Showing posts with label आरोग्य-मित्र. Show all posts
Showing posts with label आरोग्य-मित्र. Show all posts

Saturday, 9 December 2023

Our Ancient 🇮🇳 Bharatiya Sages were actually the scientists

 *Our Ancient 🇮🇳 Bharatiya Sages were actually the scientists.* They've given certain Crucial HEALTH TIPS in Sanskrit translated into English for common understanding.


*Highly relevant even today !*


*1. अजीर्णे भोजनं विषम्।* 

If previously taken Lunch is not digested..taking Dinner will be equivalent to taking Poison. Hunger is one signal that the previous food is digested 


*2. अर्धरोगहरी निद्रा।*

Proper sleep cures half of the diseases..


*3 मुद्गदाली गदव्याली।*

Of all the Pulses, Green grams are the best. It boosts Immunity. Other Pulses all have one or the other side effects. 


*4. भग्नास्थि-संधानकरो लशुनः।*

Garlic even joins broken Bones.. 


*5. अति सर्वत्र वर्जयेत्।*

Anything consumed in Excess, just because it tastes good, is not good for Health. Be moderate. 


*6. नास्ति मूलमनौषधम्।*

There is No Vegetable that has no medicinal benefit to the body.. 


*7.  न वैद्यः प्रभुरायुषः।*

No Doctor is capable of giving Longevity. (Doctors have limitations.) 


*8. चिंता व्याधि प्रकाशाय।*

Worry aggravates ill-health.. 


*9. व्यायामश्च शनैः शनैः।*

Do any Exercise slowly.

(Speedy exercise is not good.) 


*10. अजवत् चर्वणं  कुर्यात्।*

Chew your Food like a Goat.

(Never Swallow food in a hurry. 

Saliva aids first in digestion.) 


*11.  स्नानं नाम मनःप्रसाधनकरंदुः स्वप्न-विध्वंसनम्।*

 Bath removes Depression.

 It drives away Bad Dreams.. 


*12. न स्नानमाचरेद्  भुक्त्वा।*

Never take Bath immediately after taking Food.  (Digestion is affected). 


*13. नास्ति मेघसमं तोयम्।*

No water matches Rainwater in purity.. 


*14.  अजीर्णे भेषजं वारि।*

When there is  indigestion taking plain water serves like medicine.


*15. सर्वत्र नूतनं  शस्तं, सेवकान्ने पुरातने।*

Always prefer things that are Fresh.. 

Whereas Rice and Servant are good only when they are old.


*16. नित्यं सर्वा रसा भक्ष्या:।*

Take the food that has all six tastes.

(viz: Salt, Sweet, Bitter, Sour, Astringent and Pungent). 


*17. जठरं पूरायेदर्धम् अन्नैर्, भागं जलेन च।*

*वायोः संचरणार्थाय चतर्थमवशेषयेत्।*

Fill your Stomach half with Solids, 

(a quarter with Water and rest leave it empty.)


*18. भुक्त्वा शतपथं गच्छेद् यदिच्छेत् चिरजीवितम्।*

Never sit idle after taking Food.

Walk for at least half an hour. 


*19. क्षुत्साधुतां जनयति।*

Hunger increases the taste of food..

In other words, eat only when hungry.. 


*20. चिंता जरा नाम मनुष्याणाम्* 

Worrying speeds up ageing.. 


*21. शतं विहाय भोक्तव्यं, सहस्रं स्नानमाचरेत्।*

When it is time for food, keep even 100 jobs aside. 


*22. सर्वधर्मेषु मध्यमाम्।*

Choose always the middle path. Avoid going for extremes in anything


*Golden words of wisdom in Sanskrit by our sages.*


*Please share with your loved ones.*

Tuesday, 21 November 2023

गोष्ट मधमाशांची.. नाशिकच्या नव्या वैभवाची!

 गोष्ट मधमाशांची.. नाशिकच्या नव्या वैभवाची!


मधमाशांचं अस्तित्त्व संपल तर आपण किती वर्ष जगू…? तुम्हाला माहित आहे का मधमाशांचे २५ हजार प्रकार असतात?... कामकरी मधमाशा सर्वाधिक कष्टाळू असतात…? मादी मधमाशी सर्वाधिक आयुष्य जगते…? नर मधमाशी सर्वांत दुदैवी जीवन जगते…? मधमाशा अष्टकोनीच घर का बांधतात…? आपण मधमाशांकडून काय शिकू शकतो…? हे आणि याहूनही अधिक प्रश्न मला का पडले? ते पिंपळगाव बसवंत येथील हनीपार्क पाहताना. मला पडलेल्या प्रश्नांनी मला खूप काही शिकवलं. नाशिकचं नवीन वैभव ठरलेल्या हनीपार्कमधील.. मधमाशांची गोष्ट नक्की समजून घेण्यासारखी आणि आवर्जून पाहण्यासारखी आहे. 


