Showing posts with label उयोग रोजगार. Show all posts
Showing posts with label उयोग रोजगार. Show all posts

Monday, 21 July 2025

बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळावाhttps://www.mahaswayam.gov.in pl share

 बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळावा

मुंबईदि. २१ : बेरोजगार उमेदवारांसाठी दिनांक २२ जुलै २०२५ रोजी करीयर मार्गदर्शनप्लेसमेंट ड्राईव्ह व पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रमुंबई शहर यांच्या वतीने  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक २२/०७/२०२५ रोजी MMP Shaha Woman College, Matunga East येथे सकाळी १०.३० ते १२.३० वा. करीयर मार्गदर्शन व धारावी मिशन सेंटरगणेश विद्या मंदिर धारावी येथे दु.०२.०० ते ०५.०० प्लेसमेंट ड्राईव्ह तसेच Sharda Mandir High School, Grant Road, Mumbai 400 007 दुपारी ०३.०० ते दुपारी ०५.३०वाजेपर्यंत पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

अद्याप सदर करीयर मार्गदर्शनप्लेसमेंट ड्राईव्ह व रोजगार मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकीत कंपन्या/नियोक्ते प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत. नोकरी इच्छुक उमेदवारांनी पर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास https://www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे तसेच प्रत्यक्ष मेळाव्याच्या दिवशी जास्तीत जास्त संख्येने मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित रहावे.

भरती नियोक्ते इच्छुक पदे यांनी जास्तीत जास्त रिक्त https://www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर "Pandit Dindayal Upadhyay Job Fair" ऑप्शनवर क्लिक करुन "पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा" यावर रिक्त पदे अधिसुचित करावी व २२ जुलै २०२५ रोजी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित रहावे याबाबत काही अडचणी असल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या श्री. खालकर मो.न.८९९९६९१५१५ या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा.

वरील कार्यक्रमांचा जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन  शैलेश भगतसहायक आयुक्तजिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई शहर यांनी केले आहे.

****

Featured post

Lakshvedhi