Showing posts with label Kala krida. Show all posts
Showing posts with label Kala krida. Show all posts

Tuesday, 28 January 2025

राज्य शासनातर्फे यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव

 राज्य शासनातर्फे यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव

सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांची घोषणा

• साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने घोषित

• तांत्रिक आणि बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर

 

मुंबई दि. २७ : मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर करण्यात आले.

मागील ६० वर्षापासून राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. राज्यात विविध ठिकाणी विविध संस्थांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे आयोजन केले जाते. अशा संस्थांना १० लाखापासून ४ कोटीपर्यंत शासन अर्थसहाय्य करते. यावर्षीपासून मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्याची संकल्पना सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी मांडलीत्याला आता मुर्त स्वरूप आले आहे. यावर्षीचा हा पहिला चित्रपट महोत्सव मुंबईत होणार असून तीन दिवसांचा हा महोत्सव असेल. जे मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाहीत असे चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येतील. प्रत्येक चित्रपटासोबत त्या चित्रपटाची टीम उपस्थित असेल जी थेट दर्शकांशी संवाद साधेलया निमित्त काही विशेष परिसंवाद व या विषयातील अभ्यासकांच्या मुलाखती अशा आंतरराष्ट्रीय मानकांच्या स्वरूपात राज्याचा मराठी चित्रपट महोत्सव आयोजित केला जाणार आहे. याबाबतच्या तारखा व नियमावली लवकरच जाहीर करण्यात येतील. या महोत्सवात दर्जेदार मराठी चित्रपटांचा आस्वाद घेण्याची संधी चित्रपट रसिकांना मिळणार आहे. याबाबतची अंमलबजावणी महाराष्ट्र चित्रपटरंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे.

राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने

सन 2022 या वर्षातील साठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी अनन्यापाँडिचेरीसनीधर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे४ ब्लाईंड मेनसमायरागाभह्या गोष्टीला नावच नाहीग्लोबल आडगावहर हर महादेव या दहा चित्रपटांना अंतिम फेरीत नामांकन प्राप्त झाले आहे.

तर उत्कृष्ट बालकलाकार म्हणून श्रीनिवास पोकळे (छुमंतर) व अर्णव देशपांडे (आम्ही बटरफ्लाय) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट कला दिग्दर्शन महेश कुंडलकर (उनाड)उत्कृष्ट छाया लेखन अभिजीत चौधरी (फोर ब्लाइंड मेन) ओंकार बर्वे (ह्या गोष्टीला नावच नाही) उत्कृष्ट संकलन यश सुर्वे (काटा किर्र)उत्कृष्ट ध्वनिमुद्रण सुहास राणे (ह्या गोष्टीला नावच नाही)उत्कृष्ट ध्वनी संयोजन लोचन प्रताप कानविंदे (हर हर महादेव)उत्कृष्ट वेशभूषा उज्वला सिंग (ताठ कणा)उत्कृष्ट रंगभूषा सुमित जाधव (ताठ कणा)यांना तांत्रिक विभागातील पुरस्कार जाहीर झाले आहेत. 

पुरस्काराच्या प्राथमिक फेरीसाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या वर्षात सेन्सॉर झालेल्या एकूण ५० प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. या चित्रपटांचे परीक्षण मुग्धा गोडबोलेविवेक लागूबाबासाहेब सौदागरविजय भोपेश्रीरंग आरसराजा फडतरेशरद सावंतमेधा घाडगेचैत्राली डोंगरेविनोद गणात्राप्रकाश जाधवशर्वरी पिल्लेईजफर सुलतानदेवदत्त राऊतविद्यासागर अध्यापक यांनी केले होते.

नामनिर्देशन विभागातील पुरस्कारांची नामांकने पुढीलप्रमाणे

• सर्वोत्कृष्ट कथा :

१. अनिल कुमार साळवे (ग्लोबल आडगाव)

२. पूर्वल धोत्रे (4 ब्लाईंड मेन)

३. सुमित तांबे (समायरा )

• उत्कृष्ट पटकथा :

१. इरावती कर्णिक (सनी)

२. पूर्वल धोत्रे- अभिषेक मेरुरकर (4 ब्लाईंड मेन)

३. तेजस मोडक - सचिन कुंडलकर (पॉंडिचेरी)

• उत्कृष्ट संवाद :

१. प्रवीण तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

२. मकरंद माने (सोयरिक)

३. सचिन मुल्लेमवार (टेरिटरी)

• उत्कृष्ट गीते :

१. प्रशांत मडपूवार (ग्लोबल आडगाव/गाणे - यल्गार होऊ दे)

२. अभिषेक रवणकर (अनन्या/गाणे-ढगा आड या)

३. प्रकाश (बाबा) चव्हाण : (फतवा/गाणे-अलगद मन हे)

• उत्कृष्ट संगीत :

१. हितेश मोडक (हर हर महादेव)

२. निहार शेंबेकर (समायरा)

३. विजय गवंडे (सोंग्या)

• उत्कृष्ट पार्श्वसंगीत :

१. अविनाश विश्वजीत (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

२. हनी सातमकर (आतुर)

३. सौमिल सिध्दार्थ (सनी)

• उत्कृष्ट पार्श्वगायक :

१. मनिष राजगिरे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे/गीत - भेटला विठ्ठल माझा)

२. पद्मनाभ गायकवाड (गुल्ह/ गीत - का रे जीव जळला)

३. अजय गोगावले (चंद्रमुखी/गीत - घे तुझ्यात सावलीत)

• उत्कृष्ट पार्श्वगायिका :

१. जुईली जोगळेकर (समायारा/गीत - सुंदर ते ध्यान)

२. आर्या आंबेकर (चंद्रमुखी/गीत - बाई ग कस करमत नाही)

३. अमिता घुगरी (सोयरिक/गीत - तुला काय सांगु कैना)

• उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक :

१. राहूल ठोंबरे-संजीव होवाळदार (टाईमपास 3 / गीत - कोल्ड्रीक वाटते गारवाघाची डरकाळी )

२. उमेश जाधव (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे/गीत- आई जगदंबे)

३. श्री. सुजीत कुमार (सनी/ गीत - मी नाचणार भाई)

• उत्कृष्ट अभिनेता :

१. प्रसाद ओक (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

२. वैभव तत्ववादी (पॉन्डीचेरी)

३. ललीत प्रभाकर (सनी)

• उत्कष्ट अभिनेत्री :

१. सई ताम्हाणकर (पॉन्डीचेरी)

२. अमृता खानविलकर(चंद्रमुखी)

३. सोनाली कुलकर्णी (तमाशा लाईव्ह)

• उत्कृष्ट विनोदी अभिनेता :

१. मकरंद अनासपुरे (वऱ्हाडी वाजंत्री)

