Showing posts with label .सामाजिक. Show all posts
Showing posts with label .सामाजिक. Show all posts

Wednesday, 17 December 2025

लिंगायत समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणणार

 लिंगायत समाजासाठी स्वतंत्र महामंडळ

स्थापन करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणणार

इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

 

नागपूरदि 14 :- लिंगायत समाजातील खुल्या वर्गातील समाजाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्यात येणार असल्याची माहिती इतर मागासवर्ग  बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत दिली.

 

सदस्य शिवाजीराव गर्जे यांनी म.वि.प. नियम ९७ अन्वये विधान परिषदेत या विषयी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेत सदस्य अमोल मिटकरी यांनी सहभाग घेतला.

 

मंत्री सावे यांनी सांगितलेजगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ मार्फत लिंगायत समाजाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जात आहे. लिंगायत समाजातील काही उपजाती इतर मागासवर्ग प्रवर्गात तर काही उपजाती विशेष मागास प्रवर्गात समाविष्ट आहेत. या व्यतिरिक्त लिंगायत समाजातील खुल्या प्रवर्गातील समाजाला शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी उपकंपनी स्थापन करण्याऐवजी स्वतंत्र महामंडळ स्थापनेबाबत मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणून योग्य तो निर्णय घेतला जाईलअसे मंत्री सावे यांनी अल्पकालीन चर्चेच्या उत्तरात सांगितले.

ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक

 ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

नागपूरदि. १४ : ध्वनी प्रदूषणाचे गंभीर दुष्परिणाम होत असून पर्यावरण विभाग आणि पोलीस प्रशासनामार्फत यावर कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत. याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. तथापिध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी शासनाबरोबरच नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य श्रीकांत भारतीय यांनी डीजेच्या आवाजावर नियंत्रण आणण्याबाबत नियम ९७ अन्वये अल्पकालीन सूचना उपस्थित केली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य अमोल मिटकरी यांनी सहभाग घेतला.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्याध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने मानके ठरविण्यात आली आहेत. निवासी आणि शांतता क्षेत्रामध्ये रात्रीच्या आवाजावर विशेष बंधने आहेत. याच्या उल्लंघनाबाबत तक्रार प्राप्त होताच पोलीस प्रशासनामार्फत तत्काळ कारवाई करण्यात येते. प्रदूषण रोखण्याबाबत जिल्हा पातळीवर समिती असून या समितीमध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल. तथापिशासन आणि प्रशासनामार्फत केलेल्या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याशिवाय यश येत नसल्याने ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी स्वतः नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सोलापूर जिल्ह्यात डीजेच्या वापरावर निर्बंध घालण्यासाठी चांगल्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याच पद्धतीने राज्यात सर्वत्र ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येतीलअसेही पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

0000

केंद्र सरकारच्या कायद्यानुसार मॅट्रीमोनी वेब साईट्सनी शासनाला माहिती देणे बंधनकारक

 केंद्र सरकारच्या कायद्यानुसार मॅट्रीमोनी वेब साईट्सनी

शासनाला माहिती देणे बंधनकारक

गृह राज्यमंत्री योगेश कदम

 

नागपूरदि. १४ : केंद्र सरकारच्या सायबर गुन्हे रोखण्यासाठीच्या कायद्यामध्ये २०२१ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यातील नियम ३(१) नुसार आवश्यकता भासल्यास मॅट्रीमोनी वेब साईट्सनी त्यांच्याकडील माहिती शासनाला उपलब्ध करुन देणे बंधनकारक असल्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य श्रीमती चित्रा वाघ यांनी मॅट्रीमोनी वेब साईट्सना कायद्याच्या कक्षेत आणण्याबाबत नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती.

राज्यमंत्री योगेश कदम म्हणालेसायबर गुन्हे रोखण्यासाठी केंद्र सरकारचा कायदा आहे. या कायद्यामध्ये मॅट्रीमोनी वेब साईट्सॲप यांच्यासाठी वेगळे बंधन असावेयाबाबत केंद्र सरकारकडे मागणी करण्यात येईल.

