Tuesday, 30 April 2024

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मंत्रालयात अभिवादन

  •  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मंत्रालयात अभिवादन


            मुंबई, दि. 30: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर यांनी यावेळी पुष्पहार अर्पण केला. कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, सहायक कक्ष अधिकारी रवींद्र बच्छाव, नितीन राणे आदींसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.



*आज की अमृत कथा

 *आज की अमृत कथा

एक बार एक तपस्वी जंगल में तप कर रहे थे। नारद जी उधर से निकले तो उन्होंनेे साष्टांग प्रणाम किया और पूछा -मुनिवर कहाँ जा रहे हैं ? नारदजी ने कहा -विष्णुलोक को भगवान के दर्शन करने जा रहे हैं। तपस्वी ने कहा - एक प्रश्न मेरा भी पूछते आइए कि -मुझे उनके दर्शन कब तक होंगे ?


 नारद जी विष्णुलोक पहुँचे तो उन्होंने उस तपस्वी का भी प्रश्न पूछा -भगवान ने कहा-84 लाख योनियों में अभी 18 बार उसे और चक्कर लगाने पड़ेंगे तब कहीं मेरे दर्शन होंगे। वापिस लौटने पर नारदजी ने यही उत्तर उस तपस्वी को सुना दिया।


 तपस्वी अधीर नहीं हुए । समय की उन्हें जल्दी न थी। इतना आश्वासन उन्हें पर्याप्त लगा कि भगवान के दर्शन देर सबेर में उन्हें होंगे अवश्य ! इससे उन्हें बड़ी प्रसन्नता हुईं और दूने उत्साह के साथ अपनी तपस्या में लग गये। उनकी इस अविचल निष्ठा और धैर्य को देखकर भगवान बड़े प्रसन्न हुये और उन्होंने तुरन्त ही उन तपस्वी को दर्शन दे दिये।


कुछ दिन बाद नारद जी उधर से फिर निकले तो भक्त ने कहा -मुझे तो आपके जाने के दूसरे दिन ही दर्शन हो गये थे। इस पर नारद जी बहुत दुःखी हुये और विष्णु भगवान के पास जाकर शिकायत की कि आपने मुझसे कहा इनको लंबी अवधि में दर्शन होंगे और आपने तुरन्त ही दर्शन देकर मुझे झूठा बनाया।


भगवान ने कहा -नारद जिसकी निष्ठा अविचल है जिसमें असीम धैर्य है उसके तो मैं सदा ही समीप हूँ। देर तो उन्हें लगती है जो उतावली करते हैं । उस भक्त के प्रश्न में उतावली का आभास देखकर मैंने लंबी अवधि बताई थी पर जब देखा कि वह तो बहुत ही धैर्यवान है तो उतना विलंब लगाने की आवश्यकता न समझ और तुरन्त दर्शन दे दिये..!!


    *जय श्री कृष्ण*

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

 महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

                                                                                   

            मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम आज घेण्यात आली. यावेळी अवर सचिव मिलिंद हरदास यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 

            अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) निखिल गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) डॉ.आरती सिंह यांच्यासह वरिष्ठ शासकीय तसेच पोलीस अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

 

            आज झालेल्या रंगीत तालीम मध्ये राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र बल, बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस ध्वज, मुंबई पोलीस ध्वज, राज्य राखीव पोलीस बल ध्वज, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वज, मुंबई अग्निशमन दल ध्वज, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, बृहन्मुंबई पोलीस आणि मुंबई लोहमार्ग पोलीस ब्रास बॅण्ड पथक, राज्य राखीव पोलीस बलाचे पाईप बॅण्ड पथक, बृहन्मुंबई पोलीस विभागाचे निर्भया वाहन पथक, मुंबई अग्निशमन दलाचे हाय राईज फायर फायटिंग वाहन, हायड्रोलिक प्लॅटफॉर्म आणि 64 मीटर टर्न टेबल लॅडर आदी पथकांनी सहभाग घेतला.

 

उत्कृष्ट संचलन पुरस्कार

 

            भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना रंगीत तालीम दरम्यान मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये शासकीय सेवेतील सहभागी पथकांच्या गटात गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याच्या सी-60 पथकाने प्रथम, राज्य राखीव पोलीस बलाने द्वितीय तर बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथकाने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला. शालेय सहभागी पथकांमध्ये रोड सेफ्टी पेट्रोल (मुले), डॉ.अँटोनियो डा सिल्वा हायस्कूल, दादर च्या पथकाने प्रथम तर रोड सेफ्टी पेट्रोल (मुली), एमसीएम मुलींचे हायस्कूल, काळाचौकी च्या पथकाने द्वितीय क्रमांक पटकावला. स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम गटात नायगाव/ परेल भोईवाडा म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने प्रथम, ग्लोब मिल पॅसेज म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने द्वितीय तर सांताक्रुझ पूर्व मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने तृतीय क्रमांचा पुरस्कार मिळविला. 

 

            या समारंभात किरण सुरेश शिंदे, अरुण सुरेश शिंदे, विवेक विनोद शिंदे यांनी सनई चौघडा वादन केले. तर शिबानी जोशी आणि पल्लवी मुजुमदार यांनी सूत्रसंचलन केले.

 

00000

दिव्यांग मतदारांमध्ये मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम

 दिव्यांग मतदारांमध्ये मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम

 

            मुंबई, दि. २९ :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सुविधांची माहिती दिव्यांग मतदारांपर्यंत पोहोचवण्याकरिता व मतदानाबाबत जनजागृतीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी कार्यरत शासन मान्यताप्राप्त दिव्यांग शाळांतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.

        लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील '३०-दक्षिण मध्य मुंबई' व '३१-मुंबई दक्षिण' या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत २० मे, २०२४ रोजी सकाळी ०७ ते सायंकाळी ०६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

         दिव्यांग मतदारांचा मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली 'स्वीप' कार्यक्रमांतर्गत दिव्यांग मतदारांसाठी शाळांतर्फे राबवण्यात आलेल्या उपक्रमात मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी, पालक यांच्यासमवेत मेळावे, बैठका, चर्चासत्र घेऊन जास्तीत जास्त संख्येने मतदान करणेबाबत आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे मतदान जागृतीसाठी प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. प्रभात फेऱ्यांद्वारे दिव्यांग मतदारांनी मतदानाच्या दिवशी १०० टक्के मतदान करण्याबाबतचे आवाहन विद्यार्थ्यांतर्फे करण्यात आले. या उपक्रमामध्ये मुंबई शहर जिल्ह्यातील माहिम येथील शिवाजी पार्क लायन्स डेफ स्कूल, दादर येथील श्रीमती कमला मेहता अंधशाळा, माटुंगा येथील मीरा विद्यालय विशेष मुलांची शाळा, शिवडी येथील जय वकील ऑटिझम सेंटर, माहीम येथील लायन्स स्कूल फॉर डेफ, सीपी टॅंक येथील ए.के. मुन्शी योजना स्कूल, नॅब वर्कशॉप फॉर ब्लाइंड या दिव्यांगासाठी कार्यरत शाळा व संस्था सहभागी झाल्या.

        दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये दिव्यांग व्यक्तींची गृह भेट घेऊन त्यांना मतदानाच्यादिवशी व्हीलचेअर, मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी वाहन सुविधा उपलब्धतेबाबत माहिती दिली. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी संबंधित दिव्यांग मतदाराला आवश्यक असलेले साधन उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानुसार प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी संबंधित दिव्यांग मतदाराला आवश्यकतेनुसार मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहन सुविधा (रिक्षा, टॅक्सी तसेच व्हीलचेअर युक्त वाहने) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मतदानाकरिता दिव्यांग मतदारांना रांगेत उभे राहावे लागणार नाही, प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प, स्वच्छतागृहे, व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अंध मतदारांना मतदान केंद्रावर ब्रेल लिपीमध्ये बॅलेट पेपर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर दिव्यांगांना मदत करण्यासाठी स्वयंसेवक उपलब्ध असणार आहेत. ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेले मतदार व वय वर्षे ८५ व अधिक वयोमान असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पोस्टल बॅलेट म्हणजे घरी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

            भारत निवडणूक आयोगाकडून दिव्यांगांना उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधेची माहिती देण्यासाठी कर्णबधिर प्रवर्गाच्या शाळांनी सांकेतिक भाषेमध्ये रिल्स बनवून समाज माध्यमांद्वारे जनजागृतीचा प्रयत्न केला जात आहे, असे सुनीता मते, जिल्हा समन्वय अधिकारी दिव्यांग सुगम्यता, मुंबई शहर यांनी सांगितले.

००००

मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात चार उमेदवारांची सात नामनिर्देशनपत्रे दाखल

 मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात

चार उमेदवारांची सात नामनिर्देशनपत्रे दाखल

 

            मुंबई, दि. २९ : मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३१- मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज २९ एप्रिल रोजी चार उमेदवारांनी सात नामनिर्देशनपत्रे दाखल केले आहेत.

     आज नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये मोहम्मद माहताब अख्तर हुस्सेन शेख (बहुजन मुक्ती पार्टी)(१ अर्ज), डॉ. मयुरी संतोष शिंदे (अपक्ष)(१ अर्ज), अरविंद गणपत सावंत - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (१+३ अर्ज), सबिहा बानो  (अपक्ष)(१ अर्ज) यांचा समावेश आहे.

****

28 लोकसभा मतदारसंघात दोन उमेदवारी अर्ज दाखल

 मुंबई उत्तर पूर्व -28 लोकसभा मतदारसंघात दोन

उमेदवारी अर्ज दाखल

- निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

 

            मुंबई, दि. 29 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई  उपनगर जिल्ह्यातील २८ - मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात 26 एप्रिल रोजी अर्ज स्वीकृती प्रक्रियेस सुरवात झाली.  आज दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केला असल्याची माहिती मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे.

