Showing posts with label उडोग रोजगार. Show all posts
Showing posts with label उडोग रोजगार. Show all posts

Monday, 3 November 2025

माय भारत ॲपद्वारे युवकांना रोजगाराच्या संधी

 माय भारत ॲपद्वारे युवकांना रोजगाराच्या संधी

-केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया

 १७ वा आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न

 

मुंबई,दि.३ : युवकांनी २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी योगदान द्यावे. तसेचयुवकांना रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी माय भारत पोर्टल मार्गदर्शक ठरणार आहे. या पोर्टलद्वारे युवकांना नोकरीच्या संधीकौशल्य विकासऑनलान स्पर्धा तसेच काम आणि विचारांची देवाणघेवाण यासंबंधीची सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. युवकांनी डिजिटल उपस्थिती वाढवून या पोर्टलचा सक्रिय वापर करावाअसे आवाहन  केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी केले.

गृह मंत्रालयाच्या सहकार्याने युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य पोलीस यांच्या समन्वयाने पोलीस प्रशिक्षण केंद्रमरोळ, येथे १७ वा आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण विभाग) प्रवीण कुमार पडवळजिल्हा युवा अधिकारी (माय भारतमुंबई) अनुप इंगोलेपोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रवींद्र दळवी आणि ज्युडो कार्यक्रम समन्वयक यतिन बांगरा आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाचा उद्देश आदिवासी युवकांना मुख्य प्रवाहात आणणेत्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करणे आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणे हा आहे. कार्यक्रमाचे आयोजन आणि संचालन अनुप इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आले. निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त फुलसिंग पवार यांनी प्रेरणादायी व्याख्यान दिले. या वेळी गृह मंत्रालयाच्या अवर सचिव पिंकी राणीतसेच पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सहभागी युवक-युवतींनी अभिप्राय सत्रात आपले अनुभव सांगितले. यावेळी सांस्कृतिक व भाषण स्पर्धेतील विजेत्यांचा चषक देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम आदिवासी युवकांमध्ये राष्ट्रीय एकतानेतृत्व व सांस्कृतिक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने यशस्वीरीत्या संपन्न झालाअशी माहिती जिल्हा युवा अधिकारी अनुप इंगोले यांनी दिली.

Monday, 29 July 2024

पर्यटन विभागाचे आता एकच बोधचिन्ह व घोषवाक्य -पर्यटन मंत्री गिरीश महाजन

 पर्यटन विभागाचे आता एकच बोधचिन्ह व घोषवाक्य

-पर्यटन मंत्री गिरीश महाजन

          मुंबई, दि.29 : पर्यटन संचालनालय तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या दोन  प्रमुख संस्था पर्यटन विभागाच्या अधिनस्त असल्या तरी त्यांचे बोधचिन्हघोषवाक्य यामध्ये तफावत होती, ती आता दूर करण्यात आली आहे. आता महाराष्ट्र टुरिझम’ हे बोधचिन्ह (लोगो), महाराष्ट्र अनलिमिटेड हे घोषवाक्य (टॅग लाईन) असेल, असा निर्णय घेण्यात आल्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

            पर्यटन विभागाच्या अंतर्गत असलेल्या पर्यटन संचालनालय तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यामार्फत वापरण्यात येणारे बोधचिन्ह (लोगो) तसेच घोषवाक्य हे स्वतंत्र वेगळ्या स्वरूपातील होते. मात्र आता पर्यटन विभागाला एकच घोषवाक्य असणार आहे.

            राज्यातील पर्यटन स्थळांची राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीप्रचार करून  पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी शासन कार्यरत आहे. देशातील एक अग्रगण्य राज्य बनवून मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आकर्षित करण्याकरता नुकतेच ‘पर्यटन धोरण 2024 राज्यात जारी करण्यात आले आहे. येत्या काळामध्ये राज्यातील पर्यटन वाढीसाठी महत्त्वपूर्ण योजना आणि उपक्रम या धोरणाअंतर्गत राबविण्यात येणार आहेत असेही  मंत्री श्री.महाजन यांनी सांगितले.

0000

Featured post

Lakshvedhi