Showing posts with label खाऊ-गल्ली. Show all posts
Showing posts with label खाऊ-गल्ली. Show all posts

Sunday, 21 May 2023

घटना

 आजोबांनी कष्ट करून विकत घेतलेली, कसलेली, माझ्याच आज्याची शेती माझ्या बापाच्या नावावर करावी म्हणून तलाठी सज्जात गेलो . . .


तलाठ्यानं सांगितलं -

काम करू पण,

 देणार किती ?

मला वाटलं शेती आमची, 

बाप माझा, 

आजा माझा.

मग याला का पैसे द्यायचे ?


तलाठ्याची तक्रार करावी म्हणून पोलिस स्टेशनला गेलो.

पोलीस म्हणाले -

 गुन्हा दाखल करू, तपास करू पण . . .

आमच्या चहा पाण्याचं काय ?


मला पुन्हा राग आला.

यांना तर, सरकार म्हणजेच मी पगार देतोय मग पुन्हा हे चिरीमिरी का मागत असतील.


म्हटलं हे आमदारांच्या कानावर टाकू,

आमदार म्हटले . . .

 त्याची गडचिरोलीला बदली करू, 

त्याला निलंबित करू,

मंत्र्यांना भेटू पण . . .

वजन ठेवल्या शिवाय फाईल पुढं जातच नाही.


मला वाईट वाटलं.

यांना तर मी मतदान केलं होतं.


वाटलं कोर्टात जाऊ . . .

गेलो.

तिथं गेल्यावर कळलं की,

तिथं एक आज-उद्या मरेल अशी म्हतारी आली आहे. 


तिच्यावर तरुणपणी अत्याचार झाला होता. त्या मॅटरची तारीख होती.

अजून निकाल लागला नव्हता.

शिवाय निकाल कसा लागेल याची खात्री नव्हती. 


म्हटलं हे एखाद्या . . . पत्रकार, 

लेखक, 

कवीला सांगावं . . .

*मन हलकं करावं !* आपल्या प्रश्नांना ते आवाज देतील.


तिकडे गेलो s s

तर सगळेच म्हणाले, 

पेन आमच्या हातात असला तरी,

त्यातली शाई आम्ही विकली आहे.

आम्ही तसं लिहू शकत नाही.

आमचे हात अन . . .

पेन बांधलेले आहेत. 


मला याचा प्रचंड राग आला होता.

म्हणून एका साधू कडे गेलो.

वाटलं तेवढीच आत्मशांती मिळेल.

मठावरचे सेवेकरी म्हणाले . . .

*उद्या या !*


सध्या भाऊसाहेब,

 P I साहेब, 

आमदार साहेब, 

पत्रकार साहेब,

लेखक, 

कवी आले आहेत.

महाराज त्यांच्यासोबत बिझी आहेत, 

नंतर . . .

 त्यांच्या सोबत जेवायला बसणार आहेत. 

आज ते तुम्हाला टाईम देणार नाहीत.


माझा सगळ्यांवरचा विश्वास उडाला होता.

म्हटलं जनतेच्या दरबारात जाऊ ...!


लोकांसमोर गेलो, लोकांना हे सांगितलं.

लोकं म्हटली हा येडा झालाय् . . . . .

हल्ली काही बरळतोय् !

नंतर कळलं . . .

*लोकं गुलाम झाली आहेत !*

लाचार झाली आहेत !


क्षणभर वाईट वाटलं.


मी करणार तरी काय होतो.


त्यांच्यात सामील व्हावं कि मरावं ?

कि मारावं यांना . . .



😢 😢 


*- मी एक मतदार !*

( या देशाचा मालक ? )

Monday, 12 September 2022

Bharitya संस्कृती विश्व माझे घर

 यह देखिए इंग्लैंड की महारानी की मृत्यु के बाद भारतीय सनातन का शांति पाठ किया जा रहा है और हम पाश्चात्य सभ्यता में आकर श्राद्ध का और शांति पाठ का उपहास उड़ाते हैं। हमको अपनी संस्कृति का अपमान करते हुए तनिक भी लज्जा नहीं आती। 🙏🙏


Monday, 15 August 2022

मी मोदक बनवतो बर का.

 गणपती बाप्पा घरी येणार. त्यांना त्यांच्या आवडीचे मोदक करायचेत. आम्हाला पण खूप आवडतात. मुलांना तर गणपतीत मोदक खायला मिळणार याचा खूप आनंद असतो. खूप इच्छा आहे घरी करायची, पण काय करणार मोदक करताच येत नाही. 😥

काळजी कशाला करताय. 

