स्त्री-पुरुषांमध्ये मैत्री असावी का ?-----
का? नसावी ----
स्त्री-पुरुषांची मैत्री म्हटली की अनेकांच्या पोटात गोळा येतो एका वेगळ्या नजरेने बघितले जाते
आम्ही 21व्या शतकात वावरत असताना सुद्धा आमचे विचार मनुवादी विचारसरणीचेच आहेत,
खरंतर हा विषय गहन च आहे
लिहिण्याच धाडस करत आहे
किती पर्यंत जमेल माहित नाही,
आज ही समाजव्यवस्थेत स्त्री पुरुषाच्या मैत्रीला कुटुंबात व समाजात मोकळे असे स्थान नाही ,
स्त्री पुरुष मैत्री म्हणजे फक्त शारीरिक संबंधच, असे आम्ही गृहीतच धरले आहे,
हाच विचार रूढ केला आहे,
'राधा 'आणि कृष्णाची '' मैत्री आम्ही स्वीकारली, कान्हा वर प्रेम व भक्ती करणारी '' मिरा" ही आम्ही स्वीकारली,
परंतु स्त्री पुरुषाची मैत्री म्हटलं की भुवया उंचावतात, त्यातल्या त्यात ते जर, विवाहित असतील तर मग बघायलाच नको,
मानवी संस्कृतीच्या इतिहासात स्त्री एक स्वतंत्र व्यक्तीमत्व असलेली मानव आहे, या विचाराशी परीचित व्हायला गेल्या शेदिडशे वर्षात सुरूवात झाली आहे. स्त्रीला एक मानव म्हणून स्विकारणे, तीला एकसमान समजणे तरी अजूनही रूजलेले नाही.
स्त्री पुरूष यांच्यातील सबंधाचा विचार केवळ नरमादी वा केवळ एकच नात्याच्या अनुषंगाने करणारे लोक, निव्वळ संकुचित वा बुरसटलेले नव्हे तर ते मानव या अर्थाने उत्क्रांतही झालेले नसतात. स्त्रीयांना स्वतंत्र बुद्धी असते ही बाबच अनेकांना मान्य नसते असे लोक कोणत्याही स्त्रीपुरूषांना एकाच नात्याने पाहत असतात.
लिओ टॉलस्टॉय म्हणताच ' nothing is so necessary for man, as to the company of intellectual women'. टॉलस्टॉय ने स्त्रींयाबाबतच लिहीलं कारण त्यावेळी स्त्रीया बुद्धीमान नसतात ,असा समज होता. प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या वा स्त्रीच्या मागे पुरूष वा स्त्री असते. जरूरी नव्हे की ती स्त्री पत्नीच असेल वा तो पुरूष तीचा पतीच असेल! हा आधुनिक, स्त्रीपुरूष समतावादी, मुक्त, स्वतंत्रतावादी असू शकतात
मुळात मैत्रीचा पाया शारीरिक नसुन मानसिक भावनिक आणि वैचारिकतेचा आधारावर उभा असतो, हे आम्ही लक्षातच घेत नाही,
शारीरिक भुके पेक्षा ही बौद्धिक आणि मानसिक भुकेसाठी ते एकत्र येऊ शकत नाही का?
प्रत्येक नात्याला' एक मर्यादा असते 'हे तर आम्ही मान्य करतो,
पती -पत्नीशी जे बोलू शकत नाही'
किंवा पत्नी - पतीशी जे बोलू शकत 'नाही परंतु आपल्या मित्रा शी नक्कीच बोलते हे हक्काचं विश्वासाचे नाते नाही का,?
मैत्री मध्ये समविचारांची देवाण-घेवाण विचार विनिमय संकटात एकमेकांना सहाय्य एकमेकावर आढळ विश्वास एकमेकांसाठी झोकुन देण्याची भावना अपार मायेची प्रेमाची श्रृंखला मी पनाचा व अहंकाराचा लवलेशही नसतो, एकमेकांचे हितचिंतक असतात.
