*" पूर्वकर्म व संगत "*
🌹 *कोणालाच जीवनाच्या कोणत्या वळणावर आपली कोणाशी गाठभेट होणार आहे याची पूर्वकल्पना नसते. प्रत्येकाशी आपलं रक्ताचं नातं असू शकत नाही म्हणून कोणत्या तरी कारणाने काही माणसं अद्भुतरित्या आपल्या जवळ येतात जसं की नदीच्या प्रवाहात वाहताना दोन ओंडके अचानक एकत्र येतात. सोबत कुठपर्यंत असेल ते काहीच निश्चित नाही पण काही काळ एकत्र प्रवास होऊन पुढे वेळ आल्यावर एखादे कारण घडते अन् जीव अलग होतात. अशी नाती खरंच अद्भुत असतात पण फक्त ती जपण्याची जाणीव आणि आस्था आपल्यात असायला हवी. नात्यांमध्ये आस्था असावी पण आसक्ती नसावी कारण कोणीही कोणालाही सोबत घेवून जन्माला येत नसतं. आपण एकटेच जन्माला आलो आणि एकटेच जाणार हे कायम लक्षात असू द्यावं तरच आसक्तीही निर्माण होत नाही*.
मूळातच आपला जन्म कशासाठी झाला आहे हे गूढ उकलता आले तर पुढचा सर्व प्रवास सुखकरच होतो. *प्रारब्धात ठरल्याप्रमाणे व आपल्या पूर्व कर्मानुसारच काही घेणे असेल किंवा आपण कोणाचं देणे लागत असू तेव्हांच त्या जीवाच्या भेटीचे प्रयोजन* असते.
म्हणून कोणापासून आपणास काय लाभ झाला अथवा कोणापासून काय नुकसान झाले याचा विचार न करतां आपण फक्त कर्म करत राहावं इतकंच!...
🌷 *।।श्री राम जय राम जय जय राम।।*🌷