२. संजय नार्वेकर (टाईमपास)

३. भरत गणेशपुरे ( पिल्लू बॅचलर)

• सहाय्यक अभिनेता :

१. योगेश सोमण (अनन्या)

२. किशोर कदम (टेरीटरी)

३. सुबोध भावे (हर हर महादेव)

• सहाय्यक अभिनेत्री :

१. स्नेहल तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

२. क्षिती जोग (सनी)

३. मृण्मयी देशपांडे (चंद्रमुखी)

• उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता :

१. अकुंर राठी (समायरा)

२. रोनक लांडगे (ग्लोबल आडगाव)

३. जयदीप कोडोलीकर (हया गोष्टीला नावच नाही)

• उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :

१. ऋता दुर्गुळे (अनन्या)

२. सायली बांदकर (गाभ)

३. मानसी भवालकर (सोयरिक)

• प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती :

१. आतुर

२. गुल्हर

३. ह्या गोष्टीला नावच नाही

• प्रथम पदार्पण दिग्दर्शन :

१. 4 ब्लाइंड मेन

२. गाभ

३. अनन्या

0000

संजय ओरके/विसंअ/


 

वृत्त क्र.374


आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा द्याव्या

 क्रीडा व युवक कल्याण विभागाकडील शंभर दिवसात करावयाच्या उपक्रमांचा आढावा

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना

अधिकाधिक चांगल्या सुविधा द्याव्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 27 : आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या राज्यातील स्पर्धकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा द्याव्याअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत शंभर दिवसात करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथील बैठकीत घेतला. 

            मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेआंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूस आवश्यक सेवा सुविधा मिळाव्यात याबाबत क्रीडा विभागाने आवश्यक कार्यवाही करावी. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी खेळाडू सोबत जाणाऱ्या मार्गदर्शक व फिजिओथेरपिस्ट यांचा खर्च क्रीडा विभागाने करण्याबाबत नियोजन करावे

Sunday, 19 January 2025

टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा स्थळी उपस्थित राहून क्रीडा मंत्र्यांनी स्पर्धकांना दिल्या शुभेच्छा

 टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय  मॅरेथॉन स्पर्धा स्थळी उपस्थित राहून क्रीडा मंत्र्यांनी स्पर्धकांना दिल्या शुभेच्छा

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थिती मॅरेथॉनची सुरुवात

टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय  मॅरेथॉन स्पर्धा अखंड ऊर्जेचा स्रोत

-क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

 

मुंबई,दि.१४ : टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा स्थळी  उपस्थित राहून  क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत. सामाजिक सलोखा वाढविणारीबंधुभाव वाढविणारीमाणसं जोडणारी ही मॅरेथॉन प्रत्येकाला आकर्षित करणारी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली ही मॅरेथॉन  उत्कृष्टता आणि सामुदायिक भावनेला मूर्त स्वरूप देते. ही मॅरेथॉन ऊर्जेचा स्रोत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला उपस्थित राहून शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी आयोजकविविध क्षेत्रातील मान्यवरस्पर्धक उपस्थित होते. श्री. भरणे यांच्या उपस्थितीत स्पर्धेची सुरुवात झाली.

मंत्री श्री. भरणे म्हणाले,टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत धावणाऱ्या प्रत्येकाला वर्षभर सकारात्मक उर्जा मिळते. इथं  मिळणारं हे प्रेम आणि आनंद शब्दात व्यक्त करता येणं शक्य नाही. मुंबई मॅरेथॉनच्या हजारो स्वयंसेवकांची पाणीएनर्जी ड्रिंक्सरिलिफ स्प्रेफळं देण्यासाठी सुरू असलेली धावपळ वाखाणण्याजोगी असते. आपल्या शरीराची आणि मनाची सलग धावण्याची क्षमता आहेयाची प्रचिती आल्याने अभिमान वाटतो. टाटा मुंबई मॅरेथॉनच्या ऐतिहासिक पर्वाच्या या उत्सवात  सहभागी होऊन प्रत्येकानं आनंद घेतला पाहिजे.

००००००००००००

Friday, 20 September 2024

🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻 *मधुर स्मृतींची*

 🌹⚜️🌹🎼🌅🎼🌹⚜️🌹


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻


                 *मधुर स्मृतींची*              

                                          

🌸🥀🔆🌺🎶🌺🔆🥀🌸

             

        *जीवनात अनेक नाती जोडली जातात. पण काळाच्या ओघात ही नाती विसरलीही जातात. मग त्या नात्यांसोबत व्यतीत केलेला आज निघून गेलेला काळ.. त्यात भेटलेली ती नाती.. त्या व्यक्ती खरंच भेटल्या होत्या  का ? तो भूतकाळ भास तर नव्हता ना असेही वाटते. हे आमचे जीवन म्हणजेच भास तर नाही ना असेही वाटते.*

        *आता बघा ना.. अजूनही ते दृश्य दिसतेय. ती तुडुंब भरुन वाहणारी यमुना.. त्या लगतचा कदंब वृक्ष.. तिथे मोरपिस लावलेला.. मुरलीने गारूड घालणारा गोकुळातील भेटलेला कान्हा.. सोबत असणारी ती राधा.. त्या कृष्णाच्या लीला. हे जे सारे  प्रत्यक्षात अनुभवले होते, ते खरे होते की.. की तो भासच होता ?*

        *कधीकधी आसपास पुण्यवान व्यक्ती असल्या तरीही त्यांना ओळखताच येत नाही. अगदी परमात्माही जवळपास असला तरीही आम्हांला पटतच नाही. विश्वास बसत नाही. पण तो कान्हा अविनाशी. आमच्या अज्ञानाचे रहस्य तोच जाणतो.*

        *एकाच जीवनात किती किती म्हणून भूमिका वठवल्यात त्या कृष्णाने ? बंधू.. पती.. पिता.. परममित्र राजा.. द्रष्टा उपदेशक.. सर्वांना आश्रय देणारा असा सहृदयी नेता. त्याच्या सगळ्या लीलासुद्धा आम्हाला शिकवण देणाऱ्या.. आमचे भलेच करणाऱ्या.. आनंद देणाऱ्या.*

       *कृष्णाने त्याच्या जीवनातून अशाश्वत जीवनात कसे जगावे याचा धडा शिकवलाय. प्रेमबंधनी   नात्यांमध्ये अडकला नाही. सुखदुःखापासून अलिप्तता राखून धर्म कर्तव्य चोख पार पाडली. जीवन रहस्य जाणणारा असा तो योगी*