*मैं हूं ना*

*आता झटपट मोदक बनवा*

मोदक यंत्र 200/-

कुरिअर चार्जेस एक्स्ट्रा

*संपर्क :* अरविंद पटवर्धन. सांगली

मोबाईल : ९४०३४०२८०४


३४०२८०४

Tuesday, 8 March 2022

 मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करताना कोठे काय काय खरेदी कराल ?

पेण : गावामध्ये झिंगा (कोळंबी) भाकरी, कलिंगड , पांढऱ्या कांद्याच्या माळा, पोहे मिरगुंड, पापड.

इंदापूर : गावठी पोहे, तांदूळ, वेलवांगी.

महाड: वटवाघूळ तेल ( वातनाशक )

परशुराम घाट : जेवण ( हॉटेल ओमेगा)

चिपळूण: जेवण (अभिषेक हॉटेल)

संगमेश्वर : मोहनथाळ, (संगमेश्वरी खाजा) गणेशकृपा चे मोदक.

निवळी घाट: जेवण (ग्रीन पार्क हॉटेल)

हातखंबा: HP पंपावर गद्रे यांची बेस्ट फ्रोझन फिश प्रॉडक्टस व मॉलमध्ये शॉपींग.

लांजा: व्हेज नॉनव्हेज जेवण, सरसचे शेंगदाणा लाडू व इतर उत्पादने.

राजापूर: ठाकूर बेकर्सची स्पेशल नान-कटाई व इतर बेकरी प्रॉडक्टस.

कणकवली:- सकाळी ताजे मासे, ब्रेकफास्ट, मालवणी खाजा व खडके लाडू, बाळा सावंतचो कटवडो 

सावंतवाडी :- माशांचे जेवण,ताजा मालवणी खाजा, शोभेची फळे. सकाळी सुरंगीचे गजरे, स्थानिक भाजी, आबोलीचे वळेसर, नारळ आणि पुराणिक फूड्सची प्रसिद्ध गुळापासून बनविलेली स्पेशल कोकोनट बर्फी आणि मॅंगो कोकोनट बर्फी

पुढे गोव्यात :

म्हापसा : म्हापशाच्या बाजारात मडक्यात मिळणारी हुर्राक, फेणी, काजूगर,

एकदा अवश्य भेट देऊन खरेदी करा व आनंद घ्या...

Friday, 29 October 2021

Ali divali arogya sambhali

 दीवाली जवळ आली आहे

त्यामळे बाहेरची मिठाई किंवा इतर मिठाईच्या दुकानातील पदार्थ विकत घेताना विचार करा



आपल्यासाठी किती मेहनत करतात ते पाहा


Sunday, 8 August 2021

 गटार ( Gutter) नव्हे , गताहार    !   ...….                                 आपल्या सणांना बदनाम करायचे काम नेहमी केले जाते।

 आपल्या कडे आषाढी अमावस्या नंतर आहारात बदल केला जातो। या दिवसाला गताहारी(जो आहार गेला आहे तो)अमावस्या म्हणतात।

आपल्या प्रत्येक सणांचे नावे संस्कृतवर आधारित आहेत। Gutter हा इंग्रजी शब्द आपल्या सणाला खोडसाळ पणे जोडलेला आहे। आपली लायकी गटारात लोळायची आहे असे आपल्याला हिणवले गेले व दुर्दैव हे की आपण ते खरे ठरवण्याच्या मागे लागलोय।

आपल्या महान संस्कृतीची जाणीव ठेवा। आपल्या प्रत्येक सणाला मोठा अर्थ आहे। आपल्या सणांची बरोबरी कुणीही करू शकत नाहीं। आपले सण आपणच संस्कृतीने साजरे करू या।

गटार(Gutter) नव्हे, गताहार

गत=मागील, जुने, गेलेले, आता नाहीं ते

आहार= भोजन

गत+आहार=गताहार

जसे:-

शाक+आहारी=शाकाहारी

तसे:-

गत+आहारी=गताहारी

गत+आहारी+अमावस्या=गताहारी अमावस्या


या दिवशी दीप पुजन करतात


                येत्या रविवारी ८ऑगस्ट २०२१  रोजी दीप अमावस्या आहे. हिंदूंच्या सर्वाधिक कुचेष्टेचे, विकृत विनोदांचे  जे सण आहेत त्यात वटपौर्णिमेनंतर दीप अमावस्या हा सण येतो. व्यक्तिगत पातळीवर गटारी साजरी करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. पण दीपपुजेऐवजी केवळ गटारी म्हणून याला सर्वत्र  कुप्रसिद्धी मिळू नये असे वाटते.  जो आपला सणच नाहीये त्यासाठी आपण आपला धर्म,आपली संस्कृती का म्हणून बदनाम करायची ? उलट महाराष्ट्रातील सर्व जातींच्या लाखो घरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने या दिवशी दीपपूजन केले जाते. त्यामुळे अशी आपलीच बदनामी टाळण्याची मी  गेली कित्येक वर्षे मी माझ्या पातळीवर ही विनंती अनेकांना करीत आहे. हळूहळू याचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत. 