            आज दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी  1 ) भवानी हिरालाल चौधरी (सरदार वल्लभ भाई पटेल पार्टी )  (2) बबन सोपान ठोके (अपक्ष) या उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

            लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात  मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. मुंबई उत्तर पूर्व या लोकसभा मतदारसंघाअंतर्गत  155 - मुलुंड, 156 - विक्रोळी, 157 - भांडुप पश्चिम, 169 - घाटकोपर पश्चिम, 170 - घाटकोपर पूर्व, 171 - मानखुर्द शिवाजीनगर हे विधानसभा मतदारसंघ येतात. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 3 मे 2024 रोजी दुपारी 3.00 पर्यंत आहे. 4 मे रोजी दाखल अर्जाची छाननी करण्यात येईल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ६ मे २०२४ आहे. दिनांक २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे आणि 4 जून रोजी मतमोजणीची प्रक्रिया उदयांचल शाळा, गोदरेज संकुल, विक्रोळी येथे करण्यात येणार आहे.

000

दुचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन मालिका

 मुंबई (पूर्व) प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत

दुचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन मालिका

 

              मुंबई, दि. 29 : प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) येथे दुचाकी वाहनांसाठी असलेली MH03EM ही मालिका संपत आहे. त्यामुळे दुचाकी वाहनांसाठी MH03EN नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका सुरू करण्यात येणार आहे.

             ज्या वाहन धारकांना आपल्या वाहनांसाठी या नवीन क्रमाकांच्या मालिकेतून आकर्षक अथवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असेल, त्यांना विहित नमुन्यातील अर्ज, पत्त्याचा पुरावा, छायाचित्र ओळखपत्र, पॅनकार्ड आणि पसंतीच्या क्रमांकासाठीच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) (REGIONAL TRANSPORT OFFICE MUMBAI) (EAST) किंवा आरटीओ, मुंबई (पूर्व) (RTO MUMBAI) (EAST) यांच्या नावे काढलेल्या विहीत शुल्काचा राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्षासह 2 मे 2024 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) कार्यालयात सादर करावा.

             एकाच नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास महाराष्ट्र शासनाच्या 8 मे 2016 च्या अधिसुचनेनुसार नियमित शुल्का व्यतिरिक्त सर्वात जास्त रकमेच्या धनाकर्ष सादर करणाऱ्यास हा नोंदणी क्रमांक देण्यात येईल. आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक देण्यासाठीची कार्यपद्धती या कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेली आहे. अनधिकृत व्यक्तीकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी वाहन धारकांनी स्वत: कार्यालयात जावून अर्ज करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहीरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

००००

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चौथ्या टप्प्यात राज्यात 298 उमेदवार निवडणूक रिंग

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चौथ्या टप्प्यात राज्यात 298 उमेदवार निवडणूक रिंगणात मुंबई, दि. 29 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील 11 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात 369 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील 71 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 298 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. चौथ्या टप्प्यातील अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या : नंदुरबार 11, जळगाव 14, रावेर 24, जालना 26, औरंगाबाद 37, मावळ 33, पुणे 35, शिरुर 32, अहमदनगर 25, शिर्डी 20, बीड 41 अशी आहे. या 11 मतदारसंघांमध्ये 13 मे रोजी मतदान होणार आहे. ००००

Monday, 29 April 2024

जैन समाजासाठी जैन महामंडळ

 कोल्हापूर : देशाच्या विकासात जैन समाजाचे मोठे योगदान आहे व दातृत्वात सदैव अग्रेसर राहिलेला जैन समाज हा परंपरेने आमच्या पाठीशी राहिलेला समाज आहे. जैन समाजाच्या विकासासाठी हे सरकार नेहमीच कटिबद्ध राहील. "अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाने" केलेल्या मागणी अनुसार जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापण्याचा निर्णय सरकार घेईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

                अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या "जैन जागृती अभियान" या विशेष कार्यक्रम प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरील घोषणा केली.

                        मुख्यमंत्री पुढे म्हणाले की जैन समाजाच्या साधुसंतांच्या रक्षणासाठी, जैन मंदिर, जैन तीर्थांच्या रक्षणासाठी व जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एक स्वतंत्र जैन महामंडळ स्थापन व्हावे ही काळाची गरज आहे आणि जैन अल्पसंख्याक महासंघा ची मागणी मान्य करत महाराष्ट्र राज्यामध्ये जैन विकास महामंडळ लवकरच स्थापन करण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की महाराष्ट्रातील जैन समाजातील व्यापारी, उद्योजकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे हे सरकार असून राज्यात विकासाच्या योजना साठी सरकार कधीही मागे हटणार नाही. व्यापारी- उद्योजकांना कोणतीही अडचण आल्यास तुम्ही थेट माझ्याशी संपर्क करू शकता.

                        नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले की कोल्हापूरच्या विकासातही जैन समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे व महायुती सरकार  नेहमीच जैन समाजाच्या पाठीशी आहे व यापुढेही असेल.

                        जैन समाजाचे राष्ट्रीय अधक्ष ललित गांधी यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणात, जैन अल्पसंख्यांक महासंघाने गेल्या दहा वर्षात केलेला कामाची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी व्यापारी व उद्योजकांसाठी घेतलेल्या विविध कल्याणकारी निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले. जैन समाजाचे पवित्र तीर्थ सम्मेद शिखरजी, पालीताना, गिरणारजी नाकोडाजी या तीर्थक्षेत्रावरील समस्या सोडवण्यासाठी सरकारने केलेल्या सहकार्याबद्दल, त्याचबरोबर संभाजीनगर येथील कीर्तीस्तंभ हटवण्याचा निर्णय रद्द केल्याबद्दल आणि जैन साधुसंतांना त्यांच्या विहारांमध्ये पोलीस संरक्षण पुरवण्याचे आदेश काढल्याबद्दल राज्य व केंद्र सरकारला धन्यवाद दिले.

                        या प्रसंगी ललित गांधी यांनी जैन समाजातील  कर्जफेड करणाऱ्या १६००० अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नसल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली  यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी तातडीने निर्देश दिले जातील व प्रत्येक शेतकऱ्याला हे अनुदान मिळेल याची ग्वाही दिली.

                        जैन महासंघाने मागणी केलेल्या जैन विकास आयोग महामंडळ च्या स्थापनेस पाठिंबा दिलेल्या राज्यातील 160 आमदार व 28 खासदारांच्या शिफारस पत्रासह तयार केलेला प्रस्ताव ललित गांधी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला

                        अलीकडच्या काळात जैन समाजावर होत असलेल्या वेगवेगळ्या आघात व साधुसंतांच्या रक्षणासाठी जैन समाजात आज एक सशक्त संघटनेची आवश्यकता आहे व त्या अनुषंगानेच अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वात "राष्ट्रीय जैन सेने"ची स्थापना महावीर जन्म कल्याणक च्या पवित्र दिवशी करण्यात आली आहे अशी माहिती राष्ट्रीय जैन सेनेचे राष्ट्रीय उपप्रमुख संदीप भंडारी यांनी यावेळी दिली. तसेच राष्ट्रीय जैन सेना ही अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तथैवच: या तत्त्वाने काम करेल व जिथे ही गरज पडेल तिथे 'राष्ट्रीय जैन सेना' चे जैन सैनिक वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून जैन समाजाच्या मान व सन्मानाची रक्षा करण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही असे या वेळेस संदीप भंडारी यांनी सांगितले.

                        याप्रसंगी संभवनाथ जैन ट्रस्ट गुजरीचे अध्यक्ष नरेंद्र ओसवाल, लक्ष्मीपुरी जैन ट्रस्टचे अध्यक्ष कांतीलाल ओसवाल, भक्ती पूजा नगर ट्रस्ट अध्यक्ष राजेंद्र ओसवाल, महावीर नगर जैन संघ चे अध्यक्ष जवाहर गांधी, शत्रुंजय संघ ट्रस्ट चे अध्यक्ष अमृत शहा, प्रशम ओसवाल, हिम्मत ओसवाल, महेंद्र ओसवाल, विकास अच्छा, प्रीती पाटील, अमित वोरा, प्रितेश कर्नावट, मेघ गांधी, प्रीतम बोरा, राजेश ओसवाल इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


फोटो : जैन विकास महामंडळ स्थापना करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देताना समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी, संदीप भंडारी, नरेंद्र ओसवाल, याप्रसंगी सोबत राजेश क्षीरसागर, कांतीलाल ओसवाल व अन्य मान्यवर दिसत आहेत

सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

 सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांची

 ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

 

            मुंबई, दि. २९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास'  कार्यक्रमात सांगलीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ राजा दयानिधी यांची 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ सांगली जिल्हा प्रशासन सज्ज' या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत मंगळवार दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरुन तसेच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरुन सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल आहे.सांगलीचे जिल्हा माहिती अधिकारी फारुक बागवान यांनी ही मुलाखत घेतली आहे.

          लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यात निवडणुकीचे कामकाज पार पाडण्यासाठी सुरु असलेली कार्यवाही. मतदान केद्रे व मतमोजणी केंद्रावर करण्यात आलेली तयारी,मतदार जनजागृती,कायदा व सुव्यवस्थेचे नियोजन, मतदारांसाठी सोयीसुविधा आदींबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी माहिती दिली आहे.


दिव्यांग मतदारांमध्ये मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम

 दिव्यांग मतदारांमध्ये मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम

 

            मुंबई, दि. २९ :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सुविधांची माहिती दिव्यांग मतदारांपर्यंत पोहोचवण्याकरिता व मतदानाबाबत जनजागृतीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी कार्यरत शासन मान्यताप्राप्त दिव्यांग शाळांतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.

        लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील '३०-दक्षिण मध्य मुंबई' व '३१-मुंबई दक्षिण' या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत २० मे, २०२४ रोजी सकाळी ०७ ते सायंकाळी ०६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

         दिव्यांग मतदारांचा मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली 'स्वीप' कार्यक्रमांतर्गत दिव्यांग मतदारांसाठी शाळांतर्फे राबवण्यात आलेल्या उपक्रमात मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी, पालक यांच्यासमवेत मेळावे, बैठका, चर्चासत्र घेऊन जास्तीत जास्त संख्येने मतदान करणेबाबत आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे मतदान जागृतीसाठी प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. प्रभात फेऱ्यांद्वारे दिव्यांग मतदारांनी मतदानाच्या दिवशी १०० टक्के मतदान करण्याबाबतचे आवाहन विद्यार्थ्यांतर्फे करण्यात आले. या उपक्रमामध्ये मुंबई शहर जिल्ह्यातील माहिम येथील शिवाजी पार्क लायन्स डेफ स्कूल, दादर येथील श्रीमती कमला मेहता अंधशाळा, माटुंगा येथील मीरा विद्यालय विशेष मुलांची शाळा, शिवडी येथील जय वकील ऑटिझम सेंटर, माहीम येथील लायन्स स्कूल फॉर डेफ, सीपी टॅंक येथील ए.के. मुन्शी योजना स्कूल, नॅब वर्कशॉप फॉर ब्लाइंड या दिव्यांगासाठी कार्यरत शाळा व संस्था सहभागी झाल्या.

        दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये दिव्यांग व्यक्तींची गृह भेट घेऊन त्यांना मतदानाच्यादिवशी व्हीलचेअर, मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी वाहन सुविधा उपलब्धतेबाबत माहिती दिली. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी संबंधित दिव्यांग मतदाराला आवश्यक असलेले साधन उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानुसार प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी संबंधित दिव्यांग मतदाराला आवश्यकतेनुसार मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहन सुविधा (रिक्षा, टॅक्सी तसेच व्हीलचेअर युक्त वाहने) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मतदानाकरिता दिव्यांग मतदारांना रांगेत उभे राहावे लागणार नाही, प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प, स्वच्छतागृहे, व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अंध मतदारांना मतदान केंद्रावर ब्रेल लिपीमध्ये बॅलेट पेपर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर दिव्यांगांना मदत करण्यासाठी स्वयंसेवक उपलब्ध असणार आहेत. ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेले मतदार व वय वर्षे ८५ व अधिक वयोमान असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पोस्टल बॅलेट म्हणजे घरी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

            भारत निवडणूक आयोगाकडून दिव्यांगांना उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधेची माहिती देण्यासाठी कर्णबधिर प्रवर्गाच्या शाळांनी सांकेतिक भाषेमध्ये रिल्स बनवून समाज माध्यमांद्वारे जनजागृतीचा प्रयत्न केला जात आहे, असे सुनीता मते, जिल्हा समन्वय अधिकारी दिव्यांग सुगम्यता, मुंबई शहर यांनी सांगितले.

००००

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून दोन, तर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून दोन, तर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात एक उमेदवारी अर्ज दाखल मुंबई उपनगर, दि. 29 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून दोन उमेदवारांनी, तर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून एका उमेदवाराने सोमवारी अर्ज दाखल केले. मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघातून आज भवानी हिरालाल चौधरी (सरदार वल्लभभाई पटेल पार्टी), बबन सोपान ठोके (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली. मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघातून रोहन रामदास साठोणे (अपक्ष) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिली. मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघात सोमवारपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाने दिली आहे.

महाराष्ट्र दिनी राष्ट्रध्वज पडलेले आढळल्यास यंत्रणांकडे सुपूर्द करावे मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 महाराष्ट्र दिनी राष्ट्रध्वज पडलेले आढळल्यास यंत्रणांकडे सुपूर्द करावे

मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाचे आवाहन

            मुंबई, दि. २९ : प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी, स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट व महाराष्ट्र दिन १ मे रोजी राष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन राज्यात करण्यात येते. राष्ट्रीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यात येतात. अशा कार्यक्रमांच्या ठिकाणी प्लास्ट‍िक व कागदी राष्ट्रध्वज नागरिकांकडे दिसून येतात.   याव्यतिरिक्त महत्त्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्यावेळी अशा प्रकारचे राष्ट्रध्वज निदर्शनास येतात. मात्र, कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात किंवा रस्त्यावर पडलेले असल्याचे आढळून येते. अशा कार्यक्रमांच्या ठिकाणी राष्ट्रध्वज आढळून आल्यास हे राष्ट्रध्वज गोळा करून संबंधित तहसिल कार्यालय अथवा जिल्हास्तरावरील यंत्रणेकडे सुपूर्द करावे.

            प्लास्ट‍िक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हास्तरावर व अंधेरी, बोरीवली व कुर्ला (मुलूंड) या तीन तालुक्यांकरिता तालुकास्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. येत्या १ मे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानंतर मैदानात किंवा रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज आढळून आल्यास संबंधित तहसिल कार्यालयात किंवा जिल्हास्तरावरील यंत्रणेकडे सुपूर्द करावे, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी केले आहे.

