संयुक्ता ही या जागतिक स्पर्धेसाठी भारतातून निवड झालेली एकमेव जिमनॅस्ट असून ती पाचव्या वर्षापासून फिनिक्स जिम्नॅस्टिक्स अकादमी, ठाणे येथे प्रशिक्षण घेत आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक व शिवछत्रपती पुरस्कार विजेती पूजा सुर्वे यांचे तिला मार्गदर्शन लाभले आहे.
आजवर संयुक्ताने इंडिया युवा खेळ, राष्ट्रीय व इतर स्पर्धा मिळून १५० पदकं (१२५ सुवर्ण) जिंकून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तसेच आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ७ वा क्रमांक मिळवत आंतरराष्ट्रीय पातळीवरही ठसा उमटवला आहे. याच स्पर्धेत मानसी गावंडे यांची भारताच्या संघाच्या प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे.