सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 15 September 2024
Wednesday, 21 August 2024
राज्यातील सर्व आयटीआयसह मुंबई उपनगरमधील महाविद्यालयांमध्ये महिलांना स्व-सरंक्षणाचे प्रशिक्षण
राज्यातील सर्व आयटीआयसह मुंबई उपनगरमधील
महाविद्यालयांमध्ये महिलांना स्व-सरंक्षणाचे प्रशिक्षण
मुंबई दि. 21 : महिला व बालकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी मुंबई उपनगरातील विविध शाळा महाविद्यालय आणि शासकीय वसतिगृह येथे महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक संस्थानी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था व मुंबई उपनगरमधील प्रत्येक महाविद्यालयांमध्ये सप्टेंबर पासून स्व-सरंक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य गीताचा कोनशीला उद्घाटन समारंभ मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ,जिल्हा नियोजन अधिकारी संजय शिंदे आदि उपस्थित होते.
मंत्री श्री.लोढा म्हणाले की, राज्यात महिला व बालकांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ त्याचप्रमाणे शासकीय व खासगी आस्थापना यांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काटेकोरपणे उपाययोजना कराव्यात. शाळा व महाविद्यालयाने आणि विविध संस्थांनी आपल्याकडे नियुक्त केलेल्या कर्मचारी वर्गाची देखील खात्रीपूर्वक तपासणी करावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. तसेच शाळा व महाविद्यालयामधील शौचालयांच्या ठिकाणी जिथे महिला शौचालय आहेत तिथे महिलाच कर्मचारी नियुक्त करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
0000
Saturday, 10 August 2024
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई दि 9 :- ०७ सप्टेंबर २०२४ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला असून शासन निर्णयातील परिशिष्ट "अ" मधील विहित नमुन्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या इमेलवर दि.३१ ऑगस्ट २०२४ पूर्वी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सन २०२४ च्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याकरिता स्पर्धा आयोजन करुन अभिप्रायासह गुणांकन करुन प्रस्ताव शासनास सादर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती गणेश मंडळाच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देतील.
जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येवून ३ गणेशोत्सव मंडळाची शिफारस करून त्यांची नावे, सर्व कागदपत्र व्हिडीओसह राज्य समितीकडे देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रकल्प संचालक, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांचेकडे सादर करतील. निकालाचा दिनांक, सर्व विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षीस वितरणाचा समारंभ कोठे व कसा करायचा याबाबत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय यांच्याकडून स्वतंत्र सूचना देण्यात येतील, असे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
----
Friday, 2 August 2024
श्री सप्तशृंगी निवासिनि राजराजेश्वरी सप्तशृंगी देवीबाबतचे काही रहस्य*
*श्री सप्तशृंगी निवासिनि राजराजेश्वरी सप्तशृंगी देवीबाबतचे काही रहस्य*
1 गडावर साग ,काग,नाग दिसत नाही गडाच्या आजुबाजुला भरपुर सागाची झाडे असुन सुध्दा
जंगल परीसर आहे तरी नाग दिसत नाही
आणि कावळयाचे दर्शन फार दुर्मीळ
2 देवी मध्ये महासरस्वती महाकाली महालक्ष्मी ह्या त्रिगुणात्मिका आहेत
ह्या मीळुन देवीचे स्वरुप आहे
3 वणी गडावर सप्त मातृका हि आहेत
1 शिवा 2 चामुण्डा 3 वाराही 4 वैष्णवी 5 इंद्राणी 6 कार्तिकेयी 7 नारसिंही
ह्या सात योगमाया गडाच्या सात शिखरावर क्रमाने विराजमान आहेत
4 गडावर मच्छिंद्रनाथाना देवीने शाबरी विद्येचे धडे दिलेत त्याची समाधी ही गडावर आहे
5 सप्तशृंग गडा द्रोणागीरी पर्वताचाच एक भाग आहे
राम रावण युध्दात लक्ष्मण जख्मी झाला तेव्हा हनुमंताना द्रोणागीरी आनण्यास सांगीतले