        *त्यानेच या मानवी नात्यांमध्ये रंग भरून हे  जीवन सुंदर केलेय.. आयुष्याला अर्थ दिलाय. या जीवनात चैतन्य निर्माण करणाऱ्याला काय बरे म्हणावे.. तो काळाचा स्वामी होता की देव. त्याच्या वागण्याचे गुढ अशा निळ्या अस्तित्वाचे रहस्य जनसामान्यांना समजण्या पलिकडचेच. पण तरीही जेव्हा तो दिसत नाही तेव्हा वाटते की त्याचे ते वागणे.. प्रेम करणे.. ते लीला दाखवणे हा भास तर नव्हता ना ?*

        *जसा काळ पूढे पूढे सरकतो तसे जगलेले मानवी जीवन भासमयच वाटते. ही पण त्याचीच माया. पण एकमात्र खरे की कृष्णाच्या या मधूर स्मृतीतही चैतन्य भरलेय.*


🌹🌼🎼🌺🎶🌺🎼🌼🌹

  

  *अजून तरळते दृष्टीपुढती* 

  *ते मोराचे पीस निळे*

  *झिळमिळत्या रंगांचे गारुड* 

  *अजून मला पुरते नकळे !*


  *ती मुरली ती तुडुंब यमुना*

  *कदंब फुलले काठी*

  *खरेच का तो होता तिथला*

  *गोकुळचा रहिवासी ?*

  *खरीच होती राधा अन तो*

  *रास खरा होता का ?*

  *नवलपरीच्या लीला त्याच्या*

  *भासच तो होता का ?* 

  *त्या अविनाशी मूलपणाचे*

  *रहस्यही पुरते नकळे !*


  *तो तर होता गोपसखा*

  *की तरुण प्रियकर होता*

  *धीट किती तो लोकप्रिय किती*

  *नित्य अग्रणी होता*

  *मधुवचनी तो मुरलीमनोहर*

  *रूपवंत वेल्हाळ*

  *समयज्ञही तो चतुर जाणता*

  *शत्रूंजय कळीकाळ* 

  *त्या नित्य नूतन शत रूपांचे*

  *रहस्यही पुरते नकळे !*


  *तो बंधु तो पती पिता तो*

  *परम मित्र तो राजा*

  *तो द्रष्टा उपदेशक प्रेरक*

  *आश्रय तो सकलांचा* 

  *सर्वांसाठी सहृदय तरीही* 

  *तो तर त्या पलीकडचा*

  *अलिप्त सावध निर्मम साक्षी*

  *सगळ्या सुखदुःखांचा*

  *अपूर्व त्या जीवन योगाचे*

  *रहस्यही पुरते नकळे !*


  *सर्व मानवी नात्यांना*

  *अति सुंदर केले त्याने* 

  *आयुष्याला अर्थ दिला*

  *रसभरल्या चैतन्याने*

  *काय म्हणावे ? काय नेमके*

  *द्यावे त्याला नाव ?*

  *काळाचा होता का स्वामी,* 

  *तो होता का देव ?*

  *गूढ निळ्या त्या अस्तित्वाचे*

  *रहस्यही पुरते नकळे !*


🌹🎼🌹🔆🎶🔆🌹🎼🌹 

  

  *गीत : अरुणा ढेरे*  ✍

  *संगीत : मिलिंद जोशी*

  *स्वर : श्रेया घोषाल*

  

  🎼🎶🎼🎶🎼    🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-२०.०९.२०२४-*


🌻🥀🌸🎼🌺🎼🌸🥀🌻

कलाकाराला salute


 

Thursday, 19 September 2024

दिल्लीतील मराठी रसिकांसाठी कलगीतुरा नाटकाचे सादरीकरण

 दिल्लीतील मराठी रसिकांसाठी कलगीतुरा नाटकाचे सादरीकरण

 

नवी दिल्ली 19 : नवी दिल्लीतील इंडियन हॅबिटॅट सेंटरच्या राष्ट्रीय स्तरावरील आयएचसी नाट्य महोत्सवात नाशिकमधील लोकप्रिय "कलगीतुरा" या संगीत नाटकाची निवड झाली आहे. हे नाटक २२ सप्टेंबर २०२४ रोजीसायंकाळी ७ वाजता स्टेन ऑडिटोरियम येथे सादर होणार आहे. 

"कलगीतुरा" हे नाटक मराठी लोककलेचा अप्रतिम नमुना असूननाटककार दया पाटील यांनी या नाटकाचे लेखन दहा वर्षांच्या संशोधनातून साकारले आहे. या संगीत नाटकाचे दिग्दर्शन सध्याचे आघाडीचे नाट्यदिग्दर्शक सचिन शिंदे यांनी केले आहे. तब्बल २२ कलाकारांचा सहभाग असलेल्या या नाटकात हेमंत महाजनविमल ननावरेनिलेश सूर्यवंशीअर्णव इंगळेआणि ऋषिकेश शेलार यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील विविध भागांतील कलाकार भूमिका साकारत आहेत.

नाटकाचे संगीत ऋषिकेश शेलार यांनी दिले असूनरोहित सरोदे यांनी संगीत संयोजन केले आहे. प्रकाशयोजनेची जबाबदारी चेतन बावडेकर यांनी सांभाळली आहे. या नाटकाच्या माध्यमातून पारंपरिक "कलगी" आणि "तुरा" या लोकपरंपरेचा संघर्ष रंगमंचावर सादर होतोजो अंधारात हरवलेल्या लोककलेचा पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न आहे.

"कलगीतुरा विषयी

"कलगीतुरा" हा महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रसिद्ध लोककला परंपरा आहे. यामध्ये पारंपरिक लावणींचा प्रयोग केला जातोज्यामध्ये गावातील शेतकरी आणि लोक आपल्या गाण्याद्वारे सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर टिप्पणी करतात. "कलगीतुरा" विशेषतः अत्यंत सुरस व मजेशीर असतोज्यामध्ये जीवनातील प्रतिकूल परिस्थितीला हास्य आणि विनोदाच्या माध्यमातून सामोरे जाता येते.

एनसीपीए मुंबईच्या 'दपर्णलेखन उपक्रमात विजेते ठरलेले हे नाटक आधीच मुंबई रंगभूमीवर खूप लोकप्रिय झाले आहे. दिग्दर्शक सचिन शिंदे आणि लेखक दत्ता पाटील यांची जोडी मराठी रंगभूमीवर यापूर्वीही अनेक गाजलेली नाटके सादर करून रसिकांची मने जिंकली आहेत.

0000

Sunday, 18 August 2024

 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्र दिनानिमित्त....

परळीतील एका महिला छायाचित्रकाराचा
फोटोग्राफी क्षेत्रातील प्रवासावरील लेख.....
----------------------------------------
फोटोग्राफी क्षेत्राला लाभली नव "संजीवनी"
--------------------------------------------------------  
 छायाचित्र म्हणजे फोटो ही केवळ एक निर्जीव वस्तू नसते, तर ती असते त्या व्यक्तीच्या जीवनातील एक अमूल्य आठवण, छायाचित्रकाराने आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केलेली.
 आपले, आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे फोटो पाहताना आठवणींचा खजिनाच आपण उघडत असतो. हा खजिना ज्याच्यामुळे जतन करता आला, त्या छायाचित्रकारास मात्र आपण विसरून जातो. या छायाचित्रकारांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आणि छायाचित्रणास उतेजन देण्यासाठी जगभरात 19 ऑगस्ट हा "जागतिक छायाचित्रण दिन" म्हणून साजरा केला जातो. यावर्षीच्या जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने आपल्या परळीतील एका अनोख्या छायाचित्रकाराचा परिचय करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. फोटोग्राफी हा पुरुषांची मक्तेदारी असलेला प्रांत.  या पुरुषांच्या दुनियेत नवीन कल्पना सोबत घेऊन अत्यंत दमदारपणे आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारी आणि मरगळलेल्या फोटोग्राफी क्षेत्राला नवीन "संजीवनी" देणारी एक उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणजे सौ संजीवनी राम भाले "बेबी मॅजिक" या आपल्या नवजात बाळांच्या फोटोसाठीच वाहिलेल्या फोटो स्टुडिओच्या माध्यमातून आपल्या फोटोग्राफर पतीला समर्थ साथ देत असलेली एक अतिशय चांगली छायाचित्रकार. मोबाईल कॅमेरा मधील क्रांती नंतर ग्राहकांनी फोटो काढण्यासाठी स्टुडिओत  जाणे जवळजवळ सोडून दिले आहे. प्रत्येक जण आपले फोटो आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात स्वतःच क्लिक करून हे फोटो सोशल मीडिया द्वारे सार्वजनिक करण्यात आणि आपली कलाकारी दाखवण्यात व्यस्त आहे. हे फोटो जतन करण्यासाठी गुगलने गुगल फोटो फुकटात उपलब्ध करून दिले आहे,त्यामुळे फोटो काढणे हा पूर्वी जसा सोहळा असायचा, तसा तो आता राहिलेला नाही. आपल्या दररोजच्या आठवणी आपण अत्यंत सहजपणे मोबाईल कॅमेऱ्याने टिपून त्या पाहिजे तेवढ्या प्रमाणात जतन करून ठेवू शकतो. फोटोग्राफी क्षेत्राला या नवीन बदलांमुळे मरगळ आल्यासारखी वाटत होती. परळीतील उत्कृष्ट फोटोग्राफर असा नावलौकिक असलेले श्रीराम भाले आपल्या भाले फोटोग्राफी या स्टुडिओच्या माध्यमातून परळीकरांना फोटोग्राफीची सेवा देत असताना, त्यांची पत्नी आपल्या आदिती आणि व्यंकटेश या  चिमुकल्यांना सांभाळत आपले आदर्श गृहिणीचे कार्य पार पाडत होती; याचवेळी फोटोग्राफीची आपल्या मनातील आवड ओळखून आणि या क्षेत्रातील बदलांना सामोरे जाण्यासाठी आपल्या पतीशी चर्चा करून फक्त नवजात बालक आणि चिमुकल्यांच्या भावविभोर करणाऱ्या अदा कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी "बेबी मॅजिक" या स्वतंत्र स्टुडिओच्या माध्यमातून परळीकरांना सेवा देण्यास सज्ज झाली, आणि आज या क्षेत्रात स्वतःचे एक स्वतंत्र स्थान या आदर्श गृहिणीने निर्माण केले आहे, ही परळीकरांसाठी अभिमानाची बाब आहे. खरे म्हणजे महिलांना स्वतः नटून थटून, स्वतःचेच फोटो काढण्याची हौस असते, त्यासाठी त्या पाहिजे तेवढा वेळ द्यायला तयार असतात. स्वभावतःच  सर्व स्त्रियांमध्ये एक कलाकार दडलेला असतो. रंगसंगती बद्दलचे त्यांचे ज्ञान तर प्रत्येक पुरुष मान्य करतो. आपले हे उपजत गुण ओळखून आणि प्रकाश योजना, बॅकग्राऊंड, फोटोचा ठराविक अँगल या फोटोग्राफी मधील बारकाव्यांचा अभ्यास करून स्वतःचे फोटो न काढता इतर स्त्रियांना आणि बालकांना सजवून त्यांचे अप्रतिम फोटो काढण्याचे कसब संजीवनी भाले यांनी प्राप्त केले आहे. लहान बालकांचे मुड्स सांभाळून, त्यांची योग्य वेशभूषा करून अगदी सहजपणे त्यांचे आईच्या नजरेतून विविध क्षणांचे फोटो त्या टिपतात. यामधील त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून ते केवळ एक महिना वयाच्या बाळाचेच फोटोशूट त्या करतात. आपल्या या स्वतंत्र स्टुडिओच्या माध्यमातून नवजात बाळांच्या पालकांसाठी, आपल्या बाळाचे लहानपण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचा त्यांचा हा "बेबी मॅजिक स्टुडिओ"चा प्रयत्न वरदानच ठरला आहे, यात शंका नाही.
 मोठ्या शहरातील आधुनिक स्टुडिओच्या धर्तीवर केवळ लहान बालकांच्या फोटोसाठीचा हा स्वतंत्र स्टुडिओ परळी सारख्या लहान गावात काढणे हे धाडसाचेच काम आहे. पण सौ संजीवनी भाले यांनी ते आपल्या कलेच्या आणि मेहनतीच्या जोरावर शक्य करून दाखवले आहे.
 यासोबतच  मॅटर्निटी फोटोशूट, ब्रायडल फोटोशूट, मॉडेलिंग फोटोज इत्यादी क्षेत्रात पण त्या सध्या आपले योगदान देण्याचा प्रयत्न करत आहेत.
 जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने परळीतील या महिला छायाचित्रकारास फोटोग्राफीच्या पुढील प्रवासासाठी अनेक अनेक शुभेच्छा.
- शब्दांकन...
गोपाळ रावसाहेब आंधळे
माजी शिक्षण सभापती
परळी वैद्यनाथ
मो.9823335439





Friday, 16 August 2024

राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्राथमिक फेरीची नामांकने घोषित तांत्रिक आणि बालकलाकार गटातील पुरस्कारही जाहीर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली घोषणा

 राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्राथमिक फेरीची नामांकने घोषित

तांत्रिक आणि बालकलाकार गटातील पुरस्कारही जाहीर

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली घोषणा

            मुंबई दि. 14 : अठ्ठावनाव्या आणि एकोणसाठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक आणि बालकलाकार गटातील पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. तांत्रिक आणि बालकलाकार गटातील पुरस्कार विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

            सन 2020 वर्षासाठीचा 58 वा तसेच 2021 वर्षासाठीचा 59  वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार आहे. सन 2020 या वर्षाच्या अंतिम फेरीसाठी मी वसंतरावफासबापल्योकगोष्ट एका पैठणीचीबीटर स्वीट कडुगोडजयंतीचोरीचा मामलासुमीफनरलगोदाकाठ या दहा चित्रपटांची सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या  पारितोषिकासाठी नामांकन झाले आहे.  प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनाकरिता जून,जयंतीफनरल या तीन चित्रपटांना नामांकन मिळाले आहे.

            उत्कृष्ट कला दिग्दर्शन अशोक लोकरेए.ऋचा ( मी वसंतराव)उत्कृष्ट छायालेखन अभिमन्यू डांगे ( मी वसंतराव ),उत्कृष्ट संकलन मनीष शिर्के (गोष्ट एका पैठणीची)उत्कृष्ट ध्वनीमुद्रण राशी बुट्टे ( बिटरस्वीट कडूगोड )उत्कृष्ट ध्वनीसंयोजन अनमोल भावे (मी वसंतराव),उत्कृष्ट वेशभूषा सचीन लोवाळेकर ( मी वसंतराव )उत्कृष्ट रंगभूषा सौरभ कापडे ( मी वसंतराव )उत्कृष्ट बाल कलाकार अनिश गोसावी ( टकटक ) यांना तांत्रिक विभागातील पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. 

            58 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीसाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2020 या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण 28 मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या.

            सन 2021 च्या 59 व्या राज्य चित्रपट महोत्सवाच्या अंतिम फेरीसाठी तिचं शहर होणंएकदा काय झालंगोदावरीफ्रेमकारखानिसांची वारीइरगलयेरे येरे पावसाबाल भारतीराखबाईपण भारी देवा या दहा चित्रपटांची सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या  पारितोषिकासाठी नामांकन झाली  आहेत.  याचबरोबर प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती करीता जननीलकडाऊन be positive, आता वेळ झाली आणि दिग्दर्शनाकरीता तिचं शहर होणंफ्रेम,कुलूप या तीन चित्रपटांचे नामांकन घोषित करण्यात आले आहे.

            सन 2021 साठी उत्कृष्ट कला दिग्दर्शन भूषण राऊळराकेश कदम (पांडू )उत्कृष्ट छायालेखन  रणजित माने  (पोटरा)उत्कृष्ट संकलन  परेश मांजरेकर (लक डाऊन be positive), उत्कृष्ट ध्वनीमुद्रण अनिल निकम (बेभान)उत्कृष्ट ध्वनीसंयोजन अतुल देशपांडे (बाई पण भारी देवा)उत्कृष्ट वेशभूषा शफक खानरोहित मोरेनिलेश घुमरे ( येरे येरे पावसा)उत्कृष्ट रंगभूषा पूजा विश्वकर्मा (हलगट)उत्कृष्ट बालकलाकार आर्यन मेगंजी ( बाल भारती ) यांना तांत्रिक विभागातील पुरस्कार जाहीर झाले आहेत.

            दिनांक 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021  या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण  50 मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका 59  व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीसाठी प्राप्त झाल्या होत्या.

 58 व्या राज्य चित्रपट पुरस्काराचे नामांकने खालीलप्रमाणे आहेत.-

सर्वोत्कृष्ट कथा  :- विठ्ठल काळे (बापल्योक)शंतनू रोडे ( गोष्ट एका पैठणीची )रमेश दिघे ( फनरल उत्कृष्ट पटकथा :- मकरंद मानेविठ्ठल काळे  (बापल्योक ),गजेंद्र अहिरे( गोदाकाठ)शंतनू रोडे ( गोष्ट एका पैठणीची )

उत्कृष्ट संवाद :- रमेश दिघे (फनरल)मकरंद मानेविठ्ठल काळे  (बापल्योक )शंतनू रोडे ( गोष्ट एका पैठणीची )

उत्कृष्ट गीते :- गुरु ठाकूर, (बापल्योक)वैभव जोशी ( मी वसंतराव )गजेंद्र अहिरे ( गोदाकाठ)

उत्कृष्ट संगीत: - विजय गवंडे ( बापल्योक )राहूल देशपांडे ( मी वसंतराव )रोहित नागभिडे ( फिरस्त्या )

उत्कृष्ट पार्श्वसंगीत:- सारंग  कुळकर्णीसौरभ भालेराव ( मी वसंतराव )विजय गवंडे ( बापल्योक )अद्वैत नेमळेकर (फनरल),

उत्कृष्ट पार्श्वगायक:- अजय गोगावले (बापल्योक)आदर्श शिंदे (फिरस्त्या)राहूल देशपांडे (मी वसंतराव)

उत्कृष्ट पार्श्वगायिका:- आनंदी जोशी (काळी माती)सावनी रवींद्र (जीवनाचा गोंधळ)प्राची रेगे (गोदाकाठ)

उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक :- शर्वरी जेमनीस ( मी वसंतराव )सुजितकुमार ( गोष्ट एका पैठणीची)सुजितकुमार (चोरीचा मामला ),

उत्कृष्ट अभिनेता:- आरोह वेलणकर (फनरल)राहूल देशपांडे ( मी वसंतराव )सिद्धार्थ मेनन (जून )

उत्कृष्ट अभिनेत्री :- सायली संजीव ( गोष्ट एका पैठणीची )अक्षया गुरव ( बीटर स्वीट   कडुगोड )मृण्मयी गोडबोले ( गोदाकाठ )

उत्कृष्ट विनोदी अभिनेता :- जितेंद्र जोशी (चोरीचा मामला)हेमंत ढोमे (चोरीचा मामला)

सहाय्यक अभिनेता :- नितीन भजन (सुमी)विठ्ठल काळे (बापल्योक)पुष्कराज चिरपुटकर (मी वसंतराव)

सहाय्यक अभिनेत्री:- प्रेमा साखरदांडे (फनरल)नीता शिंडे (बापल्योक),  स्मिता तांबे (बीटर स्वीट कडुगोड),

प्रथम पदार्पण अभिनेता :- ऋतुराज वानखेडे ( जयंती)ओमप्रकाश शिंदे ( काळीमाती)वैभव काळे (काळोखाच्या पारंब्या )

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :- पायल जाधव ( बापल्योक )पल्लवी पालकर ( फास ) रेशम श्रीवर्धन ( जून ) 

