Showing posts with label खट्टा बहर. Show all posts
Showing posts with label खट्टा बहर. Show all posts

Friday, 28 June 2024

सुंदर विचार

 नकारात्मक विचार पाया कमकुवत करतात आणि तुमची क्षमता मर्यादित करतात.तुमचे विचार हे तुमचे आर्किटेक्ट आहेत.(Your Thoughts Are Your Architects)आपण कोण आहोत आणि आपण काय सक्षम आहोत याबद्दल आहेत.तुमच्या अंतरमनाला काय आग लावते? तुम्हाला खरोखर जिवंत वाटते कशामुळे? तुमचा उद्देश शोधणे.परेशान हो तो पढ़ो ! हैरान हो तो समझो !स्वतःबद्दल नकारात्मक बोलू नका.(Don't speak negative about yourself) 

   समस्या इतक्या मोठ्या होतात जेव्हा आपण काळजी करू लागतो आणि तक्रार करू लागतो तेव्हा आपण त्याबद्दल विचार करून खूप थकून जातो. अनेकदा अपयश येते. नियतीला सुबुध्दी साठी प्रार्थना करा,

काय करावे लागेल याची यादी तयार करा.  

मग बघा कामे सोपी होतात.आपल्याला वास्तवापेक्षा कल्पनेचा त्रास जास्त होतो.

    कल्पनेत आपण समस्येच्या स्वरूपाचा अतिरेक करून असे चित्र बनवतो की ती गुंतागुंतीची आणि कठीण आहे पण प्रत्यक्षात जेव्हा आपण तिचा सामना करतो तेव्हा आपल्याला कळते समजते समस्या किती छोटी आहे,

Thursday, 20 June 2024

कि जरा बरं वाटतं

 *कि जरा बरं वाटतं.....*


जाताना बरोबर काही नेणार नाही!

हे जरी सत्य असल तरी...


खात्यावर बऱ्यापैकी शिल्लक असली की जरा बरं वाटतं!!


वाटेत कुणी दिन दुबळा असाह्य दिसला की... चार नाणी खिशात असली की ती त्याच्या हातावर टेकवताना जरा बर वाटत!


हॉटेलिंग ची हौस फिटली असली तरी....

मित्र भेटला तर त्याच्या बरोबर गप्पा मारायला हॉटेलात बसण्या इतपत चार पैसे केव्हाही जवळ असले की जरा बरं वाटतं!


कपडालत्ता दागदागिने नकोसे वाटू लागले तरी... मुलाबाळा साठी, नातवंडासाठी मनाजोगा खर्च करण्या इतकी ऐपत असली की जरा बरं वाटतं!


बरोबर काही न्यायचं नसल तरी .....

शेवट पर्यंत हातात चार पैसे खुळखुळत असले की,जरा बरं वाटतं!!


साठी पार केलीत?अजिबात वाटत नाही!अस कुणी म्हटल की जरा बरं वाटतं!


मित्रांसोबत रात्रभर पार्टी केली तरी...

घरी कुणीतरी आपली वाट पाहतंय हे जाणवलं की,जरा बरं वाटतं!


जाताना बरोबर काहीच जाणार नाही हे माहीत असल तरी...


आहे तोपर्यंत जे जे शक्य ते उपभोगुन घेतलं की,जरा बरं वाटतं!


पुढे दवा डॉक्टर काय वाढून ठेवलंय माहीत नाही तरी...

दोन चार एफडी एखादी पॉलिसी असली की, जरा बरं वाटत!


साठी नंतर ही आपण मुला बाळांना भार नाही. माझ मला पुरेस आहे.अस म्हणण्या इतपत पुंजी गाठीशी असली की,जरा बरं वाटतं!


मी मेल्यावर मला काय करायचंय अस म्हटल तरी...

जाताना दुसऱ्यासाठी काही शिल्लक ठेऊन गेलं की,जाताना जरा बर वाटत!


गरजे पुरता संचय कर हे तत्वज्ञान ऐकायला बर वाटल तरी...

भविष्यात कशा कशाची गरज पडेल हे सांगता येत नाही!


म्हणून.....

सगळं काही इथच रहाणार,

जाताना काही आपल्या बरोबर नेता येणार नाही.हे जरी खर असल तरी...

अंगात ऊब आहे तो पर्यंत खिशाला ही ऊब असली की,

जरा बरं वाटतं!जरा बरं वाटतं!


*कोणी लिहिलं माहीत नाही पण वाचून जरा बर वाटलं…*

👍🏻🙏🏻👍🏻

Thursday, 13 June 2024

माहूत हत्तीला ट्रकवर ढकलून देऊ शकत होता असे नाही.*

 *माहूत हत्तीला ट्रकवर ढकलून देऊ शकत होता असे नाही.*  

पण, पाठीमागून हात ठेवल्यामुळे, हत्तीला विश्वास वाटत होता की, आपला मालक आपल्याला मदत करत आहे म्हणून हत्ती स्वतःला सहजतेने ट्रकवर चढवून घेत होता.  

*प्रेरणा देणे एक साधी कृती एवढेच.*


आपल्यामध्ये असे बरेच लोक आहेत, ज्यांना पाठिंबा किंवा प्रेरणा देणारे कोणी नसल्यामुळे ते मागे पडले आहेत.


कधीकधी काहींना वाटत असते, जर आम्ही जागरूक/अपडेट असतो, जर कोणी आम्हाला आधार आणि प्रेरणा दिली असती तर आम्ही फार काही करू शकलो असतो... 


आपण हे सर्वाणसाठी करू  शकत नाही, परंतु काहींसाठी, काही कठीण वेळी आपण ते करू शकतो.


*प्रेमाचा एक साधा शब्द, सकारात्मकता किंवा शक्ती आणि समर्थनाचे काही प्रेरक शब्द एखाद्याचे आयुष्य कायमचे बदलू शकतात.*

🙏🙏

Tuesday, 13 February 2024

पुणेरी डोके* 😊😄

 *पुणेरी डोके* 😊😄 


कोणीतरी एकदा पुण्यातील एका प्रख्यात वकीलाला प्रश्न विचारले *महाभारत* आणि *रामायण* मध्ये काय फरक आहे?

वकीलानी एकदम वकिली भाषेतच उत्तर दिले..

*महाभारता* मध्ये जमिनी बद्दल वाद होता *(सिव्हील केस) तर रामायणा* मध्ये अपहरणची  केस होती. *(क्रिमिनल केस)* 

🤣😂

हाच प्रश्न जेव्हा पुण्यातील प्रख्यात साहित्यकांना विचारला,

तेव्हा त्यांच्याकडे अगदी मार्मिक उत्तर होते..

*हरणा* चं *वस्त्र* बनवण्या वरून झाले ते *रामायण*

आणि

*वस्त्रा* चं *हरण* करण्या वरुन झालें ते *महाभारत.*


😂🤣😂😂😂😂😂😃😃

Featured post

Lakshvedhi