Showing posts with label मार्गदर्शन केंद्. Show all posts
Showing posts with label मार्गदर्शन केंद्. Show all posts

Saturday, 25 January 2025

*रिट याचिका क्र. ४०५/२३ कर्नाटक हायकोर्ट.* पेन्शनधारकाने जीवन प्रमाणपत्र

 .  *रिट याचिका क्र.   ४०५/२३ कर्नाटक हायकोर्ट.* 

 पेन्शनधारकाने जीवन प्रमाणपत्र सादर केले नसल्यास;  पेन्शन थांबवण्यापूर्वी, पेन्शनधारकाच्या घरी भेट देणे आणि न सादर करण्याचे कारण जाणून घेणे हे बँकेचे कर्तव्य आहे. 

 न्यायालयाने सर्व थकबाकी भरण्याचे आदेश दिले आणि *₹ दंडही ठोठावला.  प्रतिवादीवर एक लाख*.

 *6%* व्याजासह पेमेंट दोन आठवड्यांत करावयाचे आहे._ 

 जर 2 आठवड्यांच्या आत पेमेंट केले नाही तर, व्याजाचा दर *18%* टक्के व्याजाने वाढला.

 सर्व बँकर्सनी नोंद घ्यावी.

 *सर्व पेन्शनधारकांसाठी उपयुक्त निर्णय.*


 माझ्या प्रिय मित्रानो,

 कृपया ही पोस्ट सर्व निवृत्तीवेतनधारक, कुटुंब आणि मित्रांपर्यंत पोहोचवा

Thursday, 16 January 2025

मेडिक्लेम पॉलिसी घ्यायची कधी?*

 *मेडिक्लेम पॉलिसी घ्यायची कधी?*


*वय--20 वर्षे* - - आता शिक्षण चालू आहे… !! बघु नंतर 

*25 वर्षे* -- नोकरीच्या शोधात आहे… !! बघु नंतर

*30 वर्षे* -- लग्न करायचं आहे.… !! बघु नंतर

*31 ते 35 वर्षे* -- मुल  आजारी होते.दवाखान्यात बरेच पैसे खर्च झाले,पैसे आले की लगेच करु.

*36-40 वर्ष* -- थोडं "सेटल" होऊ द्या.… !! बघु नंतर

*41-45 वर्षे* -- वेळच मिळत नाही हो.… !! बघु नंतर

*46-50 वर्षे* -- मुलगा/मुलगी दहावीला आहे.… !! बघु नंतर

*51-55 वर्ष*-- प्रकृती बरी नसते. मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले… !! बघु नंतर

*56-60 वर्षे* -- मुलग्याचं/मुलीचं लग्न करायचं आहे,त्यातच बीपी,डायबेटिस सुरू झाला आहे आता मेड़िक्लेम करावाच लागेल, पण थोडं  थांबा.… !!

*62-63 वर्षे* --छातीत चेस्टपेन झाला दोन तीन दिवसात मी आपणास फोन करतो.

*63-64 वर्षे* -- डाॅक्टरांनी  एन्जोग्राफी करायला सांगितले.त्यातच एन्जोप्लास्टी झाली 3 लाख खर्च झाले. 

*65 वर्षे* -- इच्छा तर खूप होती मेड़िक्लेम करून घेण्याची, पण गुडघ्यांचा त्रास खूप वाढला होता.दोन्ही गुडघे कृत्रिम बसवावे लागले (हॉस्पिटल मध्ये ६ लाख ख़र्च झाले)

*66-70 वर्ष*-- मुलगा बाहेर गावी/परदेशी आहे.एकाएकी छातीत पेन/दुखणे वाढले डाॅक्टरांनी बायपास सर्जरी करण्यासाठी सांगितलं आहे सर्व पैसा संपुन गेला.पुढचं आयुष्य जगायचं कसं?  

अरे पैशाअभावी जीव गमवावा लागला !!


अरेच्चा !!! मेडिक्लेम पॉलिसी घ्यायची राहुनच गेले.       


यात आपण थंडी-ताप,डेंग्यू,मलेरिया,चिकनगुनीया,संसंर्गजन्य रोग,टायफाॅइड,काविळ,न्युमोनिया,डायरिया,रस्त्यावर खाल्यामुळे अन्नातुन विषबाधा,छोटे-मोठे  अपघात याचा खर्च किती?


महत्वाचे:-

आधी मेडिक्लेम घेऊन सुरक्षित व्हा.आपली बचत,गोल्ड,स्थावर मालमत्ता वाचवा.

एखाद्या मोठ्या आजारपणासाठी हॉस्पिटल मधील १० दिवसाचा स्टे,मागील २०-२५ वर्षात अत्यंत मेहनतीने कमावलेली आपली बचत साफ करू शकतो.. 


आपणास मदतीचा हात देण्यास आम्ही तयार आहोत. 

 

आरोग्यविमा घेणे काळाची गरज आहे.

*✔संपत्ती निर्मिती जेव्हढी महत्वाची,तेव्हढंच तिचं संरक्षण महत्वाचं.* 


*अत्यंत महत्वाचा मेडिक्लेमचा नियम*

मेडिक्लेम पॉलिसी गरज नसताना घेऊन ठेवा. 

कारण,जेंव्हा खरी गरज लागेल तेंव्हा वेळ निघुन गेलेली असेल.मिळणार नाही !!!

**

Monday, 23 December 2024

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

 स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

 

मुंबई दि.23 :- सन 2024 वर्षातील मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी राज्य शासनाच्यावतीने  स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय  पुरस्कार  देण्यात येणार आहे.  1 जानेवारी 2024  ते 31 डिसेंबर, 2024 या कालावधीत प्रकाशित झालेले प्रथम आवृत्ती पुस्तके स्पर्धेसाठी पात्र आहेत. लेखकांनी पुरस्काराच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून) दि. 31 जानेवारी, 2025 पर्यंत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत मुंबई येथे आपले साहित्य पाठवावीत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव यांनी  प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400 025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध आहेत.  महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 'नवीन संदेश' या सदरात 'स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2024 नियमावली व प्रवेशिका' या शीर्षाखाली व 'What's new' या सदरात 'Late Yashwantrao Chavan State Literature Award 2024 Rules Book and Application Form' या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या  http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील. प्रवेशिका पूर्णतः भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 1 ते 31 जानेवारी 2025 या विहित कालावधीत पोहचतील अशा पाठवाव्यात.

