Showing posts with label सामाजिक मार्गदर्शन केंद्र. Show all posts
Showing posts with label सामाजिक मार्गदर्शन केंद्र. Show all posts

Tuesday, 22 October 2024

जन जागर

सर्वांना विनंती आहे की PM Kisan list.Apk Gharkul yojana.Apk CSC CENTER.APK SBI Rewards.APK MGB Rewards.APK Solar Pump list.Apk इत्यादी कुठलीही APK (android app) फाईल डाऊनलोड, करून install किंवा उघडू नये म्हणजे ह्या PDF किंवा डॉक्युमेन्ट फाईल नसतात. ही APK फाईल डाऊनलोड किंवा इंस्टॉल केल्यावर लगेच आपला मोबाईल चे नियंत्रण जाते म्हणजे मोबाईल हँग होतो, तसेच हँग करणारी व्यक्ती त्या मोबाईल वरून ग्रुप वर ही APK फाईल सर्व ग्रुप वर पाठवते. व त्या मोबाईल वरील फोनेपे, गुगल पे, पे टीम, अमेझॉन सारखे ॲप हॅक करून धडाधड 7 ते 8 OTP येतात व बँक खाते रिकामे होते. तसेच बँकेतून पैसे कमी झालेले SMS येतात ते सुद्धा हॅकर माणसे डिलीट करून टाकतात त्यामुळे आपल्याला समजत नाही. उपाय - ही ॲप इंस्टॉल करून मोबाईल हँग झाले असता लगेच शक्य झाल्यास जमल्यास इंटरनेट बंद करून, इंस्टॉल झालेले ही ॲप लगेच uninstall करणे किंवा डिलीट करणे तरी सर्वांनी अश्या frauds ला बळी पडू नये... 🙏

Monday, 21 October 2024

खास गृहिणी साठी फराळ बनवायला tipa

 👆


*या वेळी दिवाळीचे तळण सुरुवात करून संपवावे. तेल कमी लागेल.*


*भरतीची वेळ विचारात घेऊन तयार केले आहे.*


*21 Oct 2025 ते 27 Oct 2025*


▪︎ 21 OCT: कृ .5 // 12.30 ते 3.30 pm

▪︎ 22OCT: कृ .6 // 1.30 ते 4.30 pm

▪︎ 23 OCT: कृ .7 // 2.25 ते 5.25 pm

▪︎ 24 OCT: कृ .8 // 3 ते 6 pm

▪︎ 25 OCT: कृ .9 // 3.30 ते 6.30 pm

▪︎ 26 OCT: कृ .10 // 4.30ते 7.30 pm

▪︎ 27OCT: कृ .11 // 5.30 ते 8.25 pm


*भरती आणि ओहोटीचा स्वयंपाकावर परिणाम होतो का ?*


उत्तर: हो


▪︎ एखाद्या वर्षी दिवाळीत मोठ्या प्रमाणात चकल्या, अनारसे , शंकरपाळे केल्यावर ते पदार्थ आपण ज्या डब्यात ठेवतो, त्याच्या तळाशी खूप सारे तेल जमते, आणि ते पदार्थ ही मऊ होतात. पदार्थ करणारी व्यक्ती आणि जिन्नसाचे प्रमाण ही तेच असते परंतु त्या पदार्थांत खूप तेल शोषले जाते. बटाटेवडे / भजी केलीे तर कधी कधी ते खूप तेल पितात. ह्याचे कारण म्हणजे तो पदार्थ नेमका ओहोटीच्या वेळेत तळला गेलेला असतो.


▪︎ जर पदार्थ भरतीच्या वेळेत तळला गेला तर खूप कमी तेल लागते व पदार्थ ही छान होतो आणि आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले असते.


*भरती ओहोटीची वेळ कशी काढावी ?*


ती खालील प्रमाणे वृत्तपत्रात किंवा नेटवर ती मिळतेच पण एक साधी आणि सोपी पद्धत खाली देत आहेत. 

पंचागावर आजची तिथी बघावी  ,उदारणार्थ आजची कृ. ५ आहे , तिथी कृ. ५ × ३/४ = ३.७५ , आता ३.७५ म्हणजे दुपारी ३.३० वाजता पूर्ण भरती आहे. पूर्ण भरतीच्या साधारण 3 तास आधी तळण सुरू करावे. (सकाळी १२.३०  वाजल्यापासून ते दुपारी ०३.३० वाजेपर्यंत) पण जर तुम्ही दुपारी १२.३० नंतर तळणाला सुरवात केलीत तर जसजशी वेळ पुढे जाईल तसतसे पदार्थ जास्त तेल शोषेल.


