Showing posts with label कला क्रीडा. Show all posts
Showing posts with label कला क्रीडा. Show all posts

Tuesday, 16 December 2025

महाविद्यालयातील प्रत्येक खेळाडूची ‘भारत स्पोर्ट्स पोर्टल’ वर नोंदणी व्हावी

 महाविद्यालयातील प्रत्येक खेळाडूची  ‘भारत स्पोर्ट्स पोर्टल’ वर नोंदणी व्हावी

महा-देवा प्रोजेक्टसाठी फुटबॉल टीम तयार करा

-राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे

 

मुंबईदि.15 : राज्यातील सर्व  विद्यापीठांअंतर्गत महाविद्यालयांमध्ये प्रत्येक खेळाडूंची भारत स्पोर्ट्स पोर्टल वर नोंद करून महा-देवा प्रोजेक्टसाठी फुटबॉल टीम तयार करण्याचे निर्देश राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले.

'लोकभवनयेथे महा-देवा प्रोजेक्ट तसेच इतर खेळांच्या प्रगतीसंदर्भात राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्यपालांचे उपसचिव राममूर्तीलोकभवनमधील सह संचालक (वै. वि. मं.) विकास कुलकर्णी तसेच दूरदृश्यप्रणाली द्वारे सर्व विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक उपस्थित होते.

Friday, 22 August 2025

शिवकालीन खेळांना प्रोत्साहन देऊन नव्या पिढीपर्यंत

 शिवकालीन खेळांना प्रोत्साहन देऊन नव्या पिढीपर्यंत सांस्कृतिक वारसा पोहोचवण्यासाठी ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव परंपरागत देशी खेळांच्या क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले. परंपरागत खेळांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून आगामी काळात मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात परंपरागत देशी खेळांचे आयोजन केले जाईल असे कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले.

Thursday, 21 August 2025

२९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान क्रीडा महोत्सवाचे

 क्रीडा दिनानिमित क्रीडा महोत्सवाचे राज्यभर आयोजन

 

मुंबई, दि. २० : क्रीडा दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय महोत्सवात राज्यभर विविध कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी कार्यप्रणाली तयार करण्यात यावी. त्यासाठीचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी दिली.

पद्मभूषण मेजर ध्यानचंद सिंह यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यभर २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.  या महोत्सवाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, आयुक्त शितल तेली, उपसचिव सुनील पांढरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे राज्यातील क्रीडा अधिकारी सहभागी झाले होते.

मंत्री ॲड.कोकाटे म्हणाले कीकेंद्र सरकारच्या क्रीडा धोरणाच्या धर्तीवर नवे क्रीडा धोरण तयार करण्यात यावे. तसेच राज्यातील खेळाडूंच्या अपेक्षेप्रमाणे बदल करावे. क्रीडा महोत्सवात जिल्हा तसे तालुकास्तरावर विविध क्रीडा कार्यक्रमांचे आणि स्पर्धांचे आयोजन करावे. शाळा महाविद्यालय विद्यापीठांना तसेच जिल्ह्यातील क्रीडापटूंना या महोत्सवात सहभागी करून घ्यावे. केंद्र शासनाने दिलेल्या सूचनाप्रमाणे २९ ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांना अभिवादनफिट इंडिया शपथ आणि ६० मिनिटे संघ खेळ व विरंगुळ्याचे खेळ आयोजित करावे.

३० ऑगस्ट रोजी स्थानिक/आदिवासी खेळइनडोअर स्पोर्ट्सशाळा/महाविद्यालय स्तरावरील क्रीडावादविवादफिटनेस व्याख्यानेक्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे. ३१ ऑगस्ट रोजी Sundays on Cycle या उपक्रमात देशभरातील नागरिकांचा सहभाग करून उपक्रम राबवावा.

