इच्छुक विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे यासाठी
जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काऊट गाईडची अंमलबजावणी करावी
- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 12 : विद्यार्थ्यांना बालवयापासूनच मूल्य शिक्षण, स्वावलंबन, शिस्त, संस्
राज्यातील जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काऊट गाईडची अंमलबजावणी करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव, उपसचिव तुषार महाजन, क्रीडा विभागाचे सहायक संचालक तथा महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् चे राज्य चिटणीस मिलिंद दिक्षित उपस्थित होते. तर शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
मंत्री श्री.भुसे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या माता पित्यांचा, वडीलधाऱ्यांचा, गुरु
राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी स्काऊटचा गणवेश उत्कृष्ट असून तो घातल्यानंतर विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो, असे यावेळी नमूद केले.