▪︎ जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात तळण करणार असू तेंव्हा ही वेळ पाळली तर पदार्थात तेल खूप कमी शोषले जाईल, पदार्थही चांगला होईल आणि ते आरोग्यासही उत्तम राहील. आमच्या घरी दिवाळीचे सर्व पदार्थ वरील पद्धतीने भरती आणि ओहोटीची वेळ बघून केले जातात. हा प्रयोग तुम्हीही अवश्य करून बघा ; विशेष करून केटरिंगचा व्यवसाय करणार्यांनी.


▪︎ वरील पोस्टचे शास्त्रीय विश्लेषण आपण विज्ञानात शिकलो आहे की---- Attraction - Repulsion (आकर्षण विकर्षण), Ionic bond, Covalent bond ,Vanderwaal's forces, Hydrophobic (स्निग्धता / Aromatic, oily fatty principal),


▪︎ स्पष्टीकरण: -


भरतीच्या वेळेस हायड्रोफिलिक फोर्सेस (पाणीतत्व) जास्त कार्यरत असते. केवळ समुद्राचेच नाही, तर मनुष्याच्या शरीरात असलेल्या ५-६ लीटर द्रव पदार्थ, रक्त, होर्मोन्स यावर सुद्धा परिणाम होतो, पोर्णिमा, अमावस्या, अष्टमी या तिथींना हे फोर्सेस जास्त एक्टीव असतात. म्हणून, मानसिक आजार असलेल्यांत वेडाचे झटके / अंगात येणे, चिडचिड, हे प्रकार अंगातील द्रवरूप व पाणी असलेले होर्मोन्स अप डाऊन होत असल्याने या तिथींवर मूडवर जास्त परिणाम होतो. याच तत्वाने समुद्रास भरती येणे, पाऊस कमी जास्त पडणे, आणि देवतांचे शक्तीतत्व जास्त कार्यरत असणे, हे प्रकार अष्टमी व पौर्णिमेस घडतात, कारण जलतत्व जास्त कार्यरत असते. मनास चंचल, ऊद्विग्न, डीप्रेस्ड वाटत असता मूठभर मीठ कोमट पाण्यात टाकून आंघोळ करावी, भरतीच्या वेळी जलतत्व जास्त कार्यरत असल्याने जास्त सुलभतेने मीठ विरघळू शकते, मीठात NaCl मध्ये निगेटिव शक्ती खेचून घेण्याची क्षमता असते,कारण मीठ पाण्यात विरघळले, की घन व ऋण (positive & negative) आयन्स् (प्रभारित अणू) तयार होवून ते वीजवहन करू शकतात. आपल्या शरीरात पण वीजवहन सतत सुरू असते. मीठाचे पाणी अधिक पातळ व गुळगुळीत असल्याने मल साफ करण्यास पण मदत करते. यास्तव, भरतीच्या वेळेस घरच्या बादलीत मीठ पाण्यात घालून आंघोळ केल्यास मनास शांती लाभू शकते.


▪︎ तळणीचे तेल हे पाण्याच्या विरूद्ध धर्माचे (hydrophobic) असल्याने भरतीच्या वेळेत त्याचे शोषण पदार्थात कमी होते. पाण्याचे शोषण करायची पदार्थाची वृत्ती (hydrophilic) तेव्हा असते. याऊलट ओहोटी लागताच पाण्याचा प्रभाव (हायड्रोफिलीक /hydrophilic effect) व पृथ्वीवरील जलतत्वाचा परिणाम कमी होवून तैली पदार्थ (हायड्रोफोबिक/ hydrophobic ईफेक्ट) वाढतो, त्यामुळे ओहोटी लागली की तळण जास्त तेल पीत असणार. याच तत्वाने खिचडी, दाल, वरण, भाजी करताना भरतीच्या वेळेस कमी शिट्ट्या लागून शिजावे, तर ओहोटीच्या वेळेस वेळ लागू शकतो.


▪︎ याच तत्वाने जास्तीत जास्त शक्ती ग्रहण करायची क्षमता असलेले देवी देवता अष्टमी, वा पौर्णिमेस अवतार घेतात. ऊदाहरणार्थ -- चैत्र पौर्णिमेस हनुमान, श्रावण पौर्णिमेस बलराम, अष्टमीस कृष्ण वा देवी, आश्विन पौर्णिमेस शिववक्ती भ्रमण, मार्गशीर्ष पौर्णिमेस दत्तात्रेय ईत्यादी.