या तीन दिवसीय क्रीडा महोत्सवात दोर  खेचणे (Tug of war), ५० मी. शर्यतरिले रेसमॅरेथॉनचमच्यातील गोळी शर्यतगोणपाट शर्यतयोगक्रिकेटसायकलिंगपिट्ठू सारखे स्थानिक खेळखो-खोकबड्डीव्हॉलीबॉलदोरीवर उड्या मारणेबुद्धिबळऑलिंपिक मूल्य शिक्षण कार्यक्रम  तसेचज्येष्ठ नागरिकांसाठी ३०० मी. स्पीड वॉक१ किमी वॉकयोगश्वसनाचे व्यायामसांध्यांचे व्यायामस्ट्रेचिंग चॅलेंजसायकलिंग या क्रीडा प्रकाराचा सहभाग करावा.

Wednesday, 13 August 2025

संस्थांना आणि क्रीडा मंडळांना यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी ९८६७०६६५०६ अथवा ९७६८३२७७४५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे क्रीडा

 क्रीडा भारती या संस्थेच्या माध्यमातून मुंबई परिसरातून मोठ्या प्रमाणात या स्पर्धेसाठी नोंदणी सुरु करण्यात आली असून आतापर्यंत १५ हजार पेक्षा जास्त स्पर्धकांनी विविध खेळांसाठी नोंदणी केली आहे. शाळा, आयटीआय आणि महाविद्यालयांनीही क्रीडा भारती यांच्याशी संपर्क केला आहे. दरम्यान ज्या संस्थांना आणि क्रीडा मंडळांना यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी ९८६७०६६५०६ अथवा ९७६८३२७७४५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे क्रीडा भारतीकडून सांगण्यात आले आहे. मुंबईमध्ये यापूर्वीही मंत्री श्री. लोढा यांच्यावतीने अशा प्रकारच्या पारंपरिक खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या पारंपरिक क्रीडा स्पर्धांना जनतेने दिलेला उदंड प्रतिसाद पाहता आता मोठ्या प्रमाणात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे

Thursday, 31 July 2025

जिल्हास्तरीय खेलो इंडिया कबड्डी केंद्राकरिता इच्छुक प्रशिक्षकांना ४ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 जिल्हास्तरीय खेलो इंडिया कबड्डी केंद्राकरिता

इच्छुक प्रशिक्षकांना ४ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. ३१ : जिल्हास्तरीय खेलो इंडिया कबड्डी केंद्रात क्रीडा प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात येणार आहे. इच्छुक क्रीडा प्रशिक्षकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कांदिवली येथे ४ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी केले आहे.

 

केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत "खेलो इंडिया" योजनेअंतर्गत देशभरात १००० खेलो इंडिया केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत.  या योजनेचा उद्देश  मुलांना प्रशिक्षित करून आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी अधिकाधिक खेळाडू घडविणे हा आहे. या योजनेअंतर्गत मान्यता प्राप्त केंद्रांवर शासकीय मार्गदर्शकअनुभवी प्रशिक्षक व माजी गुणवंत खेळाडू हे प्रशिक्षक म्हणून नेमण्यात येणार आहेत.

 

प्रशिक्षकाची वयोमर्यादा १८ ते ४५ वर्षे असूनउच्च दर्जाची गुणवत्ता व कामगिरी असल्यास समितीच्या मान्यतेने ५० वर्षांपर्यंत वयाचे उमेदवारही प्रशिक्षक पदासाठी पात्र ठरू शकतात. प्रशिक्षकांना ऑलिंपिकएशियन गेम्सजागतिक अजिंक्यपदआंतरराष्ट्रीय स्पर्धाराष्ट्रीय किंवा राज्य पुरस्कारएनआयएस पदविकाअधिकृत लेवल कोर्सेसबीपीएड/एमपीएड व किमान १० वर्षांचा अनुभव यांपैकी एक किंवा अधिक अर्हता असणे आवश्यक आहे.

