Showing posts with label . मुखपृष्ठष योजना. Show all posts
Showing posts with label . मुखपृष्ठष योजना. Show all posts

Saturday, 18 January 2025

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई दि. १७ : राज्य शासनाच्या क्रीडा विभागाद्वारे राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा "शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार" प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी सन २०२३-२०२४ करिता अर्ज करण्याचे आवाहन क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

अर्ज सादर करण्याऱ्या इच्छुक क्रीडा मार्गदर्शकखेळाडूसाहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहित मुदतीत क्रीडा विभागाच्या http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर स्क्रोलिंग लिंक (Scrolling Link) मध्ये उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर दि. १४ ते २६ जानेवारी२०२५ या कालावधीत व दि. २६ जानेवारी२०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्यात यावेत.

क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरिता जीवन गौरव पुरस्कारक्रीडा मार्गदर्शकांकरिता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक / जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक)शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू)शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम)शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली २०२३ विहित केली आहे. या नियमावलीनुसार सन २०२३-२४ या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शकखेळाडुदिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू / व्यक्ती यांच्याद्वारा दि. १५ जानेवारी ते २६ जानेवारी२०२५ ह्या कालावधीमध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे मुंबई शहरचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

००००

Friday, 6 September 2024

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या विविध योजनांसाठी 15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या

 विविध योजनांसाठी 15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

            मुंबई, दि. ६ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सुविधा कर्ज योजना, महिला समृद्धी योजना, शैक्षणिक कर्ज योजना अशा विविध योजना राबविल्या जातात. या योजनांकरिता दि. १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाच्या मुंबई शहर-उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा व्यवस्थापक वैशाली मुडळे यांनी केले आहे.

            'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ' आणि 'राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त विकास महामंडळा'मार्फत अनुसूचित जातीमधील मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी कर्ज योजना राबविण्यात येतात. सुविधा कर्ज योजना - कर्ज मर्यादा रक्कम ५ लाख रुपये, महिला समृद्धी योजना - कर्ज मर्यादा १. ४० लाख व  शैक्षणिक कर्ज योजना कर्ज मर्यादा देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी ३० लाख रुपये व परदेशातील अभ्यासक्रमासाठी ४० लाख रुपये आहे. या कर्ज योजनेंतर्गत लाभार्थीकरिता भौतिक उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

             या कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी दि. १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मुंबई, गृहनिर्माणभवन, कलानगर, तळमजला, रूम नं ३३, बांद्रा (पू) मुंबई-५१ या पत्त्यावर अर्ज करावे, असे महामंडळाने प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

०००००

Featured post

Lakshvedhi