0000

Monday, 15 December 2025

#फुगेनाही #noballoons मूर्खपणाचा फुगेबहार.... ©®

 #फुगेनाही  #noballoons 

मूर्खपणाचा फुगेबहार....

©®अमृता खंडेराव.

वाढदिवस किंवा कुठलाही विशेष कार्यक्रम करताना आजकाल फुग्यांची सजावट करण्याची जोरदार पद्धत आली आहे. मागच्या महिन्यात मी एका लहान मुलाच्या वाढदिवसाला गेले होते. तिथे शेकडो फुग्यांची सजावट केली होती. दुसऱ्या दिवशी त्या फुग्यांचे गुच्छ त्यांनी घराबाहेर फेकून दिले. लग्नकार्यात तर संपूर्ण परिसर आणि स्टेज हजारो फुगे लावून सजवले जाते. 


फुग्यांचे मुख्यत्वे चार प्रकार पडतात. 

१. लँटेक्स बलून 

२. फाँईल मायलर बलून

३. हॉट एअर बलून 

४. स्पेशालिटी बलून 


लँटेक्स बलून नैसर्गिक रबरामध्ये रंग आणि काही पदार्थ घालून तयार केले जातात. त्यातील कंपोझिशनुसार त्याचे डीग्रेडेशन होण्यासाठी काही महिन्यांपासून चार वर्षांपर्यंत वेळ लागू शकतो. त्याचे तुकडे पडून ते निसर्गात तसेच साठून राहू शकतात.


फाँईल बलून नायलॉन वर मेटॅलिक कोटिंग करून तयार केले जातात आणि हे अजिबात बायोडिग्रेडेबल नसतात. यांचे 100 वर्षांपर्यंतसुद्धा विघटन होत नाही. म्हणजे तुमच्या एक दिवसाच्या हौसेसाठी तुम्ही पृथ्वीचे शंभर वर्षाचे काम वाढवून ठेवणार...


हॉट एअर बलून लाईटवेट नायलॉनपासून तयार होतात. तंबू किंवा मोठी पाकिटे बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉनपासून हे फुगे तयार होतात तर स्पेशल बलून फुगे पॉलीक्लोरोप्रेनपासून तयार केले जातात. 


विशेषतः जेव्हा ते सोडले जातात तेव्हा फुगे पर्यावरणासाठी हानिकारक असतात. फुग्यांपासून

धोकादायक कचरा बनतो. ज्यामुळे वन्यजीव (पक्षी, कासव, सागरी सस्तन प्राणी यांच्या अन्नातून फुगे पोटात गेले तर त्यांच्यासाठी फार धोकादायक असते. प्राण्यांनी गिळलेल्या फुग्यामुळे त्यांच्यामध्ये जीवघेणे अंतर्गत अडथळे निर्माण होतात‌. 


फुगे स्वस्त आहेत म्हणून सजावटीसाठी वापरले जातात परंतु ते पर्यावरणासाठी किती मोठ्या प्रमाणावर हानिकारक आहे याचा विचार केला जात नाही. फुग्यांऐवजी पाने-फुले वापरली तर ती सजावट निसर्गात पुन्हा कुजून जाईल आणि तिचा पर्यावरणाला धोका होणार नाही. 


कुणीतरी एक मूर्ख चुकीची पद्धत सुरू करतो आणि सगळे मूर्ख रांगेने ती अमलात आणायला सुरू करतात. इथे सुशिक्षित आणि अशिक्षित सगळे सारखेच मूर्खपणाच्या आहारी जातात. बऱ्यावाईटाचा कोणीच विचार करत नाही.


भारतीय सुशोभन पद्धतीत फुगे वापरण्याची प्रथा नव्हती आणि नाही. भारतीय सुशोभन पर्यावरणपूरक आहे. पाने, फुले, डहाळ्या, धान्य, रांगोळ्या वापरून आपण सजावट करत आलो आहोत. आंब्याच्या पानांची तोरणे, केळीचे खांब आणि सोपटे, गवत, आंब्याच्या डहाळ्या, कागदी पताका लावून सजावट करण्याची भारतीय पद्धत सर्वात उत्तम आहे कारण या पद्धतीत वापरले जाणारे साहित्य विघटनशील आहे. ते पर्यावरणाला कसलाही धोका पोहोचवत नाही.


आपण सजावटीसाठी जी वस्तू वापरतो तिचे विघटन होत आहे की नाही याचा विचार केला पाहिजे. फेकून दिलेले फुगे नंतर मातीमध्ये, जलस्त्रोतांमध्ये अडकून पडतात.  फॉइल फुगे तुटत नाहीत, तर लँटेक्स फुगे प्लास्टिकच्या तुकड्यांमध्ये विघटित होतात जे मायक्रोप्लास्टिक्स बनतात, माती आणि पाणी प्रदूषित करतात.


कुणाचीही नक्कल करण्यापूर्वी पर्यावरणाचा आधी विचार केला पाहिजे. उगीचच कुणीतरी सरी घातली म्हणून आपण दोरी घालण्यात अर्थ नाही. नवीन पिढीसाठी आपण आधीच प्रचंड प्रदूषित जमीन पाणी हवा निर्माण करून ठेवली आहे. त्यात वेगवेगळ्या चुकीच्या पद्धती वापरून आणखी भर घालून ठेवू नये. 


प्रदूषणाचा महाराक्षस सर्व बाजूंनी पृथ्वीला वेढत आहे त्यात आता ही फुगेबहार आली आहे. आपल्या क्षणिक हौसेसाठी आपण एवढे मोठे प्रदूषण निर्माण करून ठेवत आहोत याचे सुशिक्षित लोकांना तरी भान आहे का? 

©®अमृता खंडेराव.


(ही पोस्ट सर्वांनी शेअर केली पाहिजे.)

Sunday, 23 November 2025

झिरोधा आणि ‘रेनमॅटर फाउंडेशन’ या संस्थांच्या माध्यमातून पर्यावरणीय व सामाजिक उपक्रम

 झिरोधा आणि रेनमॅटर फाउंडेशन’ या संस्थांच्या माध्यमातून पर्यावरणीय व सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. रेनमॅटर फाउंडेशनमार्फत हवामान बदल व पर्यावरणीय ऱ्हास या समस्यांवर कामे करण्यात येतात. यासाठी झिरोधा ही कंपनी आपल्या नफ्यातील 10 टक्के निधी सामाजिक उत्तरदायित्व व पर्यावरणीय कामांसाठी राखीव ठेवते. या राखीव निधीतून झिरोझाने संस्थेच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त 100 कोटी रुपये गुंतवणुकीचा झिरोधा रीवाइल्डिंग फंड’ जाहीर केला आहे. या उपक्रमांतर्गत देशातील पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्वाच्या परिसरातील निसर्गाचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. त्यामध्ये देशात विविध ठिकाणी मोनोकल्चर वृक्षलागवडी ऐवजी जैवविविधता टिकवणाऱ्या पद्धतीने निसर्गाचा समतोल राखण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातील 800 एकरच्या प्रकल्पाचा समावेश आहे.

Monday, 8 September 2025

भ .बुद्ध एक भौतिकशास्त्रज्ञ*

 *भ .बुद्ध एक भौतिकशास्त्रज्ञ*


*अनिल वैद्य,*

माजी न्यायाधीश 


आधुनिक विज्ञानाच्या इतिहासात अणू, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यांच्या शोधाने विश्वाचे रहस्य समजून घेण्याचे नवीन दालन उघडले. 1897 मध्ये जे. जे. थॉमसन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला, तर 1917–1920 मध्ये अर्नेस्ट रदरफोर्ड यांनी प्रोटॉनचा शोध घेतला. 20व्या शतकात वैज्ञानिकांनी अणूचे स्वरूप व त्यातील कणांचे गतीमान अस्तित्व सिद्ध केले.