द्रोणागीरी आणतांना त्याचा काही भुभाग सह्याद्री पर्वतात पडला तोच भुभाग म्हणजे सध्याचा
सप्तशृंग गड
6 गडावर संजिवनी बुटी आहे पण कलियुगात आईसाहेबांनी ती गुप्त स्वरुपात ठेवली आहे
7 देवीच्या दारी औदुंबराची छाया आहे तेथे दत्त दिगंबर भेटीसही येतात
त्या औदुबंराखाली शुभ्र नागराज असुन त्याच्या मस्तकात शक्तीशाली हिरा आहे
9 राम सिता लक्ष्मण वनवास काळी पंचवटीत आले तेव्हा गडावर आईसेबांचे नीत्य दर्शनास येत असत
8 देविच्या द्वारी कासव आहे कासवीन जसी प्रेमळ नजरेन आपल्या पीलांचे पालन पोषन करते
तसे आई भगवती आपल्या भक्तांचा सांभाळ करते
आणि कासव गती ने दर्शनास यावे असेही सांगते
घाई गर्दि करु नये हाही त्यामागील उद्देश आहे
11 ज्ञानेश्वराची ही कुलस्वामिनी आहे त्याचे मोठे बंधु निवृत्तीनाथ हे समाधी घेण्यापुर्वी वणी गडावर आले होते
भगवती च्या आदेशानुसार त्यानीं त्रंबकेश्वर येथे समाधी घेतली
त्याना सप्तशृगी माते मध्ये त्याची वीठुमाउली दिसली होती
10 नाथ सांप्रदायाची ही कुलस्वामिनी आहे नवनाथाची शाबरी विद्या हीचीच देणगी आहे
12 गडावर तीर्थराज शिवालय आहे ब्रम्हदेवाच्या कमंडलु मधुन जे पाणी वाहीले त्याचा मोठा प्रवाह तयार झाला तीच गीरिजा(सध्याची गिरणा नदी) नदी आणी त्यापासुन हे तीर्थ तयार झाले ह्यास गीरीजा तीर्थ ही म्हटले जाते
ह्या कुंडात सर्व देवानीं स्नान केले होते असे हे पापविनाशक तीर्थ आहे
13 ह्या तीर्था शेजारी श्री शंभुराज विराजमान आहेत
तसेच कुंडावरती अर्धनारी नटेश्वर आहे त्याचा संबध किन्नरांशी आहे
14 किन्नर येथे कोजागीरी ला खुप मोठया प्रमाणात हजेरी लावतात
देवीच्या सेवे साठी कृष्णाने किन्नराना धरती वर पाठवले आणि सांगितले त्या आदिमायेच्या कृपेन तुम्ही भक्ताची संकटे स्वत:वर घ्याल आणि तुमची सेवा श्री भगवती पर्यंत पोहचेल तुमचा उध्दार होइल
(स्रि ला मासिक धर्म असतो पुरूषा स त्याची कामे
किन्नर हा सर्व काम पाशापासुन मुक्त असतो त्यात शिव आणी शक्ती दोघांचा एकत्रीत मीलन असते (अर्धनारीनटेश्वर) म्हणुन त्यानी केलेली सेवा लवकर आईसाहेब चरणी रुजु होते )
तसेच शरद पौर्णिमा ही शापमुक्ती देणारी पौर्णिमा आहे आणि आईचा जागर घालण्यासाठी ही मंडळी येते
आणि आईकडे मागणे मागते पुढचा जन्म व्यवस्थित द्यावा आणि ह्या जन्माचे सार्थक व्हावै
15 डावर 108 कुंड होती काही बुजली गेली सध्यस्थितीत काहीच कुंडे अस्तीत्वात आहेत
17 कालीका तीर्थ हे कुंड कपारीत असुन ह्याचे पाणी थंड आहे
16 तांबुल तीर्थ जेथे भगवती ने पानाचा वीडा खाउन थुखंली होती
आणी चुळ भरली होती ते तीर्थ
गडाच्या पश्चिमेला आहे
तसेच ह्य कुंडाचे पाणी ही तांबडे आहे
देवीच्या मुखातील विडयाला खुप मान आहे खुप कमी देवी आहेत ज्याना विडा भरवला जातो
गडावर दैनंदीन देवीला वीडा भरवला जातो आणी दुसरया दिवशी
तो वीडा भक्ताना दिला जातो
भाग्यवान भक्ताला वीडा मीळतो
आणि तो वीडा खायला सांगतात पण थुंकायचा नसतो
19 सुर्यतीर्थ ह्या कुंडाटचे पाणी उष्ण असते तिन्ही रुतु मध्दे
18 काजळ तीर्थ देवीने डोळ्यातील काजळ येथे धुतले होते ह्या कुंडाचे पाणी काळेशार आहे
20 सप्तशृंग पर्वताशेजारी नादुंरी गावानजीक एक पर्वत आहे त्यास खिंडार आहे असे सांगतात की देवी दैत्य युध्दात देवीने त्रिशुलाने ते खिंडार पाडले आहे
21 दैत्याला नाचवत नाचवत दैत्य पळत पळत वणी गडावर आला तेथे देवीने महिषासुराचा वध केला अशी ही मानता आहे
22 दैत्य मारुन आदिशक्ती सप्तशृंगी त्या दैत्यांच्या रक्तान नहाली होती म्हणुन ती रक्तवर्णा आहे
23 महिषासुर वधानंतर ती तांडव करु लागली तीचा क्रोध शांत करण्यासाठी शंकर मासांच्या ढिगार्यात पडुन राहीले त्याच्या छातीवर देवीने पाय दिला तेव्हा तीने विचार केला
पाय पडुनही हाडांचा चुरा झाला नाही ही छाती पतीची असावी
आणि पती वरती पाय ठेवल्यामुळे
अरे रे नवरा असे म्हणुन तीने जीभ बाहेरही काढली होती
तीचा क्रोधावर नियंत्रण रहावे म्हणुन शिवशंभु गडावर विराजमान आहेत
24 युध्दामुळे थकलेले हे रुप विसावा घेण्यासाठी रम्य अशा वणी डावर आले