लेखक / प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक / प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400 025 येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक / प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हे साहित्य दिनांक 1 जानेवारी, 2025 ते 31 जानेवारी 2025 या विहित कालावधीत पाठवावे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.

लेखक / प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर / पाकीटावर 'स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2024 साठी प्रवेशिका' असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2025 हा राहील. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत.

 

0000


Friday, 27 September 2024

सेना दलात अधिकारी पदाचे मोफत पूर्व प्रशिक्षण

 सेना दलात अधिकारी पदाचे

मोफत पूर्व प्रशिक्षण

 

मुंबईदि. २६ : भारतीय सैन्यदलनौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (Service Selection Board) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिक रोडनाशिक येथे मोफत प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन मुंबई शहर सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतींसाठी दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ ते २३ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. ५८ आयोजित करण्यात आला आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षणासह निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबई शहर जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मुंबई शहर येथे दिनांक ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे (DSW) यांच्या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील एसएसबी-५८ कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

एस. एस. बी. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढीलप्रमाणे नमूद कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.

प्रशिक्षणार्थी कंम्बाईड डिफेन्स सहींसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अॅकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेले असावे व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. प्रशिक्षणार्थी एनसीसी 'सीसर्टिफिकेट 'किंवा 'बीग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी प्रशिक्षणार्थ्याकडे एस. एस. बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी प्रशिक्षणार्थीकडे एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नांव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारीछात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिक रोडनाशिक यांचा ईमेल आयडी: training.petenashik@gmail.com व दूरध्वनी क्र. आणि 0253-2451032 किंवा व्हाटसअप क्र. 9156073306 यावर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा.


Monday, 26 August 2024

आपल ते सोनं पण ओळखणार कोण..?🤔 👉 खोबरेल तेल

 आपल ते सोनं पण ओळखणार कोण..?🤔


👉 खोबरेल तेल


खोबरे, खोबरेल तेल किती विलक्षण आणि गुणकारी आहे..!


माझे स्वतःचे कितीतरी गैरसमज दूर झाले !


कृपया मित्र मैत्रिणींनो हा लेख जरूर वाचा आणि आवडला तर ज्यांच्या ज्यांच्यावर तुमचे प्रेम माया आहे त्यांना पाठवा ….!


तुमच्यासाठी ख़ास डॉ मीना नेरुरकर यांचा हा लेख ..!!


“कोकोनट ऑइल”

गेली तीस वर्षे नारळाच्या खोबर्‍याला, खोबरेल तेलाला आरोग्यबाधक ठरवल्यावर त्याचे ग्रह पालटले आहेत.


दिवसागणिक वाढत असलेल्या अल्झायमर या रोगावर जालीम उपाय म्हणून खोबरेल तेलाला आत्ता महत्त्व आलेले आहे.


अमेरिकेत डॉक्टर पेशंटना टोस्टवर खोबरेल तेल लावून द्या, असे सांगत आहेत. इतके दिवस आजूबाजूचा काहीही गंध नसलेली अल्झायमर पीडित जनता महिनाभराच्या टोस्टवरच्या खोबरेल तेलाने एकेकाळचे परिचित जग परत नव्याने ओळखायला लागलेली आहे. कोकोनट ऑइलचे भाग्य पालटायला डॉ. ब्रूस फाइफ याच्या रूपाने गॉडफादर लाभला.


अमेरिकेच्या र्‍होड आयलंड राज्यात राहणार्‍या या न्यूट्रिशयन शेजारी पॉल सोएर्स नावाचा फिलिपिनो माणूस होता. पॉल मिरॅकल ऑइल विकायचा. आजूबाजूची फिलिपिनो जनता काहीही झाले की त्याच्या दुकानात धावत यायची व तेल घेऊन जायची.


कुतुहल म्हणून ब्रूसने एके दिवशी पॉलला विचारणा केली. पॉल म्हणाला, थायलंड वा फिलिपाइन्स देशातून नारळ आणतो, नारळाच्या डोळ्यात खिळा घालून पाणी काढतो, मग तो हातोड्याने फोडतो, आतले खोबरे किसतो, ते पाण्यात उकळत ठेवतो, पाणी आटून वर राहते ते कोकोनट ऑइल. कसल्याही व्याधीवर उपचार म्हणून देतो.


डॉ. ब्रूस न्यूट्रिशनिस्ट असल्यामुळे त्याला प्रक्रिया न झालेल्या नैसर्गिक खाद्यपदार्थामध्ये रस होता खोबर्‍यातून तेल काढण्याची किचकट प्रक्रिया सोपी करायला ब्रूसने खूप मदत केली. पॉलला खोबरे वाटायला मिक्सर आणून दिला. खोबर्‍यातून तेल काढायला द्राक्षातून वाइन काढायचा प्रेस आणून दिला. आता तेल काढणे खूप सोपे झाले. पॉलच्या सांगण्यावरून काहीही दुखत असले की, ब्रूसने चमचाभर कोकोनट ऑइल तोंडाने घ्यायला सुरुवात केली. कापलेल्या खरचटलेल्या ठिकाणी कोकोनट ऑइल लावायला सुरुवात केली. ब्रूसचे वजन कमी झाले, त्याची त्वचा तुकतुकीत दिसायला लागली. जखम पटकन भरायला लागली. ब्रूसच्या आश्चर्याला पारावर उरला नाही.


इतके दिवस नारळाला का वाईट म्हणत होते याबद्दल त्याने खोलात जाऊन तपास करायला सुरुवात केल्यावर त्याला आढळून आले की, सोयाबीन इंडस्ट्रीने जगात पाय रोवण्यासाठी मुद्दाम खोबर्‍याविरुद्ध अपप्रचार करायला सुरुवात केली होती. सगळे जण हार्ट अटॅकला घाबरतात. खोबरेल तेलात स्निग्धांश जास्त असतात व त्याने हार्ट अटॅक येतो, पण सोयाबीनचे पदार्थ खाल्ले तर हृदयविकार कमी होतात असा खोटा प्रचार सुरू केला. झाले. घाबरट लोकांनी हा रिपोर्ट वाचल्यावर नारळाचे पदार्थ खाणे कमी केले. चाणाक्ष सोयाबीन इंडस्ट्रीने स्वत:चे घोडे पुढे दामटले.


ब्रूसने नारळ वापरत असलेल्या देशात जाऊन खोबरेल तेलावर संशोधन केले. खोबर्‍यात असतात ते Medium chain fatty acids जे शरीराला हितकारक असतात. थायलंड,इंडोनेशिया, फिलिपाइन्स, पॉलिनेशियन देश खोबर्‍यावर जगतात. त्यांच्यात हार्ट अटॅकचे प्रमाण जगापेक्षा खूप कमी आहे. ब्रूसने शोधाअंती खोबर्‍यामुळे हार्ट अटॅक येत नाही असे विधान केले.


१९९९साली त्याने Coconut Oil miracle या नावाचे पुस्तक स्वत:च प्रसिद्ध केले. ते वाचून डॉ. मेरी न्यूपोर्ट हिने २००८ साली अल्झायमरच्या रोग्यांमध्ये कोकोनट ऑइलचा उपयोग करून पाहिला. फरक बघून तीदेखील चकीत झाली. इंटरनेटमुळे तो रिपोर्ट जगभर पसरला.


यू ट्यूबवर डॉक्टर हेल्दी फूडसाठी नारळाचे दूध कसे बिनधास्तपणे वापरावे याच्या रोज नव्या रेसिपीज देतात.


माझ्या आजीच्या बटव्यात जगातल्या सगळ्या व्याधींवर अक्सर इलाज म्हणून एकच औषध होते ते म्हणजे खोबरेल तेल.

परीक्षा आली की डोकं थंड राहावे म्हणून ती माझ्या डोक्यावर खोबरेल तेल थापटायची, केस काळे राहावेत म्हणून आंघोळीच्या आधी डोक्याला खोबरल तेलाचा मसाज करायची, कातडीत चरबी होऊ नये म्हणून अंगाला खोबरेल तेल चोळायची, कान दुखला तर कानात गरम खोबरेल तेलाची धार सोडायची…

सर्दी झाली, डोके खाली करून नाकात गरम खोबरेल तेलाचे थेंब घालायची.

ती जेव्हा ९५ व्या वर्षी गेली तेव्हा डोक्यावरचे सगळे केस शाबूत होते व काळे होते.


सध्या माझी हॉर्वर्ड विद्यापीठातली हुशार मुलगी अदिती नियमितपणे खोबरेल तेल वापरते. पणजी सारखे डोक्याला अंगाला तर लावतेच, पण ब्रूसने सांगितल्याप्रमाणे रोज तीन चमचे तेल पिते. खोबरेल तेलात जेवण करते. खोबरेल तेलावर वाढूनही मी त्याचा वापर थांबवला म्हणून माझी कीव करते. कोकोनट गुरू डॉ. ब्रूसच्या अथक प्रयत्नांनी अमेरिकेतही कोकोनट ऑईल खूप लोकप्रिय होत आहे. आता मी ही न बिचकता वाटी वाटी सोलकढी पिते. आमट्या, उसळी, कालवणांना नारळाचे वाटण घालते. कोकोनट ऑइल अँटी एजिंग असल्याचे रोज नवनवे रिपोर्ट बाहेर येत आहेत.


डॉ. मीना नेरूरकर….

Friday, 12 July 2024

विद्यार्थिनींकडून शैक्षणिक शुल्क आकारल्यास संस्थांवर कारवाई करणार

 विद्यार्थिनींकडून शैक्षणिक शुल्क आकारल्यास संस्थांवर कारवाई करणार

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

            मुंबई, दि. १२ : शासकीय महाविद्यालयेशासन अनुदानितअशासकीय महाविद्यालये अशा शैक्षणिक संस्थेत आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थिनींना शैक्षणिक व परीक्षा शुल्क १०० टक्के माफ करण्यात आले आहे. शैक्षणिक संस्थांनी शुल्क आकारल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

            मंत्रालयात राज्यातील विद्यार्थिंनींना शैक्षणिक शुल्क माफ करण्याच्या अंमलबजावणी संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री श्री. पाटील यांनी शैक्षणिक संस्थांना निर्देश दिले. यावेळी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीतंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकरउच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकरउपसचिव अशोक मांडेमुंबई विद्यापीठाचे निबंधक श्री. गायकवाडएसएनडीटी विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. पाटील म्हणाले कीराज्यातील शासकीय महाविद्यालयेशासन अनुदानित अशासकीय महाविद्यालयेअंशतः अनुदानित (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतने / सार्वजनिक विद्यापीठेशासकीय अभिमत विद्यापीठे (खाजगी अभिमत विद्यापीठे / स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसशासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (Centralized Admission Process-CAP) (व्यवस्थापन कोट्यातील व संस्थास्तरावरील प्रवेश वगळून) प्रवेशित विद्यार्थ्यापैकीज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या मुलींना शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क  घेण्यात येऊ नयेत.

            जर विद्यापीठमहाविद्यालय यांनी शिक्षण शुल्कपरीक्षा शुल्क घेतले तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशा सूचना मंत्री श्री.  पाटील यांनी संबंधित अधिकारी यांना बैठकीमध्ये दिल्या.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/


 

वृत्त

Sunday, 12 May 2024

चला.. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊया मतदानासाठी या आहेत सुविधा ....

 चला.. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊया

मतदानासाठी या आहेत सुविधा ....

            मुंबई उपनगरदि.12: लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. 