परंतु, आश्चर्य म्हणजे 2600 वर्षांपूर्वी तथागत बुद्धांनी कोणत्याही उपकरणाशिवाय, फक्त ध्यानाच्या सामर्थ्याने आणि अंतर्ज्ञानाच्या प्रकाशाने, हेच सत्य प्रत्यक्ष अनुभवलं होतं.

त्यांनी सांगितले –

“सब्बो पज्जलितो लोको, सब्बो लोको पकम्पितो।”

(संपूर्ण लोक प्रज्वलित आहे, संपूर्ण लोक प्रकंपित आहे.) 

लोक म्हणजे विश्व.

भौतिक जगाचे स्वरूप  कलाप सिद्धांत

बुद्धांच्या अनुभवांतून उमगले की आपल्याला दिसणारे शरीर व जग ठोस नाही. ते केवळ तरंग आहेत,हे भासमान सत्य आहे (Conventional Truth) 

बुद्ध म्हणतात परमसत्य असे की जगातील सर्व पदार्थ सूक्ष्मतम घटकांनी  (कलापांनी) बनलेले आहेत.

कलाप म्हणजे अणूपेक्षाही सूक्ष्म कण

बुद्धांनी कलाप हा शब्द वापरला. बुद्ध म्हणतात

तो कोणताही स्थिर कण नसून तरंगांचा पुंज आहे.

एका कलापात आठ घटक – पृथ्वी, जल, अग्नी, वायु व त्यांच्या गुणधर्मांचा समूह असतो. 

त्यामुळे त्याला अष्टकलाप असे म्हणतात,

हे कलाप प्रतिक्षण उत्पन्न होतात व नष्ट होतात. त्यामुळे वस्तू आपल्याला ठोस भासते पण वास्तविक तो बुड बुदबुदा असतो. बुद्धांनी याला संततिघन म्हटले.

 विज्ञानाने जे "Sub-atomic Vibrations" म्हणून मांडले, त्याचा अनुभव बुद्धांनी प्रत्यक्ष ध्यानातून घेतला होता.

आता आधुनिक काळात 

आधुनिक भौतिकशास्त्र मानते की विश्वातील प्रत्येक कण सतत गतिशील आहे. अणूतील इलेक्ट्रॉन प्रोटॉन हे स्थिर नसून अखंड गतीत आहेत. फिरत आहेत.

बुद्धांनी याच सत्याला अनित्यता(Impermanence) असे नाव दिले.

त्यांच्या मतेप्रत्येक वस्तू उदय–व्ययधर्मी आहे.

उत्पन्न होणे व नष्ट होणे, अनित्य आहे हीच तिची प्रकृती आहे. 

म्हणूनच शरीर वा जग काहीही शाश्वत नाही.

यामुळे बुद्धांचे म्हणणे विज्ञानाशी असलेले साम्य आपल्याला ठळकपणे दिसते. नव्हे बुद्धाने ते 2600 वर्ष पूर्वी शोधले.

आधुनिक विज्ञान सत्य शोधण्यासाठी प्रयोगशाळेचा वापर करते.

बुद्धांनी  मन व शरीर हीच प्रयोगशाळा मानले.

बुद्धाने सतीपठ्ठान हा उपदेश केला. आणापानं सती व चार स्मृती उपस्थान सांगितले. ही बुद्धाची ध्यान पद्धती आहे.

यामध्ये ध्यान करणारा आपले श्वास, संवेदना, विचार व प्रतिक्रिया यांचे निरपेक्ष निरीक्षण करतो.

यामुळे त्याला भासमान सत्यापलीकडे जाऊन सूक्ष्म परमसत्याचा अनुभव येतो.

शरीर व चित्त हे तरंगांचे समूह आहेत, हे प्रत्यक्ष अनुभूतीत उतरते.

बुद्धांनी सांगितले की "दर्शन म्हणजे मत नव्हे, तर जाण्यता आहे."

म्हणजेच, सत्य हे मतांत, कल्पनांत वा परंपरेत नाही, तर प्रत्यक्ष अनुभूतीत आहे. 

बुद्ध – मनोविज्ञानाचे जनकसुद्धा होते.

बुद्धांचे योगदान फक्त भौतिक सत्यापुरते मर्यादित नाही, तर ते मानवी मानसशास्त्राचेही जनक आहेत.

त्यांनी दुःखाचे मूळ तृष्णा व अज्ञान यात शोधले.

त्यांनी मानवी स्वभाव बदलण्याचा मार्ग – आर्य अष्टांगिक मार्ग – दिला.

त्यांनी ध्यानाद्वारे मनाचे शुद्धीकरण व विचारांचे रूपांतर करण्याची पद्धत जगाला दाखवली.

आज आधुनिक मानसशास्त्र "Mindfulness", "Behavioural Therapy" यांची चर्चा करते. पण त्यांची मूळ प्रेरणा बुद्धांच्या ध्यानशास्त्रात अर्थात सतीपठ्ठान मध्ये आहे. भौतिक व मानसिक जगाची 

साधन प्रयोगशाळा मन व शरीर हेच आहे

आज विज्ञानाने जे सिद्ध केले आहे ते बुद्धांनी आधीच अनुभवलं आहे.

म्हणून बुद्धांचे विचार सिद्ध करण्यासाठी विज्ञानाची आवश्यकता नाही. उलट विज्ञानालाच बुद्धांच्या अनुभूतीतून दिशा मिळते.

बुद्ध हे केवळ धर्मसंस्थापक नव्हते; ते जगातील पहिला महान भौतिक, वैद्यक आणि महान मनोवैज्ञानिक होते.

त्यांनी जगाला शिकवले की 

सत्य हे  प्रत्यक्ष अनुभूतीत आहे.

 अनेक वैज्ञानिक, तत्त्वज्ञ आणि न्यूरोसायन्स तज्ञांच्या दृष्टिकोनातून बुद्धांच्या शिकवणुकींचे वैज्ञानिक दृष्ट्या आकलन, त्यांचे गुण, आणि त्यांच्या विचारांच्या सुव्यवस्थितपणे संज्ञानात्मक आणि भौतिकशास्त्रीय अर्थांची चर्चा केली आहे:

प्रसिद्धवैज्ञानिकांच्या बुद्धा विषयीच्या टिप्पणी अशा की,

निल्स बोहर (Niels Bohr) यांनी, आणि

जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांनी,आणि  अल्बर्ट आइंस्टीन यांनी बुद्धांच्या विचारांमध्ये आधुनिक भौतिकशास्त्राशी साम्य असल्याचे स्पस्ट केले आहे.

दलाई लामा यांनी विज्ञान आणि बुद्धधर्म यांची तर्कशुद्ध तुलना केली आहे.

“मी माझा विश्वास विज्ञानाप्रमाणेच बुद्धधर्मही सत्याचा शोध अनुभवातून घेण्याचा मार्ग मांडतो... जर विज्ञानाने निर्विवादपणे बुद्धधर्मातील कोई गोष्ट खोटी ठरवली तर आम्ही ती स्वीकारून त्याला सोडून द्यायला तयार आहोत.३. तत्त्वज्ञ आणि न्यूरोसायन्समध्ये संतुलन

बी ॲलन वाल्स 

(B. Alan Wallace) म्हणतात की बुद्धधर्म एक सुव्यवस्थित तत्त्वज्ञ आणि अनुभव-आधारित प्रणाली आहे, विशेषतः मानसिक अवस्थांवर केंद्रित आहे (ज्ञान-मनोविज्ञान) — जे विज्ञानाला पूरक आहे.

रॉबर्ट तुरुमन 

(Robert Thurman) बुद्धाच्या ध्यानाला “आंतरिक विज्ञान” (inner science) म्हणतात आणि चेतनेच्या अभ्यासाला भौतिकवादाच्या सीमापलीका म्हणून 

पाहतात.