आणि 18 हातासह विसावले
25 मार्कंडेयानीं देवीची स्थापना केली असे सांगतात
26 मार्कंडेयानीं तीच्या स्वरुपाची व्याप्ती केली तीला रुपास आणले
आणि रक्तवर्णीय आदिमाया स्वरुपास आली
27 मार्कंडेय मुणी च्या काळी दुष्काळ पडला होता तो हिवाळयात
म्हणुन मार्कंडेयांचे बंधु ह्यानी देवीचा अभीषेक थांबु नये म्हणुन कावडी ने पाणी आणुन नित्य देवीचा अभीषेक केला, कावडीची सुरुवात शरद पौर्णिमे पासुन केली म्हणुन भक्त कधीही दुष्काळ पडु नये म्हणुन
कोजागीरीस कावड आणतात आणी देवीचा अभीषेक करतात
29 गडावर खैराचा वृक्ष आहे त्यावर शाबरी विद्येच्या तांत्रिक 52 देवता विराजीत आहेत पण तो वृक्ष उदृष्य स्वरुपात आहेत
पण योग्य उपासनेने तो जागृत होतो
28 देविने दैत्याचा हाडाचा चुरा केला त्यापासुन हळद बनवीली
आणि त्यापासुन कंकू
आणि सांगीतले की जी स्रि कुकंवासह हळद लावेल ती प्रेत योणी पासुन वाचेल
30 गडपठारावर ध्वज लावण्याची खुप जुनी परंपरा आहे तो मान
दरेगावच्या गवळी परीवाराचा आहे त्यांच्या पिढयानपीढया ही भगवतीची सेवा करीत आहे
11 वार झेंडयाचे निषाण असते ते घेउन गवळी परीवाराती एक जण ज्याला पठारावर जाण्याचा रस्ता माहीत आहे ती व्यक्ती
झेंडा घेउन जाते पण कुणालाही ते कळत नाही की ती व्यकती कुठून जाते ते
एका परदेशी जानकाराने सांगीतले की दुरबिनीने बघीतले असता गडाला झेंडा घेउन जाणार्या रस्त्यावर कातळावर पायर्या त्याला दिसुन आल्या
पण गड कातळावर पायर्या नाहित
31 देवीच्या पाठीमागे दुसरी देवी आहे असे काही लोकांचे मानने आहे
पण ते साफ खोटे आहे देवीची जी मुळ मुर्ती आहे तीच खरी मुर्ती
आणि देवी पाठी मागे काहीमते शक्तीपीठाचे स्थान आहे तेथे नैवेद्या दिलाजातो आरती च्या आधी देवीला पडदा लावला जातो तेव्हा त्या स्थानी नैवेद्य दिला जातो
32 देवीचे मंदिर पुर्वी रात्री लवकर बंद राही अशी मानता होती की
सिंहराज देवीच्या भेटीला नीत्य येत
त्याच्या डरकाळी चा आवाज स्पष्टपणे ऐकु यायचा असे तेथील आदिवासी सांगत
33 श्री सप्तशृंग निवासिनि भगवतीस चामुण्डा ही म्हटले जाते
तीचा मंत्र ही आहे
ॐ ऐं र्हिं क्लीं चामुण्डाए विचै
देवीमुर्ती च्या वरती चांदीमध्ये कोरला आहे
म्हणुन काहीच्या मते गुजरात मधील चोटीला चामुण्डा आईसाहेब सप्तशृंगीचेच रुप असावे अशी मानता देखील आहे
ही आदिशक्ती गुजरात राज्यातील बहुतेक कुळांची कुलदेवता आहे
तसेच मध्यप्रदेश महाराष्ट्र दक्षिण भारतीयांची ही कुलदैवत आहे
35 सप्तशृंग क्षेत्र पुर्वीचे दंडकारण्य होय
ह्या पर्वताला सात शीखर असल्याने ह्यास सप्तशृंग म्हणतात
आणि सात शृंगार केलेली देवी आणि सप्त शीखरावर विराजीत आहे म्हणुन तीला श्री सप्तशृंग निवासिनि सप्तशृंगी म्हणतात
34 ॐ काराचे अर्धे चंद्र स्वरुप सप्तशृंग क्षेत्री पुर्ण होते म्हणुन हे अर्ध शक्तीपीठ होय
हि माता येथे बिंदुस्वरुपिनी आहे
ॐ म्हणजेच आदिशक्ती स्वरुप होय आणि आदिशक्ती ने सर्व विश्व व्यापले आहे
36 देवीची नकळत कलती मान आहे
समोर मार्कण्डेय मुणी सप्तशतीचे पाठ वाचतायेत आणि आईसाहेब कान देउन ऐकतायेत
थकव्या मुळे मान झुकली आहे आणि डावा हात कानावर ठेवुन आदिशक्ती मार्क॔ण्डय मुणींचा कथासार ऐकत आहे
38 ह्या आदिमायेची न्यारीच कला आहे ही सकाळी बाला , मध्यदिवसावर तारुणी दुपारी वयस्क आणि संध्याकाळी वृध्दा भासते
37 देवीचे माहेर खांन्देश आहे आणि तीचे सासर वणी आहे अशी मानता आहे तीकडे तीचे ध्यान ही आहे
असे म्हणतात की जेव्हा माहेरची लोक येतात तेव्हा तीचे स्वरुप अधिक खुलते
आणी जेव्हा माहेरची मानस परतीला निघतात तेव्हा आई रडकी होते
39 गडावर रडतोंडी नामक वाट आहे नांदुरी हुन गडावर जायला
महिषासुर वधानंतर आईसाहेब वणीगडावर विश्रांती साठी आल्या असता डोंगर दर्यांचा भाग मग जी अवघड वाट चढतान्ना आईसाहेब चक्क रडल्या म्हणुन त्या वाटेला रडतोंडी असे म्हणतात
ह्या रडतोंड्या 3 आहेत
1 नादुरी मार्ग
2 वणी मार्ग
3 मार्कण्डेय पर्वताकडुन येणारा रस्ता
40 आदिमायेचे हे स्वरुप दृष्टिस पडले ते सर्वप्रथम गवळी बांधवाला
