प्रल्हाद ढाकणे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
बीड प्रतिनिधी : तागडगाव ता. शिरूर कासार येथील भूमिपुत्र विधीतज्ञ प्रल्हाद रामकिसन ढाकणे यांची वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य बीड जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. ढाकणे यांच्या निवडीमुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
शिरूर कासार येथील तालुका न्यायालयात कार्यरत असलेले विधिज्ञ् प्रल्हाद ढाकणे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष गणेश खाडे, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बुधाजीराव पानसरे, राज्य संपर्क प्रमुख खंडेश्वर मुंडे, महासचिव व्यंकट मुंढे, यांनी बीडच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली आहे. त्या आशयाचे निवडपत्र ढाकणे यांना देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. स्वधर्म रक्षण व राष्ट्र निर्माणात योगदान हे कर्तव्य आणि जबाबदारी, नैतिक मूल्याचे रक्षण तसेच संस्कृती व संस्कारक्षम पिढीच्या निर्मितीसाठी अविरत कार्य करण्याचे व भावी पिढीला दिशा देण्याचे कार्य प्रल्हाद ढाकणे यांनी करावे अशी अपेक्षा महासंघाच्या वतीने नियुक्तीपत्रात व्यक्त केली आहे. दरम्यान बीडच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रल्हाद ढाकणे यांचे तागडगावचे उपसरपंच प्रभाकर सानप, विष्णू सानप, अशोक सानप, शेषेराव सानप, अंकुश ढाकणे, अनिल सानप, संजय सानप आदींनी सत्कार करून अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment