*आयुष्यातील १९ उंटांची गोष्ट*
*एका गावात एका व्यक्तीकडे १९ उंट होते.*
*एके दिवशी ती व्यक्ती मरण पावली.*
*त्याच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्र वाचण्यात आले.*
*ज्यामध्ये असे लिहिले होते की..*
*माझ्या १९ उंटांपैकी अर्धा हिस्सा माझ्या मुलाला, १९ उंटांपैकी एक चतुर्थांश हिस्सा माझ्या मुलीला आणि १९ उंटांपैकी पाचवा हिस्सा माझ्या नोकराला द्यावा.*
*अर्थात ही वाटणी कशी व्हायची असा सर्वांचाच गोंधळ उडाला.*
*१९ उंटापैंकी अर्धा हिस्सा करायचा म्हणजे एक उंट कापावा लागेल.*
*त्यात एक कट झाला म्हणजे १८ बाकी राहीले.*
*त्यापैकी त्यात चतुर्थांश हिस्सा करायचा म्हणजे साडेचार होतात मग?*
*सगळेच खूप गोंधळले होते.*
*तेवढ्यात शेजारच्या गावातून एका शहाण्याला बोलावण्यात आले.*
*तो शहाणा त्याच्या उंटावर बसुन आला.*
*समस्या ऐकून घेतली. थोडा विचार केला.*
*मग म्हणाला ठिक आहे या १९ उंटांमध्ये माझा आणखी हा एक उंट मिसळा आणि वाटून द्या.*
*प्रत्येकाला वाटले की एक निघाला मरणासन्न वेडा! जो असे मृत्युपत्र तयार करून निघून गेला आणि आता हा दुसरा वेडा निघाला आहे.*
*तो म्हणतो की, त्यात अजून एक माझा उंट त्यांच्यामध्ये वाटून द्या.*
*तरीही मुद्दा मान्य करण्यात काय हरकत आहे. नुकसान तर नाही.*
*असा विचार करून सर्वांनी वाटणी करायचा निर्णय घेतला.*
*आता एकूण उंट १९+१=२० झाले.*
*२० उंटापैकी अर्धे मुलाला दिले.*
*उरले १० उंट.*
*२० उंटापैकी एक चतुर्थांश हिस्सा मुलीला म्हणजे ५ उंट तिला दिले.*
*२० उंटापैकी पाचवा हिस्सा म्हणजे ४ उंट नोकराला दिले.*
*असे एकूण १०+५+४=१९ होतात.*
*त्यात एक उंट वाचला. वाचलेला उंट जो ज्ञानी माणसाचा होता. तो त्याला परत देऊन टाकला व तो त्याच्या गावी घेऊन निघून गेला.*
*अशा प्रकारे १ उंट मिसळल्या नंतर काय झाले तर त्यामुळे उरलेल्या १९ उंटाना सुख, शांती, समाधान आणि आनंदाने राहता आले.*
*त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या आयुष्यातही १९ उंट आहेत.*
*५-ज्ञानेंद्रिये.*
*(डोळा, नाक, जीभ, कान, त्वचा)*
*५ कर्मेद्रिंये.*
*(हात, पाय, जीभ, मूत्रमार्ग, गुद्द्वार)*
*५ पंचप्राण.*
*(व्यान, समान, अपान, उदाम व प्राण )*
*आणि...*
*४-अंतःकरण चतुष्टय.*
*(मन, बुद्धी, चित्त, अहंकार)*
*असे एकूण १९ उंट आहेत.*
*माणूस आयुष्यभर या १९ उंटांच्या वाटणीत अडकून राहतो.*
*आता त्यात अडकून न राहाता फक्त त्यात "मित्र" रुपी उंट त्यात जोडा.! अर्थात आयुष्यात चांगला, इमानदार व सच्चा "मित्र" रूपी उंट सोबत ठेवा.*
*जोपर्यंत मित्र रुपी उंट आपुल्या आयुष्यात जोडत नाही. तोपर्यंत आपलेच नातेवाईक आपल्याला सुख, शांती, समाधान आणि आनंद हे मिळवून देणारच नाहीत.*🙏
*♦️वाचण्यात आलेला सुंदर लेख♦️*
●┈┉❀꧁꧂❀┉┈●
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩



