Showing posts with label योजणा. Show all posts
Showing posts with label योजणा. Show all posts

Thursday, 30 January 2025

ल्ह्स्त्यावर राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्यासह,महिला, बालक व दिव्यांगांना सर्वतोपरी , राज्यभर अहिल्या भवन उभारण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी

 १८ जिल्ह्यांसह राज्यभर अहिल्या भवन उभारण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे

महिलांना रोजगार देण्यासाठी पिंक रिक्षा योजनेअंतर्गत

५ हजार महिलांना लवकरच रिक्षा वाटप करणार

 

              मुंबई दि. २९ : महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठीत्यांच्या सबलीकरणासाठी अहिल्या भवनाच्या माध्यमातून अतिशय महत्वाचे काम सुरू होणार आहे. १८ जिल्ह्यात अहिल्या भवनचे कार्य सुरू असूनराज्यातील उर्वरित जिल्ह्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी अहिल्या भवन उभारण्यासाठीच्या प्रक्रियेस गती देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

              मंत्रालय येथील दालनात महिला व बालकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी विभागामार्फत सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी विभागाचे सचिव अनुपकुमार यादवआयुक्त कैलास पगारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. लवकरच ४ जिल्ह्यातील अहिल्या भवनचे लोकार्पण करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्याच्या सूचनाही महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी यावेळी दिल्या.

              महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या कीप्रत्येक जिल्ह्यात उभारण्यात येणारे हे अहिल्या भवन महिलाबालक व दिव्यांगांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी सज्ज असणार आहे. तसेच अहिल्या भवन उभारण्यासंदर्भातील पायाभूत सुविधा उभारण्याचे निर्देशही तटकरे यांनी यावेळी दिले.

              महिला व मुलींना रोजगार मिळावात्यांचे आर्थिकसामाजिक सक्षमीकरण व्हावेआणि महिला वर्गाचा प्रवास सुरक्षित व्हावायासाठी राबविण्यात येणाऱ्या 'पिंक ई-रिक्षाच्या योजनेसंदर्भात संबंधितांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्राप्त अर्जापैकी पाच हजार पात्र महिलांना लवकरच या योजनेअंतर्गत रिक्षाचे वितरण करण्यात येणार आहे.

              याचबरोबर रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फिरते पथक कार्यरत असूनआजतागायत तीन हजारपेक्षा जास्त मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम विभागाने या पथकाच्या माध्यमातून केले आहे. प्रायोगिक तत्वावर सुरू असलेल्या हा उपक्रम व्यापक स्वरूपात सुरू करण्यासाठीची कार्यवाही करण्यासंदर्भातही महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी सूचना दिल्या.

              नोकरी करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी पाळणाघर आवश्यक असल्याने गरजु महिलांच्या मुलांसाठी अंगणवाडी केंद्रासोबत पाळणाघर सुरू करण्यात येणार आहे. पाळणाघर से‍विका व मदतनिस यांचे मानधन तसेच निर्भया समुपदेशन केंद्रावरील समन्वयकाचे मानधन वाढविण्यासंदर्भातही सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचेही तटकरे यांनी यावेळी उपस्थित समन्वयक महिलांना सांगितले. तसेचमाध्यमिक शिक्षणाकडे वळणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी शिक्षण विभागाशी समन्वय साधुन उपाययोजना आखण्यासंदर्भातही निर्देश तटकरे यांनी यावेळी दिले.

Wednesday, 11 September 2024

धार्मिक अल्पसंख्यांक शाळांनी अनुदान योजनेसाठी 15 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

 धार्मिक अल्पसंख्यांक शाळांनी अनुदान योजनेसाठी

15 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

 

       मुंबई, दि. 11 : मुंबई उपनगरातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी  अनुदान  योजना राबविण्यात येते सन 2024-25 या वर्षासाठी अल्पसंख्याक बहुल शाळांनी 15 सप्टेंबर, 2024 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर  करण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे. 

           शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शाळांनी विहीत नमुन्यात अर्ज करावेत.  संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगीक  प्रशिक्षण  संस्थामध्ये  70% व अपंग शाळामध्ये  50% विद्यार्थी हे अल्पसंख्यांक समुदायातील असणे अनिवार्य आहे. तसेच, संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांना शासनाकडून मान्यता मिळालेली असणे आवश्यक आहे. स्वंय-अर्थसहाय्यित शाळा सदर योजनेसाठी पात्र असणार नाहीत, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.

00000

Tuesday, 20 August 2024

जिल्हास्तर क्रीडा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याचे

 जिल्हास्तर क्रीडा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याचे

जिल्हा क्रीडा अधिकारीमुंबई उपनगर यांचे आवाहन

 

            मुंबई, दि. २० : क्रीडा व युवक सेवा संचालनालयमहाराष्ट्र राज्यपुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांचे द्वारा सन २०२३-२४ या वर्षाच्या जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू (पुरुषमहिला व दिव्यांग खेळाडू) आणि क्रीडा मार्गदर्शक यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

            जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटूक्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे / योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. सन २०२२-२३ या वर्षाकरिता गुणवंत क्रीडापटू (पुरुषमहिला व दिव्यांग खेळाडू) आणि क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्यात येणार आहेत.

पुरस्कार पात्रतेचे निकष

            (ब) क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार (१) पुरस्कारासाठी अर्ज करणा-या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्ष संबंधित जिल्ह्यामध्ये वास्तव्य असावे. वयाची ३५ वर्ष पूर्ण केलेली असावीत, सतत १० वर्ष क्रीडा मार्गदर्शकाचे कार्य केलेले असावे. गुणांकनाकरिता त्या जिल्ह्यातील कामगिरी ग्राह्य धरली जाईल. (४) गेल्या दहा वर्षात किमान वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते तसेच कनिष्ठ शालेयग्रामीण व महिला (खेलो इंडिया) मधील राष्ट्रीयस्तरापर्यंतचे पदक विजेते खेळाडू तयार केले असतील, असे क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी पात्र ठरतील.

            (ब) खेळाडू पुरस्कार (पुरुष महिला आणि दिव्यांग) : (१) खेळाडुने पुरस्कार वर्षासह लगत पूर्व ५ वर्षापैकी २ वर्ष त्या जिल्ह्याचे मान्यता प्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धेमध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे. (२) खेळाडूंची मान्यता प्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य / राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमधील पुरस्कार वर्षालगत पूर्व पाच वर्षातील राज्य व राष्ट्रीय स्तरावरील वरीष्ठ / कनिष्ठ शालेयराष्ट्रीय शालेय व केंद्रशासनामार्फत आयोजित क्रीडा स्पर्धामधील राष्ट्रीयस्तरावरील कामगिरी आणि या पैकी उत्कृष्ट तीन वर्षाच्या कामगिरीचा विचार करण्यात येईल.

            वरीलप्रमाणे पुरस्काराकरिता इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज दि. २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयशासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसरसंभाजीनगर समोरआकुर्ली रोडकांदिवली (पुर्व) मुंबई ४००१०१ येथे पृष्ठांकीत करुनच आणि सीलबंद पाकीटामध्ये सादर करावेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२२/ २८८७११०५ या वर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारीमुंबई उपनगर यांनी कळविले आहे.

Wednesday, 12 June 2024

मुलुंड येथील शासकीय मुलींच्या वसतिगृह प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

 मुलुंड येथील शासकीय मुलींच्या वसतिगृह प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

 

             मुंबई, दि. ११ : मुलुंड येथील मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता रिक्त असणाऱ्या जागेवर प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थिनींनी कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत प्रवेशासाठी संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहप्रमुखांनी केले आहे.

                 प्रवेशित विद्यार्थिनींना वसतिगृहात राहण्याची व्यवस्था, भोजनरुपये ९००-मासिक निर्वाह भत्तास्टेशनरी रक्कमग्रंथालय सुविधादैनंदिनी वर्तमानपत्र इत्यादी मोफत सोयी-सुविधा दिल्या जातात. या वसतिगृहात ११ वी व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाईल.

            प्रवेशासाठी पुढीलप्रमाणे पात्रता आवश्यक आहे. प्रवेशासाठी ५५% पेक्षा जास्त गुण असावेत. ती महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावी. या वसतिगृहाचा पत्ता : गृहपाल मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहडी-१० पार्श्वनाथ कॉ. हौसिंग सोसायटीसर्वोदय नगर मुलुंडमुंबई-४०००८० असा आहे.

उष्माघातामुळे मृत्युमुखी पडलेल्या व उपचार घेत असणाऱ्या रुग्णांना शासनाकडून मदतीचे निकष निश्चित करावेत

 उष्माघातामुळे मृत्युमुखी पडलेल्या व उपचार घेत असणाऱ्या

रुग्णांना शासनाकडून मदतीचे निकष निश्चित करावेत

- विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

            मुंबई दि. ११ : नैसर्गिक आपत्तीत वीज पडून मृत्यू झाल्यास आपदग्रस्तांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येते. त्याच धर्तीवर उष्माघाताने मृत रुग्णांनाही मदत मिळण्याबाबत नैसर्गिक आपत्तीचा निकष लावावाजेणेकरून आपदग्रस्तांना आर्थिक मदत मिळेल अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.

            उष्माघातामुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांची नोंद होत नाही त्यामुळे याबाबत आढावा शासन स्तरावून घेण्यात यावा. तसेच उष्माघाताने मृत व्यक्तीच्या वारसांना शासनाकडून आर्थिक मदतीची तरतूद नसल्याने आर्थिक मदत दिली जात नाही. त्यामुळे उष्माघातातील रुग्णांना मदतीबाबत निकष ठरविण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठीत करावी, अशा सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या आहेत

Featured post

Lakshvedhi