Showing posts with label मुखपृष्ठ. Show all posts
Showing posts with label मुखपृष्ठ. Show all posts

Friday, 2 May 2025

'विकसित भारता'च्या निर्माणासाठी प्रगत महाराष्ट्र घडवूया

 'विकसित भारता'च्या निर्माणासाठी प्रगत महाराष्ट्र घडवूया

- राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

महाराष्ट्र राज्याचा 66 वा स्थापना दिन सोहळा शिवाजी पार्क येथे संपन्न

 

मुंबईदि. 1: राज्यातील सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशकप्रगतिशीलपुरोगामी आणि विकसित राष्ट्र घडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. भारताच्या  अमृत काळामध्ये भारताला विकसित राष्ट्र’ बनविण्याचे ध्येय साध्य करताना  महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे असेल. महाराष्ट्राला आधुनिकबलशाली आणि प्रगत राज्य बनविण्यासाठी आपण सर्वांनी काम करूयाअसे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात केले.

कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसविधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकरविधान परिषद सभापती प्रा.राम शिंदेवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफस्थानिक लोकप्रतिनिधीमुख्य सचिव सुजाता सौनिकबृहन्मुंबई आयुक्त भूषण गगराणी,पोलीस महासंचालक रश्मी शुक्लाशासनाच्या विविध विभागांचे अपर मुख्य सचिवपोलीस आयुक्त देवेन भारतीअपर पोलीस महासंचालक (प्रशासन) मल्लिकार्जुन प्रसन्नअपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकरविविध विभागांचे प्रधान सचिववरिष्ठ शासकीय आणि पोलीस अधिकारीतिन्ही सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारीविविध देशांचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारीआदी यावेळी उपस्थित होते. यावेळ राष्ट्रगीत आणि राज्यगीत गायनाने मानवंदना देण्यात आली.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करीत राज्यपाल म्हणालेराज्य शासनाने काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी तातडीने  उपाययोजना केल्या. राज्य शासनाने सर्व विभागांना लोककल्याणकारी लक्ष केंद्रित करणारे उपक्रम जलद गतीने राबविण्यासाठी 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले असून  यामध्ये समाविष्ट बाबींमध्ये विभागांनी समाधानकारक काम केले आहे.

सुरक्षित व उद्योगस्नेही महाराष्ट्र

राज्यपाल म्हणाले कीमहाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा मंडळ तसेच महाराष्ट्र सायबर सुरक्षा धोरण व कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण विकसित करण्यासाठी एका विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तर महाराष्ट्राने एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. स्वित्झर्लंडच्या दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत राज्य शासनाने 15 लाख 72 हजार 654 कोटी रुपयांच्या 63 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या करारांमुळे राज्यात 15 लाख 95 हजार 960 रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

स्टीलमाहिती तंत्रज्ञानहरीत ऊर्जाऑटोमोबाईल्स आणि इलेक्ट्रिक वाहनेवस्त्रोद्योगडेटा सेंटर्सइलेक्ट्रॉनिक्सअवकाश आणि संरक्षणजैवतंत्रज्ञानऔषध निर्मितीपायाभूत सुविधाड्रोन उत्पादनशिक्षण आदी विविध क्षेत्रांतील आघाडीच्या कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब’ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासनाने तेथे नऊ स्टील उत्पादन प्रकल्पांना देकारपत्रे दिली आहेत. या उपक्रमामुळे एक लाख 60 हजार 238 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होईल आणि जवळपास 50 हजार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. राज्यात 78 उद्योग घटकांना देकारपत्रे देण्यात आली असून त्यामुळे सुमारे सहा लाख 55 हजार 84 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे दोन लाख 47 हजार 400 लोकांना रोजगार मिळणार आहेअसेही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सांगितले.

कल्याणकारी योजनांचा लाभ आणि शेतकऱ्यांना दिलासा

राज्यपाल म्हणालेप्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र लाभार्थी कुटुंबास राज्य शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दरवर्षी तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. अडचणीमध्ये आलेल्या धान उत्पादक नोंदणीकृत शेतकऱ्यांना मदतीच्या दृष्टीने 2024-25 या हंगामासाठी प्रती हेक्टर 20 हजार रुपये प्रमाणे प्रोत्साहनपर राशी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या राज्यातील 31 लाख 36 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना 3,389 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत राज्यात एक लाख सौर कृषी पंप बसवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या 45 लाख कृषी पंप धारकांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने मागील हंगामात 11.21 लाख मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केली असूनही देशातील सर्वाधिक खरेदी असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत आणि वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी 12 हजार रुपये इतके निवृत्तीवेतन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यात दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी नमो दिव्यांग अभियान’ राबविण्यात आले असल्याचेही राज्यपाल म्हणाले.