            मुंबई उपनगर जिल्ह्यात २६-मुंबई उत्तर२७- मुंबई उत्तर पश्चिम२८- मुंबई उत्तर पूर्व आणि २९- मुंबई उत्तर मध्य या चार लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. २६ -मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघांत १५२- बांरीवली१५३ – दहिसर१५४ – मागाठणे१६० – कांदिवली१६१ – चारकोप१६२ – मालाड पश्चिम हे विधानसभा मतदारसंघ येतात. तर२७- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात १५८- जोगेश्वरी पूर्व१५९ – दिंडोशी१६३ – गोरेगांव१६४ – वर्सोवा१६५ -अंधेरी पश्चिम१६६- अंधेरी पूर्व या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. २८ – मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघात १५५- मुलुंड१५६ – विक्रोळी. १५७ -भांडुप पश्चिम१६९ – घाटकोपर पश्चिम१७० – घाटकोपर पूर्व१७१ मानखुर्द शिवाजीनगर हे विधानसभा मतदारसंघ येतात.  २९ – मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघात १६७ – विलेपार्ले१६८ – चांदिवली१७४ कुर्ला१७५ – कलिना१७६ वांद्रे पूर्व१७७ – वांद्रे पश्चिम या मतदारसंघाचा समावेश आहे. १७२ – अणूशक्ती नगर आणि १७३ – चेंबूर या  विधानसभा मतदारसंघाचा समावेश मुंबई शहर जिल्ह्यातील ३०-मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघात होतो.

            निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जवळ आली असताना मतदारांना त्यांचे मतदारयादीतील नाव शोधणे सुलभ व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने ॲप्स आणि पोर्टलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

                                    कसे शोधावे मतदार यादीत नाव?

            VOTERS' SERVICES PORTAL (eci.gov.inया लिंकवर जाऊन अथवा भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन आपले मतदान केंद्रयादी क्रमांक शोधता येणार आहे. किंवा स्वत: बद्दलची संपूर्ण माहिती ऑनलाईन भरून तुम्ही तुमचे मतदान केंद्र शोधू शकता. तसेच तिसरा पर्याय म्हणजे तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांकाद्वारेही तुमचे मतदान केंद्र आणि यादी क्रमांक शोधू शकता. तसेच व्होटर हेल्पींग ॲपद्वारेही तुम्ही मतदान केंद्र आणि यादी भाग विषयी माहिती मिळवू शकता.

                                व्होटर आयडी व्यतिरिक्त इतर १२ ओळखपत्रे मतदानासाठी वैध

            मतदारांनी मतदानाच्या दिवशी म्हणजे २० मे रोजी आपली ओळख पटवून देण्यासाठी मतदार ओळख पत्र सोबत आणावे. ते नसल्यास आधार कार्डपॅन कार्डविशिष्ठ दिव्यांगांचे ओळखपत्रकेंद्र सरकार/राज्य सरकार/  सार्वजनिक क्षेत्र उपक्रम / सार्वजनिक मर्यादित कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र,  पासपोर्टबँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबूक,  राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत  भारताचे महानिबंधक यांनी दिलेले स्मार्ट कार्ड,  वाहन चालक परवानाछायाचित्र असलेले निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे,  श्रम मंत्रालयाच्या योजने अंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्डमनरेगा कार्डसंसद सदस्यविधानसभा सदस्यविधानपरिषद सदस्य यांनी दिलेले ओळखपत्र मतदाना दिवशी ओळख पटविण्यासाठी वापरता येणार आहे.

 

                                   

                                   

                                    तुमच्या मतदारसंघातील उमेदवाराबाबत जाणून घ्या

            भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन मतदार त्यांच्या लोकसभा मतदार क्षेत्रातील उमेदवाराची माहिती जाणून घेऊ शकतात. Election Commission of India (eci.gov.inअथवा या लिंकवर तुम्हाला उमेदवाराबाबत माहिती मिळेल अथवा 'नो युवर कॅन्डीडेट' (know your candidate) या ॲपवर माहिती मिळेल. २६- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २७ – मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात २१ उमेदवार२८ - मुंबई उत्तर पूर्व मतदरसंघात २० उमेदवार२९ – उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात २७ उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय३०-दक्षिण मध्य मुंबईत १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांना भरपगारी सुट्टी

            या जिल्ह्यातील सर्व उद्योग समूहमहामंडळेकंपन्या व संस्थाऔद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांवर कार्यरत कर्मचारीअधिकारी यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी आहे. सुट्टी नसल्यास दोन तासांची सवलत देणे आवश्यक आहेमात्र त्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. सुट्टी अथवा सवलत न दिल्याची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेने दिली आहे.

उन्हाळ्यापासून बचावासाठी उपाययोजना

            मतदारांना मतदान सहजतेने करता यावे यासाठी सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर असणार आहेत. पिण्याच्या पाण्याची सोयवैद्यकीय सुविधाशौचालयेएकाच ठिकाणी अनेक केंद्रे असल्यास मतदान चिठ्ठीवर विविध रंगांचा वापर करण्यात येणार आहे. जेणेकरून मतदारांना मतदान करण्यासाठीचा वेळ वाचणार आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष रांग असणार आहे. अंध दिव्यांगांसाठी ईव्हीएम मशीनसाठी ब्रेल लिपी आणि वरिष्ठ नागरिकांना व्हिल चेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

                                                            कुठे संपर्क साधाल

            सामान्य चौकशीसाठी १९५० क्रमांकावर संपर्क साधू शकता. तसेचआपल्या क्षेत्रातील आशा वर्करअंगणवाडी सेविकाआरोग्य सेविका यांच्यामार्फत ही आपण मतदानासंदर्भात असलेल्या समस्यांबाबत माहिती घेऊ शकता. सक्षम ॲप दिव्यांग उमेदवारांना उपलब्ध होणाऱ्या सुविधांबाबत आहेत. तसेचआचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे आढल्यास सि-व्हीजील ॲपवर (C vigil App)तक्रारी दाखल करता येऊ शकतात.

