प्रयागराज महाकुंभ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में दर्ज हो गया 🙏🔱 #ChandrashekharAzad #एकता_का_महाकुंभ
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 2 March 2025
Thursday, 20 February 2025
वऱ्हाडी बोलीभाषेचे
वऱ्हाडी बोलीभाषेचे वैशिष्ट्य
वऱ्हाडी ही मराठीची अत्यंत महत्त्वाची आणि लोकप्रिय बोली आहे. विदर्भात बोलली जाणारी ही बोली आपल्या सहज संवादशैलीमुळे प्रसिद्ध आहे. वऱ्हाडी भाषेचा विनोदी बाज हा तिचा खास गुणधर्म आहे. वऱ्हाडी बोलीत बोलताना एक वेगळीच गंमत असते. शब्दांच्या उच्चारांतील लयबद्धता आणि लहेजा मराठीला एक वेगळेच सौंदर्य प्रदान करतो.
वऱ्हाडी भाषेचे महत्त्व
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देताना वऱ्हाडी भाषेतील लिखाण अलिकडच्या काळात विशेष अधोरेखित झाले आहे. लीळाचरित्र या महानुभव पंथाच्या ग्रंथात वऱ्हाडीचा प्रभाव आढळतो. आद्य मराठी कवी मुकुंदराज यांच्या लेखनातही वऱ्हाडीचा वापर दिसतो. संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ग्रंथात वऱ्हाडीचा प्रभावी वापर केला आहे. कर्मयोगी गाडगेबाबांचे प्रवचनदेखील अस्सल वऱ्हाडी भाषेत असायचे. पुरुषोत्तम बोरकर यांची मेड इन इंडिया, उद्धव शेळके यांची धग कादंबरी त्यातील वऱ्हाडी भाषा यांनी अनेक पिढ्यांना वेड लावले आहे. अनेक अशा अशा कादंबऱ्या, कथा मान्यवर लेखकांनी मराठी वाचकांना दिल्या आहेत.
वऱ्हाडीतील साहित्यिक योगदान
वऱ्हाडी भाषेत विपुल प्रमाणात साहित्यनिर्मिती झाली आहे. कथा, कादंबऱ्या, कविता, आत्मचरित्र, नाटके, सिनेमा अशा विविध माध्यमांद्वारे ही भाषा आपल्या भाषिक परंपरेत एक ठसा उमटवत आहे. अनेक लेखक आणि साहित्यिकांनी वऱ्हाडी भाषेत उत्कृष्ट लेखन केले आहे. वेगवेगळ्या टीव्ही सिरीयल,कॉमेडी शो आणि चित्रपटात या बोली भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. हिंदी भाषेनंतर हास्य कवी संमेलनाची संस्कृती वऱ्हाडी भाषेने सर्वाधिक जोपासली आहे. माध्यमांमुळे या बोलीभाषा आता आपल्या सीमा भेदून सार्वत्रिक होत आहे.
प्रा. देविदास सोटे, पुरुषोत्तम बोरकर, उद्धव शेळके, मनोहर तल्हार, बाजीराव पाटील, गो. नी. दांडेकर, महेश दारव्हेकर, पांडुरंग गोरे, विठ्ठल वाघ, डॉ. मिर्झा रफी अहमद बेग,शंकर बडे, मधुकर केचे, ज्ञानेश वाकुडकर,शाम पेठकर, नाना ढाकूलकर, मनोहर कवीश्वर, मधुकर वाकोडे, गौतम गुडदे, डॉ. प्रतिमा इंगोले, शरदचंद्र सिन्हा, जगन वंजारी, राजा धर्माधिकारी, बापुराव झटाले, अॅड. अनंत खेळकर, किशोर बळी, रमेश ठाकरे, बापुराव मुसळे, रावसाहेब काळे,सदानंद देशमुख, नरेंद्र लाजेवार, नरेंद्र इंगळे,आदी मान्यवरांसह शेकडो लेखकांनी वऱ्हाडी भाषेतील साहित्य समृद्ध केले आहे.
वऱ्हाडी भाषेतील नाटक आणि गझलसुद्धा विशेष प्रसिद्ध आहेत. कविवर्य सुरेश भट यांनी मराठीत गझल लेखन केले, पण खासगी संभाषणात ते अस्सल वऱ्हाडीच वापरत. वऱ्हाडी भाषेतील सहज संवाद साधण्याची शैली, विनोदी प्रकृती, आणि लयदार उच्चार हा एक वेगळाच अनुभव देतात.