रमेश पडवळ, नाशिक / मोबा. ८३८००९८१०७


मधमाशी… हा विषय तसा आपल्या सर्वांसाठीच दुर्लक्षित. पण, एका वाक्यानं माझं अंतर्मन मधमाशांकडे वेधलं गेलं. हे वाक्य साध्यासुद्या माणसाचं नव्हतं तर ते होत खुद्द प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांचं. आइन्स्टाइन म्हणतात,‘पुथ्वीवरून मधमाशा नष्ट झाल्या तर मानवासह निसर्ग नष्ट व्हायला अवघे चार वर्ष लागतील.’ पिंपळगाव बसवंत येथील हनीपार्क म्हणजेच भारतातील पहिले अ‍ॅपी ‘बसवंत गार्डन’मध्ये प्रवेश केल्यावर हे वाक्य डोळ्यात भरत आणि कितीतरी वेळ ते वाचत रहावं आणि असं कसं होऊ शकतं? या प्रश्नाभवती डोक्यातील मेंदूची कालवाकालव होते. पण, हे खूद्द प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन सांगतायेत म्हटल्यावर फक्त विरंगुळा हा हनीपार्क पाहण्याचा हेतू गळून पडतो आणि आपण काही तरी शिकण्यासाठी येथे आलो आहोत, याचा भान जागं होतं. खरचं मधमाशा नष्ट झाल्या तर आपलं आयुष्य चारवर्षांत संपुष्ठात येईल का? हे जाणून घेण्याची एक ओढ मला लागली आणि मधमाशांची शिकविलेल्या शिस्तीच्या धड्यासह त्यांनी कष्टानं बनविलेलं मध मला चाखायला मिळालं. अ..अं… गोष्ट संपलेली नसून ती आता कुठं सुरू झाली आहे. 

मधमाशी म्हटलं की मला बालपणी अंब्याच्या झाडावरून तिचं पोळ हिसकावून काढण्याची आठवण झाली अन्‌ ते काढताना पाठभर चावलेल्या मधमाशा मला आठवल्या, की आजही अंगावर शहारा येतो. तुम्हीही कधीतरी असं काही तरी केलं असेलच ना? पण हे चुकीचं होतं. हे आज कळालं. मधमाशी तशी कोणाच्या अध्यात ना मध्यात. अल्पायुषी असूनही जगण्यासाठी धडपडणारी. फक्त धडपडनं नाही तर जे आयुष्य मिळालयं ते शिस्तबद्ध, आखीवरेखीव आणि आपल्या मागच्या पुढच्यांचा विचार करत जगणारी! असं आता कोणालाही जगावं वाटतं नाही, प्रत्येकजण आपल्याला कसं सुखावह जगता येईल इतकाच विचार करताना दिसतो पण, हा विचार मधमाशीला शिवतही नाही. म्हणूनच तिचं अंतर्मन माणसाच्या भावविश्वाशी जोडलं गेलं असावं. गोष्ट सुरू होते.. अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या वाक्यापासून. खरचं मधमाशीच्या एकूणच जीवनक्रमाशी आपलं आयुष्य जोडलं गेलं असेल तर मधमाशीला जाणून घ्यायला हवंच. पिंपळगाव बसवंत हे एक प्राचीन गाव आहे, त्यामुळे या गावाशी माझं एक वेगळं नातं आहे. अनेकदा या गावातील प्राचीन मंदिर, नदीकाठच्या समाधी, घाट आणि जैन साधूंचा सहवास असं बरचं काही अनुभवायला यापूर्वी अनेकदा गेलो आहे. बसवंत पासून वणी रस्त्यावर मुखेड गावाकडे निघालात की, हनीपार्क नावाचं एक वेगळं विश्व संजय पवार या उद्योजकानं उभारलं आहे. नाशिकची लोकं तशी खटपटी हे आजचं नाही तर दोन हजार वर्षांपासून आतापर्यंत असंख्य उदाहरणं देता येतील. त्याच रेषेतील हा माणूस असावा. प्रत्यक्ष कधी भेटलेलो नाही पण, त्यांनी कष्टानं जे काही उभारलंय ते पाहावं असं वाटलं म्हणून हनीपार्कमध्ये सकाळी साडेदहाच्या सुमारास पोहचलो. गेटमधून आत गेल्या-गेल्या उजव्या हाताला अल्बर्ट आइन्स्टाइन भेटले आणि तेथे जाण्याचा दृष्टीकोन बदलला. तेथील एका गाईड मित्रांन मधमाशांचं आयुष्य उलगडायला सुरूवात केली. खरंतर मधमाशांबद्दल आपल्याला फारसं माहित असण्याच काही कारण नाही म्हणूनच तुम्हाला हे माहित आहे का? या फलकापासून मधमाशांच्या भावविश्वाचा प्रवास सुरू झाला. साखरेच्या कणाऐवढा मेंदू असलेली मधमाशीला पाच डोळे असतात हे मी पहिल्यांदाच ऐकत होतो. इतकचं नाही तर मधमाशी ३०० प्रकारच्या चवी ओळखण्याची क्षमता बाळगूण असते. ती ताशी १५ ते २० किलोमीटर वेगाने उडते आणि एकाच उड्डाणामध्ये ५० ते १०० फुलांना भेटी देत मधचा कण आणि कण गोळा करते. हे एकताना मला चक्कर येणंच बाकी राहिलं होतं तेवढ्यात गाईड मित्रांन डोक्यात दगड टाकावा असं काही सांगितलं. ते म्हणजे, एक मधमाशी तिच्या आयुष्यात फक्त एक चमचा मध गोळा करते यासाठी तिला ४ लाख किलोमीटरचा प्रवास करावा लागतो, म्हणजेच ती पृथ्वीला दोन प्रदक्षिणा एवढे अंतर त्या एक चमच्या मधासाठी घालते. मधमाशीबद्दलची ही माहिती ऐकताना मी थबकून गेलो. विशेष म्हणजे हनीपार्कमधील प्रवास अनुभवताना असंख्य फलकांपैकी ही माहिती पहिल्याच फलकावर लिहिली आहे तर पुढे काय काय असेल अशा विचारात मी पडलो. 