                                                                  

26- मुंबई उत्तर मतदासंघाकरीता दीपेंद्रकुमार निवडणूक खर्च निरीक्षक

 26- मुंबई उत्तर मतदासंघाकरीता

दीपेंद्रकुमार निवडणूक खर्च निरीक्षक


 


मुंबई उपनगर, दि. 29 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 26- मुंबई उत्तर मतदासंघांकरीता भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी दीपेंद्रकुमार यांची खर्च विभागाच्या निवडणूक निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे विधानसभेचे 160-कांदिवली पूर्व, 161 चारकोप आणि 162- मालाड पश्चिम या मतदासंघांचे कामकाज असेल, असे निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.


निवडणूक खर्च निरीक्षक श्री. दीपेंद्रकुमार यांचा मोबाईल क्रमांक 8928567686 असा आहे. खर्च विभागाचे निरीक्षक श्री. दीपेंद्रकुमार यांनी 26- मुंबई उत्तर मतदारसंघाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा आज घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देवरे यांच्यासह पोलिस उपायुक्त, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, खर्च पथकाचे नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.


लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवून नोंद घ्यावी. त्यासाठी संबंधित सर्व विभागांनी सतर्क राहावे. मतदानाची प्रक्रिया मुक्त व नि:पक्ष होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असेही निर्देश निरीक्षक श्री. दीपेंद्रकुमार यांनी दिले.

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाकरीता राजकुमार चंदन, किरण छत्रपती खर्च निरीक्षक

 मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाकरीता

राजकुमार चंदन, किरण छत्रपती खर्च निरीक्षक

 

मुंबई उपनगर, दि. 29 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाकरीता भारत निवडणूक आयोगाने भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी राजकुमार चंदन आणि किरण के. छत्रपती यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत आज आढावा घेतला. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये ही माहिती दिली आहे. 

या बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सूर्यवंशी यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस, आयकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, खर्च विभागाचे नोडल अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. चंदन, श्री. छत्रपती यांनी नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेत त्यांनी केलेल्या तयारीची माहिती करून घेतली. राजकीय पक्ष, उमेदवारांनी करावयाच्या निवडणूक खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी सतर्क राहावे, मतदानाची प्रक्रिया मुक्त व नि:पक्ष होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी निर्देश दिले.

खर्च निरीक्षकांची नागरिक भेट घेऊ शकतात. त्यांचा संपर्क क्रमांक असा : श्री. राजकुमार चंदन (मोबाईल क्रमांक – 93214-05417) यांच्याकडे विधानसभेचे मतदारसंघ 158- जोगेश्वरी पूर्व, 159- दिंडोशी, 163- गोरेगाव, तर श्री. किरण के. छत्रपती (मोबाईल क्रमांक - 8928571922) यांच्याकडे विधानसभेचे मतदारसंघ 164- वर्सोवा, 165अंधेरी पश्चिम, 166- अंधेरी पूर्वच्या खर्च निरीक्षणाशी संबंधित समस्यांबाबत तक्रारींसाठी संपर्क साधू शकतात, असे आवाहन खर्च विभागाचे निवडणूक निरीक्षक श्री. चंदन, श्री. छत्रपती यांनी केले आहे.

00

Silent killers

 इंग्रजी व्यतिरिक्त मराठीतही कांही शब्द 'Silent' असतात. 


उदाहरणच द्यायचं म्हटलं म्हणजे जसं की... , 


जेव्हा एखादा दुकानदार भाव करतेवेळी म्हणतो की "तुम्हाला जास्त नाही लावणार" तेव्हा यात


"चूना" हा शब्द Silent असतो.. 😂😃😅


लग्नाच्या वेळी असं म्हटल्या जातं की आमची मुलगी तर "गाय आहे गाय"


तेव्हा यात " शींगवाली" शब्द silent असतो 😂😂😜


वधूची पाठवणी करताना जेव्हा जावयाला डोळ्यांत पाणी आणून सांगितल्या जातं 

"काळजी घ्या",


तेव्हा यात "आपली" हा शब्द Silent असतो.

🤣🤣


जेव्हा एखादा नेता म्हणतो, "गरीबी हटवीन"

तेव्हा

"माझी"

हा शब्द silent असतो.

👌👌👌👌.

स्वस्थ रहा, मस्त रहा आणि हसत रहा...!😊

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

 महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

                                                                                   

            मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम आज घेण्यात आली. यावेळी अवर सचिव मिलिंद हरदास यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 

            अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) निखिल गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) डॉ.आरती सिंह यांच्यासह वरिष्ठ शासकीय तसेच पोलीस अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

 

            आज झालेल्या रंगीत तालीम मध्ये राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र बल, बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस ध्वज, मुंबई पोलीस ध्वज, राज्य राखीव पोलीस बल ध्वज, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वज, मुंबई अग्निशमन दल ध्वज, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, बृहन्मुंबई पोलीस आणि मुंबई लोहमार्ग पोलीस ब्रास बॅण्ड पथक, राज्य राखीव पोलीस बलाचे पाईप बॅण्ड पथक, बृहन्मुंबई पोलीस विभागाचे निर्भया वाहन पथक, मुंबई अग्निशमन दलाचे हाय राईज फायर फायटिंग वाहन, हायड्रोलिक प्लॅटफॉर्म आणि 64 मीटर टर्न टेबल लॅडर आदी पथकांनी सहभाग घेतला.