                     हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या धर्मात याच्या मागचे विज्ञानही सामावलेले आहेच. पूर्वी या दिवशी मांसाहार करून गौरींच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात असे. प्राण्याच्या शरीरातून जगभर पसरलेला कोरोना लाखोंचे प्राण घेत सुटला आहे. किमान या पावसाळी दिवसांमध्ये मांसाहार बंद ठेवण्याची तीव्र गरज आणि आपली प्रथा किती दूरदर्शीपणे आपल्या पूर्वजांनी योजली आहे हे यावर्षी प्रकर्षाने अधोरेखित होते आहे.


**** आपण यामागची वैज्ञानिक कारणे जाणून घेऊया---


१) या ओलसर पावसाळी वातावरणात मांसाहार नीट पचत नाही.


२) बहुतेक प्राण्यांचा हा काळ म्हणजे विणीचा / प्रजननाचा काळ असतो. याच काळात प्राण्यांची हत्या केली  तर नवीन प्राणी जन्मालाच येणार नाहीत. मग वर्षभर खायला प्राणी मिळणार कुठून ? याचा  साऱ्या निसर्गचक्रावरच विपरीत परिणाम होतो.  त्यामुळे निसर्गपुत्र कोळीबांधव या काळात मासेमारी करीत नाहीत आणि सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते. 


३) या दिवसात बाहेरच्या दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीराच्या आत आणि शरीरावरील त्वचेवर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते. शिजविताना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणाऱ्याला त्रास होऊ शकतो.


४) वातावरणात ओलावा असतो. मांस किंवा मासे नीट न ठेवल्यास ते  हवेतील वाढलेल्या  जंतूंमुळे कुजण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते. 


५) आज विविध लसी, अत्यंत परिणामकारक प्रतिजैविके, औषधे उपलब्ध असूनसुद्धा, धुमाकूळ घालणाऱ्या विविध साथीना  आवर घालणे कठीण झाले आहे. अनेक  घातक रोगांच्या जीवघेण्या साथी, ह्या अस्वच्छ प्राण्यांच्या शरीरावर वाढणाऱ्या जंतुंमुळे पसरतात. म्हणून या दिवसात मांसाहार टाळल्यास जंतू संसर्गाचा धोका कमी होतो. 


 अशा सर्व कारणांमुळे या दिवसाला धार्मिक जोड दिली गेली आहे. त्यामुळे  आपोआपच निसर्गाचा तोल साधला जातो.


 


*** या दिवसात शाकाहार करण्यामागेही शास्त्रीय कारणे आहेतच--


१ ) अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात. संपूर्ण वर्षभरात या भाज्या पुन्हा पाहायलाही  मिळत नाहीत. 


२) शाकाहार केल्यामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या  जातात. 


३) तुलनेने शाकाहाराचे या दिवसात नीट पचन होते.                                              


४) विविध उपासांच्या दिवशी खाल्ल्या  जाणाऱ्या कंदमुळांच्या आहारामुळे त्यातील अनेक दुर्मिळ खनिजे आणि उपयुक्त पोषक घटक अपोआप शरीराला लाभतात. 


५) कायम मांसाहार करणाऱ्यांच्या पचन संस्थेवर नेहेमी येणारा ताण, या शाकाहारी बदलामुळे कांही काळ कमी होतो.  


म्हणून विनंती करतो  " श्रावण जरूर पाळा, गटारीची कुप्रसिद्धी टाळा "!


( कृपया हे जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि आपल्या  संस्कृतीची अकारण होणारी कुचेष्टा थांबविण्यास हातभार लावावा, ही विनंती )

Monday, 26 July 2021

 🙏वेळ काढून वाचावे असे 🙏        

जिवन जगताना संगत ही खुप महत्वाची आहे.....

                    🌵 

               *बाभळीच्या* 

               *झाडाशेजारी* 

                  *केळीचे* 

                   *झाड* 

                  *वाढले*

                     ❕

                    *तर*

                     ❗

                *बाभळीच्या*

                 *काट्याने* 

                  *त्याची* 

                  *संपुर्ण*

                   *पाने* 

                  *फाटून* 

                  *जातात.* 

                    🌿

                    *या*

                   *उलट*

               *चंदनाच्या*

               *झाडाशेजारी* 

                 *लिंबाचे*

                  *झाड* 

                 *वाढले*

                   *तर* 

               *लिंबाच्या* 

               *गाभ्याला* 

               *चंदनाचा* 

                *सुवास*

                 *येतो.* 

                   🐾

                 *ज्या* 

                *प्रमाणे* 

               *रामाच्या* 

              *सहवासात*

                *हनुमान*

                 *धन्य* 

                 *झाला.*

                    🌾

            *श्रीकृष्णाच्या*

             *सहवासाने* 

                *अर्जुन*

               *सर्वश्रेष्ठ* 

                *योध्दा* 

                 *झाला.* 

                   🍂

                *याउलट*

             *दुर्योधनाच्या* 

              *सहवासाने*

                 *भीष्म,* 

                  *कर्ण* 

                *सर्वश्रेष्ठ* 

                *असुनही* 

                 *त्यांचा*

                  *नाश*

                 *झाला.*

                   🌳

                *आपण* 

             *"ज्यांच्या"*

                *सोबत* 

                *रहातो*

               *त्यांच्या*

                  👇

             *विचारांचा,*

                  👇

             *रहाणीचा,* 

                  👇

             *वागण्याचा,* 

                  🚸

            *"अंमल"* 

                 *हा* 

           *आपल्यावर*

               *होत* 

              *असतो.*

             🎊👏🎊


            *"संगतीने*

               *विचार*

                *श्रेष्ठ*

              *अथवा*

               *दुषित*

               *होतात"*

                  🙏


               *म्हणून* 

            *चांगल्यांची*

               *संगत* 

                *धरा*

                 *व*

              *आपले*

               *जिवन*

              *सुखकर*

                *करा.*


 *आपलं "वय" व "पैसा"* *यांच्यावर कधीच*

*घमेंड करू नये,*

*कारण ज्या गोष्टी "मोजल्या" जातात*

*त्या नक्कीच संपत असतात ...*


*" मृत्यु नंतरचं हेच कडव सत्य"*


*1:-"पत्नी " दरवाजा पर्यंत*

*2:-"समाज" स्मशाना पर्यंत*

*3:-"पुत्र" अग्निदाना पर्यंत*


      *फक्त आणी फक्त*  

              *"कर्म"*

          *ईश्वरा  पर्यंत*


जिच्या उदरात जन्म होतो ती *माता*

आणि जिच्या उदरात अस्त होतो ती *माती*

*यातील वेलांटीचा फरक*

       म्हणजेच माणसाचे *जीवन..*


🙏🏻🙏🏻🙏🏻 *सुप्रभात* 🙏🏻🙏🏻🙏🏻

Monday, 6 May 2019

भरलेली शाही वांगी


भरलेली शाही वांगी



साहित्य - १० ते १२ छोटी निळी वांगी,  १ नारळाचे ओले खोबर, २ कांदे, गरम मसाला पावडर, काळा खजूर, मनुका, काजूचे तुकडे, कोकम, तमालपत्र, गुळ/साखर, मिठ
कृती - प्रथम वांगी धुवून पुसून घेणे.  जिर, हिंग फोडणीला टाकणे, कांदा चांगला परतवुन घेणे त्यामध्ये ओले खोबरे टाकून खमंग भाजून घेण त्यामध्ये गरम मसाला व मिठ टाकणे. नंतर खोबरं वाटून घेताना साखर/गुळ, कोकम टाकून वाटून घेणे. वाग्यांचे  देठ तसेच ठेवून चार काप करून (देठासहीत) वाटलेले मिश्रण त्यात भरणे. त्यात काजू, खजूर, मनुका भरणे.
    त्यानंतर फोडणीला हिंग, जिर व तमालपत्र टाकून कांदा परतविणे. परतवलेल्या मिश्रणात भरलेली वांगी मंद अग्नीवर वाफविणे.
    ही भरलेली शाही वांगी ४ ते ५ दिवस राहतात व चविष्ठ ही लागतात.