ट्रिंग जुहान थूआन 

(Trịnh Xuân Thuận,) खगोलशास्त्रज्ञ, बुद्धधर्म आणि विज्ञान यांना समांतर ज्ञानाचे दोन मार्ग मानतात आणि “उभय दृष्टिकोनांत संवाद फायद्याचा ठरू शकतो” असा विश्वास व्यक्त करतात.

या वरून तथागत बुद्ध किती महान संशोधक होते याची कल्पना यावी! 


संदर्भ

1. संयुक्त निकाय, १.१.१६८, उपचालासुत्त

2. क्या बुद्ध नास्तिक थे? गोयंका, एस. एन

पुस्तक : क्या बुद्ध नास्तिक थे.?पृष्ठ90लेखक : एस एन गोयंका


*अनिल वैद्य* 

✍️✍️✍️✍️

Friday, 29 August 2025

-खासगी भागीदारीद्वारे Mpower चे कार्य म्हणजे

 मुलांच्या कुटुंबियांनाही समुपदेशनाची सुविधा दिली जाते.  पालकांचे समुपदेशन केल्याने मुले घरी परतल्यावर त्यांना  पुर्वीप्रमाणे मोकळे वातावरण मिळेल हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.  मासूम प्रकल्प हा राज्यातील बालसंगोपन संस्थांमध्ये मानसिक आरोग्य सेवांना बळकटी देणारा ठरला असून मुलांच्या पुनर्वसन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

या प्रकल्पासंदर्भात Mpower व आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थापिका व अध्यक्षा नीरजा बिर्ला म्हणाल्या की,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील संस्थांमध्ये राहणाऱ्या मुलांच्या मानसिक आरोग्याला दिलेले प्राधान्य हे दूरदर्शी नेतृत्वाचे द्योतक आहे. या सार्वजनिक-खागी भागीदारीद्वारे Mpower चे कार्य म्हणजे अडचणीत असलेल्या व विधी संघर्षीत मुलांना त्वरित ट्रॉमा रिलिफ व सर्वसमावेशक मानसशास्त्रीय आधार देणे. प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञांच्या मदतीने विद्यमान प्रणालीला बळकटी देऊन मुलांच्या पुनर्वसन व समाजात पुन्हा समावेशक होण्यासाठी सुरक्षित व सहाय्यकारी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

Saturday, 23 August 2025

पिठोरी पूजन (मातृदिन) : संततीसाठी मातृशक्तीची प्रार्थना 🌸

 पिठोरी पूजन (मातृदिन) : संततीसाठी मातृशक्तीची प्रार्थना 🌸


भारतीय संस्कृतीत "माता" हाच सृष्टीचा मूलाधार मानला गेला आहे. संततीचे कल्याण, आरोग्य आणि दीर्घायुष्य यासाठी माता जी उपासना करते, त्यात पिठोरी अमावस्या (म्हणजेच मातृदिन) विशेष स्थान आहे. हा दिवस केवळ धार्मिक व्रत नसून आईच्या निःस्वार्थ भावनेचे व त्यागमय शक्तीचे प्रतीक आहे.



---


📜 ऐतिहासिक पार्श्वभूमी


भाद्रपद कृष्ण पक्षातील अमावस्येला पिठोरी अमावस्या पाळली जाते. याची मुळे वैदिक व पुराणकालीन परंपरेत दिसतात.


स्कंद पुराणात व्रतकथेचे वर्णन असून यात "संततीचे रक्षण व वृद्धी" हा प्रमुख उद्देश आहे.


"पिठोरी" या शब्दाचा अर्थ पीठापासून घडविलेली मूर्ती. या दिवशी देवीच्या 64 योगिनींची पीठातील प्रतिकात्मक मूर्ती घडवून त्यांची पूजा केली जाते.


पिठोरी अमावस्या ही स्त्रीप्रधान परंपरा आहे. माता आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी देवतेचे स्मरण करून निसर्गाशी एकरूप होते.