 

उत्कृष्ट संचलन पुरस्कार

 

            भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना रंगीत तालीम दरम्यान मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये शासकीय सेवेतील सहभागी पथकांच्या गटात गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याच्या सी-60 पथकाने प्रथम, राज्य राखीव पोलीस बलाने द्वितीय तर बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथकाने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला. शालेय सहभागी पथकांमध्ये रोड सेफ्टी पेट्रोल (मुले), डॉ.अँटोनियो डा सिल्वा हायस्कूल, दादर च्या पथकाने प्रथम तर रोड सेफ्टी पेट्रोल (मुली), एमसीएम मुलींचे हायस्कूल, काळाचौकी च्या पथकाने द्वितीय क्रमांक पटकावला. स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम गटात नायगाव/ परेल भोईवाडा म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने प्रथम, ग्लोब मिल पॅसेज म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने द्वितीय तर सांताक्रुझ पूर्व मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने तृतीय क्रमांचा पुरस्कार मिळविला. 

 

            या समारंभात किरण सुरेश शिंदे, अरुण सुरेश शिंदे, विवेक विनोद शिंदे यांनी सनई चौघडा वादन केले. तर शिबानी जोशी आणि पल्लवी मुजुमदार यांनी सूत्रसंचलन केले.

 

00000

बी.सी.झंवर/वि.सं.अ/

विवाहाची आमंत्रणपत्रिका देऊन अपमान करण्याची पद्धत म्हणजे लग्नातले स्वागत व सत्कार समारंभ!* 😊😊

 *विवाहाची आमंत्रणपत्रिका देऊन अपमान करण्याची पद्धत म्हणजे लग्नातले स्वागत व सत्कार समारंभ!*

😊😊


लग्नकार्यात आलेल्या काही मोजक्या श्रीमंत पैसेवाले व मोठ्या लोकांचे स्टेजवरून नाव घेऊन स्वागत करण्याची पद्धत म्हणजेच आलेल्या इतर सर्व नातेवाईक व मित्रपरिवाराचा अप्रत्यक्षपणे अपमान समजावा का!

 ते म्हणजे वेळात वेळ काढुन आले आणि बाकीचे येणारे काही रिकामटेकडे आहेत का?

*अशा फालतू प्रथा बंद करायला पाहिजेत, असे सुचवावेसे वाटते.*


प्रतिष्ठित असोत की पुढारी, कुणाचेही शब्दसुमनानी स्वागत करणे हेही बंद केलं पाहिजे. प्रतिष्ठित मान्यवरांचे नाव घेऊन स्वागत करायचे म्हणजे लग्नाला पैसे खर्चून येणारे बाकीचे हॉलमधील सगळे समाजबांधव अप्रतिष्ठीत असतात का? नाही. निमंत्रणाचा स्वीकार करून वधु वरांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्वच समाज बांधव आणि भगिनी, आप्तेष्ट तसेच मित्रपरिवार देखील आलेले असतात, जे विवाह सोहळ्यास वेळेवर उपस्थित राहून सोहळ्याची प्रतिष्ठा वाढवितात. तेव्हा प्रारंभीच उपस्थित सर्व वऱ्हाडी मंडळींचे शाब्दिक स्वागत करून पुढील विवाह विधी नियोजित वेळेवर पार पाडण्याची काळजी घेतली पाहिजे, असे सुचवावेसे वाटते.


🙏🙏

सी-व्हिजिल ॲपवरील प्राप्त तक्रारींचा 100 टक्के निपटारा

 सी-व्हिजिल ॲपवरील प्राप्त तक्रारींचा 100 टक्के निपटारा


                                           - निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर


            सी - व्हिजिल ॲपवर ऑनलाईन 49 तक्रारी आणि ऑफलाईन 18 तक्रारी प्राप्त झाल्या असून सर्व तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. तसेच , आचारसंहिता भंग प्रकरणी प्राप्त 18 तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. यापैकी चार प्ररकरणी जवळपास 93 लाखांची रक्कम जप्ती करण्यात आली असल्याची माहिती यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली. यापुढेही असेच काम करून पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले.


            या बैठकीस पोलिस उपायुक्त (परिमंडळ 6) हेमराज सिंग राजपूत, (परिमंडळ 7) पुरूषोत्तम कराड, (परिमंडळ 10) मंगेश शिंदे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. देविदास क्षीरसागर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, बँकेचे समन्वय अधिकारी, अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे अधिकारी, भरारी पथक आणि स्टॅटिक सर्व्हिलन्स पथकाचे अधिकारी, एक खिडकी कक्षाचे समन्वय अधिकारी अमोल शिंदे यांच्यासह सर्व पथकाचे समन्वय अधिकारी उपस्थित 

होते.


Sunday, 28 April 2024

उमेदवारांच्या खर्चाची काटेकोरपणे तपासणी करावी - केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) डॉ. सुनील यादव

 उमेदवारांच्या खर्चाची काटेकोरपणे तपासणी करावी

                                           - केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) डॉ. सुनील यादव

 

         मुंबई, दि. 28 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 28 - मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने उमेदवारांच्या खर्चाची काटेकोरपणे तपासणी करावी, असे निर्देश केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) सुनील यादव  यांनी दिले.  

            मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या विक्रोळी येथील पिरोज शहा सांस्कृतिक सभागृहातील कार्यालयात नुकतीच खर्च विभागांचे निरीक्षक डॉ. यादव यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 

            या बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर, निवडणूक खर्च विभागाचे नोडल अधिकारी सीताराम काळे यांच्यासह पोलीस अधिकारी, 155 मुलुंड, 156- विक्रोळी, 157-भांडुप पश्चिम, 169 - घाटकोपर पश्चिम , 170 - घाटकोपर पूर्व, 171 - मानखुर्द शिवाजी नगर मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

            निवडणूक खर्च विभागात नियुक्त अधिकारी - कर्मचारी यांच्या कामकाजाचा आढावा घेत निरीक्षक डॉ. यादव म्हणाले की,  मुंबई उत्तर पूर्व अंतर्गत निवडणुकीसाठीच्या उमेदवारांच्या खर्चाच्या बँक खात्यावर देखरेख ठेवणे, संवेदनशील क्षेत्रात दिवसा तसेच रात्रीच्या वेळेतही भरारी पथक आणि स्टॅटिक सर्व्हिलन्स पथकाने सतर्क रहावे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी केलेल्या खर्चाकडे बारकाईने लक्ष द्यावे. प्रत्येक बाब ही उमेदवार अथवा राजकीय पक्षांनी त्यांच्या खर्चविषयक बाबींमध्ये नोंदविली गेली असल्याबाबत  नेमलेल्या विविध पथकांनी दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

           कक्ष, तक्रार कक्ष, आचारसंहिता कक्ष, पोलीस कक्ष सर्वांनी एकत्रितरित्या काम करून, नि:पक्ष पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.  

            आचार संहितेच्या अनुषंगाने तक्रारी असल्यास 8130122499 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) डॉ. यादव यांनी केले आहे

तज्ज्ञांची व्याख्याने, गप्पा-गोष्टी, प्रदर्शन आणि बरंच काही…

 तज्ज्ञांची व्याख्याने, गप्पा-गोष्टी, प्रदर्शन आणि बरंच काही…

• “भवताल गेट-टुगेदर” १८ मे; नाव नोंदवले का?

“भवताल” शी संबंधित सर्वांनी एकत्र यावं, गप्पागोष्टी कराव्या, भवताल मासिक - कोर्सेस - इकोटूर्स - कट्टा - भिजूया मोजूया या उपक्रमांच्या निमित्ताने भेटलेल्या सर्वांशी संवाद साधावा, आठवणींना उजाळा द्यावा, एखाद्या विषयावर व्यक्त व्हावं, तज्ज्ञांकडून नवं काहीतरी ऐकावं, ज्ञानग्रहण करावं… असं “भवताल” चं गेट-टुगेदर!

दिवस आहे- शनिवार, १८ मे २०२४. ठिकाण- पुण्यात कोथरूड परिसर. सकाळी ९ ते सायं. ५ असा दिवसभराचा कार्यक्रम आहे. आमंत्रण सर्वांना आहे- “भवताल” च्या विविध उपक्रमांमध्ये‌ सहभागी झालेले किंवा सहभागी होऊ इच्छिणारे. अट एकच. पुढे दिलेल्या लिंकवरून नाव नोंदवावे. जागा मर्यादित असल्याने नावनोंदणी आवश्यक!

मग वाट कशाची पाहताय? नावनोंदणी करा आणि आपला सहभाग निश्चित करा.

तज्ज्ञ व्याख्याते:

• डॉ. कुरुष दलाल
(आर्कियॉलॉजी ऑफ फूड)

• डॉ. हिमांशू कुलकर्णी
(भूजलाच्या नव्या वाटा)

इतरही सादरीकरणे.

नाव नोंदणीसाठी लिंक:
https://forms.gle/mWqqvMWDpYAFS6Aq6

संपर्क:
bhavatal@gmail.com

• भवताल टीम

(भवताल गेट-टुगेदर)

--

भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com

29- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी सूरज कुमार गुप्ता यांची केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून नियुक्ती

  

29- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी

सूरज कुमार गुप्ता यांची केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून नियुक्ती

 

मुंबई दि. 28 – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी खर्चविषयक केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी सुरजकुमार गुप्ता (आयआरएस) यांची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाने केली आहे.

            केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) श्री. गुप्ता यांचे  कार्यालय हे  29- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, पाचवा मजला, प्रशासकीय इमारत, शासकीय वसाहत, वांद्रे पूर्व, मुंबई 400051 येथे असून त्यांचा संपर्कासाठीचा भ्रमणध्वनी क्रमांक                        +91 8591369100 असा आहे.

            आज निवडणूक निरीक्षक (खर्च) श्री. गुप्ता यांनी या मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस उपायुक्त, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, वॉर्ड ऑफीसर, राज्य उत्पादन शुल्क यासह मतदारसंघासाठी

Featured post

Lakshvedhi