Showing posts with label कृही. Show all posts
Showing posts with label कृही. Show all posts

Sunday, 16 June 2024

एकात्मिक कापूस,सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 एकात्मिक कापूस,सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ

व मूल्यसाखळी विकास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

               मुंबई दि. 16 : कापूससोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देण्यासाठी राज्य शासन तीन वर्षासाठी विशेष कृती योजना राबविण्यात येत आहे.   राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर mahadbt.maharashtra.gov.in अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने कळविले आहे.

       ही विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे. सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू खरिप हंगाममध्ये पुढील निविष्ठा पुरविण्यात येणार आहेत. नॅनो युरिया सोयाबीन, नॅनो डीएपी सोयाबीन, नॅनो युरिया कापूस, नॅनो डीएपी कापूस यासाठी 30 जूनपर्यंत अर्ज करावेत तर मेटाल्डीहाइड सोयाबीनसाठी 23 जून, २०२४ पर्यंत महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावेत.

       या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर सदर बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. बियाणेऔषधे व खते या टाईल्स अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील.

        तरी जास्तीत- जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

0000

Featured post

Lakshvedhi