Showing posts with label .आरोग्य. Show all posts
Showing posts with label .आरोग्य. Show all posts

Sunday, 1 June 2025

चक्र'च्या माध्यमातून संशोधन, नाविन्यता आ byणि स्टार्टअपला बळ मिळेल cr, ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन · सामान्य माणसालाही सहज आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्यादृष्टीने चक्र उपयुक्त ठरणार

 चक्र'च्या माध्यमातून संशोधननाविन्यता आणि स्टार्टअपला बळ मिळेल

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         विद्यापीठाने आरोग्यदायी कुंभ संकल्पना राबवावी

·         आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र चक्रचे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

·         सामान्य माणसालाही सहज आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्यादृष्टीने चक्र उपयुक्त ठरणार

 

नाशिक दि. १: विद्यापीठे ही केवळ शिक्षणसंस्था आणि अभ्यासक्रम नियोजन करणारी संस्था ठरू नये तर संशोधननाविन्यता आणि स्टार्टअप सुरू करणारी केंद्रे व्हावीत. त्यादृष्टीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केलेले उत्कृष्टता केंद्र आणि कंपनी कायद्यांतर्गत सुरू केलेले 'चक्र' ( सेंटर फॉर हेल्थअप्लाइड नॉलेज अँड रिसर्च ऑटोनॉमी) हे उपयुक्त ठरेल. आताच्या उपक्रमातून सामान्य माणसाला ज्या गोष्टी उपलब्ध होत नाहीत त्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून देणारी व्यवस्था यामधून निर्माण  होईलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र चक्र’ चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन  मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. जलसंपदा (विदर्भतापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरिष महाजनवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (दूरदृष्यप्रणाली द्वारे)शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसेअन्न व औषध प्रशासनविशेष सहाय्य विभागाचे मंत्री  नरहरी झिरवळवैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त राजीव निवतकरनाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडामविद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त),  -कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ आदी यावेळी उपस्थित होते. 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेमहाराष्ट्राने वैद्यकीय शिक्षणात चांगली प्रगती केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असावे असा विचार असून  गेल्या 2 वर्षात 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली आहेत.  आरोग्य विज्ञान विद्यापीठाने गेल्या 25 वर्षात चांगले काम केले आहे.

Featured post

Lakshvedhi