अभियानाच्या शुभारंभाच्या दिवशीच १,४६,७९८ नागरिकांना
२० प्रकारच्या विविध आरोग्य सेवा
राज्यात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत १७ सप्टेंबर २०२५ रोजी विविध विभागात मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिरे घेण्यात आली. या दिवशी एकूण १,४६,७९८ नागरिकांना विविध आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या. ठाणे विभागात सर्वाधिक ३२,२९९ लाभार्थी, कोल्हापूर जिल्ह्यात २४,९५० लाभार्थी, तर नागपूर विभागात - २४,६०४ लाभार्थी होते.
शुभारंभ दिनी या अभियानांतर्गत ११७ विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. एनसीडी तपासणी शिबिरांत १७,७७९ लाभार्थी, नेत्र तपासणीत ३,१०४, दंत तपासणीत ३,३५८, तर मातृ आणि बाल आरोग्य शिबिरांत ७,३२२ महिलांची तपासणी करण्यात आली. महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी घेतलेल्या पोषण जनजागृती सत्रात १०,०९१ महिला व बालकांनी सहभाग घेतला. याशिवाय, मोफत औषध वितरण शिबिरांद्वारे २७,३४४ लाभार्थ्यांना औषधे पुरविण्यात आली, ११,३४५ नागरिकांच्या डायग्नॉस्टिक तपासण्या पार पडल्या, तर कर्करोग तपासणी व जनजागृती सत्रांमध्ये ९,८४२ नागरिकांचा सहभाग नोंदविण्यात आला. मानसिक आरोग्य समुपदेशन शिबिरांद्वारे ४,२९६ नागरिकांना मार्गदर्शन मिळाले, तसेच व्यसनमुक्ती जनजागृती उपक्रमांत ३,३५७ नागरिकांनी सहभाग घेतला. स्वच्छता आणि आरोग्य जनजागृती - ७,७५५ लाभार्थी, आरोग्य मेळावे - ८,०३२, शाळांमधील तपासण्या - ६,५९१ आणि रक्तदान शिबिरांमध्ये ७१५ रक्तदाते यामुळे अभियानाला सर्वांगीण प्रतिसाद मिळाला.
या व्यापक प्रयत्नांतून राज्यभरात आरोग्याविषयी जागरूकता वाढीस लागली असून, महिलांचे आरोग्य सशक्त करण्याच्या दिशेने हे अभियान महत्त्वपूर्ण ठरले आहे.
अभियानाची वैशिष्ट्ये
शिबिरांचे आयोजन (एसएनएसपीए पोर्टल)
• एकूण : २,३०,६५३ शिबिरे (३४१३ विशेष शिबिरांसह)
• एकूण लाभार्थी : १,०८,५९,३३२ (३२,७१,७७१ पुरुष आणि ७५,८७,५६१ महिला)
इतर संस्था (केंद्रीय सरकारी संस्था, वैद्यकीय महाविद्यालये आणि खासगी संस्था)
• एकूण शिबिरे : १८६०
• एकूण लाभार्थी : ४,६३,१३३
असंसर्गजन्य रोग (एनसीडी) तपासणी (एनसीडी पोर्टल)
• उच्च रक्तदाब तपासणी: १४,४१,६४८ लाभार्थी
• मधुमेह तपासणी: १४,९८,२१९ लाभार्थी
• कर्करोग तपासणी: ६,१८,३९३ (तोंडी कर्करोग), ३,२०,१६४ (स्तन कर्करोग) २,४१,१४८ (गर्भाशयाचा कर्करोग) लाभार्थी
प्रजनन आणि बाल आरोग्य (आरसीएच पोर्टल)
• एएनसी क्लिनिकमध्ये (आरसीएच पोर्टल) ४,३८,३४५ गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली.
U-WIN पोर्टल
• अॅनिमिया तपासणी: १०,१६,१९८ लाभार्थी
• लसीकरण करण्यात आले: १,८८,२६१ मुले
नि-क्षय (टीबी) कार्यक्रम (नि-क्षय पोर्टल)
• १३,१३,६३५ लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली (६,५९,९९५ पुरुष आणि ६,५२,६२१ महिला)
• १५,०२७ नि-क्षय मित्रांची नोंदणी
सिकलसेल तपासणी (SNSPA गुगल शीट)
• तपासणी करण्यात आली: १,०३,८६२ पुरुष, २,७३,५०० महिला
• सिकल सल कार्ड वितरित केले: ५६,०२५ पुरुष, १,२६,७३७ महिला