Showing posts with label Krishi. Show all posts
Showing posts with label Krishi. Show all posts

Thursday, 14 March 2024

सोयाबीन दुधाचा पोषण आहारात समावेशासाठी प्रयत्नशील

 सोयाबीन दुधाचा पोषण आहारात समावेशासाठी प्रयत्नशील


- कृषीमंत्री धनंजय मुंडे


सोयाबीन प्रक्रियादारांची गोलमेज परिषद


 


            मुंबई, दि. 11 : सोयाबीन या पिकात शेतकऱ्याला आर्थिक आधार देऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याची क्षमता आहे. त्यामुळे सोयाबीनचा सर्वसामावेशक वापर करण्याच्या अनुषंगाने धोरण ठरविण्यात येईल. तसेच छत्तीसगडच्या धर्तीवर सोया मिल्क सर्व विभागांच्या पोषण आहारात घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.


            सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि प्रक्रियादारांची गोलमेज परिषद कृषीमंत्री श्री. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते.


            यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक परिमल सिंह, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर आणि सोयाबीन प्रक्रियादारांचे प्रतिनिधी फूड चेनच्या चिन्मयी देऊळगावकर, चेतन भक्कड, अमोल धवन उपस्थित होते.


            मंत्री श्री. मुंडे म्हणाले, राज्यातील सोयाबीन हे मुख्य पीक असून त्यापासून माफक दरात खाद्य तेल व प्रथिने उपलब्ध होतात. मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना स्मार्ट प्रकल्पांतर्गत सीबीओ निवडीचे लक्षांक शिथिल केलेले आहे. या विभागातील जिल्ह्यांमधून शेतकरी उत्पादक कंपन्याचे सोयाबीन प्रक्रिया- सोयाबीन दूध, सोयाबीन टोफू, इत्यादीचे प्रस्ताव सादर केल्यास प्रकल्पाच्या निकषाप्रमाणे मान्यता देण्यात येईल. सद्य:स्थितीत सोयाबीन दूध- दही- टोफू उत्पादन युनिट 100 किलो प्रती तास या मशनरीचे मापदंड 30 लाख रुपये आहे. सोयाबीन पिकाच्या प्रक्रिया केलेल्या पदार्थाला स्थानिक तसेच जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.


            यावेळी या गोलमेज परिषदेमध्ये सोयामिल्क छत्तीसगडच्या धर्तीवर सर्व विभागांच्या पोषण आहारात घ्यावे, पॅकेजिंग कॉस्ट मोठी आहे. त्यामुळे प्लास्टिक पाऊच आणि नियमित पुरवठा सुरु केला पाहिजे, जीएसटी 12 टक्के आहे त्याचा विचार व्हावा, अंडी, दूध जसे पोषक आहे तसेच सोयाबीन पोषक तत्वानी भरपूर असल्यामुळे त्याचे मार्केटिंग व्हावे, सोशल मीडिया प्रचारक, आहारातज्ञ यांच्या मार्फत प्रसार व्हावा, आदी विषयांवर चर्चा झाली.

Tuesday, 12 March 2024

पर्यायी बाजार व्यवस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या अभ्यासासाठी गठीत दांगट समितीचा अहवाल शासनास सादर

 पर्यायी बाजार व्यवस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या अभ्यासासाठी


गठीत दांगट समितीचा अहवाल शासनास सादर


 


            मुंबई दि. 11 : राज्यातील पर्यायी बाजार व्यवस्था तसचे कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा अभ्यास करण्यासाठी गठीत केलेल्या माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट अभ्यासगटाच्या शिफारशी शासनास सादर करण्यात आल्या.


            सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री अब्दुल सत्तार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मंत्री मंडळातील अन्य मंत्री यांच्या उपस्थितीत माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी अभ्यास गटांच्या शिफारशी शासनास सादर केल्या.


            खाजगी बाजार, थेट पणन परवाना, शेतकरी ग्राहक-बाजार, ई-व्यापार व्यासपीठ (e-Trading Platform) तयार करणे. कंत्राटी शेती, कृषी उत्पन्न बाजार समित्या, खासगी बाजार व कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा तुलनात्मक अभ्यासातील महत्वाच्या बाबी, किमान आधारभूत किंमतीबाबत, कृषी पणन विभागाचे बळकटीकरण आणि पुरेशी अर्थसंकल्पीय तरतुद करणे. कृषी पणन व्यवस्थेत भविष्याचा वेध घेणे. या महत्त्वाच्या शिफारशी शेतकरी हित केंद्रबिंदू मानून अभ्यासगटांने सादर केल्या आहेत.


0000

Featured post

Lakshvedhi