तो गाई चारण्यास गडावर येत असे त्याची एक गाय अचानक गायींमधुन निघुन अवघड अशा स्थानी चरण्यास जायी
हे त्याने कित्यांदा बघीतले
तो तेथे गेला मग त्याला तेथे भले मोठे मधाचे पोळ दिसले तो खुश झाला पण मधाच्या पोळात काठी खुपसली असता काठीच्या टोकाला शेंदुर लागलेला दिसुन आला
मग झाड पाचोळा बाजुला केल्यावर त्याला आदिमायेचे स्वरुप दृष्टिस पडले
आदिमाया बोलती झाली की
`` मी ह्या गडावर आधीच होते माझी पुजा करणार कोणी नव्हते माझ्या दर्शनाचे भाग्य तुला लाभले आता माझी नीत्य पुजा होणार तुझ्या गवळी घराण्याला कधीही हाणी पोहचणार नाही
आणि मग भक्ता देवीच्या दर्शनाला यायला लागले देवीचा महीमा दुरवर पसरला स्थानिक दिक्षीत आणि देशमुख कुंटुबीय पिढयानपीढया देवीच्या सेवेत आहे
तसेच गवळी परीवाराला ध्वजाचा मान मीळाला
41 सप्तशृंगी मंदिराच्य दुसर्या टप्प्यात परतीच्या मार्गावर श्री कालभैरव महाराज विराजमान आहेत
आदिशक्तीच्या संरक्षणा साठी ते तेथे आहेततसेच गडावर मारुती आणि इतर अकरा रुद्र ही आहेत
42 तसेच चितांमणी म्हणुन एक दगडाचा भाग आहे तेथे भाविक पैशे चिकटवुन मनातील इच्छा बोलतात
रुपया चिकटला तर इच्छा पुर्ण नाही चिकटला तर काहीच नाही अशी भाविकांची श्रध्दा आहे
43 गडासमोर एक पर्वत आहे त्यास मार्कण्डेयाचा पर्वत असे म्हणतात तेथे मार्कण्डेत ऋषींचा आश्रम ही होता येथेच बसुन मार्कण्डय ऋषींनी दुर्गा सप्तशती हा अनमोल ग्रंथाचे लिखान केले अशी मानता आहे
हा मार्कण्य पर्वत एक किल्ला ही आहे मार्कंडा म्हणुन ओळखला जातो..🙏🙏🙏
*आदिपंढरी
*आदिपंढरी*
वालावल (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील लक्ष्मीनारायणाच्या अंगावरील वस्त्र आणि तुळशीच्या मंजिऱ्यांची माळ घातल्यानंतरच महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाचा आषाढी एकादशीचा उत्सव सुरू होतो. ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. या लक्ष्मीनारायणाचे मंदिर असलेल्या वालावल गावाला म्हणूनच ‘आदिपंढरी’ म्हणून ओळखले जाते.
Thursday, 1 August 2024
Shiv स्तुती
ॐ भैरवरुद्राय महारुद्राय कालरुद्राय कल्पांतरुद्राय
वीररुद्राय रुद्ररुद्राय घोररुद्राय अघोररुद्राय
मार्तंडरुद्राय अंडरुद्राय ब्रह्माण्डरुद्राय
चंडरुद्राय प्रचंडरुद्राय दंडरुद्राय
शूलरुद्राय वीररुद्राय भवरुद्राय भीमरुद्राय
अतलरुद्राय वितलरुद्राय सुतलरुद्राय
महातलरुद्राय रसातलरुद्राय तलातलरुद्राय
पताळरुद्राय नमोनमः
हर हर हर हर हर हर हर हर महादेव
हर हर हर हर हर हर हर हर महादेव
ॐ शिवोहं ॐ शिवोहं रुद्रनामं भजेहं
ॐ शिवोहं ॐ शिवोहं रुद्रनामं भजेहं भजेहं ||१||
वीरभद्राय अग्निनेत्राय घोरसंहारकाय
सकललोकाय सर्वभुताय सत्यसाक्षात्काराय
शंभो शंभो शंकरा
ॐ शिवोहं ॐ शिवोहं रुद्रनामं भजेहं भजेहं
हर हर हर हर हर हर हर हर महादेव
ॐ नमः सोमाय च रुद्राय च नम:ताम्राय च अरुणाय च
नम: शंखाय च पशुपतये च नम: उग्राय च भीमाय च
नमो अग्रेवधाय च दुरेवधाय च नमो हंत्रे च हनियसे च
नमो वृक्षेभ्यो हरिकेषेभ्यो नम: ताराय नम: शम्भवे च
मयोभवे च नमः शंकराय च मयस्कराय च
नमः शिवाय च शिवतराय च
अंड ब्रम्हाण्ड कोटि अखिल परिपालना
पूरणा जगकारणा सत्यदेव देवप्रिया
वेदवेदांतसारा यज्ञ यज्ञोमया
निश्चला दुष्टनिग्रहा सप्तलोक संरक्षणा
सोम सूर्य अग्नि लोचना श्वेत ऋषभ वाहना
शूलापाणी भुजंगभूषणा त्रिपुरनाश रक्षणा
व्योमकेश महासेन जनका पंचवक्त्र परशुहस्त नमः
ॐ शिवोहं ॐ शिवोहं रुद्रनामं भजेहं भजेहं
ॐ शिवोहं ॐ शिवोहं रुद्रनामं भजेहं भजेहं ||२||
कालत्रिकाल नेत्रत्रिनेत्र शुलत्रिशुल धात्रं
सत्यप्रभाव दिव्यप्रकाश मंत्रस्वरूप मात्रं
निश्प्रपंचादि निष्कलंकोह निजपूर्ण बोधहं हं
सत्यगात्माग नित्यब्रम्होहं स्वत्प्रकाशोह हं हं
सचित्प्रमाण ॐ ॐ मूलप्रमेय ॐ ॐ
अयं ब्रह्मास्मि ॐ ॐ अहं ब्रम्हास्मि ॐ ॐ
गण गण गण गण गण गण गण गण
सहस्रकंठ सप्तविहरकी
ङम ङम ङम ङम डुम डुम डुम डुम
शिवडमरुनाद विहारकी
ॐ शिवोहं ॐ शिवोहं रुद्रनामं भजेहं भजेहं
ॐ शिवोहं ॐ शिवोहं रुद्रनामं भजेहं भजेहं ||३||
वीरभद्राय अग्निनेत्राय घोरसंहारकाय