ती त्याची मैत्रीण अगदी सहजतेने स्वीकारते तसेच त्यांने ही अगदी सहजतेने तिच्या मित्राला स्वीकारले पाहिजे. दोन्ही नात्यात सहजता असेल ना तर कुठेच प्रॉब्लेम येत नाही. परंतु तसे होत नाही,
पती आपल्या पत्नीला म्हणत असतो की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो
परंतु प्रेम म्हणजे काय हे अनेक पतीला समजलेलच नसते, तिने जर सांगितलं की आज माझ्या मित्राचा फोन आला होता ,आम्ही भेटणार आहोत, तेव्हा त्याचा चेहरा बघा त्याच्या प्रतिक्रिया काय आहे, बायकोचा मित्र म्हटला की त्याची तळपायाची आग मस्तकाला जाते, तेंव्हा त्याचे प्रेम कुठे गेल, म्हणजेच काय त्याचं प्रेम किती स्वार्थी विचाराच आहे ,तो जर खरं प्रेम करत असता त्याने खुशीने विचारलं पाहिजे अरे वा माझ्यासोबत पण त्याची ओळख करून दे,, असे मात्र होत नाही हेच तिच्यासाठीही लागू होते
परंतु सहजतेने दोघांनीही समजून घेतल्यास
दोघांच्याही वैवाहिक जीवनाला यत्किंचितही धक्का लागणार नाही ,
आता तरी
या नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे खूप महत्त्वाचे आहे,
🌹 ( *भाग 2)*
*स्त्री-पुरुषाची मैत्री असावी का ? का असू नये* ?
2 दिवसा पुर्वी याच विषयावर पोस्ट लिहीली होती अनेकांनी खूप चांगल्या प्रतिक्रया आल्या अनेकांनी सूचना ही केल्या काहींनी आमच्या मनातील भावना तुम्ही व्यक्त केल्या आहेत असे सांगीतले, या विषयावर वर्ध्या वरुन ऐका मैत्रिणीने पोस्ट सेंड केली माझे काम सोपे केले,
मित्रानो!
आयुष्याच्या कोणत्याही स्टेज ला कोणीतरी आपलं असणं.. हक्काचं असणं... आपल्या पाठीशी असणं... समजून घेणारं असणं... खूप मॅटर करतं... मग ते एखद्या स्त्री ला असो वा पुरुषाला...
लग्न झाल्यावर... पहिली काही वर्षे खूप मस्त आनंदी जातात... दिवस ढळू नये अन रात्र सरु नये अशी अवस्था.... असते
एकमेकांची खूप काळजी करणं... कौतुक करणं.. खूप प्रेम करणं... खूप छान दिवस असतात.... नाही का त्यात रुसवे फुगवे ही असतात.. मनवणं ही असतंच ...
भांडणा नंतरचा समेट होणं अजुन गोड असतं....
यात २-३ वर्षे निघुन जातात...
मग बाळाची चाहुल लागते..
त्या सर्व घडामोडी मधे १२-१५ वर्षे अशीच निघुन जातात...
मुलांना मोठं करणं... त्यांच्या शाळा सुरु होतात...
ही मधली १०-१५ वर्षे खूप धावपळीत निघुन जातात..
पहिल्या २-३ वर्षांची अनुभवलेली नवलाई संपलेली असते... अन ही मधली १५ वर्षे सुसाट निघुन गेलेली असतात..
स्त्री ३५-४० शीत आलेली असते.. मुलांच्या घराच्या जबाबदारीतुन थोडी बाहेर आलेली असते.....
थोडी स्वतः कडे लक्ष देवु लागते...