Saturday, 3 February 2024

आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामासाठी आता बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार -

 आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामासाठी

आता बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

 

            मुंबईदि. ३० :  राज्यातील माता व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करणेप्रजनन व बाल आरोग्य विषयी सेवा अधिक प्रभावीपणे देणेकुटुंब कल्याण उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणे आणि लोकसहभागातून विविध आरोग्य कार्यक्रम यशस्वी करणे यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या घटकांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. सन २०२३-२४ या वर्षापासून एक नविन आरोग्य पुरस्कार राज्यात सुरू झालेला आहे. हा पुरस्कार उत्कृष्ट काम करणारी स्वयंसेवी संस्थाउत्कृष्ट काम करणारे डॉक्टरआरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट वार्तांकन करणारे पत्रकार व कर्मचारी यांना देण्यात येणार आहेअशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.

            याबाबतचा शासन निर्णयही निर्गमीत करण्यात आलेला आहे. आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेलाउत्कृष्ट काम करणाऱ्या तीन डॉक्टरांनाउत्कृष्ट वार्तांकन करणाऱ्या एका पत्रकाराला  व ५ कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी एक लाख रूपये असणार आहे. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम  दरवर्षी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी आयोजित करण्यात येईल. सन २०२३-२४ या वर्षात डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार प्राप्त व्यक्तीचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कारासाठी विचार करण्यात येणार नाहीअसे शासन निर्णयात नमूद आहे.

--

निलेश तायडे/विसंअ/

Thursday, 21 September 2023

मंत्री सुधीर मुनगंटीवार आता व्हॉटसॲप चॅनेलवर, व्हॉटसअप चॅनेल फॉलो करण्याचे आवाहन

 मंत्री सुधीर मुनगंटीवार आता व्हॉटसॲप चॅनेलवर,

व्हॉटसअप चॅनेल फॉलो करण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. 20 :  वनेसांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार आता राज्यातील जनतेशी थेट व्हॉटसॲपवरून जोडले गेले आहेत. काल गणेश चतुर्थीच्या दिवशी मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या ‘Sudhir Mungantiwar | सुधीर मुनगंटीवार’ या व्हॉटसॲप चॅनेलचा शुभारंभ करण्यात आला आहे. मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अखत्यारीत असलेल्या तीनही विभागांचे महत्वाचे निर्णयत्यांनी केलेली विविध कामेसंबंधित योजनाविविध विकास प्रकल्प आदींची अचूक आणि अधिकृत माहितीत्यांचे विविध कार्यक्रमदौरेबैठका यांची माहिती या व्हॉट्सअप चॅनेलच्या माध्यमातून आता थेट जनतेपर्यंत पोहोचणार आहे.

            समाजातील संवाद माध्यमांमध्ये नवीन तंत्रज्ञानानुसार वेगाने बदल होत असून  सर्वसामान्यांचे संवादाचे प्रभावी माध्यम ठरलेल्या व्हॉटसॲपने चॅनलच्या माध्यमातून संवादाचा नवीन मार्ग उपलब्ध करून दिला आहे.

            सोबत दिलेल्या दुव्यावरून आपल्या या चॅनेलला फॉलो करण्याचे आवाहन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे. या चॅनेलवरून सोप्या पद्धतीने सर्व अधिकृत माहिती जनतेला थेट हातातील स्मार्टफोनवर मिळणार आहे.

            या व्हॉट्सअप चॅनेलला केवळ स्वतःच्या व्हॉट्सअपवरून फॉलो करायचे आहे. त्यासाठी कुठलीही नोंदणी करण्याची आवश्यकता नसून आपला व्हॉट्सअप क्रमांकही व्हॉटसअपकडून गुप्त राखला जातो. शिवाय एका व्हॉट्सअप चॅनेलला किती लोकांनी फॉलो करावे यावरही व्हॉट्सअप ग्रुपसारखे काही बंधन नाही. त्यामुळे व्हॉट्सअप चॅनेल हे अधिक मुक्तस्वतंत्र आणि प्रभावी असे लोकप्रिय संवाद माध्यम ठरेलअसे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

चॅनेलला असे करा फॉलो :

            व्हॉटसॲपवरील अपडेट्स’ मेनूमध्ये गेल्यावर तिथे चॅनेल विभागात हे चॅनेल आहे. त्याला क्लिक करुन फॉलो केले की तुम्हाला सर्व अपडेट्स विनासायास उपलब्ध होणार आहेत. https://whatsapp.com/channel/0029Va9ERCr4NViuAvsdCI14 या लिंकवर व्हॉटसॲपधारकांनी क्लिक केल्यास ‘Sudhir Mungantiwar | सुधीर मुनगंटीवार’ या चॅनलला फॉलो करता येणार आहे.

Thursday, 27 July 2023

भारतीय वारसा आणि वैज्ञानिक श्रद्धास्थाने.*

 *भारतीय वारसा आणि वैज्ञानिक श्रद्धास्थाने.*


भारतीय संस्कृती आणि परंपरा समजून घेत असताना, त्यात नकळत वैज्ञानिक दृष्टिकोन कसा होता, यावर असलेले हे चिंतन मला आवडले. 

आपल्या साठी पाठवत आहे.


१) *गोमय* (सारवणे): पूर्वीच्या काळी घराच्या भिंती आतून व बाहेरून ह्या गाईच्या शेणाने सारावल्या जायच्या कारण गाईचे शेण हे प्रतिजैविक तसेच खनिजे युक्त असल्यामुळे वेगवेगळ्या आजारांपासून आणि आजार पसरवणाऱ्या जिवाणू पासून प्रतिबंध करतो.


२) *गाभारा*: हिंदू मंदिरांची स्थापना वैज्ञानिक दृष्ट्या झाली आहे. मंदिरात जिथे मूर्तीची स्थापना केली जाते त्या भागाला “गाभारा” म्हटले जाते. हा गाभारा अश्या ठिकाणी असतो जिथे पृथ्वीतून येणाऱ्या चुंबकीय किरणांचे प्रमाण जास्त असते आणि ते उपासना करणाऱ्याला लाभदायक असतात.