मी सगळंच काही आपल्याला सांगणार नाही. कारण मी लिहिलेलं तुम्ही वाचणार अहात पण गाईड मित्राच्या तोंडून ते भरभरून ऐकतानाची मज्जा काही वेगळीच आणि आजूबाजला मधमाशा पाहताना ते समजून घेणं वेगळं आणि अनोख ठरतं. माझी दोन्ही मुले माझ्या इतकीच उत्सुकतेनं सर्वकाही ऐकत होती. पत्नीनं तर डोक्याला हात लावला होता. आपण किती किती आळशी आहोत, याची जाणीव मला झाली होती. पण माणसाला मधमाशांचे महत्त्व आताच नाही तर दोन हजार वर्षांपूर्वी समजले होते. इजिप्त आणि चीन बहुदा भारतातील मंडळींना मध व मेणासाठी तेव्हा मधमाशांची महती लक्षात आली होती. विशेष म्हणजे, मानवाला सर्वात प्रथम माहित असलेला गोड पदार्थ म्हणजे मध होय. जगभरात मधमाशांच्या किती जाती असतील, असं गाईड विचारल्यावर त्यांनाही वेगवेगळ्या जातीत विभागल्याचं लक्षात आलं. असतील तीन चार? असं वाटलं पण, २५ हजार जातींचं मधमाशांचं विश्व असेल अशी साधी कल्पनाही आम्ही केली नव्हती. त्यापैकी फक्त ५ जाती मधामुळे सर्वाधिक परिचित आहेत. मधमाशीचा आकार किती असतो हे वेगळं सांगायला नको, कधीतरी त्यांच्याशी गाठभेट झाली असेलच. पण त्यांच्या घरात त्यांचे प्रामुख्याने तीन प्रकार असतात. एक मादी, दुसरा नर आणि तिसरी कामकरी मधमाशी. मादी अर्थातच कुटुंब वाढविण्याचे काम करते, नर त्यासाठी तिला सहकार्य करतो आणि कामकरी मधमाशी सतत काम करत राहते. या तिघांचं कामाचं तंत्र एका विशिष्ट सुत्रात गुंफलेलं आहे. हे समजून घेताना मला नर मधमाशीबद्दल खूप वाईट वाटलं. बिचारा नर! असं म्हणण्याचं कारण म्हणजे, त्याला ना मध गोळा करता येत, ना कोणाला चावण्यासाठी डंख त्यांच्याकडे असतो. मादी तिचं काम झाल्यावर नराचं ओझं नको म्हणून त्याला मारून टाकण्याचा आदेश देते. कारण त्यानंतर उगाचं नराला पोसण्यासाठी मध वाया जाऊ नये म्हणून कामकरी मधमाशा मादीच्या आदेशानंतर नराला मारून टाकतात. किती वाईट ना? पण, हेच जीवनाचं सूत्र आहे. हे एकून मी थक्क झालो होतो. गाईड मित्राला मी वारंवार प्रश्न विचारून त्रास देत होतो आणि तोही आनंदान माझ्या प्रश्नांची उत्तर देत होता. कामकरी माशी साधारण सहा महिने आयुक्त घेऊन आलेली असते तर मादी मधमाशी दोन ते पाच वर्षांपर्यंत जगते. यासाठी ती फक्त राजअन्न सेवन करते. राजअन्नामुळे तिचं वाय दीर्घायु ठरतं. हे राजअन्न मध २५ हजारांना मिळतं आणि आपल्या नटनट्या हेच राजअन्न तारुण्य टिकविण्यासाठी खातात. मधमाशांचं भावविश्व कामाभवती गुंफलं गेलं आहे. त्यांच्या मधाची पोळ, वयोमानानुसार बदलणारी त्यांची कामे असोत वा फुलांमधून मध गोळा करण्याची छंद असो. हे सगळं करताना कामाची इतक्या बारकाईने आखणी केलेली असते की, त्यांचं सूत्र अंगी भिनवलं तर कोणत्याही क्षेत्रात अपयश येणे कठीणचं. असं म्हणण्याचं कारण म्हणजे, तुम्हाला आत्मनिर्भर व्हायचं असेल तर तुमचे आई-वडिल तुम्हाला कष्टाची सवय कशी लावतात यावर सर्वकाही अवलंबून आहे. मी सातवीत असल्यापासून रांगोळी विकायला सुरूवात केली होती. तेव्हा कोणी मुलाला कामवायला का पाठवता असं म्हणत नसे. तर घराला हातभार लावतोय म्हणून कौतुक होई. आता मुलांना कामाला लावणे सोडा घरातील कामे सांगितली तरी काय आई-बाप आहेत मुलांकडून कामे करून घेतात, अशी दुसणे लोक देतात. पण, मधमाशी आपल्या पिलांना वयाच्या १ ते ३ दिवसात घराची स्वच्छता करायला शिकविते, ४ ते ६ दिवसात मोठ्या अळ्यांना खाद्य द्यायला लावते, ७ ते १० दिवसाच्या मधमाशा लहान अळ्यांना खाद्य देतात, तर ११ ते १२ दिवसाच्या मधमाशा राणी माशीला खाद्य देणे आणि तिची सेवा करतात. १३ ते १८ दिवस वयाच्या मधमाशा मेण स्त्रवणे व घरे बांधण्याची कामे करतात, १९ ते २० दिवसाची मधमाशी वसाहतीचे संरक्षणसाठी रखवालदारीचे काम करतात, २१ च्या पुढे मकरंद, पराग, पाणी भरणे आणि गरजेनुसार इतक कामे करतात. आहे ना अनोखं. असं बरंच काही हनीपार्कमध्ये अनुभवायला पाहायला आणि समजून घ्यायला मिळते. त्यामुळेच पिंपळगाव बसवंत येथे अभिनव असे ‘बसवंत हनी बी पार्क- मधमाशी पालन प्रशिक्षण केंद्र’ तसेच ‘बसवंत कृषी उद्योग पर्यटन केंद्र’ वेगळं ठरतं. देशातील पहिले अ‍ॅपी- अ‍ॅग्री टुरिझम सेंटर म्हणून या केंद्राची ओळख आहे. मधमाशीचे मानवी जीवनातील महत्त्व सर्वांपर्यंत पोहचवून तिचे संरक्षण व संवर्धन करणे, हा या प्रकल्पाचा बीजविषय आहे. मधमाशी पालनाच्या माध्यमातून पिकांची उत्पादन वाढ तसेच स्वयंरोजगार निर्मितीतून शाश्वत ग्रामविकासाची संकल्पना येथे रंजक व अभ्यासपूर्ण स्वरुपात साकारण्यात आली असून, येथे दोन लघुपटाच्या माध्यमातून मधमाशीचे महत्त्व समजावून सांगितले जाते. या केंद्रात वर्षभर विविध परिसंवाद व चर्चासत्रे आयोजिली जातात. त्यात राज्यस्तरीय ‘मधुक्रांती’ परिसंवाद, हनी बी फेस्टिवल, बसवंत फळ महोत्सव, द्राक्ष आणि किशमिश महोत्सव, मुख्याध्यापक/ प्राचार्य परिषद, पर्यटन महोत्सव तसेच इतरही उपक्रम नियमित होत असतात. मधमाशांसंदर्भातील विविध स्पर्धांच्या माध्यमातून चिमुकले या हनीपार्कशी जोडले गेले आहेत. त्यामुळे या पार्कमधील पृथ्वी आणि त्यावर बसलेली मधमाशी आपल्याला पृथ्वी रक्षणाचा संदेश देताना दिसते. 

