Showing posts with label आरोग्यमित्र. Show all posts
Showing posts with label आरोग्यमित्र. Show all posts

Monday, 24 February 2025

जनतमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची तत्परता* pl share जास्तीत जास्त

 जनता दरबारात आलेल्या पाच रुग्णांना मिळाली उपचारांसाठी तातडीने मदत*

*नातेवाईकांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार*

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची तत्परता*

मुंबईदि. 24 : शासकीय योजनांच्या वैद्यकीय मदतीच्या निकषात आजार बसत नसल्याने आर्थिक विवंचनेतील पाच रुग्णांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशामुळे पाच लाखांची मदत मिळवून देण्यात आली. वेळीच मदत मिळाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांचे आभार मानले आहे.

या रुग्णांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात मदतीसाठी विनंती केली होती. त्यावर  मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायकता कक्षास कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्यानुसार कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी तत्परतेने कार्यवाही केली. त्यामुळे आरव चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या रुग्णांना मदत उपलब्ध करून देण्यात आली.

मुख्यमंत्र्यांची मोलाची मदतधीर देणारा आधार

'आमच्या बिकट परिस्थितीमुळे किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया व उपचार थांबण्याची भीती निर्माण झालेली असताना वेळीच मिळालेली ही मदत मोलाची आणि तेवढीच धीर देणारी आहे,' अशा शब्दांत एका २८ वर्षीय रुग्णाच्या पतीने मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.

ठाण्यातील 12 वर्षीय चिमुकला रक्ताच्या कर्करोगाशी झुंज देत असून त्याच्या उपचारासाठीही मदत मिळाली. 'मित्रपरिवार-नातेवाईकांकडे मदत मागून थकलो पण उपयोग झाला नाहीमात्र मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या तत्परतेमुळे मदत मिळाली आणि पुढील उपचारासाठी धीरही मिळाला,' अशी भावना या चिमुकल्याच्या वडिलांनी व्यक्त केल्या. त्याला पुढील उपचाराकरिता शासनस्तरावर त्याला सर्व मदत केली जाणार आहे.

याबरोबर ठाणे जिल्ह्यातील रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला पायावरील शस्त्रक्रीयेकरिताकोल्हापूर येथील रुग्णाला किडनी प्रत्यारोपणासाठी तसेच छत्रपती संभाजीनगरमधील एका चिमुकल्याला वैद्यकीय उपचाराकरिता मदत करण्यात आली असून या रुग्णांच्या नातेवाइकांनी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांचे तसेच आरव संस्थेचे आभार मानले आहे. या मदतीमुळे या पाचही रुग्णांच्या कुटुंबाना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान,  गरजू रुग्णांना मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून समाजातील दानशूर व्यक्तीउद्योजक आणि खाजगी संस्थांनी जास्तीत जास्त संख्येने समोर यावेअसे आवाहन कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष संपर्क

Mail ID -  cmhelpdesk.mh@gmail.com

Facebook -  Cmrf Maharashtra

Facebook Page – CMRFmaharashtra

Instagram – cmrfmaharashtra

Youtube - Chief Minister Relief & Charity Hospital Helpdesk

X- @CmrfMh

Website -  https://cmrf.maharashtra.gov.in

Mail-ID - aao.cmrf-mh@gov.in

टोल फ्री क्रमांक – ९३२११०३१०३

कार्यालयाचा पत्ता :- मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षमुख्यमंत्री कार्यालय७ वा मजलामंत्रालयमुख्य इमारतमुंबई-४०००३२ दूरध्वनी क्रमांक - ०२२-२२०२६९४८

Featured post

Lakshvedhi