Monday, 29 April 2019

गोड भात


ही पाककृति सन १९८० पर्यंत सर्रास ग्रामीण भागात लग्न व पुजा व इतर धार्मिक समारंभ वेळी केली जात असे. शक्यतोवर गुळाचा वापर जास्त असायचा. फक्त शहरी भागात साखर भात कार्यक्रमप्रसंगी असायचा. आता ही पाककृति ग्रामीण व शहरी भागातूनही गायब झाली आहे. आता तिची जागा उत्तर भारतीय गुलाबजामुन, जिलेबी  हयांनी घेतली आहे. पुनश्च महाराष्ट्रीयन पाककृति रुजवा.
गोड भात
साहित्य - अर्धा किलो गुळ/साखर, ओले खोबरे १ नारळ, अर्धा किलो तांदुळ, कच्चे शेंगदाणे, वेलची, सुंठ व जायफळ पावडर

कृति -
    प्रथम तांदुळ धुवून एक ते दिड तास पाण्यात ठेवणे, कच्चे शेंगदाणे पाण्यात भिजवत ठेवणे. तांदुळ शिजवून घेणें, तांदळाचा भात होईपर्यंत खोबरे किसून,गुळ बारीकसा कापून मंदाग्नीवर ठेवणे, कच्च्‌े शेंगदाणे सालकाढून, सुंठ पावडरसह एकत्र गुळाच्या पाकात मिक्स करणे व मंदाग्नीवर शिजत ठेवणे. शिजल्यावर वेलची जायफळ पावडर पसरणे, आवडीनुसार वा खास पाहुण्यासाठी काजू, बदाम, मनुका भातावर पसरणे.





Thursday, 25 April 2019

गोडाचे घावण


साहित्य- तांदळाचे पिठ व मिठी
सारणासाठी- आवश्यकतेनुसार खोबरे, गुळसाखर वेलची
कृति-
       प्रथम गुळ बारीक करुन घ्यावा. साखर व गुळ एकत्र करुन मंद अग्नीवर शिजत ठेवावे. नंतर त्यात किसलेले खोबरे टाकावे व थंड झाल्यावर वेलची व जायफळ टाकून मिक्स करावे आवडीनुसार मनुके, काजू, बदाम तुकडे करुन टाकावे. तांदळाचे पिठात मीठ टाकून आवश्यकतेनुसार थोडेस पातळ करावे.
       नंतर तव्यावर पातळसर पीठ पसरविणे व झाकण ठेवावे. मध्यम आचेवर शिजण्यासाठी ठेवावे,पाच मिनिटांनी काविलथ्याने घावण तयार झालेवर उलटविणे व त्यामध्ये गुळ खोबरेचे साहित्य भरुन अर्धा / पाव फोल्ड मारुन लगेचच उतरविणे व आवडीनुसार साजूक तुपात सर्व्ह करणे.
       मुलांना भुख लागल्यावर वा आयत्यावेळी पाहुणे आल्यावर तात्काळ करण्याजोगा हा पक्वान्न आहे व ही पाकक्रिया लवकरच लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.

Saturday, 20 April 2019

रेश्मी पुरणपोळी


रेश्मी पुरणपोळी
साहित्य- २० पुरणपोळयासाठी चे साहित्य
        १ किलो चणाडाळ, अर्धा ते पाऊण किलो गुळ (गोडीनुसार ), अर्धा किलो मैदा.
         वेलची व जायफळ पावडर, साजूक तूप
कृती : -
प्रथम डाळ धुवून मऊशीर शिजवून घेणे. मऊशीर शिजवून झाल्यावर गुळ किसून पुरणामध्ये टाकून एकजिव होईल इतपत पातळसर शिजविणे. कोमट असतांनाच मिक्सरमध्ये मऊशीर वाटून घेणे. नंतर कढईत पुरणाचे मिश्रण गरम करुन मध्यम आचेवर हाताला पुरणाची गोळी होईल  इतपत गरम करणे. थंड झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवणे. त्याच बरोबर मैदयामध्ये गरम तेलाचे मोहन घालून हळद मीठ घालून भिजविणे. थोडा मैदा लाटण्यासाठी वेगळा ठेवावा व थंड तेलामध्ये भिजविलेला मैदा घालून पाच सहा तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवणे.
       सर्व्ह करण्यापुर्वी मैदयाची पातळ लाटी करुन त्यात वेलची व जायफळ पावडर मिक्स करुन पसरावी    व पुरण घालून पोळी लाटावी. हे पुरण पारीच्या कडेपर्यत पसरत असल्याने पारदर्शक पुरण पोळी बनते. गरम गरम असतांनाच साजूक तुपामध्ये भिजवावी म्हणजे रेश्मी पुरण पोळी जिभेवर कशी विरघळते व खास पाहुणे आपली स्तुती चोहोकडे कशी पसरवतात  याचा अवश्य अनुभव घ्या.
टिप : पुरण व मैदा ५-६ दिवस फ्रिजमध्ये राहिल्याने आठवडाभरात केव्हाही पुरणपोळी गरमागरम करु शकता.
राहुल भगत

Featured post

Lakshvedhi