इतकेच नाही तर मधमाश्यांची वसाहत (अ‍ॅपिअरी) येथे उभारण्यात आली असून, येथे मधमाशा हाताळताही येतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मधाची चवही चाखता येते. हनीपार्कपासून जवळत बसवंत गार्डनही साकारण्यात आले असून, येथे बैलांचे विविध प्रकार आणि त्यांची शिल्प उभारण्यात आले आहेत. याशिवाय आग्या मधमाशी प्रतिकृती, बी-प्लँट नर्सरी- सीड बँक, मधमाशीच्या संदर्भातील विविध पुस्तकांचे खुले वाचनालय, ग्रामीण भागातील संस्कृती आणि मधमाशीचे कार्य वारली पेंटिंग्जच्या माध्यमातून समजावून देणारा विभागही आहे. येथील आर्ट गॅलरीत  बांबू पेंटिंग, पॉट पेंटिंग, स्टोन पेंटिंग, बोहाडा संग्रहालय अशी आकर्षणे आहेत. याबरोबरच येथील खाद्यपदार्थ आणि विक्री विभागात आऊटलेट आणि कॅफे, मधुबन फूडकोर्ट, विसावा, सोव्हिनिअर शॉप, गेम झोन कॅफे अशा विविध सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

बसवंत कृषी-उद्योग पर्यटन केंद्रात ‘गांव समृद्ध, तर देश समृद्ध’ ही महत्त्वाची विचारधारा अधोरेखित करणाऱ्या ‘सेवरगांव’ या  स्वयंपूर्ण आदर्श गावाची (मिनिएचर व्हिलेज) संकल्पना प्रतिकृतीद्वारे मांडण्यात आली आहे. अलीकडे प्रक्रिया उद्योगांतून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. यासाठी एक मध्यम स्वरूपाचे फूड प्रोसेसिंग युनिट, मध प्रक्रिया युनिट तसेच चॉकलेट फॅक्टरी येथे उभारून प्रशिक्षणाची सोय देखील केली आहे. द्राक्षांची माहिती, बेदाणा निर्मिती प्रक्रिया आणि विविध प्रकारच्या बेदाण्यांची मांडणी येथे केली आहे. हे सगळं पाहताना मधमाशा या सगळ्याच्या केंद्रबिंदू असल्याचेही वारंवार अनुभवायला मिळतं. मधमाशीच जीवन माणसाला प्रेरीत करतानाचा अनुभव येथे घेता येतो. मधमाशी आतापर्यंत आपल्याला कळालीच नव्हती, ती आता उलगडली हा अनुभव येथे मिळतो हे नक्की.

मधमाशीला समजून घेता घेता आणि येथे उभं केलेलं विश्व अनुभवता अनुभवता चार-पाच तास कसे निघून जातात हे कळत नाही. हा वेगळा प्रयोग नाशिकचं वेगळेपण नक्की अधोरेखित करेल यात शंका नाही. हा आणि आणखी एक मधमाशी आपल्या बचावासाठी तुम्हाला चावत नाही तर ती आपल्या कुटुंबापासून तुम्हाला लांब ठेवण्यासाठी चावते. चावताना ती आपलं बलिदान देते. जेव्हा मधमाशी तुम्हाला चावते त्यानंतर काही मिनिटात तिचा मृत्यू होतो. तिला चावण्याची हौस नसते, असते ती तिच्या कुटुंबाची काळजी. हा विचारही मला खूप काही सांगून गेला. चला, तर मधमाशीचं विश्व अनुभवायला.. हनीपार्कला!

(अधिक माहितीसाठी संपर्क : संदीप वाघ : ९९२२१०९५५७)

Monday, 20 November 2023

गोपाष्टमी सोमवार 20 नवम्बर 2023 ? गौ माता धरती की सबसे बड़ी वैद्यराज है।

 ।।श्रीगणेशाय नमः।।


गोपाष्टमी सोमवार 20 नवम्बर 2023 ?


