दगडांच्या देशा... मेघालया !(मेघालय डायरी)
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा... महाराष्ट्राचे वर्णन करणाऱ्या या ओळी. पण *‘दगडांचा देश’* ही ओळख एकट्या महाराष्ट्राला लागू पडत नाही, तर ईशान्य भारतातील मेघालय या राज्याचेसुद्धा असेच वर्णन करण्याचा मोह होतो. कारण माहितीए?...
ही गावांची नावे पाहा-
Mawphlang (मॉफलाँग)... ‘सॅक्रेड फॉरेस्ट’ साठी प्रसिद्ध असलेलं गाव.
Mawsynram (मॉसिनराम)... सर्वाधिक पावसाबाबत चेरापुंजीशी स्पर्धा करणारे गाव.
Mawlynnong (मॉलिनाँग)... आशिया खंडातील सर्वांत स्वच्छ ठरलेले गाव.
या सर्व गावांच्या नावांमधे एक साम्य आढळते. ते म्हणजे, या सर्व गावांची नावे ‘Maw / मॉ’ यापासून अक्षरापासून सुरू होतात. फक्त इतकीच गावे नव्हेत, तर Mawkriah, Mawlai, Mawtnun, Mawshynrut, Mawthadraishan, Mawphanlur, Mawnan… अशी अनेक गावे मेघालयात आहेत. तिथे फिरताना अशी कितीतरी गावे लागतात. त्यातील ‘Maw / मॉ’ या शब्दाचा अर्थ माहितीए?... त्याचा अर्थ- दगड किंवा खडक.
Mawphlang म्हणजे खडक व गवत किंवा गवतावरचा खडक.
Mawlynnong म्हणजे खडकाचे गाव. काही जण सांगतात- खडकाची गुहा.
Mawkriah म्हणजे खडकाची बास्केट.
Mawlai म्हणजे खडक आणि तीन. याचे अनेक अर्थ काढतत. हे गाव शिलाँग या मुख्य गावापासून तीन मैल अंतरावर आहे. या गावात तीन गौरवार्थ दगड (स्मारके) आहेत. काही जण याचा अर्थ हद्दीचा दगड असाही सांगतात... असे हे गावाच्या नावांचे दगड पुराण!
याशिवाय मेघालयात मोठ्या संख्येने शिळास्मारके पाहायला मिळतात. लोकांच्या स्मरणार्थ / गौरवार्थ शिळा उभारण्याची प्रथा आहे. ‘यू- मावथो – दूर - ब्रीव’ या ठिकाणी तर एकाच परिसरात शेकडो शिळा उभारल्या आहेत. याशिवाय अनेक गावांमधे दगड उभारून केलेली स्मारके आहेतच.
आता सांगा, अशा राज्याला ‘दगडांचा देशा’ नाही म्हणायचे तर आणखी काय...?
...
नेहमीच्या गोष्टींपलीकडचं काही समजून घेण्यासाठी,
चलो मेघालय,
Exclusive Meghalaya - Kaziranga
(26 Feb - 4 March 2024)
9545350862
- अभिजित घोरपडे