Showing posts with label उद्योग रोलल्. Show all posts
Showing posts with label उद्योग रोलल्. Show all posts

Tuesday, 4 July 2023

राज्यातील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती हरित हायड्रोजन धोरण

 राज्यातील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती

हरित हायड्रोजन धोरण जाहीर, 8 हजार 500 कोटीस मान्यता


            नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या हरित हायड्रोजन धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. असे धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ८ हजार ५६२ कोटी रुपये खर्चास देखील मान्यता देण्यात आली.


            प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन जाहीर केले असून, २०२३ पर्यंत देशात ५ मिलीयन टन हरित हायड्रोजन दरवर्षी निर्मित करण्याचे उद्द‍िष्ट आहे. राज्यामध्ये देखील हरित हायड्रोजन आणि संबंधित उत्पादनांची क्षमता ओळखून, हे धोरण तयार करण्यात आले आहे. राज्याची सध्याची हायड्रोजनची मागणी दरवर्षी ०.५२ मिलीयन टन इतकी आहे. ही मागणी २०३० पर्यंत १.५ मिलीयन टनांपर्यंत पोहचू शकते.


            आज जाहीर करण्यात आलेल्या हायड्रोजन धोरणामध्ये ओपन अँक्सेसद्वारे, स्वयंवापरासाठी राज्यातून किंवा राज्याबाहेरून, राज्यातील वीज वितरण कंपन्यांकडून, पॉवर एक्स्जेंजकडून नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणाऱ्या प्रकल्पांना लाभ सवलती दिल्या जातील. महाऊर्जा कार्यालयाकडे हरित हायड्रोजन आणि संबंधित उत्पादन प्रकल्पांची नोंदणी करण्यात येईल. या प्रकल्पांना २५ हजार प्रति मेगावॅट इलेक्ट्रोलायझर क्षमतेनुसार प्रकल्प सुविधा महाऊर्जाकडे जमा करावी लागेल. प्रकल्प कार्यान्वित झाल्यापासून पुढील दहा वर्षांसाठी पारेषण शुल्क, व्हिलिंग चार्जेसमधून अनुक्रमे ५० टक्के व ६० टक्के सवलत देण्यात येईल. स्टॅंडअलोन व हायब्रीड ऊर्जा प्रकल्पांना अनुक्रमे पुढील १० वर्षांसाठी आणि १५ वर्षांसाठी विद्युत शुल्कातून १०० टक्के सवलत देण्यात येईल तसेच क्रॉस सबसिडी व अधिभारातून देखील माफी देण्यात येईल.


            याशिवाय पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटीव्ह्ज् २०१९ नुसार लाभ मिळतील, ५ वर्षांकरिता हरित हायड्रोजनच्या गॅसमध्ये मिश्रणासाठी प्रत्येक किलोकरिता ५० रुपये अनुदान देण्यात येईल. तसेच पहिल्या २० हरित हायड्रोजन रिफ्युएलिंग स्टेशनला कमाल ४.५० कोटी रुपये या मर्यादेत ३० टक्के भांडवली खर्च अनुदान देण्यात येईल. पहिल्या ५०० हरित हायड्रोजन आधारित फ्युएल सेल प्रवासी वाहनांना कमाल ६० लाख रुपये प्रति वाहन, एवढ्या मर्यादेत ३० टक्के भांडवली खर्च अनुदान देण्यात येईल.


            हरित हायड्रोजन प्रकल्पांसाठी असलेल्या जमिनीला स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर, अकृषिक कर व मुद्रांक शुल्कातून पूर्ण सवलत देण्यात येईल. हरित हायड्रोजन कक्षासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ घेणे, त्यांचे प्रशिक्षण, कौशल्य विकास, एक खिडकी सुविधा इत्यांदी बाबींकरिता वार्षिक ४ कोटी याप्रमाणे १० वर्षांसाठी ४० कोटी रुपये खर्चास देखील मान्यता देण्यात आली.



-----०-----


Monday, 19 June 2023

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांचा राजभवन येथे पदग्रहण सोहळा संपन्न

 महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांचा राजभवन येथे पदग्रहण सोहळा संपन्न


शेठ वालचंद हिराचंद यांच्या व्याख्यानमालेत 50 वे पुष्प ओम बिर्ला यांनी गुंफले  


 मुंबई : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, अॅ ग्रीकल्चरचे नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी यांचा नुकताच राजभवन येथे पदग्रहण सोहळा संपन्न झाला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते अध्यक्ष पदाचा कार्यभार सोपविण्यात आला.


महाराष्ट्र चेंबरच्या इतिहासात ललित गांधी हे पहिलेच अध्यक्ष आहेत, ज्यांचा राजभवन मुंबई येथे पदग्रहण सोहळा झाला. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’चे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांच्या स्मृती व्याख्यानाचे सुवर्णमहोत्सवी पुष्प शुक्रवारी राजभवनातील दरबार हॉलमध्ये गुंफण्यात आले. त्यावेळी हा पदग्रहण सोहळा झाला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते अध्यक्षीय ट्रॉफी देऊन पदग्रहण सोहळा झाला. तर वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा यांना सन्माचिन्ह देऊन पदग्रहण सोहळा झाला. पदग्रहण सोहळ्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यपाल रमेश बैस, विविध देशाचे कॉन्सुलेट, उद्योजक, व्यापारी यांनी शुभेच्छा दिल्या. चेंबरच्या वतीने महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते लोकसभा अध्यक्ष आणि राज्यपाल यांचा चांदीचा कलश, शाल देऊन सन्मापूर्वक सत्कार करण्यात आला.  