गौ माता धरती की सबसे बड़ी वैद्यराज है।

भारतीय संस्कृति में गौमाता की सेवा सबसे उत्तम सेवा मानी गयी है, श्रीकृष्ण गौ सेवा को सर्व प्रिय मानते हैं।


शुद्ध भारतीय नस्ल की गाय की रीढ़ में सूर्यकेतु नाम की एक विशेष नाड़ी होती है जब इस नाड़ी पर सूर्य की किरणे पड़ती हैं तो स्वर्ण के सूक्ष्म कणों का निर्माण करती हैं, इसीलिए गाय के दूध, मक्खन और घी में पीलापन रहता है, यही पीलापन अमृत कहलाता है और मानव शरीर में उपस्थित विष को नष्ट करता है।


गाय को सहलाने वालों के कई असाध्य रोग मिट जाते हैं क्योंकि गाय के रोमकोपों से सतत एक विशेष ऊर्जा निकलती है।


गाय की पूछ के झाड़ने से बच्चों का ऊपरी हवा एवं नजर से बचाव होता है।


गौमूत्र एवं गोझरण के फायदे तो अनंत हैं, इसके सेवन से केंसर व मधुमेह के कीटाणु नष्ट होते हैं।


गाय के गोबर से लीपा पोता हुआ घर जहाँ सात्विक होता है वहीं इससे बनी गौ-चन्दन जलाने से वातावरण पवित्र होता है इसीलिए गाय को पृथ्वी पर सबसे बड़ा वैद्यराज माना गया है, सत्पुरुषों का कहना है कि गाय की सेवा करने से गाय का नहीं बल्कि सेवा करनेवालों का भला अधिक होता है।

Saturday, 21 October 2023

कुष्‍ठरोग्यांना तपासणी व उपचारासाठी प्रवृत्त करावे

 कुष्‍ठरोग्यांना तपासणी व उपचारासाठी प्रवृत्त करावे

आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांचे आवाहन

            मुंबईदि. २१ :-  राज्यात घरोघरी सर्वेक्षण करूनकुष्‍ठरुग्ण  शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहीम काटेकोरपणे राबवावी.  शोध अभियाना दरम्यान नागरिकांचे या आजाराबाबतचे गैरसमज दूर करावे. नागरिकांना  हा आजार बरा होण्याचा विश्वास देवून  तपासणी व उपचारासाठी प्रवृत्त करावे,  असे राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी सांगितले.

             राज्यात  २० नोव्हेंबर ते ०६ डिसेंबर २०२३ या कालावधीत आरोग्य विभागाच्या वतीनेकेंद्र सरकारच्या  मार्गदर्शक सूचनेनुसार  कुष्‍ठरुग्ण  शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

             सामाजिक कारणाने  कुष्‍ठरोग लपवण्याकडे  लोकांचाविशेषतः महिलांचा कल असल्याचे सांगत आयुक्त श्री. कुमार म्हणाले,  आरोग्य विभागाने  सोशल मिडियासामाजिक संस्था व इतर  माध्यमाद्वारे लोकांचे  प्रबोधन करूनयोग्य उपचाराने हा आजार बरा होतो असा विश्वास निर्माण करावा. जास्तीतजास्त  संशयित रुग्णांची तपासणी करावी. या मोहिमेसाठी स्थानिक जिल्हाधिकारीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सहकार्य व मार्गदर्शन घ्यावे, अशा सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या.  पंतप्रधान व राज्याचे आरोग्य मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली  सन २०२७ पर्यंत शून्य कुष्‍ठरोग प्रसाराचे  ध्येय  गाठण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावेअसे आवाहनही  त्यांनी यावेळी केले.

            २० नोव्हेंबर ते ०६ डिसेंबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या संयुक्त कुष्‍ठरोग व सक्रीय क्षयरोग शोध मोहिमेसाठी राज्यभरात ६५,८३३  पथके तयार करण्यात आलेली आहेत. एक पथक  एका दिवसात शहरी भागातील २५ आणि ग्रामीण भागातील २० घरांना भेटी देणार आहे.   गृहभेटी अंतर्गत राज्यातील १ कोटी ७५ लाख घरांचे सर्वेक्षण केले जाणार असून,  अंदाजे ८ कोटी ६६ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण होईल, अशी  माहिती आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत यांनी यावेळी दिली.  नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

००००

Tuesday, 17 October 2023

 कीटकनाशके फवारणीसाठी (पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स) परवाना घेणे बंधनकारक

- विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने

            मुंबई, दि. 16 : राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून मुंबई शहरमुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्यांमध्ये कीटकनाशके साठा व विक्री व घरगुती कीटकनाशके विक्री परवाने देण्यात येतात. तसेच किटकनाशकांची फवारणी करण्यासाठी (पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स) कृषी विभागाचा परवाना असणे बंधनकारक असल्याची माहिती, विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी दिली.

            श्री. माने यांनी म्हटले आहे की, विक्रेते घरगुती कीटकनाशके विक्री (मेडिकल स्टोअर्सकिराणा दुकानेसुपर मार्केटबझार इत्यादी) विनापरवाना व्यवसाय करीत आहेत. केंद्र सरकारच्या कीटकनाशके कायदा 1968 कीटकनाशके नियम 1971 अन्वये कीटकनाशके साठा व विक्री (घाऊक व किरकोळ) घरगुती कीटकनाशके विक्री व कीटकनाशके फवारणी करणेसाठी परवाना घेणे बंधनकारक आहे. घरगुती कीटकनाशके साठा व विक्रीचे परवाने कीटकनाशक नियमानुसार कायमस्वरुपी देण्यात येतात. या परवान्यांमधील उगम प्रमाणपत्रे व्यपगत झाल्यास परवान्यामध्ये समाविष्ट करून घेणे गरजेचे आहे. तसेच प्रतिबंधित कीटकनाशके (Restricted Insecticides) वापरासाठी (Fumigation service) परवाना घेणे आवश्यक आहे. विनापरवाना व्यवसाय करणं कीटकनाशके अधिनियम 1971 चा नियम 10 चे उल्लंघन आहे.