सकललोकाय सर्वभुताय सत्यसाक्षात्काराय
शंभो शंभो शंकरा
ॐ शिवोहं ॐ शिवोहं रुद्रनामं भजेहं भजेहं ||धृ||
Tuesday, 30 July 2024
**मीठ*........*
*** **मीठ*........*
*काल एक पोस्ट वाचनात आली, की पंगतीत मीठ वाढणारा परत येत नाही तसच काही माणसं देखील* *आयुष्यातून एकदा* *निघून गेले की परत* *येत नाहीत. बहुदा ते* *गेल्यावरच त्यांची किंमत कळते.*
*का घडतं असं??*
*मिठाचं महत्व जेव्हा पानात असतं तेव्हा कळतच नाही. कारण त्यावेळी माणसाचं लक्ष पानात येणाऱ्या गोड* *पदार्थावर असतं. तो पदार्थ कुठला, कसा, त्याची चव कशी, तो* *चांगल्या तुपापासून बनवलाय का? ते खाऊन आपल्याला काही त्रास होऊ शकतो का?? हे काहीच* *माहीत नसतं तरी देखील तो गोड पदार्थ हवासा असतो. कारण मोह. असं म्हणतात की संकट हे नेहमी सुंदर रूप घेऊनच येतं.*
त्या *गोड पदार्थाच्या मोहापायी ताटातल्या मिठाकडे जराही लक्ष जात नाही. कारण* *आपण त्याला कुठेतरी गृहीत धरायला* *लागतो. त्याचा खारटपणा नकोसा वाटतो. ते आपल्या पानातील इतर* *पदार्थात मिक्स होऊ नये म्हणून आपणच त्याला स्वतःहून बाजूला करतो. त्यात कधी वाटीतील रस्सा* *भाजी वगैरे सांडली तर ते पानात असून देखील उपयोग नसतो.*
*नको वाटतात ना आपल्या आयुष्यात अशी मिठासारखी माणसं? कारण ती तुमच्या चांगल्यासाठी सल्ला देतात,* *कधी हक्काने कान धरतात तर कधी पोटतिडकीने समजावून सांगतात. नकोच वाटतात, कारण त्यावेळी* *गोड* *पदार्थाची झिंग चढलेली असते. त्याशिवाय पानातील इतर पदार्थ दिसत नाही तर वाटीमागे असलेलं ते एवुढंस* *मीठ* *काय दिसणार ना?? पण जेव्हा तोच गोड पदार्थ खाऊन तड लागते ना तेव्हा पाण्याच्या* *ग्लास मध्ये* *लिंबाची फोड पिळली जाते आणि हात आपसूक मीठ शोधायला लागतो. कारण त्याशिवाय खाल्लेलं अन्न* *पचणार कसं??*
*म्हणून देवाने वाढलेल्या ह्या आयुष्यरूपी पानात प्रत्येक व्यक्तीला महत्व असतं आणि ते द्यावं. आपल्याला ती व्यक्ती आवडो की न आवडो ती आयुष्यात आलीय ना म्हणजे नक्कीच मागील जन्माचा संबंध असतो आणि मिठासारखी माणसं तर नक्कीच ओळखावी भलेही ती तुमच्या आयुष्यात फार* *महत्वाचे नसतीलही पण निदान वाईट तर करणार नाहीत ना?? ....* 🙏🌷🙏
Monday, 29 July 2024
Maa tuzhe salam
A 3 year old boy at hand and
a 6 months old foetus in the womb !!!!! Hubby at the front
and expectant wife manning
the ordinance !!!!!
What an incredible story !!!!!
What a Lady!!!!
What an Army, Indian Army !!!
Salutes 🫡🫡🫡🫡🫡
Jai Hind 🇮🇳
Jai Hind ki Sena 🇮🇳
Friday, 26 July 2024
वैसे आपको एक और जानकारी दे दी जाए
आप को लगेगा अजीब बकवास है, किन्तु यह सत्य है👉🏻
पिछले 68 सालों में पीपल, बरगद और नीम के पेडों को सरकारी स्तर पर लगाना बन्द किया गया है।
पीपल कार्बन डाई ऑक्साइड का 100% एबजॉर्बर है, बरगद 80% और नीम 75 % ।
इसके बदले लोगों ने विदेशी यूकेलिप्टस को लगाना शुरू कर दिया, जो जमीन को जल विहीन कर देता है...
आज हर जगह यूकेलिप्टस, गुलमोहर और अन्य सजावटी पेड़ो ने ले ली है ।
अब जब वायुमण्डल में रिफ्रेशर ही नहीं रहेगा तो गर्मी तो बढ़ेगी ही, और जब गर्मी बढ़ेगी तो जल भाप बनकर उड़ेगा ही ।
हर 500 मीटर की दूरी पर एक पीपल का पेड़ लगायें,
तो आने वाले कुछ साल भर बाद प्रदूषण मुक्त भारत होगा । 🌳
वैसे आपको एक और जानकारी दे दी जाए ।
पीपल के पत्ते का फलक अधिक और डंठल पतला होता है, जिसकी वजह शांत मौसम में भी पत्ते हिलते रहते हैं और स्वच्छ ऑक्सीजन देते रहते हैं ।
वैसे भी पीपल को वृक्षों का राजा कहते है ।
इसकी वंदना में एक श्लोक देखिए ।
मूलम् ब्रह्मा, त्वचा विष्णु, सखा शंकरमेवच।
पत्रे-पत्रेका सर्वदेवानाम, वृक्षराज नमस्तुते।।
अब करने योग्य कार्य ।
इन जीवनदायी पेड़ों को ज्यादा से ज्यादा लगाने के लिए समाज में जागरूकता बढ़ायें ।
बाग
सुयश साठी
*१. गगनभरारीचं वेड*
कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगनभरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.
*२. झुंज*
वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो कि आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.
*3.संघर्ष कुठपर्यंत?*
आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली कि उरलेला प्रवास आपोआप होतो. असंच माणसाचं आहे...समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहचलात कि आयुष्यात अनेक समस्या ती उंचीच सोडवते
आप को लगेगा अजीब बकवास है, किन्तु यह सत्य है👉🏻 पिछले 68 सालों में पीपल, बरगद और नीम के पेडों को स्तर पर लगाना बन्द किया गया है।
आप को लगेगा अजीब बकवास है, किन्तु यह सत्य है👉🏻
पिछले 68 सालों में पीपल, बरगद और नीम के पेडों को सरकारी स्तर पर लगाना बन्द किया गया है।
पीपल कार्बन डाई ऑक्साइड का 100% एबजॉर्बर है, बरगद 80% और नीम 75 % ।
इसके बदले लोगों ने विदेशी यूकेलिप्टस को लगाना शुरू कर दिया, जो जमीन को जल विहीन कर देता है...
आज हर जगह यूकेलिप्टस, गुलमोहर और अन्य सजावटी पेड़ो ने ले ली है ।
अब जब वायुमण्डल में रिफ्रेशर ही नहीं रहेगा तो गर्मी तो बढ़ेगी ही, और जब गर्मी बढ़ेगी तो जल भाप बनकर उड़ेगा ही ।
हर 500 मीटर की दूरी पर एक पीपल का पेड़ लगायें,
तो आने वाले कुछ साल भर बाद प्रदूषण मुक्त भारत होगा । 🌳
वैसे आपको एक और जानकारी दे दी जाए ।
पीपल के पत्ते का फलक अधिक और डंठल पतला होता है, जिसकी वजह शांत मौसम में भी पत्ते हिलते रहते हैं और स्वच्छ ऑक्सीजन देते रहते हैं ।
वैसे भी पीपल को वृक्षों का राजा कहते है ।
इसकी वंदना में एक श्लोक देखिए ।
मूलम् ब्रह्मा, त्वचा विष्णु, सखा शंकरमेवच।
पत्रे-पत्रेका सर्वदेवानाम, वृक्षराज नमस्तुते।।
अब करने योग्य कार्य ।
इन जीवनदायी पेड़ों को ज्यादा से ज्यादा लगाने के लिए समाज में जागरूकता बढ़ायें ।
बाग
Thursday, 25 July 2024
सायबर सुरक्षा अधिक भक्कम करण्यावर भर सायबर गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील
सायबर सुरक्षा अधिक भक्कम करण्यावर भर
सायबर गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील
- मुख्य सचिव सुजाता सौनिक
व्हॉट नाऊ संस्थेच्या हेल्पलाईनचे उद्घाटन
मुंबई, दि. 25 : सध्या समाजात डिजीटल साधनांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. मात्र, ऑनलाईन व्यवहारांच्या माहिती अभावी अनेकांची फसवणूक होण्याच्या घटनाही घडत आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील सायबर सुरक्षा अधिक भक्कम करून सायबर गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ‘व्हॉट नाऊ’ ही संस्था सायबर जनजागृतीबाबत काम करीत आहे. अशा उपक्रमांना शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे प्रतिपादन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात महाराष्ट्र युवा सायबर सुरक्षा उपक्रम तसेच ‘व्हॉट नाऊ’ संस्थेच्या 9019115115 या हेल्पलाईनचे उद्घाटन मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. बृहन्मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस महासंचालक बी. के. सिंग, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, 'व्हॉट नाऊ'च्या फाऊंडर निती गोयल, निवेदिता श्रेयांस आदी यावेळी उपस्थित होते.
महापे येथे सायबर सुरक्षा केंद्राची उभारणी
सायबर गुन्हे व ऑनलाईन छळवणूकीच्या प्रकारांमुळे युवकांवर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगत मुख्य सचिव श्रीमती सौनिक म्हणाल्या की, महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांवर प्रतिबंध व उलगड्यासाठी यंत्रणा मजबूत करण्यात येत आहे. महापे येथे सायबर सुरक्षेबाबत केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. व्हॉट नाऊ संस्थेने हेल्पलाईन क्रमांक जारी करून सर्वांना सायबर सुरक्षा देण्याविषयी पाऊल उचलले आहे. यासोबतच राज्याच्या पोलीस विभागाची सायबर गुन्ह्यांमध्ये मदतीसाठी 1930 क्रमांकाची हेल्पलाईन सुरू आहे. ऑनलाईन व्यवहार व वर्तनाबाबत फसवणूक झाल्यास न घाबरता पुढे येवून या हेल्पलाईनवर तक्रार द्यावी. तसेच संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
शाळा, महाविद्यालय, कार्यालये, रहिवासी संकुले यामध्ये सायबर सुरक्षेसाठी युवकांनी जनजागृती करावी, अशी सूचना त्यांनी केली. महाराष्ट्र सायबर सेलच्या सहकार्याने सुरू होत असलेल्या 'व्हॉट नाऊ' चळवळीच्या माध्यमातून सायबर सुरक्षा अधिक मजबूत होण्यास हातभार लागेल, असा विश्वासही मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी यावेळी व्यक्त केला.