विदर्भाच्या 11 जिल्ह्यांमध्ये, मराठवाड्याच्या सीमावरती भागात, तसेच मध्य प्रदेशातील तेलंगाना व आंध्र प्रदेशातील अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वऱ्हाडी भाषा बोलली जाते. अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वेगळ्या पद्धतीने तर अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये त्यामध्ये थोडा बदल होऊन भाषा बोलली जाते. नागपूर शहरातील बोलली जाणारी भाषा ही देखील एक वेगळी वऱ्हाडी शैली आहे. नागपूर मेट्रोने तर खास नागपुरी शब्दांच्या जाहिराती केल्या आहेत. विशेष म्हणजे त्या त्या भागातील नागरिक एकमेकांना भेटल्यानंतर या शब्दांचा भरपूर वापर करतात. भाषिक जवळीकता साधण्यासाठी हे शब्द ओळखीचे काम करते. पुढे हीच भाषा भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागामध्ये वेगळा हेल घेते. तिचे उच्चार वेगळ्या पद्धतीने केले जाते. मात्र हजारोंनी या भाषेचे संवर्धन केले आहे. मराठी भाषेच्या समृद्धीचा विचार करताना मोठ्या संख्येने बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषा, त्यांचे संवर्धन आणि त्याचा अभ्यास करण्याचे व्यासपीठ अशी मोठी संमेलन असतात. दिल्लीच्या व्यासपीठावर अभिजात भाषेचा गुणगौरव होताना बोलीभाषेच्या सुप्त प्रवाहावरही चर्चा करावी लागणार आहे. बोलीचे वैभव,भाषेची संपन्नता वाढवणारे आहे.
Monday, 10 February 2025
उन्हाळा आला कलिंगड जपून खा. वरील व्हिडिओ अवश्य पहा.
उन्हाळा आला कलिंगड जपून खा.
वरील व्हिडिओ अवश्य पहा.
Saturday, 25 January 2025
मेरा भारत महान International flight to prayagraj announcement by foreign pilot
International flight to prayagraj announcement by foreign pilot
Monday, 30 December 2024
पी के अत्रेंनी एकवेळ यशवंतराव यांना
पी के अत्रेंनी एकवेळ यशवंतराव यांना
निपुत्रिक म्हटले. ही टीका अंत्यत वाईट तर होतीच.पण १९६० साली महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाल्यावर केली होती. तरीही यशवंतराव यांनी एक चकार शब्द काढला नाही. त्यांनी एक फोन केला आणि अत्रेंना खुलासा करून म्हणाले, 'माझी पत्नी वेणू १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात असताना तिच्यावर इंग्रजांनी लाठी हल्ला केला, व त्यात तिचा गर्भपात झाला आणि गर्भाशय कायमचे निकामी झाले' यशवंतराव हे सांगताना ना अत्र्यांवर रागावले ना त्यांच्याबद्दल एकही अपशब्द काढला. मात्र त्यानंतर अत्रे थेट यशवंतरावांच्या घरी आले. अंत्यत भावनिक होत त्यांनी त्यांची व वेणूताई यांची माफी मागितली, पश्चाताप केला होता. वेणुताई अत्रेंना म्हणाल्या भाऊ त्यानिमित्ताने तरी घरी आला.असे उदगार काढले होते. तेव्हा अत्रेंना अश्रू अनावर झाले होते. आणि यशवंतरावांनी हसतमुखाने अत्रेंना माफ केले. ही महाराष्ट्रातील नेत्यांची त्या वेळेची (आजची नव्हे) संस्कृती होती. ती माणसे कुठल्या मातीने बनलेली असावीत ? हा यशवंतराव साहेबांचा महाराष्ट्र... आजची संस्कृती म्हणजे तुला चप्पलने मारतो, कानशिलात मारतो, कोथळा काढतो वगैरे वगैरे . आज यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी त्या निमित्ताने विशेष लेख🙏🙏🙏
#YashwantraoChavhan
#MaharashtraCM
#politicalikon
Sunday, 21 July 2024
Friday, 28 June 2024
श्री कैलाश मानसरोवर से प्रत्यक्ष दर्शन भगवान शंकर के मां पार्वती के साथ यह कोई कंप्यूटर वीडियो नहीं है जरूर देखें
श्री कैलाश मानसरोवर से प्रत्यक्ष दर्शन भगवान शंकर के मां पार्वती के साथ यह कोई कंप्यूटर वीडियो नहीं है जरूर देखें
Friday, 21 June 2024
१ छान विचार 👌👌