 59 व्या राज्य चित्रपट पुरस्काराचे नामांकने खालीलप्रमाणे आहेत. -

सर्वोत्कृष्ट कथा :- मंगेश जोशीअर्चना बोराडे ( कारखानिंसांची वारी)जयंत पवार ( भाऊ बळी ३६०० रुपयांचा सवाल )सलिल कुलकर्णी ( एकदा काय झालं)

उत्कृष्ट पटकथा :- रसिका अगासे (तिचं शहर होणं)वैशाली नाईक (बाईपण भारी देवा)निखील महाजनप्राजक्त देशमुख ( गोदावरी)

उत्कृष्ट संवाद :- रशिद उस्मान निंबाळकर (इरगाल)नितिन नंदन (बाल भारती)प्रकाश कुंटे (शक्तिमान) 

उत्कृष्ट गीते:- जितेंद्र जोशी (गोदावरी)वलय मुळगुद (बाई पण भारी देवा)संदिप खरे (एकदा काय झालं) 

उत्कृष्ट संगीत: - अमित राज ( झिम्मा )डॉ.रुद्र कर्पे ( कुलूप ) सलिल कुलकर्णी ( एकदा काय झालं )

उत्कृष्ट पार्श्वसंगीत :- पंकज पडघन (आणीबाणी) ए.व्ही.प्रफुलचंद्र (गोदावरी)सारंग कुलकर्णी (कारखानीसांची वारी)

उत्कृष्ट पार्श्वगायक :- राहूल देशपांडे (गोदावरी)शुभंकर कुलकर्णी (एकदा काय झालं)डॉ.भीम शिंदे (इरगाल)

उत्कृष्ट पार्श्वगायिका :- आनंदी जोशी (रंगिले फंटर)आर्या आंबेकर (कुलूप) सुवर्णा राठोड (बाईपण भारी देवा)

उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक :- फुलवा खामकर (लक डाऊन be positive), विठ्ठल पाटील (पांडू)सुभाष नकाशे (बाईपण भारी देवा)

उत्कृष्ट अभिनेता :-जितेंद्र जोशी ( गोदावरी,)  सुमित राघवन ( एकदा काय झालं )संदीप पाठक ( राख ) 

उत्कृष्ट अभिनेत्री :- सोनाली कुलकर्णी (तिचं शहर होणं)मृण्मयी देशपांडे (बेभान)स्मिता तांबे (गौरीच्या लग्नाला यायचंहं )

उत्कृष्ट विनोदी अभिनेता :- भालचंद्र कदम ( पांडू )आनंद इंगळे ( लक डाऊन be positive ), सिद्धार्थ जाधव (लोच्या झाला रे)

सहाय्यक अभिनेता :- प्रियदर्शन जाधव ( शक्तीमान)मोहन आगाशे ( कारखानिसांची वारी )अमेय वाघ ( फ्रेम )

सहाय्यक अभिनेत्री :- हेमांगी कवी ( तिचं शहर होणं )क्षीती जोग ( झिम्मा )शीतल पाठक ( जननी )

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता :- रसिद निंबाळकर ( इरगाल )महेश पाटील ( कुलूप )योगेश खिल्लारे ( इंटर नॅशनल फालमफोक )'

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :-श्रुती उबाले (भ्रमध्वनी)सृष्टी वंदना(कुलूप)सृष्टी जाधव(इरगाल)

उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री :- सुकन्या कुलकर्णी-मोने ( बाई पण भारी देवा )निर्मिती सावंत ( झिम्मा )शुभा खोटे ( लक डाऊन be positive )   

00000

दीपक चव्हाण/विसंअ

Wednesday, 17 July 2024

शेतकऱ्याने आषाढी एकादशी च्या निमित्ताने आपल्या शेतीमध्ये भातरोपात श्री विठ्ठल माऊलींचे दर्शन साऱ्या जगाला घडवले

 पुण्यातील मुळशी गावात एका शिंदे नामक इंजिनीयर शेतकऱ्याने आषाढी एकादशी च्या निमित्ताने आपल्या शेतीमध्ये भातरोपात श्री विठ्ठल माऊलींचे  दर्शन साऱ्या जगाला घडवले आहे.120 फूट उंच 60 फूट रुंद अशी हि कला त्यांनी साकार केली आहे. पहा


Thursday, 16 May 2024

*आज पद्मश्री माणिक वर्मा* *जन्मदिन*

 ⚜🌹⚜🔆🌅🔆⚜🌹⚜


      🌻 *li.आनंदी°पहाट.il* 🌻


               *माणिक दिनाची*


            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

       *आज पद्मश्री माणिक वर्मा* 

                    *जन्मदिन*

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️


🌹⚜️🌸🌺🎶🌺🌸⚜️🌹

     

        *मुलीचे वय वर्ष १३. पण संगीताचा जाहीर कार्यक्रम घेतला तो सुद्धा चोखंदळ पुणेकरांसमोर. तेवढा स्वक्षमतेचा आत्मविश्वास होता. या पहिल्याच कार्यक्रमात दाद मिळवली. गदिमा.. सुधीर फडके इ. मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले. या बालिका म्हणजे माणिक दादरकर अर्थात माणिक वर्मा. किराणा घराण्याच्या गायिका. हिराबाई बडोदेकरांच्या शिष्या. ज्यांना पु. ल. देशपांडेंनी संगीतातील 'माणिक' म्हणून गौरवले. आज त्यांचा जन्मदिवस. (१९२६-१९९६). जन्म पुण्याचा.*       

        *संगीताचे बाळकडू हे त्यांना आईकडून प्राप्त झाले. पूढे त्यांनी अनेक गुरुंकडे शिक्षण घेतले. किराणा घराण्याचे गाणे शिकल्या. त्यांच्यावर हिराबाईं बडोदेकर यांचा मोठा प्रभाव होता. माणिकताईंनी स्वतः गाण्यासाठी कष्ट घेत स्वतःचे स्थान निर्माण केले. तर्कशास्त्र विषयात पदवी पण घेतली.*

        *रंजकता आणि रसिक हृदयाचा ठाव घेणारा विलक्षण गोडवा हे त्यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य. त्यांना मोठमोठे संगीत दिग्दर्शक लाभले. अगदी गदिमा.. सूधीर फडकेंच्या गीत रामायणातही त्यांची सात गाणी आहेत. शास्त्रीय.. उपशास्त्रीय.. भक्तीगीत.. नाट्यगीत ते अगदी चित्रपट गीत असा त्यांचा सर्वत्र संचार होता.* 

        *त्यांचे नाव निघताच तत्काळ आठवण होते ती "कबिराचे विणतो शेले.." गाण्याची. "निघाले आज तिकडच्या घरी..", "अंगणी गुलमोहर फुलला..", "हसले मनी चांदणे..", "आज अयोध्या सजली.." अशा अनेक लोकप्रिय गाण्यांची. त्यांनी गायलेल्या एकमेव लावणीतील त्यांची "जाळीमधली पिकली करवंद.." पण तेवढीच अवीट गोडीची. एकुण काय सगळ्याच प्रकारात त्यांची हुकूमत होती.*