पती राजा ही थोडा घरच्या मुलांच्या अन बायकोच्या व्यापातुन बाहेर पडलेला असतो... त्याचे मित्र.. ऑफिसमधल्या किंवा ऑफिस बाहेरच्या मैत्रीणी.. पत्नी पेक्षा ही त्याला जवळच्या वाटू लागतात मग दोघांमध्ये प्रत्येक विषयावर एकमेकाचा शेअरिंग होत राहत वाढदिवसाचे एकमेकांना गिफ्ट एकमेकांचे शॉपिंग पार्ट्या... आउटींग मस्त सुरु असतं ...
हळु हळु बायकोकडे दुर्लक्ष झालेलंच असतं...
थोडं गृहीत धरणं ओघानेच आलेलं असतं....
बघेल तिचं ती काय ते.. बघेल मुलांचं... बघेल घरचं... आपण पैसा देतोय ना... मग झालं...
सुख म्हणजे अजुन काय हवं हिला..
घर.. मुलं ... नवरा... जॉब असेल तर जॉब... हे सर्व आपलं जग मानणारी स्री मात्र काहीतरी शोधत असते...
वयाच्या या स्टेज वर काहीतरी निसटुन गेलंय.. निसटुन चाललंय आपल्या हातातून याची जाणीव तिला क्षणोक्षणी होवु लागते...
रितेपणा आलेला असतो... मित्र मैत्रीणी असल्या तर ठीक..
पण जिने नवरा... मुलं.. घर च सर्वस्व मानलंय तीच्या रीते पणाला मर्यादा च नसतात...
नवरा त्याच्या विश्वात दंग... मुलं त्यांच्या विश्वात ... दंग झालेले असतात
मग हिने करायचं काय?
नवऱ्याला आपलं काय चुकतंय हेच कळत नसतं... अन हिला सांगता येत नसतं...
मनापासुन वाटत असतं कोणीतरी अशी व्यक्ती हवी.. जी आपल्याला व आपल्या भावनाना समजून घेइल.. आपल्या हक्काची असेल... माझे मुड्स त्याला कळतील ... माझं शांत रहाणं त्याला कळेल.. माझी चिडचिड तो सहन करेल... मला समजावेल..
या अपेक्षा खूप भयानक असतात...
नवरोबाला कधीही न कळणाऱ्या...
त्याने तिला कधीच च गृहीत धरलेलं असतं... अन हिची मात्र घुसमट होत असते...
आयुष्य असंच संपणार की काय अशी भिती मनात... वाटत असते ,
मग सुरु होतो खेळ चौकटीतला अन चौकटी बाहेर चा...
आशा परिस्थितीमध्ये
एखाद्याला मित्र -मैत्रीण भेटते तिला समजून घेणारी.. पण तेंव्हा खरं युद्ध सुरु असतं तिच्या मनात, जिला मित्र मिळालाय ...
' हे योग्य आहे का ? आपण पाप करतोय का? समाज काय म्हणेल? कोणाला काही कळालं तर ?' वगैरे वगैरे.....
सगळीकडुन च घुसमट...
करायचं काय?
समाजाने अधोरेखीत च केललं आहे .. की स्त्री अन पुरुषामधे कधीच चांगली.. निस्वार्थी.. निर्मळ मैत्री होवू च शकत नाही...
मग भेटण्यात बोलण्यात चोरटेपणा येतो...
कधी कधी या सगळ्यात ती वहावत जाते .. तर कधीतरी कोणी तरी स्वतः ला सावरुन घेते...
पण विषय हा आहे की तिने करायचं काय ?
घरात जे हक्काचं आहे... ज्यांच्या साठी उभं आयुष्य खर्ची घातलंय ... स्वतः च्या इच्छा अपेक्षा ज्यांच्यासाठी मारल्यात... ज्यांच्या मुळे अन ज्यांच्या साठी स्वतः चं शरीर बेढब करुन घेतलंय ... त्या कोणालाच तीचं काही पडलं नसेल... तीला नक्की काय हवय हेच त्याना कळत नसेल तर तीने जावं कुठे?
कोणाकडुन अपेक्षा कराव्यात? की करुच नयेत?
तडफड तडफड अन नुसती तडफड....
कोणीतरी कुटुंबातील व्यक्ती बोलते या बाबांच्या सत्संगला जाऊया का?
तिला बरे वाटते मग ती सत्संग ला जायला लागते बुवा, बाबा ,महाराज, अतिशय चतुर असतात स्त्रियांच्या मनातील द्विंधा
ते ओळखून असतात अध्यात्माच्या गोष्टी तिला ते बरोबर अडकवतात ,तू गेल्या जन्माची "राधा व मी गेल्या जन्माचा कृष्ण" आपली भेट,, देवानेच घडून आणली, आशा तिला थापा मारत असतो
मग आसाराम बापू सारखे बाबा समाजामध्ये कितीतरी आहेत मग अनेक स्त्रिया या बाबांना बळी पडतात, मुळात ती धार्मिक नव्हतीच,, चौकटीच्या बाहेर जाऊन मित्र जर जोडला तर समाज नाव ठेवेल बाबा बुवा सत्संग हा अस्थेचा भक्तीचा व सुरक्षित मार्ग वाटतो इकडे कोणी संशयाने आणि बघत नाही एरवी नवरोबा पत्नीस डॉक्टर कडे घेऊन गेल्यानंतर डॉक्टर चेक करत असताना हा बाहेर बसून कासावीस होतो इतका वेळ हा काय तपासतो आहे डॉक्टर
परंतु पत्नी सत्संग जात आहे तेव्हा मित्र मैत्रिणी सांगत असतो माझी पत्नी भक्ती मार्गाला लागली, सत्संग च्या नावाखाली तिकडे फक्त शोषणच असते
... त्याला हिच्या मनात काय चाललंय याचं देणं घेणं नसतं...
नात्यामधे तोच तोच पणा आलेला असतो... फक्त एकमेकांच्या आयुष्यात असण्याची सवय झालेली असते ...
ती हरलेली असते... मेंटली थकलेली असते..
Physical satisfaction पेक्षा स्त्री ला mental satisfaction खुप आवश्यक असतं हे नवरोबाला कळतच नसतं... किंबहुना बहुतांशी पुरुषांना कळलेलंच नसतं...
खूप फरफट होते तिची यात.... मनात खूप मोठी उलथापालथ होत असते... अन ज्याने समजुन घ्यायला हवं तो आपल्या च विश्वात रममाण... त्याला या कसल्याचा गंधच नसतो...
अन मग सुरु होतो एकाकीपणाचा खेळ...
कितीतरी रात्रा तिने जागून काढलेल्या असतात त्याची वाट पाहत त्याच्या सोबत जेवणासाठी थांबलेली असते घड्याळाकडे पाहत, रात्री उशिरा नवराबा येतो मैत्रिणीबरोबर बाहेरच पार्टी करुन, ही जागी असल्याचे पाहून तो विचारतो' तू अजून झोपली नाहीस ' तिला हुंदका' येतो पण ती आतल्याआत तीआवंढा गिळते ,
तो तिला मिठीत घेऊन झोपण्याचा प्रयत्न करत असतो परंतु त्याच्या तोंडाचा वेगळाच दर्प व शरीराचा स्प्रे मारल्याचा वास ती घेत असते हा अनोळखी वास असतो तो केव्हाच झोपी गेलेला असतो, ही मात्र त्याच्या कुशीत जागीच असते प्रेमाला वंचित झालेली असते भूतकाळातल्या आठवणी जागवत,
शरीराने व मनाने ति केव्हाच दूर गेलेली असते, त्याच्यात उरले होते फक्त पती-पत्नीचं नाते, हे नात समाजाने दिले होते, या नात्यात 'ना भावना' होती, ना '' आकर्षण, प्रेम तर आटलच होतं,
अशा वेळी तिने काय करावे ,
तुम्हाला काय वाटते ??
नक्किच प्रतिक्रिया द्या