            विनापरवाना किटकनाशकंघरगुती वापरासाठीची (उदा. झुरळउंदीरढेकूणमच्छरडासमुंग्या इत्यादी नियंत्रण) कीटकनाशकांचा साठा व विक्री तसेच पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स करणाऱ्या विक्रेते व व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार कृषी विभागाच्या गुणनियंत्रण शाखेस आहे. जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांनी कीटकनाशके साठा व विक्री (घाऊक व किरकोळ)घरगुती कीटकनाशके विक्री व कीटकनाशके फवारणी करणेसाठी परवाने त्वरीत घ्यावेत व पुढील कायदेशीर कारवाई टाळावीअसे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक श्री. माने यांनी केले आहे.

        अधिक माहितीसाठी रोड नं. १६. झेड लेनबागळे इस्टेटठाणे (पश्चिम) ४००६०४, संपर्क क्रमांक – ८६९१०५८०९४ या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Sunday, 1 October 2023

अन्नपुर्णेचे किंवा सुगरणीचे घरातले अन्नपदार्थ चांगले ठरविण्याचे काही निकष

 अन्नपुर्णेचे किंवा सुगरणीचे घरातले अन्नपदार्थ चांगले ठरविण्याचे काही निकष


★आमटी कशी एकसंध असावी....डाळ व पाणी फारकत झाल्यासारखे वेगळे -वेगळे नको.


★भात कसा मोगर्‍याच्या कळ्यांसारखा दिसावा. पांढराशुभ्र, मोकळा पण मऊ शीत असावे.


★भाजी नुसती तिखट व तेलकट म्हणजे चवदार नाही. योग्य तितका मसाला पण असावा.


★पुरणपोळी मधे अंगठ्याने दाबून मधे खळगा करता आला पाहिजे व त्यात तूप घेता आले पाहीजे .इतके पुरण असावे.


★भाकरीला पोट व पोळीला काठ असता कामा नये.


★हिरवी चटणी म्हणजे नुसता नारळाचा चोथा नको. पुरेसा तिखटपणा असावा.


★तूप कणिदार व रवाळच असलं पाहीजे नाहीतर डालडा किवा तेल वाढल्यासारखे वाटते.


★चहा दाट असला तरी चहा म्हणजे साखरेचा पाक नको (खडा चम्मच). त्याला चहाचा सुगंध आला पाहिजे,रंघी लाल किंवा काळपट नसावा. चहा योग्य तितका मुरलेला असेल तरच तरतरी येते.


★ताक कसं थोडे आंबट व मधुर असावे. नाहीतर नुसते नासवलेले दूध वाटते.


★जेवायला काहीही करा,पण जेवण चवदार व वेळेत बनवा. भूक परतली तर जेवणाची मजा जाते.


★जेवणाचे ताट इतके सुबक व स्वच्छ रीतीने वाढावे की,भूक नसणार्‍यालाही जेवावेसे वाटले पाहीजे. नाहीतर जेवणाचे अयोग्य पद्धतीने वाढलेले ताट म्हशीला अंबोण ठेवल्यासारखे दिसते.


★सगळ्यात शेवटी महत्वाचे म्हणजे, जेवणार्‍याने इतके आकर्षक पध्दतिने जेवावे की, तुम्हाला जेवताना कोणी पाहीले तर,त्यानाही भूक लागली पाहीजे. नाहीतर एकेकजण इतके किळस वाणे जेवतात की,शेजारी जेवणार्‍याची भूकच मरते.


★पदार्थ खाण्यापूर्वी मला आवडत नाही असं म्हणू नये आधी खाऊन पहावा आवडला नाही तर परत घेऊ नये पानात काही टाकू नये आज कोणती भाजी आहे विचारून नाक मुरडणे चांगले नाही.


अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरः प्राणवल्लभे।.

ज्ञानवैराग्य सिद्यर्थम्

भिक्षांदेहिच पार्वती ।।

डीजे वाले बाबु -मला अंध नका कर, हृदय कमकुवत नका कटू

 

डीजे वाले बाबु -मला अंध नका करु  ........  

कालच अनंत चतुर्दशी आनंदात पार  पडली आपल्या लाडक्या गणरायाला आपण आनंदात विसर्जित केलं. ढोल ताशा आणि हा! आत्ता सध्या  D J च्या  ट्रेण्डिंग  गजरात आपण नाचत, थिरकत गणपती बाप्पा ला निरोप दिला !


दुसर्‍याच दिवशी मी'नेहमी प्रमाणे ओपीडी मध्ये नेत्ररोगाचे रुग्ण पाहू लागलो .

थोड्या वेळात ;एक विशीतला तरुण काल  अचानक दिसायला कमी झालं म्हणून आला. प्रार्थमिक तपासणी करून बघितला तर त्याची नजर खूपच कमी झाली होती मग डोळ्याचे pressure घेऊन त्याला नेत्रपटल तपासणी साठी घेतले.  बघतो तर काय त्याच्या नेत्रपटलावर खूप मोठे रक्त साखळे होते आणि नेत्रपटलावर भाजल्या सारख्या जखमा आढळल्या. 


 नेहमी प्रमाणे वाटणारा हा आजार नव्हता याची मला जाणीव झाली मग फेर हिस्टरी तपासणीत त्याला विचारलं कि काही मार लागला होता का? , किंवा तू काही ग्रहण बबघितले का? ,कि कुठे वेल्डिंग बघितले? तर यातील काहीच पॉसिटीव्ह नव्हते . खोलवर विचार केल्या  वर त्याने सांगितलं कि काल मिरवणुकीत नाचलो आणि D J वर लेसर शो बघितला . 


मग मनात पाल चूक चूक ली आणि लेसर शो चा लेसर बर्न रेटिना वर असल्याची खात्री पटली.

 

मग रेटिनाचा O C T स्कॅन करून माझं निदान कन्फर्म केलं .पुढील दोन तासात असेच आजून दोन रुग्ण आलेत त्यांना पण रेटिना वर याच प्रकारचे चित्र दिसले. 


मग मात्र मी आमच्या नेत्र रोग संघटनेच्या माध्यमातून विचारपूस केली असता अजून दोन हॉस्प्पिटल ला असेच रुग्ण आहेत असे निदर्शनात आले.


बापरे! म्हणजे ५ च्या वर तरुण एकाच दिवशी DJ लेसर शो चे शिकार झालेले पहिले. यातील बरेच जण अजून कदाचित रिपोर्ट झालेले नसतील किंवा दुसऱ्या डिस्ट्रिक्ट चे असतील.  

हा आकडा याहून जास्त प्रमाणात असावा

नेत्रपटलावर आम्ही या प्रकारचे लेसर बर्न क्वचितच बघितले असावेत. 


 हा काही तरी भलताच प्रकार समोर आला आणि जनजागृती साठी हा पत्रप्रपंच केला. 


मग प्रश्न पडला कि, ठराविक लोकांनाच असे का झाले. याचा खोलवर अभ्यास केला आणि कळाले कि या green लेसर चे frequency खूप जास्त होती आणि जे युवक त्या लेसर च्या frequency च्या फोकल लेंग्थ वर आलेत किंवा त्यांचे नेत्रपटल आले त्यांनाच हे प्रकार घडले. 



आपण लहानपणी भिंग घेऊन ज्या प्रमाणे ऊन्हात कागद पेटवायचो तसाच  प्रकार या लेसर ने या तरुणाई वर केला होता.


असल्या लेसर वापरावर बंदी आणण्याची गरज आहे. नाही तर याचे भयंकर परिणाम पुढील नवरात्र आणि दिवाळीत दिसतील आणि कित्येक निष्पाप लोकांची नजर यात जाईल . आपल्या कडच्या भाऊ ,दादा आणि राजकारणी चमको गिरी साठी वापरण्यात येणाऱ्या DJ लेसर चा इतका वाईट परिणाम सामान्य नागरिकांवर होईल याची यत् किंचित कल्पना पण करवत नाही. 


या सगळ्या तरुणांना आणि तरुणींना झालेला नेत्रपटल दोष त्यांच्या कॅर्रीयर साठी किती भयावह असेल?  यातील बरीच मंडळी ऊच्च शिक्षण घेणारी होती. 


प्रशाशनाला याची दखल घ्यावी आणि वेळीच हा प्रकार थांबावा 


नाहीतर लातूरच्या अंनत चतुर्दशीच्या भूकंपा प्रमाणे अंधत्वाचा भूकंप आपली वाट बघत आपल्या तरुण पिढीचा घास घेईल.


लेखक

डॉक्टर गणेश भामरे (रेटिना स्पेशालिस्ट )

डॉक्टर सचिन कासलीवाल (नेत्ररोग तज्ज्ञ )


जनहितार्थ 

नाशिक नेत्ररोग तज्ञ संघटना

[लक्षवेधी मास मीडिया : 😇🤔🫲🖐️✊ok मी पण ह्यावर human right commission la apply करते,मिरवणूक, वराती हॉस्पिटल रस्त्यावरून जातात तेव्हा छोटी बालके,आजारी,वृद्ध, माणसांना सहन होत नाही अवजाचे दणके,हृदयात कल येते, कानाचे पडदे phàtail ,सहन होत नाही,वर्गणी देतानाच त्यांना कल्पना द्यावी सर्व सोसायटी ने ठराव करावा,नगरसेवकांना ही अट सांगावी. सुधारणा आरोग्याशी निगडित असेल तर सर्वांनीच आवाज उठवला पाहिजे

Wednesday, 20 September 2023

आयुष्मान भव:’ मोहिमेतून होणार आरोग्य सेवांचा जागर

 आयुष्मान भव:’ मोहिमेतून होणार आरोग्य सेवांचा जागर

              केंद्र शासन देशभर 17 सप्टेंबरपासून आयुष्मान भवमोह राबव आहेया मोहिमेच्या माध्यमातून विविधस्तरावर आरोग्य विषयक सेवा देण्यात येत आहेमोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता सार्वजनिक आरोग्य विभागाने देखील आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहेदेशभर मोहिमेचा शुभारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 13 सप्टेंबर रोजी करण्यात आलाराज्यस्तरीय कार्यारंभ दिन कार्यक्रमाचे मुंबईतही 13 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले.  ही मोह 31 डिसेंबर 2023 पर्यंत राबविण्यात येत आहेआयुष्मान भवशब्दाप्रमाणे सर्वांना सुदृढ आरोग्य मिळावेया हेतूने शासन काम असून मोहिमेच्या माध्यमातून आरोग्य सेवांचा जागर करण्यात येत आहे.

               आयुष्मान भवहा शिर्वादरूपी शब्द आपल्या आयुष्यात  महत्वाचा आहेया शब्दाच्या अर्थावरच ही मोह आधारि आहेमोहिमेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी 17 सप्टेंबरपासून झाला आहेराज्यातही राज्यपाल रमेश बैसमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आरोग्य मंत्री प्राडॉतानाजी सावंत यांच्या उपस्थितीत मोहिमेचा कार्यारंभ करण्यात आलामोहिमेदरम्यान क्षयरोग मुक्त भारत अभियान जोरकसपणे राबविण्यात येत आहेजास्तीत जास्त निक्षय मित्र बनवून क्षयरोग मुक्त भारत अभियानाला बळ देण्यात येत आहेदेशभरात मोहिमेदरम्यान घेतलेल्या उपक्रमांचीकार्यक्रमांची नोंदणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने संकेतस्थळही विकसित केले आहेमोहिमेची संपूर्ण माहिती डॅश बोर्ड स्वरूपात https:// ayushmanbhav. mohfw. gov. in/public/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेया संकेतस्थळावर देशातील कुठल्याही जिल्ह्यातील माहिती उपलब्ध आहे.   