पृथ्वी तालावर ७० टक्के पाणी नि मानवी शरीरातही ७० टक्के पाण्याचे प्रमाण म्हणून भरती ओहटीचा समुर्द्रवर व मानवी शरीरातील पाण्यावर परिणाम होतो हे माहीतच होते पण अन-धान्य नि पाकशास्त्रावरही भरती ओहतीचा परिणाम होतो हे वाचून धन्य झालो. 


कौतुकाचे शब्द थिटे पडतील असा लेख.


जगातला कोणताही आरोग्यशास्त्र तुलनात्मकरीत्या भारतीय आरोग्यशास्त्र च्या जवळपास ही नाही असे आमचे महान अभ्यासपूर्ण भारतीय आरोग्यशास्त्र तसेच धन्य ते भारतीय धन्वंतरी ज्यांनी भारतीय आरोग्य शास्त्रास श्रीमंत केले नि करत आहात .


*दिवाळीचा फराळ न्यूजपेपरवर ठेवू नका, तर गंभीर आजाराचा धोका!*


दिवाळीला काही दिवस बाकी आहेत. दिवाळीचा फराळ करण्यात अनेक जण मग्न असतील. मात्र, तुम्ही तळलेल्या पदार्थांमधील तेल टिपण्यासाठी न्यूजपेपरचा वापर कराल तर गंभीर आजाराचा धोका अधिक आहे.


दिवाळीचे प्रमुख आकर्षण असते दिवाळी फराळाचे. घरात-घरात लाडू, चिवडा, चकली, करंजी, शंकर पाळ्या, अनारसे आदी अनेक पदार्थ केले जातात. अनेक पदार्थ तळलेले असतात. त्यामुळे तेल टिपण्यासाठी न्यूजपेपर पसरले जातात. मात्र, न्यूजपेपरसाठी जी शाही वापरतात ती आरोग्याला अत्यंत धोकादायक असते. यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.


*हा धोका अधिक वाढतो?*


- मासिके किंवा वर्तमानपत्रामधील शाई तेलकट पदार्थांमध्ये सहज शोषली जाते. शाईमधील ग्राफाईट हा घटक घातक असल्याने यामुळे कॅन्सरचा धोकाही असतो. 


- शरीरातील विषारी घटक मूत्रविसर्जनातून किंवा शौचातून बाहेर पडतात परंतु ग्राफाईट शरीरात साचून राहतो. त्याचा परिणाम किडनी आणि फुफ्फुसांवर होतो. 


- न्यूजपेपरमधील शाईतील सॉल्वंट्स पचनक्रियेत बिघाड करते. तसेच हार्मोन्सच्या पातळीमध्ये संतूलन बिघडविते. परिणामी कॅन्सरचा धोका वाढतो. 


- पेपरपेक्षा मासिकाचा कागद तुम्हांला अधिक चांगला वाटत असल्यास हा तुमचा गैरसमज आहे. कागद अधिक ग्लॉसी बनवण्यासाठी तसेच शाई स्प्रेड होऊ नये म्हणून वापरले जाणारे घटक अधिक धोकादायक असतात. 


- पदार्थांमधील अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी टीश्यू पेपर किंवा पेपर टॉवेलचा वापर करा.  


- टिश्यू पेपर किंवा टॉवेल घाऊक घेतल्यास फार महाग पडत नाहीत. मात्र तुम्हांला कागदाचाच वापर करायचा असल्यास किमान छपाई न केलेला कागद वापरा.


Wednesday, 16 October 2024

मतदारांसाठी सुविधा

 मतदारांसाठी सुविधा

दिव्यांग मतदार (PwDs) :- भारत निवडणूक आयोगाने या वर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूने सक्षम" हे अॅप उपलब्ध करुन दिलेले आहे. त्या माध्यमातून तसेच विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम 2024 (दुसरा) च्या कालावधीत दिव्यांगांसाठी विशेष शिबीरे राबवून जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी करुन घेण्यात आली आहे. आजमितीस 6 लाख 36 हजार 278 इतक्या मतदारांची नावे त्यांच्या मागणीनुसार दिव्यांग मतदार म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहेत. त्यापैकी ज्या मतदारांच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण 40 टक्के पेक्षा जास्त असेल अशा मतदारांपैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेव्दारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल.

            ही सर्व प्रक्रिया करताना वेळोवेळी राज्य व जिल्हा स्तरावर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत. दि.30 ऑगस्ट 2024 रोजी अंतिमरित्या प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार याद्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या सर्व प्रयत्नांमुळे मतदार यादी मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. सन २०१९ च्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येमध्ये अद्यापपर्यंत 69 लाख 23 हजार 199 इतकी वाढ झाली आहे.

Featured post

Lakshvedhi