१ छान विचार 👌👌
उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात.पण जर तो जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्या शिवाय चैन पडत नाही.... जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात.पण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात.... जर आई वडील फोटो त असतील तर प्रत्येकजण पूजा करतो.पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही.!फक्त हेच मला समजत नाहीजीवनापासून इतका द्वेष आणि दगडांबद्दल इतका प्रेम का आहे? लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणे पूंण्याचे काम आहे..तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुषहाल होईल.एकदा विचार करून बघा ....🙏🏻🙏🏻,
युधिष्ठराने एक सत्य सांगितलं होतं.. "मरायच सर्वांना आहे, परंतु ... मरावंसं कोणालाच वाटत नाही.. आजची परिस्थिति तर फार गंभीर आहे.. "अन्न" सर्वांनांच हवंय..पण.. "शेती" करावीशी कोणालाच वाटत नाही.. "पाणी" सर्वांनाच हवंय.पण.. "पाणी" वाचवावे कोणालाच वाटत नाही.. "सावली" सर्वांनाच हवीय..पण.. "झाडे" लावावी व ती जगवावी असे कोणालाही वाटत नाही.. "सुन" सर्वांनाच हवीं आहे.. पण.. "मुलगी" व्हावी कोणालाच वाटत नाही.. विचार करावा असे प्रश्न...पण.. विचार करावा असं कोणालाच वाटत नाही..हा मेसेज सर्वांना आवडतो परंतु forward करावा असं कोणालाच वाटत नाही.
👍एक सत्य👍
Thursday, 30 May 2024
Friday, 24 May 2024
कोकण पदवीधर मतदार संघात नाव नोंदणी करण्याची शेवटची संधी *दिनांक ३० मे २०२४*
[ 1: कोकण पदवीधर मतदार संघात नाव नोंदणी करण्याची शेवटची संधी *दिनांक ३० मे २०२४*
ऑक्टोबर २०२० पुर्वी जे पदवीधर झालेले आहेत त्यांनी त्वरित आपले नाव नोंदवावे .
*लागणारी आवश्यक कागद पत्रे...*
१ पदवीधर प्रमाणपत्र किंवा मार्क लिस्ट ( पाच आणि सहा सेम )
२ रहिवासाचा पुरावा - पासपोर्ट/ ड्राइविंग लायसन्स/ चालु लाइट बिल/ वोटर कार्ड/ आधार कार्ड
३ नावात बदल असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र
४ पासपोर्ट साईज फोटो 1: पदवीधर मतदार म्हणून नावनोंदणी ऑनलाईन फार्म लिंक
https://gterollregistration.mahait.org/
Tuesday, 21 May 2024
Monday, 20 May 2024
खूपच चांगली माहिती आहे प्रत्येकाने पुढे फॉरवर्ड करावी
खूपच चांगली माहिती आहे प्रत्येकाने पुढे फॉरवर्ड करावी
Monday, 22 April 2024
झाडांची भिशी,दर. यशवंत पेठकर यांचा अभिनव उपक्रा
दागिन्यांची किंवा पैशांची भिशी आपल्याला ठाऊक आहे. पण *‘झाडांची भिशी’* ही कल्पना अनेकांना नवीन वाटेल. झालं असं, यशवंत पेठकर नावाचे डॉक्टर शाळेपुढील जागेत शाळेच्या परवानगीनं वृक्षारोपण करीत होते. त्यांचे मित्र डॉ. सचिन पुराणिक यांनी ते पाहिलं. शाळेपुढं झाडं लावण्याची त्यांची कृती सचिन यांना अभिनव वाटली. पण एकट्या-दुकट्यानं हे काम केलं, तर त्याला व्यापक स्वरूप येणार नाही, काहीतरी वेगळी कल्पना लढवली पाहिजे, असं त्यांच्या मनानं घेतलं. एका-दोघांनी झाडं लावण्यापेक्षा ही सामूहिक कृती व्हायला हवी, पण त्यासाठी पैसे हवेत. ते कसे उभे करायचे? डॉ. सचिन यांचा आपल्या मित्रांवर भरवसा होता. त्यांनी काही मित्रांना झाडांच्या भिशीची कल्पना सांगितली. सगळ्यांनी ती उचलून धरली आणि पाहता पाहता ती आकाराला आली. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्वांनाच स्वतः झाडं लावण्यासाठी वेळ देणं शक्य नव्हतं. शिवाय त्या झाडांचं संगोपनही करण्याचा महत्त्वाचा मुद्दा होता. सगळ्यांनी मिळून त्यावर तोडगा काढला. दोन वर्षांत सोलापुरात ७०० झाडं लावण्यात आली आणि ती सगळी जिवंत आहेत.