 

इच्छुक उमेदवारांनी अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयशासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालयसंभाजीनगर समोरआकुर्ली रोडकांदिवली (पूर्व)मुंबई – ४००१०१ या पत्त्यावर सादर करावेत. अधिक माहितीसाठी क्रीडा कार्यकारी अधिकारी, श्रीमती प्रिती टेमघरे (मो. ९०२९२५०२६८) व श्री. अभिजित गुरव (मो. ८१०८६१४९११) अथवा 20890717 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी केले आहे.

Sunday, 29 June 2025

सुहित जीवन ट्रस्ट, पेन संस्थेच्या खेळाडूने rराष्ट्रीय स्पर्धेत मिळविलेल्या यशाचे - फोटो

 एकलव्य प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत मिळविलेल्या यशाचे - फोटो




Wednesday, 18 June 2025

रेडिओचे योगदान

 रेडिओचे योगदान

‘आकाशवाणी’ हे एक लोकप्रसारणाचे महत्त्वाचे माध्यम म्हणून गणले गेले आहे. १९२७ सालापासून सुरू झालेल्या आकाशवाणीने भारताच्या आर्थिकसामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात खूप मोठी भर घातलेली आहे. जनसंवादाचा आणि जनसंपर्काचा "मास मीडिया" म्हणून ओळखले जाणारे आकाशवाणी हे भारतीय माध्यमाचे एक अविभाज्य अंग आहे. आकाशवाणीमुळे अनेक कलाकार घडले असूनअनेक कलाप्रकारांना प्रोत्साहन आणि संरक्षणही मिळाले आहे. नवमाध्यमांच्या आक्रमणात व नवमनोरंजनाच्या या काळात आकाशवाणीनेही कालसुसंगत परिवर्तन केले आहे. आजही ग्रामीण भागात आकाशवाणीच्या कार्यक्रमांना मोठी पसंती मिळत असते.

महाराष्ट्रात आज घडीस ऑल इंडिया रेडिओची २८ केंद्रेएफ एम रेडिओची सोळा केंद्रे आणि ५४ कम्युनिटी रेडिओची केंद्रे हे काम करत आहेत. रेडिओ सिटीरेडिओ वनमॅजिक एफएममाय एफ एमटोमॅटो एफ एमअशी विविध एफ एम चॅनल्स सध्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. त्याचबरोबर विविध संस्थांची विविध कम्युनिटी रेडिओ स्टेशन्सही सुरू आहेत.

रेडिओ महोत्सवामुळे मराठी भाषेच्या प्रचार व प्रसिद्धीस मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकेल. मराठीसाठी काही पुरस्कार राखीव असल्यामुळे मराठी कलाकार आणि मराठी भाषा यासाठी हा महोत्सव महत्त्वाचा राहणार आहे.  नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. एफ एम रेडिओ व कम्युनिटी रेडिओने मराठी भाषेच्या प्रचाराच्या प्रसिद्धीसाठी उल्लेखनीय काम केलेले आहे.  अनेक मराठी कलाकारांना रेडिओमुळे नाव मिळालेले आहे. रेडिओ या सशक्त माध्यमाची दखल घेणेसांस्कृतिक कार्य विभाग व पर्यायाने राज्य शासनाच्या विविध योजनाउपक्रम यांची प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी रेडिओ माध्यमांचा वापर करणे हा या महोत्सव व पुरस्काराचे आयोजन करण्याचा हेतू असल्याचे सांस्कतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी यावेळी सांगितले.

०००

Friday, 13 June 2025

कर्जत तालुका क्रीडा संकुलाच्या जागेचा निर्णय तालुका क्रीडा संकुल समितीने घ्यावा

 कर्जत तालुका क्रीडा संकुलाच्या जागेचा निर्णय

तालुका क्रीडा संकुल समितीने घ्यावा

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथील बैठकीत आदेश

 

मुंबईदि. १२ :- कर्जत तालुका क्रीडा संकुलाच्या जागेचा निर्णय तालुका क्रीडा संकुल समितीने १५ दिवसाच्या आत घेतला नाहीतर जिल्हा क्रीडा संकुल समिती याबाबत निर्णय घेऊन शासनाला कळवेलया जागेबाबत त्यापुढील कार्यवाही शासनस्तरावरुन करण्यात येईलअसे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.   

            महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनमुंबई येथे तालुका क्रीडा संकुलाच्या जागेसंदर्भात उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रोहिणी घुले व उप नगराध्यक्ष संतोष मेहत्रे उपस्थित होते.

            कर्जत तालुका क्रीडा संकुलासाठी भांडेवाडी येथील जागेला मंजुरी मिळाली होती. त्यानुसार कामास सुरुवात करण्यात आलेली होती. त्याअनुषंगाने अतिरिक्त जागेची गरज लक्षात घेता बर्गेवाडी अथवा इतर पर्यायी दोन ते तीन ठिकाणांची जागेची मागणी तालुका क्रीडा संकुल समितीने करावीइतर तीन ते चार जागेचे सुयोग्य पर्याय सुचविण्यात यावेततसेच जिल्हाधिकारीअहिल्यानगर यांच्याकडून हे पर्याय तपासून घेण्यात यावेत, असे निर्देश सभापती प्रा.शिंदे यांनी दिले.

          बैठकीस क्रीडा आयुक्त शितल उगले दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या. तसेच महसूल विभागाचे सहसचिव संजय बनकरक्रीडा विभागाचे उपसचिव सुनिल पांढरेसहसंचालक सुधीर मोरेकर्जत नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अक्षय जायभाये उपस्थित होते.

0000

Friday, 16 May 2025

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅटट्रिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन

 खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅटट्रिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन

 

मुंबईदि. १६ :- 'भले शाब्बास!जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या क्रीडा गौरवात आणखी भरच घातली आहे. या यशामुळे आपण सर्व खेळाडू महाराष्ट्राचा अभिमान आहात,' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेलो इंडिया युवा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाची हॅट्ट्रिकाचा पराक्रम साधणाऱ्या महाराष्ट्राच्या चमुतील खेळाडुंचे अभिनंदन केले आहे.

 

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करीत ५८ सुवर्ण४७ रौप्य५३ कांस्य अशी एकूण १५८ पदकांची लयलूट केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अत्यंत आनंद झाल्याचे नमूद केले आहे. तसेच या ७ व्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राने तब्बल ९ स्पर्धा विक्रमांचा पराक्रमही नोंदविणे अभिमानास्पद असल्याचे म्हटले आहे. 

 

'ग्रामीण भागांतून येणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावेत्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठीची प्रेरणा मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून खेलो इंडिया स्पर्धा 2018 पासून सुरू झाली. या स्पर्धेत आतापर्यंत महाराष्ट्राने पाचव्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरणे ही बाब आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंच्या गुणवत्तेची चुणूक दाखवणारी आहे. या स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूत्यांचे प्रशिक्षकमार्गदर्शक आणि खेळाडूंच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलेल्या त्यांच्या कुटुंबीयांचे देखील कौतुक करावे तितके थोडेच आहेअशा शब्दांत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच या सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Friday, 25 April 2025

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन

 भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन

मुंबई दि. २४ : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने विविध महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. येत्या २५ ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत सायंकाळी ६.०० ते १०.०० या वेळेत रवींद्र नाट्य मंदिरप्रभादेवीमुंबई या ठिकाणी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार यांची असून,   मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात शुक्रवार दिनांक २५ एप्रिल२०२५ रोजी पहिल्या पुष्पात सायंकाळी ६.०० वाजता विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे यांचे शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सादर आहे. तर याच दिवशी उस्ताद शाहिद परवेझ यांचाही शास्त्रीय गायनाचा कार्यकम होणार आहे. शनिवार दिनांक २६ एप्रिल२०२५ रोजी दुसऱ्या पुष्पात सायंकाळी ६.०० वाजता डॉ. भरत बलवल्ली तसेच विदुषी मंजुषा पाटील यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यकम होईल. रविवार दिनांक २७ एप्रिल२०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता ज्येष्ठ गायक पं. आनंद भाटे आणि ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. उल्हास कशाळकर यांचे शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

 उपरोक्त शास्त्रीय संगीत महोत्सव रसिक प्रेक्षकांसाठी विनामुल्य ठेवण्यात आलेला आहे. विनामुल्य प्रवेशिका रवींद्र नाट्य मंदिर-प्रभादेवीछत्रपती शिवाजी नाट्य मंदिर दादर आणि यशवंत नाट्य मंदिर-माटुंगा येथे उपलब्ध आहेत.

            भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचा रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

०००

Wednesday, 16 April 2025

एव्हीजीसी – एक्स आर’ धोरणात मराठी चित्रपट निर्मितीचा समावेश करावा

 एव्हीजीसी – एक्स आर’ धोरणात मराठी चित्रपट निर्मितीचा समावेश करावा

-         उद्योग मंत्री उदय सामंत

 

मुंबईदि. 15 उद्योग विभाग ॲनिमेशनव्हिज्युअल इफेक्टस्गेमिंगकॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी अर्थात एव्हीजीसी - एक्सआर धोरण आणत आहे. यामध्ये ॲनिमेशनगेमिंगचे नवनवीन सॉफ्टवेअर निर्मितीवेब सिरीज आदींचा समावेश असणार आहे. मुंबईत बॉलीवूड असल्याने चित्रपट निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. यासोबतच मराठी चित्रपट निर्मितीही राज्यात होते. या धोरणात मराठी चित्रपट निर्मितीबाबत स्वतंत्र कॅटेगिरी करून समावेश करण्यात यावाअशा सूचना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

 

            मंत्रालयात या प्रस्तावित धोरणाबाबत बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस उद्योग विभागाचे सचिव पी. अनबलगन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

            उद्योग मंत्री श्री.सामंत म्हणालेहे धोरण सर्वंकष असावे. धोरणातून या क्षेत्रातील घटकांना सवलती देण्याबाबत दुरदृष्टीकोन ठेवण्यात यावा. राज्यात सातारा जिल्ह्यातील वाई आणि परीसरात मराठी चित्रपटांचे चित्रिकरणाचे हब’ बनत आहे. तसेच भोजपूरी चित्रपटांचे चित्रीकरणही राज्यात मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे अशा बाबींचा समावेशही या धोरणात असावा.

 

            वेब सिरीजमध्ये काही स्वतंत्र विषय घेऊन केलेल्या असतात. त्यामध्ये कृषीआरोग्यशिक्षण आदींचा समावेश असतो. अशा स्वतंत्र विषयाला वाहिलेल्या वेब सिरीज निर्मितीचा विषयवार या धोरणात सहभाग असावाअशा सूचनाही मंत्री श्री.सामंत यांनी दिल्या.

Saturday, 12 April 2025

Call for Proposals to Empower Private Sports Academies under Mission Lakshyavedh

 

Call for Proposals to Empower Private Sports Academies

under Mission Lakshyavedh

Mumbai, April 4 :To develop modern sports training systems, infrastructure, sports science, sports medicine, organize competitions, provide awards and incentives to athletes, offer career guidance, and enhance players' skills, the "Mission Lakshyavedh" scheme is being implemented. Under this scheme, private sports academies will be provided financial assistance. Interested sports academies should submit their applications by April 21, informed Rashmi Ambedkar, District Sports Officer of Mumbai Suburban.

The government is constantly striving to promote, preserve, and nurture a sports culture in the state and to develop talented athletes. Systematic efforts are being made to help athletes win medals in international events like the Olympics. Under Mission Lakshyavedh, financial support will be provided to private sports academies in Maharashtra that specialize in one of the following 12 disciplines:

Athletics, Archery, Badminton, Boxing, Hockey, Lawn Tennis, Rowing, Shooting, Sailing, Table Tennis, Weightlifting, Wrestling.