३) *वेद मंत्र*: हिंदू प्राचीन काळात वेद मंत्रांचे पठण करण्यात येई. वेद मंत्रांचे उच्चार केल्याने शरीराचे आजार बरे करण्यास मदत होते जसे की रक्तदाब.


४) *तोरण*: आंबा, लिंबू तसेच अशोकाच्या पानांचे तोरण घराच्या दरवाज्याला बांधून पूर्वी घर सजविण्यात यायचे. हि पाने वातावरण शुद्ध ठेवण्यास मदत करतात.


५) *प्राणायाम*: जर तुम्हाला रोजच्या ताणतणावातून आराम हवा असेल तर योगासने आणि प्राणायाम या पेक्षा चांगला उपाय नाही.


६) *बैठका*: पूर्वी वरिष्ट लोक देणारी शिक्षा म्हणजे कान पकडून बैठका काढणे, जे खर तर मन तेज बनविण्यास मदत करते तसेच आत्मकेंद्रित पणाला, ऐकण्यात त्रास असल्यास मदत करते.


७) *हळद*: हळदीत प्रतिजैविक, प्रतिऑक्सिडीकारक, विरोधी दाहक असे गुण असल्यामुळे हळद मिसळलेले पाणी सकाळ संध्याकाळ घर भोवती शिंपडले जाते.


८) *कान टोचणे*: लहान बाळाचे कान टोचणे हे एक आयुर्वेदिक उपचारातील भाग आहे. कानाचा जो भाग टोचला जातो तो दमा सारख्या आजरापासून बचाव करण्यास मदत होते.


९) *हनुमान चाळीसा*: नासा च्या संशोधनानुसार हनुमान चाळीसा म्हणजे सूर्य व पृथ्वी मधील अंतराची अचूक गणना आहे.


१०) *तुळस*: प्रत्येक हिंदूंच्या घराबाहेर तुळशीचं रोप असत. तुळशीचं पाने खाल्याने शारीरिक रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आजाराला प्रतिबंध घालते.


११) *केळीचे किंव्हा पळसाचे पान*: हिंदू संस्कृती मधे केळीच्या किंव्हा पळसाच्या पानावर जेवण वाढतात कारण हे एक पर्यावरणपूरक साधन असून ते साफ करण्यासाठी कोणत्याही रासायनिक साबणाची गरज नाही तसेच पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहचवता त्यांचा नायनाट करता येतो.


१२) *शंख पुकार*: शंख पुकारातून जी ध्वनी निर्माण होतो त्याने बरेच हानिकारक जीवजंतू चा नाश होतो. डासांची पैदास देखील शंख ध्वनीने प्रभावित होते ज्यामुळे मलेरिया सारख्या आजार पसरण्यात आळा बसतो.


१३) *दिवा*: तेलाचा किंव्हा तुपाचा दिवा घरात तसेच मंदिरात तेवत ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.


१४) *कडूलिंब व केळ्याचे झाड*: सकाळी कडूलिंब किंव्हा केळीच्या झाडाजवळ बसून उपासना करावी असे सल्ले दिले जातात, कारण ह्या झाडाजवळची हवा शुद्ध मानली जाते जी शरीरासाठी लाभदायी ठरते.


१५) *ॐकार*: ॐ चा सतत उच्चार हृदयाच्या ठोक्यावर नियंत्रण ठेवते. त्याच बरोबर शरीराला आराम देतो.


१६) *वाकून पाय पडणे*: वरिष्ठाच्या वाकून पाय पडल्याने पाठीचा कणा नीट ठेवण्यास मदत होते तसेच मेंदूला रक्त पुरवठा होण्यास मदत होते.


*आपल्या जवळ अजून खूप काही असेल, तर जरूर सांगा ‌.*


🙏🏻🙏🏻

Thursday, 29 June 2023

भवताल कातालशिल्प

 

भवताल कट्टा ५८

 

कोकणात अनेक सड्यांवर असंख्य कातळशिल्पं कोरलेली आहेत. नवनवी शिल्पं उजेडात येत आहेत, तसे त्यांच्याबद्दलचे गूढ वाढतच आहे. त्यांचे निर्माते, त्यांचा काळ, त्यांचा अर्थ, त्यांचे नेमके प्रयोजन असे कितीतरी प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांचा उलगडा करणारा भवताल कट्टा, शुक्रवार ३० जून रोजी आयोजित करण्यात आला आहे.

  

विषय :

कातळशिल्पांचे गूढ विश्व

 

सहभाग :

सतीश लळित

(कातळशिल्प अभ्यासक / ‘घुंगुरकाठी’ संस्थेचे संस्थापक)

साईली पलांडे-दातार

(इतिहास, पुरातत्त्व आणि पर्यावरण विषयांच्या अभ्यासक)

 

शुक्रवार, ३० जून २०२३

सायं. ७ ते ८.३०

 

सहभागासाठी:

झूम लिंक -

http://bitly.ws/JIAM

Meeting ID: 893 9400 5438
Passcode: 273379

किंवा

भवताल फेसबुक पेजवर लाईव्ह.

पेजची लिंक- https://facebook.com/bhavatal

 

संपर्कासाठी:

bhavatal@gmail.com


(आपल्या संपर्कातही शेअर करावा, ही विनंती.)