        *कोणतीही कला शिकावी तर ती मन लावून शिकावी, कष्टाने आत्मसात करावी हे माणिकताईंचे मत. त्यांच्या गायकीला असलेला सात्विकतेचा स्पर्श व्यक्तीमत्वाला आणि सुरालाही होता. त्याकाळात मुलीला दाखवायच्या कार्यक्रमात जर मुलीने माणिकताईंचे गाणे गायले तर ती सुशील समजली जायची एवढा त्यांच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव समाजावर होता.* 

        *गाण्याच्या मैफिलीत रमूनही तेवढीच धडपड त्या संसारातही करायच्या. सणावाराला पंचवीस तीस पाहुण्यांचा स्वयंपाक तेवढयाच उत्साहानं करायच्या. मोठमोठी गायक मंडळी हक्काने त्यांच्या घरी जेवायला यायची. त्यांचे उत्साहाने स्वागत करायच्या.  आपल्या मुलींवर संस्कार करताना गाणे लादले नाही. त्यांना त्यांचे क्षेत्र निवडू दिले. त्याला आशीर्वाद दिले.*

        *त्यांचा वारसा चालवत कन्या राणी वर्मा.. भारती आचरेकर.. वंदना गुप्ते.. अरुणा जयप्रकाश यांनीही आपआपली क्षेत्र गाजवलीत. पद्मश्री माणिकताईच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारालाही त्यांच्याच श्रेष्ठतेचा मान आहे.* 

        *माणिकताई वर्मा यांच्या विविधांगी गायकीची साक्ष देणारे हे वेगळ्याच ढंगाचे लोकप्रिय गीत. जेष्ठ श्रेष्ठ गायिका पद्मश्री माणिकताईंना जन्मदिनी विनम्र अभिवादन.*


🌹⚜️🌸🌾🎶🌾🌸⚜️🌹


  *कुई कुई कुई कुई चाक बोलतंय*

  *मोट चालली मळ्यामंदी*

  *झुळ झुळ झुळ झुळ पाणी पळतंय*

  *नागावाणी पाटामंदी*


  *भिर भिर भिर भिर फिरतंय वारं*

  *सळ सळ करतंय शिवार सारं*

  *चम चम चम चम मोती चमकती*

  *घाटावरनं कणसामंदी*


  *भर भर येती रानपाखरं*

  *लुटतील दौलत चिमणा चोर*

  *गर गर गोफण फिरवीत राहीन*

  *माळावर मी थाटामंदी*


  *आहा हाहा हाहा हाहा कुकुकूकू*

  *आपण दोघं घुमवत राहू*

  *करू काढणी धाट मोडणी*

  *मोती साठवू खळ्यामंदी*


  *लई सुखाची तुझीच राई*

  *घरी लक्ष्मी येईल बाई*

  *धनत्तराची बाळं आपण*

  *खेळू नांदू सुखामंदी*


🌹⚜️🌸🌾🌺🌾🌸⚜️🌹


  *गीत : ग. दि. माडगूळकर*  ✍

  *संगीत : सुधीर फडके*

  *स्वर : माणिक वर्मा*

  *चित्रपट : पुढचं पाऊल (१९५०)*


  🎼🎶🎼🎶🎼   🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

                *१६.०५.२०२४*


🌻🌸🥀🔆♦️🔆🥀🌸🌻

Wednesday, 17 April 2024

*कलिंगडात अशी जगदंबा मातेची नयनरम्य कलाकृती साकारली * *अशा सनातनी कलाकाराचे त्रिवार अभिवादन 🙏🙏

 *कलिंगडात अशी जगदंबा मातेची नयनरम्य कलाकृती साकारली *

*अशा सनातनी कलाकाराचे त्रिवार अभिवादन 🙏🙏


Friday, 23 February 2024

अष्टपैलू' अशोक सराफ हे मराठी मातीतील अस्सल हिरा

 अष्टपैलूअशोक सराफ हे मराठी मातीतील अस्सल हिरा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जगाला हेवा वाटेल अशी मुंबईची फिल्मसिटी बनवण्याचा प्रयत्न

            मुंबईदि. २२ : आपल्या अविस्मरणीय भूमिकांनी अष्टपैलू असणाऱ्या अशोक सराफ यांनी प्रेक्षकांची अभिरुची संपन्न केली. अवघ्या महाराष्ट्राला त्यांनी पोट धरुन हसवले. प्रसिद्धीचे इतके वलय मिळूनही त्यां


नी कधीही जमीनीशी नातं तोडलं नाही. खऱ्या अर्थाने ते मराठी मातीतील अस्सल हिरा आहेतअशा भाषेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या कार्याचा गौरव केला. मराठी चित्रपटसृष्टीसाठी जे जे आवश्यक आहेत्या सर्व सुविधा राज्यात उपलब्ध करून देण्याचा आणि जगाला हेवा वाटेल अशी फिल्मसिटी आपण तयार करूअसे प्रतिपादन त्यांनी केले.

            महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा "महाराष्ट्र भूषण" पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना तर मानाचा "गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार" ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज  प्रदान करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते. याशिवायमराठी व हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्ष योगदान देत रसिकांची व कलासृष्टीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारचित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले. या समारंभास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवारशालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकरआमदार मनीषा कायंदे,  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगेमहाराष्ट्र राज्य चित्रपटरंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे आणि सांस्कृतिक कार्य संचालक  बिभीषण चवरे आदींची उपस्थिती होती.

            यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले कीअष्टपैलूहा शब्द ज्याला खऱ्या अर्थाने ज्यांना लागू होतो ते नाव म्हणजे अशोक सराफ आहे. सलग ५० वर्षे असंख्य भूमिका करुनही ज्यांच्यात अभिनयाची आणि नवं काही तरी करून दाखविण्याची त्यांची भूक अजूनही कायम आहे.  अशोक सराफ हे वयाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना राज्य सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना देण्यात येत आहेहा अवघ्या महाराष्ट्रासाठी  केवळ अभिमानाचाच नाही तर अमृताहूनही गोड क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.

            गेल्या वर्षी ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले आणि ज्येष्ठ निरुपणकार तिर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्याची संधी मला मिळाली. यावर्षी अशोक सराफ यांचा आपण गौरव करत आहोत. त्यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी रसिकांवर राज्य केले. प्रसिद्धीचे इतके वलय मिळूनही सराफ यांनी कधीही जमीनीशी नातं तोडलं नाहीअसे त्यांनी सांगितले. मराठी रसिकांनीही त्यांच्या अभिनयावर भरभरुन प्रेम केले. त्यांच्याप्रमाणेच सुरेश वाडकर यांनी अत्यंत कष्टपूर्वक आपली सांगितीक कारकीर्द उभी केली. मराठी आणि हिंदीच नव्हे तर विविध भाषांतील त्यांची गाणी विशेष गाजली. सुरेशजींचा सुरेल आवाज आजही आपल्याला मंत्रमुग्ध करतोअशा शब्दात त्यांनी  ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचा गौरव केला.