भारत ही संत, शूरवीर योद्धे आणि समाज सुधारकांची जशी भूमी आहे, तशीच ती महान उद्योजकांची देखील भूमी आहे. वालचंद हिराचंद यांनी बिकट परिस्थितीत उद्योग उभारणीसह नवीनता व संशोधनाचे काम केले. उद्योग विकासाची दूरदृष्टी असलेल्या वालचंद हिराचंद यांचे जीवन प्रेरणादायी असल्याचे उदगार ओम बिरला यांनी याप्रसंगी काढले.


राज्यपाल रमेश बैस म्हणाले, स्वयंचलित वाहन निर्मिती, विमान निर्मिती, जहाज निर्मिती यांसह अनेक पायाभूत क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी पृथ्वी, जल, आकाश अश्या तिन्ही लोकात भारताचा झेंडा रोवला. देश पारतंत्र्यात असताना प्रतिकूल परिस्थितीत उद्योगविश्व निर्माण करणाऱ्या हिराचंद यांचे योगदान सुवर्णाक्षरांनी लिहावे इतके मोठे आहे. त्यांनी स्थापना केलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ने राज्याचा विकास करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  


महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी शेठ वालचंद हिराचंद यांच्या कार्याचा आढावा घेतला. महाराष्ट्र चेंबरच्या चौफेर प्रगतीसाठी अविरतपणे कार्यरत राहणार असल्याची ग्वाही अध्यक्ष निवडीनंतर त्यांनी दिली.


लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शेठ वालचंद हिराचंद यांच्या कुटुंबातील सदस्य हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन को. लि. चे अध्यक्ष अजित गुलाबचंद, प्रिमिअर ऑटो इलेक्ट्रीक लि. चे माजी अध्यक्ष अरविंद दोशी, वालचंदनगर इंडस्टीज लि. चे कार्यकारी संचालक चिराग दोशी, पद्मश्री सरयु दोशी, पल्लवी झा यांचा सत्कार झाला. अतिरीक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर , महाराष्ट्र चे मुख्य पोस्ट मास्टर जनरल किशन कुमार शर्मा, कौन्सिल दि रॉयल कॉन्सुलेट जनरल ऑफ सौदी अरेबियाचे सुलेमान इद एस अल्ताइबी, कौन्सिल जनरल कॉन्सुलेट जनरल ऑफ मलेशियाचे अहमद झुआरी युसुफ, कौन्सुल जनरल ऑफ कॉन्सुलेट जनरल ऑफ बेलारूसचे अन्टॉन पशकोव्ह, चार्ज डी अफेअर्स दि कॉन्सुलेट जनरल युएई चे हमीद अलधाभाई, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे पेट्रोन मेंबर्स नितिन धूत, रमाकांत मालू, संगिता पाटील, प्रकाश शहा, मुकेश खाबणी यांचा सत्कार झाला.चेंबरचे ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष करूणाकर शेट्टी, उपाध्यक्षा शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष रविंद माणगावे, उपाध्यक्ष तनसुख झांबड, सेक्रेटरी जनरल सागर नागरे आदींनी संयोजन केले. मानसी सोनटक्के यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद दोशी यांनी आभा

र मानले.

Wednesday, 31 May 2023

नवीन कामगार नियमांना मान्यतालाखो कामगारांचे

 नवीन कामगार नियमांना मान्यतालाखो कामगारांचे हित


               केंद्र शासनाने सर्व २९ कामगार कायदे एकत्र करून ४ कामगार संहिता तयार केल्या असून आज व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता (Code on Occupational Safety, Health and Working Conditions), 2020 या चौथ्या संहितेस राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. नवीन कामगार नियमांना मान्यता दिल्याने लाखो कामगारांचे हित जपण्यात आले आहे.


               व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहितेस मान्यता देण्यात आली आहे. यातील ठळक बाबी पुढील प्रमाणे- 100 पेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखान्यांमध्ये उपहारगृह बंधनकारक, 250 पेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखान्यात कल्याण अधिकारी, 50 पेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखान्यात पाळणा घर अशा काही तरतुदी असतील.


               यापूर्वी वेतन संहिता (Code on Wages), 2019, औद्योगिक संबंध संहिता (Code on Industrial Relations), 2020, सामाजिक सुरक्षा संहिता (Code on Social Security) 2020 या 3 संहितांच्या नियमांना राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.


               केंद्र शासनाने 1999 मध्ये माजी केंद्रीय कामगार मंत्री रविंद्र वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा श्रम आयोग नेमला होता. या आयोगाने सर्व 29 कामगार कायदे एकत्रित करुन या 4 कामगार संहिता (Labour Codes) तयार करण्याची शिफारस केली होती. या 4 संहिता अधिनियम संसदेने पारित केले आहेत.


               कामगार हा विषय समवर्ती सूची मध्ये समाविष्ट असल्याने केंद्र शासनाने सर्व राज्यांसाठी एकत्रित संहिता तयार केली आहे. सर्व संहितांची अंमलबजावणी सर्व राज्यांमध्ये एकत्रितरित्या करावयाची असल्याने राज्यांनी संबंधित संहितांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने नियम पारित करणे आवश्यक आहे. त्यानुसार केंद्र शासनाने व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता अधिनियम, 2020 प्रसिध्द केले आहेत.


               या अधिनियमात राज्यांना समुचित शासन व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती (कामगार) संहिता नियम तयार करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार या संहितेस मान्यता देण्यात आली 

आहे. 


Featured post

Lakshvedhi