- भवताल टीम


--


भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com

Wednesday, 21 June 2023

सरकारद्वारा अब वारकरीओंके लिए बीमा कवचलाखों वारकरीओं को मिलेगी राहत

 सरकारद्वारा अब वारकरीओंके लिए बीमा कवचलाखों वारकरीओं को मिलेगी राहत


             मुंबई, 21जून 2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने पंढरपुर की आषाढ़ी वारी में भाग लेने वाले वारकरीओंके लिए बीमा कवर प्रदान करने वाली 'विठ्ठल रुक्मिणी वारकरी बीमा छत्र योजना' को लागू करने का निर्णय लिया है।


            सरकार की कीमत पर लाखों श्रमिकों को बीमा कवच मिलेगा। यह बीमा कवच महीने के 30 दिनों के लिए होगा।


             किसी श्रमिक की दुर्भाग्यपूर्ण मृत्यु होने पर उसके परिवार को 5 लाख रुपये की अनुग्रह राशि दी जाएगी। स्थायी अपंगता या दुर्घटना के कारण अपंगता की स्थिति में एक लाख रुपये दिए जाएंगे। वारी के दौरान आंशिक विकलांगता की स्थिति में 50 हजार रुपये और बीमारी की स्थिति में चिकित्सा उपचार के लिए 35 हजार रुपये तक। इस संबंध में शासनादेश जारी कर दिया गया है और यह योजना राहत एवं पुनर्वास विभाग के माध्यम से क्रियान्वित की जाएगी।


             वारी के दौरान हादसा या दुर्घटनाएं होती हैं और वारकरी घायल हो जाते हैं या दुर्भाग्य से मृत्यु हो जाते हैं। मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री ने यह फैसला उन्हें और उनके परिवार को आर्थिक मदद दिलाने के मकसद से लिया है।

Monday, 29 May 2023

आज जो भारत में रेलवे है..उसको भारत में कौन लाया ?*

 💥 *आज जो भारत में रेलवे है..उसको भारत में कौन लाया ?*


*आपका उत्तर ब्रिटिश होगा।*


*कैसा रहेगा अगर मैं कहूं कि ब्रिटिश सिर्फ विक्रेता थे, यह वास्तव में एक भारतीय का स्वप्न था।*


*भारतीय गौरव को छिपाने के लिए हमारे देश की पूर्व सरकारों के समय इतिहास से बड़ी एवं गम्भीर छेड़छाड़ की गई।*


*रेलवे अंग्रेजों के कारण नहीं बल्कि नाना के कारण भारत आयी। भारत में रेलवे आरम्भ करने का श्रेय हर कोई अंग्रेजों को देता है लेकिन श्रीनाना जगन्नाथ शंकर सेठ मुर्कुटे के योगदान और मेहनत के बारे में कदाचित कम ही लोग जानते हैं।*


*१५ सितंबर १८३० को दुनिया की पहली इंटरसिटी ट्रेन इंग्लैंड में लिवरपूल और मैनचेस्टर के बीच चली। यह समाचार हर जगह फैल गया। बम्बई (आज की मुंबई) में एक व्यक्ति को यह बेहद अनुचित लगा। उन्होंने सोचा कि उनके गांव में भी रेलवे चलनी चाहिए।*


*अमेरिका में अभी रेल चल रही थी और भारत जैसे गरीब और ब्रिटिश शासित देश में रहने वाला यह व्यक्ति रेलवे का स्वप्न देख रहा था। कोई और होता तो जनता उसे ठोकर मारकर बाहर कर देती लेकिन यह व्यक्ति कोई साधारण व्यक्ति नहीं था। यह थे बंबई के साहूकार श्रीनाना शंकरशेठ, जिन्होंने स्वयं ईस्ट इंडिया कंपनी को ऋण दिया था.. है न आश्चर्यजनक।*


*श्रीनाना शंकरशेठ का मूल (वास्तविक) नाम था जगन्नाथ शंकर मुर्कुटे, जो बंबई से लगभग १०० कि. मी. मुरबाड़ से थे और पीढ़ीगत रूप से समृद्ध थे। उनके पिता अंग्रेजों के बड़े नामी साहूकार थे। उन्होंने ब्रिटिश - टीपू सुल्तान युद्ध के समय बहुत धन अर्जित किया था। उनका एक मात्र पुत्र नाना थे। यह बालक मूँह में स्वर्ण चम्मच लेकर पैदा हुआ था लेकिन धन ही नहीं अपितु ज्ञान और आशीर्वाद का हाथ भी उसके सिर पर था। पिता ने एक विशेष अध्यापक रख कर अपने पुत्र को अंग्रेजी आदि की शिक्षा देने की भी व्यवस्था की थी। अपने पिता की मृत्यु के उपरांत, उन्होंने गृह व्यवसाय का बृहत विस्तार किया।*


*जब विश्व के अनेक देश अंग्रेजों के सामने नतमस्तक थे, तब ब्रिटिश अधिकारी नाना शंकरशेठ के आशीर्वाद के लिए अपने पैर रगड़ते थे। अनेक अंग्रेज उनके अच्छे मित्र बन गए थे।*


*बंबई विश्वविद्यालय, एलफिन्स्टन कॉलेज, ग्रांट मेडिकल कॉलेज, लॉ कॉलेज, जेजे स्कूल ऑफ आर्ट्स, बंबई में कन्याओं के लिए पहला विद्यालय व बंबई विश्वविद्यालय नाना द्वारा स्थापित किये गये थे।*


*इसलिए श्रीनाना शंकरशेठ ने बंबई में रेलवे प्रारंभ करने का विचार बनाया। वर्ष था १८४३, तब वे अपने पिता के मित्र सर जमशेदजी जीजीभाय उर्फ जे जे के पास गए। श्रीनाना के पिता की मृत्यु के उपरांत वे श्रीनाना के लिए पिता तुल्य थे। उन्होंने सर जेजे को अपना विचार बताया, उन्होंने इंग्लैंड से आए सर्वोच्च न्यायालय के न्यायाधीश सर थॉमस एर्स्किन पेरी की भी राय ली कि क्या पारले, बंबई में रेलवे का आरंभ किया जा सकता है ?*


*वे भी इस विचार से चकित थे। इन तीनों ने मिलकर भारत में इंडियन रेलवे एसोसिएशन की स्थापना की।*


*उस समय कंपनी सरकार का भारत में रेलवे बनाने का कोई विचार नहीं था लेकिन जब श्री नाना शंकरशेठ, सर जेजे, सर पैरी जैसे लोगों ने कहा कि वे इस कार्य के लिए गंभीरता से इच्छुक हैं तो उन्हें इस ओर ध्यान देना पड़ा। १३ जुलाई १८४४ को कंपनी ने सरकार को एक प्रस्ताव पेश किया।*