सायबर गुन्हेमुक्त मुंबई करण्यासाठी मुंबई पोलीस सदैव तत्पर
- पोलिस आयुक्त विवेक फणसळकर
बृहन्मुंबई पोलीस आयुक्त फणसाळकर म्हणाले की, सायबर गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मुंबई पोलीस आपल्या सदैव पाठिशी आहे. मुंबई पोलिस सायबर सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवित आहे. युवकांनी समाजमाध्यमे वापरताना अनोळखी व्यक्तींचे कॉल, फ्रेंड रिक्वेस्ट यांना प्रतिसाद देवू नये. फसवणुकीची घटना घडल्यास आपल्या पालकांना कल्पना द्यावी. तसेच कुठलीही शंका न बाळगता पोलिसांकडे तक्रार नोंदवावी. अशा प्रकरणांमध्ये पोलिसांच्या 1930 या हेल्पलाईन क्रमांकाची सुद्धा मदत घ्यावी. व्हॉट नाऊ संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेली मोहीम प्रशंसनीय आहे. युवकांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून सायबर विषयक जनजागृती करावी, असे आवाहन करून मुंबई पोलीस आपल्या सहकार्यासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
मुख्यमंत्रीयांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले की, मोबाईल हे केवळ संपर्काचे साधन राहिलेले नसून आपली ओळख बनले आहे. यामध्ये आर्थिक व्यवहारांची सर्व माहिती संकलित असते. त्यामुळे मोबाईलला हॅक करून, त्यामधील माहिती चोरून आपली फसवणूक होवू शकते. देशात नवीन कायदे लागू झाले असून याबाबत पोलिसांचे प्रशिक्षणही घेण्यात येत आहे. हे कायदे पीडितांना नक्कीच न्याय देणारे आहेत. व्हॉट नाऊ संस्थेने सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच समाजात सायबर सुरक्षा विषयक साक्षरता निर्माण करणारा ठरणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस महासंचालक बी. के. सिंग यांनी सायबर सुरक्षेसाठी जनजागृती आवश्यक असल्याचे सांगत व्हॉट नाऊ संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. 'व्हॉट नाऊ'च्या संस्थापक निती गोयल व सहसंस्थापक निवेदिता श्रेयांश यांनी संस्थेच्या उपक्रमाबाबत माहिती दिली. ऑनलाईन फसवणूक झाल्यास मदत करणारा हा उपक्रम युवकांना निश्चितच सहाय्यभूत ठरणारा असून युवकांमार्फत युवकांसाठी सुरू झालेली ही चळवळ असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
हैदराबाद गॅझेटमधील कागदपत्र उपलब्ध करून मराठा-कुणबी नोंदी तपासणी तातडीने पूर्ण करावी
हैदराबाद गॅझेटमधील कागदपत्र उपलब्ध करून
मराठा-कुणबी नोंदी तपासणी तातडीने पूर्ण करावी
- मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. 24 :राज्यात मराठा – कुणबी नोंदीबाबत केलेल्या सर्वेक्षणात नोंदी न आढळलेल्या समाज बांधवांसाठी शासनाने अधिकच्या नोंदी मिळविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ‘हैदराबाद गॅझेट’मधील नोंदी मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक हैदराबाद येथे पाठविले. या पथकाने तपासलेल्या कागदपत्रांची मागणी शासनाने विहीत शुल्क भरून केली आहे. या कागदपत्रांच्या सत्यप्रती तातडीने उपलब्ध करून कागदपत्रांची पडताळणी गतीने पूर्ण करावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्री उपसमितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनी आज दिले.
मंत्रालयातील समिती कक्षात मराठा समाज आरक्षण व संबंधीत विषयांबाबत बैठकीचे आयोजन मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले हाते. या बैठकीला गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार सिंग, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, विधी व न्याय विभागाच्या सहसचिव सुवर्णा केवल आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले की, राज्यात मागील काळात शासनाने मराठा – कुणबी नोंदी पडताळणी साठी युद्धपातळीवर सर्वेक्षण पूर्ण केले. यामध्ये आढळलेल्या नोंदीनुसार मराठा – कुणबी प्रमाणपत्र मराठा समाज बांधवांना देण्यात आले. मात्र, या सर्वेक्षणात नोंदी न आढळल्यामुळे प्रमाणपत्र देण्यास अडचण आली. हैदराबाद गॅझेटमधील जास्तीच्या नोंदी तपासून प्रमाणपत्र न मिळालेल्या मराठा समाज बांधवांना प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी. हे कामही युद्धपातळीवर पूर्ण करावे. सगे- सोयरे बाबत कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी. या छाननीचे कामही अंतिमस्तरापर्यंत नेण्यात यावे. न्या. शिंदे समितीला पुन्हा मुदतवाढ देण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशाही सूचना मंत्री श्री. देसाई यांनी आज दिल्या.
मराठा आरक्षण मागणीच्या आंदोलनादरम्यान दाखल झालेले विविध गुन्हे मागे घेण्याबाबतची कार्यवाही करावी. यामध्ये 31 जानेवारी 2024 पूर्वी दाखल गुन्ह्यावर दोषारोपपत्र झालेल्या प्रकरणांमध्ये गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही गतीने पूर्ण करावी. तसेच 31 जानेवारी 2024 नंतर दाखल असलेल्या गुन्ह्यांबाबत नवीन शासन निर्णय काढण्याची कारवाई करावी, असे निर्देशही मंत्री श्री. देसाई यांनी दिले.
0000
Wednesday, 24 July 2024
गळून पडलेली फुले'_* 🌸 🏵️🥀🌹🌷🍁
*_'गळून पडलेली फुले'_*
🌸 🏵️🥀🌹🌷🍁
➖➖➖➖➖➖➖
चालणे ही एक सामान्य क्रिया आहे. पण चालण्याचं सौंदर्य हे आहे की आपल्या आजूबाजूला घडत असलेले जीवन पाहता येते.