अशी आहे भिशी
सुरवातीला बारा डॉक्टरांनी मिळून सुरू केलेल्या या भिशीमध्ये आता ८८ सदस्य आहेत. त्यातील अनेक जण उद्योजक, इंजिनिअर, आर्किटेक्ट किंवा अन्य व्यवसायांतील आहेत. प्रत्येकाकडून दरमहा दोनशे रुपये घेऊन महिन्याला दोन लकी ड्रॉ काढले जातात. ज्यांच्या नावाचा ड्रॉ निघाला, त्यांच्या पसंतीची योग्य वाढ झालेली रोपं खरेदी केली जातात. त्यांच्याच सूचनेनुसार वृक्षारोपणाची जागा निश्चित केली जाते. त्याची निगा आणि संगोपनाची जबाबदारी ठरवली जाते. त्यानुसार कधी समारंभपूर्वक, तर कधी साधेपणानं लागवड केली जाते. भिशीच्या पैशातून रोपखरेदी, जाळीचे किमान पाच फुटांचे ट्री गार्ड खरेदी केले जाते. ड्रॉ निघालेल्या सदस्याच्या घराच्या, बंगल्याच्या आवारात रोप लावले जाते. तेथे जागा नसल्यास शाळा किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी ते लावले जाते. सोलापुरातील विविध शाळा या मंडळींना आपल्या शाळेत वृक्षारोपणाची विनंती करतात. रेंज फॉरेस्ट ऑफिसर संजय माळी यांना ही संकल्पना समजली. दिवंगत ‘वृक्षमित्र’ बाबूराव पेठकर आणि पर्यावरणतज्ज्ञ सिद्राम पुराणिक या सगळ्यांनी या उपक्रमाला मार्गदर्शन केले.
दोन वर्षांत सातशे झाडं स्वखर्चाने लावणाऱ्या या निसर्गप्रेमींची दखल राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही घेतली. त्यांनी या ग्रुपमधील काही सदस्यांना मुंबईला निमंत्रण देऊन ही कल्पना समजून घेतली. त्यांच्यापुढे झालेल्या सादरीकरणामुळे हा उपक्रम आणखी जोमाने सुरू झाला. हिमाचल प्रदेशात एक लाख औषधी वृक्षांची लागवड केलेल्या योगी अरविंद यांना या उपक्रमाची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी सोलापूरला आवर्जून भेट देऊन या मंडळींना मार्गदर्शन केले.
झाडांचा वाढदिवस
लावलेल्या झाडांची महिन्यातून दोनदा तपासणी केली जाते. रोप व्यवस्थित रुजले आहे की नाही ते पाहिले जाते. बऱ्याचदा रोप रुजत नाही, तेव्हा दुसरे रोप लावले जाते. लागवडीला वर्ष पूर्ण झालेल्या झाडाचा वाढदिवस साजरा केला जातो. झाडाचं संगोपन करणाऱ्यांचे कौतुक केले जाते. हा उपक्रम सोलापूरकरांना आवडला आहे. आता कित्येक जण आपल्या वाढदिवशी किंवा लग्नाच्या वाढदिवशी झाडं लावण्याचा संकल्प करतात व या उपक्रमात सहभागी होतात. डॉ. सचिन यांच्या कल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाची व्याप्ती वाढत आहे. एकाच ग्रुपमध्ये अधिकाधिक सदस्य वाढवण्यापेक्षा शहराच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळे भिशी ग्रुप व्हावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केल्यामुळे आणखी ग्रुप तयार झाले आहेत. झाडं लावणाऱ्यांची सावली झाडंच सांभाळतात, असं हा उपक्रम पाहता म्हणावे लागेल. कवी नारायण सुमंत यांच्या शब्दांत सांगायचे, तर ‘फुलता आले नाही त्यांनी फुलवून जावे थोडे, रुजण्याजोगे झाड पाहून लावीत जावे झाडे.’