राज्यपाल म्हणालेप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा एक अंतर्गत राज्यात 12 लाख 69 हजार 785 म्हणजेच 93.6 टक्के घरे पूर्ण झाली आहेत. तरदुसऱ्या टप्प्यात 18 लाख 47 हजार 291 घरे प्रगतीपथावर आहेत. राज्याने नुकतेच सुधारित वाळू निर्गती धोरण जाहीर केले आहे.

सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी

राज्य शासनाने मुंबईत महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक भवन आणि संग्रहालय उभारण्याचा निर्णयही घेतला आहे. महाराष्ट्रातील सागरी किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा दर्जा मिळावायासाठी  शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. हरियाणातील पानिपत येथे 'मराठा शौर्य स्मारकबांधण्याचा निर्णयही  शासनाने घेतला आहे. तसेच आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत असलेल्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही राज्यपाल म्हणाले.

शिक्षण व क्रीडा विकास

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे .उत्तराखंड येथे झालेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण 201 पदके जिंकली आहेत. अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात 31 खेळाडूंची शासकीय सेवेत नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराच्या रकमेत भरघोस वाढ करण्यात आली आहे. शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठीच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा केली जात आहे.

मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांनी राज्यपालांच्या भाषणाचा मराठी अनुवाद वाचला. यावेळी झालेल्या संचलनात राज्य राखीव पोलीस बलबृहन्मुंबई सशस्त्र पोलीस बलबृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथकबृहन्मुंबई महिला पोलीस दलमुंबई लोहमार्ग पोलीस दलनिशाण टोळी (महाराष्ट्र पोलीस ध्वजबृहन्मुंबई पोलीस ध्वजराज्य राखीव पोलीस बल ध्वजमहाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वजबृहन्मुंबई अग्निशमन दल ध्वज)बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दलमुंबई अग्निशमन दलबृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलसुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हाब्रास बँड पथकपाईप बँड पथक यांनी सहभाग घेतला.


Sunday, 27 April 2025

Make Maharashtra the First Homeless-Free State in the Country: Chief Minister Devendra Fadnavis Appeals

 Make Maharashtra the First Homeless-Free State in the Country:

Chief Minister Devendra Fadnavis Appeals

 

* Chief Minister's interaction with officials at the workshop organized by the Rural  

   Development and Panchayati Raj Department

Emphasis on proper management of human resources and increased use of technology

 

Pune, 26th: The Rural Development Department has performed commendably under the Pradhan Mantri Awas Yojana, and the Centre is set to approve an additional 10 lakh houses. After approval, efforts must be made to provide land and ensure that no individual remains homeless. Through this, Maharashtra should become the country's first homeless-free state, appealed Chief Minister Devendra Fadnavis. He also called for better management of human resources and greater use of technology to make the administration more people-centric and dynamic.

 

The Chief Minister was speaking at a state-level Panchayati Raj workshop organized by the Rural Development and Panchayati Raj Department at YASHADA. The event was attended by Rural Development and Panchayati Raj Minister Jaykumar Gore, Minister of State Yogesh Kadam, Principal Secretary Eknath Dawale, YASHADA Director General Niranjan Sudhanshu, and the Chief Minister’s Secretary Shrikar Pardesi.

 

Chief Minister Fadnavis emphasized that developing human resources is essential for effective governance. He urged the efficient use of available manpower and the establishment of systems that understand and utilize advanced technology. Good ideas from other regions should be adopted. The insights gained from the workshop and the experiences of senior officers would help make the administration more citizen-centric.

 

Under the Pradhan Mantri Awas Yojana, homes approved should be connected to solar energy from the very first day through the Pradhan Mantri Suryaghar Yojana’. Officers should work towards mobilizing manpower and funding through various schemes for this effort, he said. He also expressed confidence that this initiative would create employment opportunities.

 

Saturday, 26 April 2025

पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर

 पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

·         232 प्रवाशांना घेऊन तिसरे विमान पोहोचलेआतापर्यंत 800 पर्यटक परत

·         त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची सोय

 

मुंबई25 एप्रिल : महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असूनत्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहेअशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. दरम्यानपहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन मुंबईत दाखल झाले. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोलाअमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 800 पर्यटक महाराष्ट्रात परतले आहेत.

माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीमहाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असूनमहाराष्ट्रात प्रत्येक पोलिस स्थानकाला त्याची सूचना दिली जात आहे. कोणताही पाकिस्तानी नागरिक 48 तासांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात राहू नयेयाची काळजी घेतली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जात असूनजो कुणी अधिक काळ वास्तव्य करताना आढळेलत्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असूनत्यांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसारच ही कारवाई होईल.