            मुख्यमंत्री म्हणाले कीमुंबईतल्या फिल्मसिटीत शुटींगसाठी लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेचमुंबई फिल्मसिटीबाहेर इतर जिल्ह्यात चित्रपटाची शुटींग करायची असेल तर 'वन विंडो सिस्टीम'चा निर्णय सांस्कृतिक विभागाने घेतला आहे. या शुटींगसाठी कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. राज्यात ७५ नवे चित्र नाट्यगृह उभारण्यासाठी ९ कोटी ३३ लाखाचा निधी  मंजूर केला असल्याचे त्यांनी सांगितले.

अशोक सराफ हे मराठी चित्रपटाचा चेहरा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            आजचा  दिवस सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे. चित्रपट पुरस्कारांचा बॅकलॉग भरून काढला. आज आपले कलाविश्व समृध्द करणारे अनेक मोठे कलावंत येथे आहेत. चित्रपट सृष्टीला आणि आपल्या जीवनाला समृध्द करणारी ही मंडळी आहेत. अशोक सराफ यावर्षी ७५ वर्षाचे झालेत. त्यांच्या अमृत महोत्सवात आपण त्यांना महाराष्ट्र भूषण देत आहोत. मराठी चित्रपटाचा चेहरा हे अशोक सराफ आहेतअशी भावना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.

            ते म्हणाले कीमराठीहिंदी चित्रपटसृष्टीनाटक यामध्ये सर्व पद्धतीच्या भूमिका अशोक सराफ यांनी साकारल्या. त्यांनी साकारलेला नायक हा स्वप्नातील नव्हे तर खऱ्याखुऱ्या जीवनातील नायक वाटायचे. त्यांचे चित्रपट पाहून आम्ही मोठे झालो. याशिवायसुरेश वाडकर यांनी गेल्या कित्येक वर्षे त्यांच्या सुरेल आवाजाने रसिकांचे मनोरंजन केले. ज्या लोकांनी आपले जीवन आनंदमय केलेत्यांना पुरस्कार देण्याची संधी आपल्याला मिळालीअशी भावनाही यांनी यावेळी व्यक्त केली.

महाराष्ट्राची भूमी ही कलाकारांची खाण : मंत्री सुधीर मुनगंटीवार

            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीमहाराष्ट्र हे जसे आर्थिक शक्तिकेंद्र आहे तसे ते सांस्कृतिक शक्तिकेंद्र आहे.  महाराष्ट्राची भूमी ही आता कलाकारांची खाण झाली आहे.  या कलावंतांचा सन्मान करताना सांस्कृतिक कार्य विभाग सोनेरी झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

            फिल्मसिटीच्या बाहेर जिथे चित्रीकरण असेल तिथे शुल्क आकारले जाणार नाही. मनोरंजन करातून सुट या अगोदरच दिली असल्याचे सांगून जगातील सर्वात उत्तम फिल्मसिटी करू शकतोअसा विश्वास मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

रसिक प्रेक्षकांचे प्रेम कायम हृदयात राहील : अशोक सराफ

            महाराष्ट्रातील एक क्रमांकाचा पुरस्कार तुम्ही मला दिलातयाचा खरोखर आनंद आहे. माझ्या जन्मभूमी आणि कर्मभूमी ने माझा गौरव केला. महाराष्ट्र भूषण मिळणाऱ्यांची यादी भली मोठी. त्यात मला स्थान दिले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. पन्नास वर्षात प्रवासात ज्यांनी मला कळत नकळत का होईना त्यांनी मदत केली आहेही सगळी त्यांची किमया आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे रसिक प्रेक्षक. जे आवडले तर डोक्यावर घेतात. रसिकांना आवडलं पाहिजे हाच दृष्टीकोन ठेवला. रसिकांनी प्रेम दिले. ते उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. माझ्या ह्रदयात हे प्रेम कायम राहीलअशी भावना यावेळी अशोक सराफ यांनी व्यक्त केली.

लतादीदींच्या नावे पुरस्कार हा आशीर्वाद : सुरेश वाडकर

            यावेळी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लताजींच्या नावाचा पुरस्कार हा आशीर्वाद आहे. आजही लतादीदी आपल्यात आहेतहीच भावना असल्याचे त्यांनी सांगितले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान सचिव श्री. खारगे यांनी केले. सांस्कृतिक दृष्ट्या समृध्द असे आपले राज्य आहे. महान सांस्कृतिक वारसा जतन आणि संवर्धन करण्यात कलावंतांचा मोठा वाटा आहे. विविध सांस्कृतिक पुरस्कारमहोत्सव आयोजित करून व्यासपीठ निर्माण करण्याचे काम राज्य शासन करीत आहे. तीन वर्षाचे पुरस्कार यावर्षी देत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदेउपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि मान्यवरांच्या हस्ते राजकपूर जीवनगौरव पुरस्कार २०२० ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती अरुणा इराणीसन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेते  मिथुन चक्रवर्ती आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती हेलन यांना प्रदान करण्यात आला.  तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार सन २०२० साठी ज्येष्ठ दिग्दर्शक  जे. पी. दत्तासन २०२१ साठी ख्यातनाम गायक  सोनू निगम आणि सन २०२२ साठी विधू विनोद चोप्रा यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यावतीने त्यांचे स्नेही श्री. विजय यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

            ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला.  सन २०२० साठी ख्यातनाम चित्रपट अभिनेते रवींद्र महाजनी (मरणोत्तर)सन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा चव्हाण आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा नाईक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रवींद्र महाजनी यांचा पुरस्कार त्यांचे पुत्र गश्मिर महाजनी यांनी तर श्रीमती उषा चव्हाण यांच्यावतीने विजय कोंडके यांनी पुरस्कार स्वीकारला.

            चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार सन २०२० साठी चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरेसन २०२१ साठी ज्येष्ठ पार्श्वगायक  रवींद्र साठे  आणि सन २०२२ साठी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक  नागराज मंजुळे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

            यावेळी चित्रपट समीक्षक अशोक राणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालक मीनल जोगळेकर यांनी केले तर सांस्कृतिक कार्यक्रम आणि चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचलन अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी केले.

0000

दीपक चव्हाण/निलेश तायडे/विसंअ/


Featured post

Lakshvedhi