For the Mumbai Suburban district, the eligible sports are: Boxing, Athletics, Wrestling, Table Tennis, and Shooting.

🏆 Classification & Financial Assistance:

The classification of private academies will be based on a scoring system which evaluates:

  • Number of athletes
  • Coaches and assistant coaches
  • Available training infrastructure and its quality
  • Sports equipment
  • Performance of the academy

Scoring Criteria:

  • Category ‘C’: 35 to 50 points → ₹10 lakh per annum
  • Category ‘B’: 51 to 75 points → ₹20 lakh per annum
  • Category ‘A’: 76 to 100 points → ₹30 lakh per annum

The financial aid can be used for:

  • Building/upgrading sports infrastructure
  • Coaches’ honorarium
  • Equipment and training tools, etc.

📝 How to Apply:

Interested academies should contact the District Sports Office, Mumbai Suburban at:
Government College of Physical Education Campus, Opp. Sambhaji Nagar, Akurli Road, Kandivali (East), Mumbai-400101For more details and application forms, contact:
Mrs. Preeti Temghare (Sports Executive Officer) 📞 Mobile: 9029250268

An appeal has been made by District Sports Officer Mrs. Rashmi Ambedkar to take full advantage of this opportunity.

0000


Monday, 7 April 2025

राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाबाबत लवकरच बैठक

 राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाबाबत लवकरच बैठक

- क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे

 

मुंबईदि. २० : राज्यात ३५८ तालुक्यांमध्ये १०० तालुका क्रीडा अधिकारी पदे मंजूर असून इतर तालुक्यांमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे कार्यभार आहे. पद निर्मितीचा आणि आकृतीबंधाचा प्रस्ताव शासनाच्या पातळीवर विचाराधीन असून लवकरच तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर अधिकारी उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाबाबत सर्व संबंधित सदस्यांसमवेत लवकरच बैठक आयोजित करून चर्चा करण्यात येईलअसे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य अमोल मिटकरी यांनी तेल्हारा (जिल्हा अकोला) येथील तालुका क्रीडा संकुलाची दुरावस्था झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सदाशिव खोतशिवाजीराव गर्जेविक्रम काळेकृपाल तुमानेउमा खापरे आदींनी सहभाग घेतला.

मंत्री श्री.भरणे म्हणालेतालुका क्रीडा संकुल येथे सुविधा अपुऱ्या आहेतही वस्तुस्थिती आहे. तथापि लवकरच तीन कोटी रुपयांच्या प्रस्तावित कामांमध्ये संरक्षण भिंतइनडोअर हॉलविद्युतीकरणड्रेनेज व्यवस्थारेन वॉटर हार्वेस्टिंगक्रीडा साहित्य आदी सुविधा निर्मितीचे अंदाजपत्रक तयार केले जाईल तसेच राज्य क्रीडा विकास समितीसमोर मान्यतेसाठी ठेवून हा प्रश्न तातडीने मार्गी लावला जाईल.

सभापती प्रा. राम शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार ज्या ठिकाणी क्रीडा मंडळे चांगले काम करीत असतील तेथे क्रीडा संकुलाच्या देखभाल दुरुस्तीचे काम त्यांना देण्याबाबत बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईलअसे मंत्री श्री. भरणे यांनी सांगितले. शासकीय इमारतींच्या बांधकाम आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासंबंधीचा दर हा २०१४ सालचा आहे. हा दर बदलण्याची शिफारस करण्यात आली असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईलअसेही त्यांनी सांगितले.

Wednesday, 5 March 2025

चित्रप्रदर्शनाचेही आयोजन*रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे 2 मार्च ते 15 मार्च

 *चित्रप्रदर्शनाचेही आयोजन*

रवींद्र नाट्यमंदिरप्रभादेवी येथे 2 मार्च ते 15 मार्च 2025 या कालावधीत महाराष्ट्रातील नामांकित चित्रकारसुलेखनकार आणि शिल्पकार यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत हे प्रदर्शन खुले असणार असूनमुंबईकरांनी याचा लाभ घ्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांनी केले आहे.


Monday, 24 February 2025

किलीमांजारो शिखर सर करुन निखिल कोकाटे यांची ऐतिहासिक कामगिरी

 किलीमांजारो शिखर सर करुन

निखिल कोकाटे यांची ऐतिहासिक कामगिरी


·         आदिवासी विकास विभागाचे पाठबळ

·         पुणे जिल्ह्यातील पहिले आदिवासी गिर्यारोहकाचा मान

 

मुंबईदि. 24 : पुणे जिल्ह्यातील पहिले आदिवासी गिर्यारोहक निखिल कोकाटे यांनी आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारो यशस्वीपणे सर केले आहे. त्यांच्या या मोहिमेसाठी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या तत्परतेने अवघ्या एका दिवसात विभागामार्फत ५ लाख ४० हजार ८०० रु.ची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली.

 

      निखिल कोकाटे यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी अभिनंदन केले आहे. आदिवासी युवकांना प्रोत्साहन देण्याच्या दिशेने आदिवासी विकास विभागाने केलेल्या या सहकार्यामुळे ही ऐतिहासिक कामगिरी करु शकला अशी प्रतिक्रिया निखिल कोकाटे यांनी दिली. या सहकार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे त्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी आभार मानले आहेत.

००

Sunday, 16 February 2025

कोल्हापूर फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीस तत्वत: मान्यता

 कोल्हापूर फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीस तत्वत: मान्यता

- क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

क्रीडा गणवेश दर्जाक्रीडा मार्गदर्शक मानधन,

प्रशिक्षणार्थी भोजन दरात वाढ करण्याचा निर्णय

 

            मुंबईदि. 12 :- शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडीपुणे येथे खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आहेत. या सुविधा अद्ययावत कराव्यातकाही सुविधा आवश्यतेनुसार नव्याने कराव्यात,असे निर्देश देत गणवेश दर्जाप्रशिक्षक मानधनभोजन दरात वाढ करण्याचा तसेच फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याबाबत तत्वत: मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात शिवछत्रपती क्रीडापीठ उच्चस्तर धोरण समितीची बैठक झाली. बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओलक्रीडा विभागाचे सहसचिव मंगेश शिंदेक्रीडा विभागाचे सहसंचालक सुधीर मोरेउपसंचालक सहास पाटीलनवनाथ फडतारे उपस्थित होते.

क्रीडा मंत्री भरणे म्हणाले कीमहाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय व ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू घडविणेराज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षणसंतुलित आहार देणेअद्ययावत क्रीडा सुविधा देणे त्याचबरोबर क्रीडा संस्कृती रुजविण्याच्या हेतूने शिवछत्रपती क्रीडापीठम्हाळुंगे-बालेवाडीपुणे येथे स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे हा हेतू साध्य करत महाराष्ट्राच्या लौकीकाला साजेसे काम या क्रीडापीठाच्या माध्यमातून झाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक मदत करण्यास शासन तत्पर आहे. शिवछत्रपती क्रीडापीठपुणे व राज्यातील क्रीडा प्रबोधिनींचे व्यवस्थापनदेखभाल दुरुस्तीनवीन कामे करताना सूक्ष्म नियोजन करून कामाचा दर्जागुणवत्ता कायम राखावीअसेही निर्देशही दिले.

कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीला तत्वत: मान्यता

            क्रीडा मंत्री भरणे म्हणालेकोल्हापूर कुस्तीसाठी प्रसिध्द आहे. याबरोबरच आता फूटबॉल खेळासाठी देखील कोल्हापूर प्रसिध्द होत आहे. या ठिकाणी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी असावी अशी मागणी पुढे येत आहे. या मागणीचाफुटबॉल खेळाडूंचाफुटबॉल प्रेमींचा आदर करुन कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीला तत्वत: मान्यता देण्याचा निर्णय घेत असल्याचे स्पष्ट करत या निर्णयामुळे फूटबॉल खेळाला प्रोत्साहन मिळणार असून नामवंत खेळाडू घडण्यासाठी ही प्रबोधिनी उपयुक्त ठरेलअसा विश्वासही क्रीडा मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

खेळाडूंचे प्रमाणपत्र पडताळणी

            कायाकिंग कनोईंग क्रीडा प्रकारातील खेळाडूंच्या प्रमाणपत्राच्या पडताळणीचा प्रश्न विनाविलंब मार्गी लावण्याचे आदेश क्रीडा मंत्री भरणे यांनी दिले. खेळाडूंच्या प्रमाणपत्र पडताळणीसंदर्भात उपाययोजना कराव्यात. कोणत्याही खेळाडूंवर अन्याय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावीअसे निर्देशही त्यांनी या दिले.

0000

Wednesday, 12 February 2025

कोल्हापूर फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीस तत्वत: मान्यता

 कोल्हापूर फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीस तत्वत: मान्यता

- क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

क्रीडा गणवेश दर्जाक्रीडा मार्गदर्शक मानधन,

प्रशिक्षणार्थी भोजन दरात वाढ करण्याचा निर्णय

 

            मुंबईदि. 12 :- शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडीपुणे येथे खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आहेत. या सुविधा अद्ययावत कराव्यातकाही सुविधा आवश्यतेनुसार नव्याने कराव्यात,असे निर्देश देत गणवेश दर्जाप्रशिक्षक मानधनभोजन दरात वाढ करण्याचा तसेच फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याबाबत तत्वत: मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात शिवछत्रपती क्रीडापीठ उच्चस्तर धोरण समितीची बैठक झाली. बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओलक्रीडा विभागाचे सहसचिव मंगेश शिंदेक्रीडा विभागाचे सहसंचालक सुधीर मोरेउपसंचालक सहास पाटीलनवनाथ फडतारे उपस्थित होते.

क्रीडा मंत्री भरणे म्हणाले कीमहाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय व ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू घडविणेराज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षणसंतुलित आहार देणेअद्ययावत क्रीडा सुविधा देणे त्याचबरोबर क्रीडा संस्कृती रुजविण्याच्या हेतूने शिवछत्रपती क्रीडापीठम्हाळुंगे-बालेवाडीपुणे येथे स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे हा हेतू साध्य करत महाराष्ट्राच्या लौकीकाला साजेसे काम या क्रीडापीठाच्या माध्यमातून झाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक मदत करण्यास शासन तत्पर आहे. शिवछत्रपती क्रीडापीठपुणे व राज्यातील क्रीडा प्रबोधिनींचे व्यवस्थापनदेखभाल दुरुस्तीनवीन कामे करताना सूक्ष्म नियोजन करून कामाचा दर्जागुणवत्ता कायम राखावीअसेही निर्देशही दिले.

कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीला तत्वत: मान्यता

            क्रीडा मंत्री भरणे म्हणालेकोल्हापूर कुस्तीसाठी प्रसिध्द आहे. याबरोबरच आता फूटबॉल खेळासाठी देखील कोल्हापूर प्रसिध्द होत आहे. या ठिकाणी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी असावी अशी मागणी पुढे येत आहे. या मागणीचाफुटबॉल खेळाडूंचाफुटबॉल प्रेमींचा आदर करुन कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीला तत्वत: मान्यता देण्याचा निर्णय घेत असल्याचे स्पष्ट करत या निर्णयामुळे फूटबॉल खेळाला प्रोत्साहन मिळणार असून नामवंत खेळाडू घडण्यासाठी ही प्रबोधिनी उपयुक्त ठरेलअसा विश्वासही क्रीडा मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

Featured post

Lakshvedhi