मी रोज सकाळी फिरायला जातो, तेव्हा मला एक वृद्ध गृहस्थ झाडाखाली पडलेली फुले उचलून मंदिरात दर्शनासाठी टोपलीत ठेवताना दिसतात. त्यांचा हा उपक्रम माझ्यात कुतूहल निर्माण करत होता.
एका सकाळी, मी त्यांना पुन्हा तेच करताना पाहिले आणि मी माझी उत्सुकता शांत करण्याचा निर्णय घेतला. मी त्यांना गळून पडलेल्या फुलांच्या ध्यासाबद्दल विचारले की इतर वृद्ध लोक तर ताजी फुले तोडतात.
मी त्याला विचारले, "सर, मी तुम्हाला नेहमी जमिनीवरून ही ताजी पडलेली फुले उचलताना पाहतो. तुम्ही त्यांचे काय करता?"
"मी ही फुले माझ्या पूजेच्या खोलीत देवतांच्या चरणी अर्पण करतो," त्याने अतिशय शांतपणे उत्तर दिले.
मी पहिल्यांदाच असं काही ऐकलं होतं. म्हणून, मी त्याला पुन्हा विचारले, "तुमची काही हरकत नसेल, तर मी तुम्हांला विचारू का की, झाडावर सहज तोडता येणारी फुले असताना तूम्ही ही पडलेली फुले देवाला का अर्पण करता ?"
त्याच्या उत्तराने मी थक्क झालो, "मी फुलांना त्यांचा उद्देश पूर्ण करण्यास मदत करतो - त्यांच्या शेवटच्या दिवसात देवासोबत राहण्याचा. त्यांनाही जीवन आहे; आमच्याप्रमाणे त्यांनाही त्यांच्या शेवटच्या दिवसात देवासोबत राहायचे आहे, नाही का? " त्याने मला विचारले. मी सहमती दर्शविली.
मग तो म्हणाला, "काही लोक ज्या कळ्या अजून फुलल्या नाहीत अशा कळ्या खुडतात आणि काही फक्त नुकत्याच फुललेल्या कळ्या काढतात, त्यांना त्यांचा सुगंधही सोडू देत नाहीत किंवा त्यांचे जीवन जगू देत नाहीत. प्रत्येकजण जे सुंदर आहे ते ओरबाडतो आणि त्यातून वनस्पतीचे सौंदर्य काढून घेतो. मग पहा, ही झाडे कशी दिसतात - रंगहीन आणि निर्जन."
तो पुढे म्हणाला, "प्रत्येक फुलाचा एक उद्देश असतो, देवासोबत राहण्याचा. प्रत्येकजण झाडांवर असलेली फुले घेतो, पण मी ती निवडत नाही. ती गळून पडणे हा फुलांचा दोष नाही. या म्हातारपणात मी कुणालाही साथ देऊ शकत नाही, पण किमान या फुलांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी मदत करू शकतो."
मी फक्त होकार दिला, हसलो त्यांना शुभेच्छा दिल्या आणि चालू लागलो. मी चालत होतो तेव्हा माझे मन धावत होते. या नव्या प्रेरणेने आणि कल्पनेने मी निश्चय केला की यापुढे पूजेसाठी फक्त पडलेली फुले गोळा करावयाची.
दुसऱ्या दिवशी सकाळी फिरण्यासाठी गेलो असता एका झाडाखाली पडलेली फुलं मी फुलं उचलून तळहातावर ठेवली. फुले तळहातावर फुले ठेवताच, मला अंगावर रोमांच आले आणि माझे हृदय धडधडू लागले. माझ्या शरीरासाठी या फुलांबद्दल मला वाटणारा तो एक वेगळाच अनुभव होता. मी ती फुले घरी आणली, धुऊन ती कुठे असावीत तिथे म्हणजे परमेश्वराच्या चरणी ठेवली!
हा संपूर्ण अनुभव फक्त अप्रतिम होता. मला आतून खूप छान वाटलं. मला असे वाटले की मी कोणाचा तरी जीव वाचवला आहे किंवा एखाद्याला त्याच्या दुःखातून बाहेर येण्यास मदत केली आहे. फुलांचे असे समाधान मला यापूर्वी कधीच जाणवले नव्हते. आणि मला वाटते की मी असेच करत रहावं.
जे अकाली पडले आहेत त्यांना उचलून योग्य जागी ठेवा.
आयुष्यात आपल्याला नेहमी चांगल्या आणि सुंदर लोकांच्या आसपास राहायचे असते. आपल्या उंचीच्या लोकांबरोबर आपल्याला स्वतःला पहायचे असते आणि जे आपल्या उंचीच्या खाली आहेत, त्यांना आपल्यापेक्षा खाली बघायचे असते. पण, खरे समाधान तेव्हा मिळते जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो, त्यांचे जीवन चांगले बनवतो आणि त्यांना आनंद आणि आनंद साजरा करण्यास मदत करतो. - मग तो माणूस, प्राणी, पक्षी किंवा इतर कोणत्याही प्रकारचे जीवन असो. मग फुले का नाहीत? जे पडले आहेत पदभ्रष्ट आहेत त्यांना उचला मार्गी लावा" आणि पहा तुम्हाला स्वतःला उंचावल्यासारखे वाटेल.
👩🏻 🥹 👨🏻 👨🏻🦰 👱🏻 👱🏻♂️
_ओळखीच्या सर्व लोकांना आणि इतर सर्व ग्रुप मध्ये शेअर करा जेणेकरून आपला हा ज्ञानयज्ञ सर्वत्र पोहोचेल_
➖➖➖➖➖➖➖
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...