दरम्यानकाल दोन विशेष विमानांनी 184 प्रवासी महाराष्ट्रात परतल्यानंतर तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन महाराष्ट्रात पोहोचले. ही तीन विमाने मिळून महाराष्ट्रातील 416 पर्यटक परत आलेतर अन्य माध्यमातून आतापर्यंत सुमारे 800 प्रवासी परत आले आहेत. याशिवायसुमारे 60 ते 70 आणखी पर्यटकांच्या विनंती प्राप्त झाल्या असूनत्यांच्या प्रवासाची व्यवस्था राज्य सरकारतर्फे करून देण्यात येत आहे. जसजशा विनंती प्राप्त होतीलतसे त्या पर्यटकांना परत आणण्याची व्यवस्था राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे.

Saturday, 29 March 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

पंढरपूरदि.29 :-   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे  दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.  

यावेळी त्यांच्या समवेत पालकमंत्री जयकुमार गोरेआमदार सर्वश्री समाधान आवताडेअभिजीत पाटीलगोपीचंद पडळकरसचिन कल्याणशेट्टीबाबासाहेब देशमुखमाजी आमदार राम सातपुतेविभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवारविशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारीजिल्हाधिकारी कुमार आशीर्वादजिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,  मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री तसेच मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.

तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यामध्ये श्री विठ्ठल गर्भगृहश्री रुक्मिणी गर्भगृहश्री विठ्ठल चारखांबी व सोळखांबीबाजीराव पडसाळीमहालक्ष्मी मंदिर आदी ठिकाणची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.

00000000

मुख्यमंत्री यांच्याकडून परिचारक कुटुंबियांची सांत्वन पर भेट

                  पंढरपूर दिनांक 29: - माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे वडील प्रभाकर परिचारक यांचे मागील दोन महिन्यापूर्वी वृद्धापकाळाने निधन झालेले होते. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशांत परिचारक यांच्या पंढरपूर येथील निवासस्थानी त्यांची व कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

               यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरेआमदार सर्वश्री समाधान आवताडेसचिन कल्याणशेट्टीगोपीचंद पडळकररणजीतसिंह मोहिते पाटीलबाबासाहेब देशमुखमाजी आमदार प्रशांत परिचारकउमेश परिचारक आदी उपस्थित होते.

Sunday, 27 October 2024

*मतदान ओळ्खपत्राशिवाय १२ प्रकारचे ओळखपत्र मतदानासाठी ग्राह्य*

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ 

*मतदान ओळ्खपत्राशिवाय १२ प्रकारचे ओळखपत्र मतदानासाठी ग्राह्य

 

धाराशिव दि २७ ( माध्यम कक्ष): भारत निवडणूक आयोगाने मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र दिले आहे.विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र मतदानाच्या वेळी सादर करू शकत नाही,अशा मतदारांना मतदानाच्या वेळी त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त पुढील १२ प्रकारचे कागदपत्रे मतदानाच्या वेळी ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार आहे.यामध्ये आधार कार्डमनरेगाचे रोजगार पत्रक,बँक/पोस्ट ऑफिसने दिलेले छायाचित्रासह पासबुक,कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड,वाहन चालक परवानापॅन कार्ड,रजिस्टर जनरल ऑफ इंडिया यांच्याकडून नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत दिलेले स्मार्ट कार्ड,भारतीय पासपोर्टफोटोसह पेन्शन दस्तऐवज,केंद्रराज्य सरकार/सार्वजनिक उपक्रमपब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले सेवा ओळखपत्रखासदारांना/आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र आणि भारत सरकारच्या सामाजिक न्याय  सशक्तिकरण मंत्रालयाने दिलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र यांचा समावेश आहे.

निवडणूक खर्चासाठी उमेदवाराचे स्वतंत्र बँक खाते आवश्यक*

 *निवडणूक खर्चासाठी उमेदवाराचे स्वतंत्र बँक खाते आवश्यक*

 

धाराशिव दि.२७ (माध्यम कक्ष):  भारत निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक उमेदवारांचे निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक आहेउमेदवाराला हे बँक खाते त्याच्या नावे किंवा त्यांच्या निवडणूक प्रतिनिधी यांच्या संयुक्त नावाने उघडता येते.सहकारी बँक तसेच कोणत्याही बँकेत किवा पोस्ट ऑफीसमध्येही खाते उघडता येते

 

उमेदवारांने निवडणुक खर्चासाठी असलेली संपूर्ण रक्कम संबंधीत बँक खात्यामध्ये जमा करणे आवश्यक आहेनिवडणुकीसाठी उघडलेल्या बँक खात्यातुन उमेदवाराने आपला निवडणुक खर्च धनादेश/धनाकर्ष/आरटीजीएस/एनईएफटीद्वारे करणे आवश्यक आहे.

 

उमेदवारांना बँक खाती उघडल्यास तत्पर सेवा मिळावी  निवडणुक काळात संबंधीत खात्यातुन प्राधान्याने पैसे काढण्यास आणि पैसे जमा करण्याच्या उद्देशाने समर्पित काऊंटर (Dedicated Counter) उघडणेबाबत सर्व बँकांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी निर्देश दिले आहे.

 

 

 

 

Featured post

Lakshvedhi