              मोहिमेंतर्गत आयुष्मान आपल्या दारी 3.0, आयुष्मान सभाआयुष्मान मेळावा,  अंगणवाडी  प्राथमि शाळांमधील मुलांची तपासणी आदी उपक्रम राबविण्यात येत आहेया मोहिमेदरम्यान सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहेया पंधरवड्याच्या समरोपप्रसंगी 2 ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

आयुष्मान आपल्या दारी 3.0 :

              ‘आयुष्मान आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आजपर्यं संपूर्ण देशात 25 कोटी आयुष्मान कार्डाचे वाटप करण्यात आले आहेया अनुषंगाने या उपक्रमामधून सर्व जिल्ह्यांमधील पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून आयुष्मान कार्डचे वाटप  करण्यात येणार आहेया उपक्रमाचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी काळजी घेण्यात येत आहेवैयक्तिकस्तरावर आयुष्मान कार्ड संपृक्तता प्राप्त करणे, आयुष्मान कार्डची छपाई आणि वितरण अशाप्रकारे सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयुष्मान कार्ड वितरण मोहीम सुरू झालेली आहे.

आयुष्मान सभा :

               हा उपक्रम गावपातळीवर आरोग्य सेवा सुविधांची जनजागृती करण्याकरीता ग्रामपंचायत व व्हीएचएसएनसी (व्हिलेज हेल्थसॅनिटेशन अॅण्ड न्युट्रीशन कमिटी) यांच्यामार्फत राबविण्यात येतोया मोहिमेचे मूळ उद्दिष्ट आयुष्मान कार्ड व आभा कार्डबाबत जनजागृती करणेआरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत असंसर्गजन्य आजारसिकलसेललसीकरण व क्षयरोग आदीबाबत जनजागृती करणेतसेच आरोग्यवर्धिनी केंद्रस्तरावर  मिळणाऱ्या सेवा सुविधांचे मूल्यमापन करणे हा आहेया सभेद्वारे आयुष्मान कार्ड व आभा कार्ड तयार करणेप्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांची व प्रत्यक्षात लाभ घेतेलेल्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करणेसंलग्न रुग्णालयांची यादी प्रसिद्धी देणे, असंसर्गजन्य रोगसिकलसेलआयुष्मान कार्ड व आभा कार्ड यांची जनजागृती करण्यात येत आहेआयुष्मान भव: मोहिमेमध्ये 'निरोगी गावेआणि 'निरोगी ग्रामपंचायतीनिर्माण करण्याचा प्रयत्न असणार आहेज्या पंचायती आरोग्य योजना यशस्वीपणे पूर्ण करतात, त्यांना 'आयुष्मान ग्रामपंचायतकिंवा 'आयुष्मान अर्बन वॉर्ड' म्हणून सन्मान देण्यात येणार आहेजे त्यांच्या न्याय आरोग्य सेवेच्या तरतुदीच्या समर्पणाचे प्रतीक आहे.

आयुष्मान मेळावा :

           आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रावर दर आठवड्यातील शनिवार किंवा रविवारला संकल्पनेनुसार उपक्रम राबविण्यात येत आहेपहिल्या आठवड्यात असंसर्गजन्य आजारांविषयी तपासणीदुसऱ्या आठवड्यात क्षयरोगकुष्ठरोग आणि अन्य संसर्गजन्य आजारांची तपासणीतिसऱ्या आठवड्यात माता व बाल आरोग्यपोषण आहार व लसीकरणचौथ्या आठवड्यात डोळ्यांची तपासणी व डोळ्यांचे आरोग्य ही संकल्पना असणार आहेया मेळाव्यादरम्यान आयुष्मान कार्ड व आभा कार्ड तयार करण्यात येणार आहेसर्व समावेशक आरोग्य सेवाआयुषमानसिक आरोग्यवाढत्या वयातील आजार व उपचारमौखिक आरोग्यनेत्रकाननाक व घसा यांचे आरोग्यसमुपदेशन सेवायोगा व वेलनेस उपक्रममोफत औषधीप्रयोगशाळा तपासणी तसेच टेलीकन्सल्टेशन सेवा देण्यात येत आहेत.

     सामुदायिक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय महाविद्यालयाच्या मार्फत आठवड्याला किमान एक आरोग्य मेळाव्याचे आयोजनही करण्यात येणार आहेया मेळाव्यात तज्ज्ञ सेवांपासून वंचित रुग्णांना सेवा पुरविण्यात येणार आहेतसेच ज्या तालुक्यांमध्ये तज्ज्ञ सेवांचा अभाव आहेअशा तालुक्यांमध्ये रुग्णांना तज्ज्ञ सेवांचा लाभ देण्यात येणार आहे.

अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी

            या उपक्रमांतर्गत सर्व अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांची विशेष मोहीम राबवून आरोग्य तपासणी करण्यात येणार आहेमुलांची 32 सामान्य आजारांची वेळेवर तपासणी व उपचार करण्यात येणार आहेआवश्यकतेनुसार मुलांना सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेतसेच मोहिमेत रक्तदान शिबिरांचे आयोजनही करण्यात येणार आहेअशाप्रकारे राज्यात 17 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या आयुष्मान भव : मोहिमेतून 31 डिसेंबरपर्यंत आरोग्यविषयक सेवांचा जागर सुरू आहे.

Featured post

Lakshvedhi