*(Copy-Paste-Forward)*
Thursday, 18 April 2024
Wednesday, 17 April 2024
ओळखीत जर कोणी विवाह इच्छुक ब्राह्मण मुले मुली असतील तर त्यानां ही माहिती पाठवा
तुमच्या ओळखीत जर कोणी विवाह इच्छुक ब्राह्मण मुले मुली असतील तर त्यानां ही माहिती पाठवा आणि ऑनलाईन योगिनी वधुवर मेळाव्यात सहभागी होण्यासाठी सांगा , ही नम्र विनंती 😊🙏🏻
Monday, 1 April 2024
आपण मोबाईल नंबर बदलतो, त्यामुळे आपले काय नुकसान होते. वाचा आणि दुसऱ्यांना पण पाठवा..*
*आपण नंबर बदलतो, त्यामुळे आपले काय नुकसान होते. वाचा आणि दुसऱ्यांना पण पाठवा..*
नुकतेच एका महिलेचे तिच्या बँक खात्यातून ८,१६,०००/- रुपये गायब करण्यात आले.
*हे नक्की घडले कसे ?*
१. या महिलेने तिच्या बँक खात्याशी जो मोबाईल नंबर लिंक केला होता. तो नंबर तिने 4 वर्षे वापरला नाही.
२. पण तिच्या KYC मधून ते हटवण्यासाठी बँकेला कळवले नाही.
३. आता, ती वापरात नसलेल्या मोबाईल सिम नंबर मोबाईल कंपनीने बंद केला आणि दुसऱ्या व्यक्तीला दिला.
४. मोबाइल कंपनी पॉलिसीनुसार, जर कोणताही नंबर तुम्ही ६ महिन्यांपर्यंत वापरला नाही तर तो दुसऱ्याला देवु शकतात.
५. आता बँकेचा नियमित येणारा एसएमएस ज्याला नवीन नंबर मिळाला होता त्याला यायला लागले. त्याने काय केले ? तर त्याने एका लिंकद्वारे बँकेच्या साइटवर प्रवेश केला. आणि *फरगेट पासवर्ड* असे लिहिले. आता बँकेकडून आलेल्या लिंकचा OTP सत्यतेसाठी त्याच्या ताब्यात असलेल्या नंबरवर गेला, त्याने औपचारिकता पूर्ण केली आणि इंटरनेट बँकिंगद्वारे आनंदाने सर्व पैसे काढले.
त्यामुळे, बँक खात्याशीस काय पण आपण वापरत नसलेला किंवा बंद केलेला आपला जुना नंबर आपण कोठेही लिंक केलेला असेल तर, बँकिंग नियमानुसार बँकेत जाऊन तो नंबर डीलिंक करावा लागेल.
कृपया वरील बाबी लक्षात घेता. आपला सहा महिने वापर न केलेला मोबाइल नंबर दुसऱ्याला रिअलॉट केला जाऊ शकतो.
*ही वस्तुस्थिती आपल्यापैकी अनेकांसाठी नवीन माहिती असू शकते. खुप महत्त्वाची गोष्ट आहे. नक्की विचार करा आणि पुढे पाठवा....*
Thursday, 28 March 2024
Wednesday, 27 March 2024
Saturday, 16 March 2024
प्रल्हाद ढाकणे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
प्रल्हाद ढाकणे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
बीड प्रतिनिधी : तागडगाव ता. शिरूर कासार येथील भूमिपुत्र विधीतज्ञ प्रल्हाद रामकिसन ढाकणे यांची वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य बीड जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. ढाकणे यांच्या निवडीमुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
शिरूर कासार येथील तालुका न्यायालयात कार्यरत असलेले विधिज्ञ् प्रल्हाद ढाकणे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष गणेश खाडे, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बुधाजीराव पानसरे, राज्य संपर्क प्रमुख खंडेश्वर मुंडे, महासचिव व्यंकट मुंढे, यांनी बीडच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली आहे. त्या आशयाचे निवडपत्र ढाकणे यांना देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. स्वधर्म रक्षण व राष्ट्र निर्माणात योगदान हे कर्तव्य आणि जबाबदारी, नैतिक मूल्याचे रक्षण तसेच संस्कृती व संस्कारक्षम पिढीच्या निर्मितीसाठी अविरत कार्य करण्याचे व भावी पिढीला दिशा देण्याचे कार्य प्रल्हाद ढाकणे यांनी करावे अशी अपेक्षा महासंघाच्या वतीने नियुक्तीपत्रात व्यक्त केली आहे. दरम्यान बीडच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रल्हाद ढाकणे यांचे तागडगावचे उपसरपंच प्रभाकर सानप, विष्णू सानप, अशोक सानप, शेषेराव सानप, अंकुश ढाकणे, अनिल सानप, संजय सानप आदींनी सत्कार करून अभिनंदन केले आहे.
Featured post
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...