*बंबई से कितनी दूर तक रेल की पटरी बिछाई जा सकती है, इस पर प्रारंभिक रिपोर्ट तैयार करने की आज्ञा दी गई। उसके पश्चात "बॉम्बे कमेटी" का गठन किया गया। नाना ने कुछ अन्य बड़े अंग्रेज व्यापारियों, अधिकारियों, बैंकरों को एकत्रित किया और ग्रेट इंडियन रेलवे की स्थापना कर दी जिसे आज भारतीय रेल के नाम से जाना जाता है।*


*अंत में दिन ढल गया। दिनांक १६ अप्रैल १८५३ को मध्यान्ह ३.३० बजे ट्रेन बंबई के बोरीबंदर स्टेशन से थाना (ठाणे) के लिए रवाना हुई। इस ट्रेन में १८ डिब्बे और ३ लोकोमोटिव इंजन थे। इस ट्रेन के यात्रियों में श्री नाना शंकरसेठ एवं जमशेदजी जीजीभाय टाटा भी थे, जिसे विशेष रूप से अपनी पहली यात्रा के लिए फूलों से सजाया गया था।*


*नमन है श्रीनाना शंकरसेठ जी को 💐👏*


*कृपया यह अनमोल जानकारी अपने अन्य मित्रों व परिजनों से अवश्य साझा करें।*🙏🌹👍❤️🎉❤️


https://en.m.wikipedia.org/wiki/Jagannath_Shankarseth

Saturday, 4 March 2023

आधारकार्ड धारकांसाठी “डॉक्युमेंट अपडेट” नवीन फिचर विकसित

 आधारकार्ड धारकांसाठी “डॉक्युमेंट अपडेट” नवीन फिचर विकसित नागरिकांनी आधारकार्ड अद्ययावत करुन घ्यावे


अलिबाग:- सन 2015 पासून देशामध्ये युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यामार्फत देशातील नागरिकांना आधारकार्ड देण्यात येते. बायोमेट्रिक प्रमाणिकरणासह रहिवाशाची ओळख पटविण्यासाठी आधारकार्ड हा ओळखीचा सर्वात व्यापकपणे स्वीकारला जाणारा पुरावा आहे. नागरिकांकडून अनेक शासकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी आता आधारकार्डचा वापर केला जात आहे. यापुढे शासकीय/इतर सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपले आधारकार्ड अद्ययावत करुन घेणे आवश्यक आहे.

       ज्या नागरिकांना आधारकार्ड मिळाले आहे,परंतु 10 वर्षांमध्ये एकदाही अद्ययावत केले नाही, अशा आधारकार्ड धारकांना 'डॉक्युमेंट अपडेट' हे नवीन फिचर विकसित करण्यात आले आहे. अशा नागरिकांनी ओळखीचा पुरावा (POI) आणि रहिवासी पुरावा (POA) कागदपत्रे अद्ययावत करून त्यांचा आधार अद्ययावत करणे आवश्यक आहे. ज्या नागरिकांना 'डॉक्युमेंट अपडेट' करण्याचे आहे त्यांनी myAadhaar (ऑनलाईन) पोर्टलद्वारे किंवा कोणत्याही आधार नोंदणी केंद्राला भेट देऊन आपले आधारकार्ड अद्ययावत करुन घ्यावे, असे आवाहन असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्री.सर्जेराव म्हस्के-पाटील यांनी केले आहे.

Tuesday, 21 February 2023

Be alert

 सल्ला: अपग्रेड केलेल्या सेवांचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या Jio नंबरचे सिम कार्ड बदलण्यास सांगणाऱ्या फसव्या संदेशांपासून सावध रहा. ईमेल किंवा एसएमएसद्वारे मिळालेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. ओटीपी आणि इतर आर्थिक माहिती यांसारखी गोपनीय माहिती चोरण्यासाठी फसवणूक करणारे तुमचे डिव्हाइस मिरर करू शकतात.

Monday, 20 February 2023

भावलेले छत्रपती शिवाजी महाराज

 *छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त तीनच गोष्टी सांगितल्या जातात....!*


1. अफजलखानाचा कोथळा 

2. शाईस्तेखानाची बोटे 

3. आग्राहून सुटका


  *पण भावलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावे वाटतात....!*


1. आपल्या आईला सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज "सामाजिक क्रांती" करणारे होते...!

2. रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे "लोकपालक" राजे होते...!

3. सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे "उत्तम प्रशासक" होते...!

4. विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावूनजगवण्याची शिक्षा देणारे "पर्यावरण रक्षक" होते...!

5. समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती तो विरोध पत्करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मा पेक्षा देश मोठा हा संदेश देणारे "स्व-धर्मचिकित्सक" होते ...!

6. मुहूर्त न पाहता, अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्यारात्री सर्व लढाया करुन त्या सर्वच्या सर्व लढाया जिंकून "अंधश्रध्दा निर्मुलनाचा संदेश देणारे चिकीत्सक राजे"

7. ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी सुरु केलेली शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आहे ! "जलतज्ञ" राजे छत्रपती शिवराय!!

8. ३५० वर्षांपूर्वी दळणवळणाचेकोणतेही साधन नसताना अभेद्य असे १०० राहून अधिक गडकिल्ल्यांचे निर्माते, "उत्तम अभियंते राजे"

9. सर्व जातीधर्मातल्या मावळ्यांना समान न्याय देत सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे राजे!!

10. परस्त्री मातेसमान मानत महिलांना सन्मानाने वागवाणारे "मातृभक्त, नारीरक्षक" छत्रपती शिवराय! खऱ्या अर्थाने ते "लोकराजे" होते कारण ते धर्म जातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे स्वप्न पहात होते हीच खरी शिवशाही होती.....!

 शिवजन्मोत्सव_सोहळा🚩🙏

*ऋणानुबंध समुह अमरावती*

Featured post

Lakshvedhi