---


🌺 पूजनकथा


लोकमान्यतेनुसार एकेकाळी एका राणीला अनेक मुलं असूनसुद्धा त्यांचा अकाली मृत्यू होत असे. दुःखाने ग्रस्त राणीला एका ऋषींनी "पिठोरी व्रत" सांगितले. राणीने पीठापासून 64 योगिनींच्या प्रतिमा बनवून मातृदेवतेची पूजा केली. तिच्या प्रार्थनेने मुलांचे रक्षण झाले.

या कथेवरून पिठोरी पूजन ही परंपरा प्रचलित झाली.



---


🪔 पूजन पद्धती


1. स्नान व संकल्प – स्त्री उपवास करून व्रताचा संकल्प घेते.



2. पीठाची मूर्ती निर्मिती – 64 योगिनी व मातृदेवता यांच्या पीठातील मूर्ती किंवा प्रतीके बनवली जातात.



3. पूजन व नैवेद्य – फुले, दुर्वा, अक्षता, हळद-कुंकू अर्पण करून देवीला नैवेद्य दाखविला जातो.



4. कथा वाचन – संध्याकाळी व्रतकथा ऐकली जाते.



5. आरती व उद्यापन – देवीची आरती करून व्रताची सांगता केली जाते.





---


🌼 धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व


संततीच्या दीर्घायुष्य, आरोग्य व यशासाठी आईची प्रार्थना.


"मातृदेवो भव" या वेदवचनाची अनुभूती.


मातृत्वाचा त्याग, माया व जपण्याची भावना अधोरेखित करणारा दिवस.


महिलांच्या एकत्र येऊन केलेल्या सामूहिक पूजनामुळे सामाजिक ऐक्य वृद्धिंगत होते.




---


🧭 आधुनिक संदर्भ


आज पाश्चात्य पद्धतीने "मदर्स डे" एका दिवसापुरता साजरा होतो. पण आपल्या परंपरेतील पिठोरी अमावस्या हा खरा मातृदिन आहे.

तो केवळ आईवर प्रेम व्यक्त करणारा दिवस नाही, तर आईने मुलांच्या कल्याणासाठी उपवास, प्रार्थना आणि व्रत करणे ही त्याची वैशिष्ट्ये आहेत.



---


🌿 निष्कर्ष


पिठोरी पूजन हा फक्त धार्मिक विधी नसून आईच्या उदात्ततेचे आणि मातृशक्तीच्या सामर्थ्याचे सांस्कृतिक दर्शन आहे. संततीसाठी आई जेव्हा देवीचे स्मरण करून प्रार्थना करते, तेव्हा ती स्वतः देवतेचे रूप धारण करते. म्हणूनच पिठोरी अमावस्या हा दिवस मातृदिन म्हणून भारतीय संस्कृतीत विशेष महत्वाचा ठरतो.



---

ज्योती प्रकाश म्हात्रे

ग्रंथपाल

स्व प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय

Monday, 28 July 2025

अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत वारसाला नोकरी देण्यासाठी कार्यपद्धती तयार करा, महत्वाचे save and share pl

 अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत वारसाला नोकरी देण्यासाठी

कार्यपद्धती तयार करा

-         उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम

 

 मुंबईदि. २५ : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गतअत्याचार प्रकरणांमध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत वर्ग ३ आणि वर्ग ४ च्या पदावर प्राधान्याने नियुक्ती देण्याबाबतची कार्यपद्धती सामाजिक न्याय विभागाने तयार करावीअसे निर्देश अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिले.

उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याच्या वारसाला नोकरी देण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव रवींद्र गोरवेमुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकीपुणे विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरेअवर सचिव सतीश खैरमोडेविभागातील संगीता शिंदेकिशोर बडगुजरगणेश भदानेसंजय कोठेशिवानंद भिनगीरे यांच्यासह सामाजिक न्याय विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपाध्यक्ष श्री. मेश्राम म्हणालेया प्रक्रियेसाठी प्रादेशिक उपआयुक्त कार्यालयाने जिल्हानिहाय वर्ग ३ आणि वर्ग ४ मधील रिक्त पदांची यादी सर्व प्रादेशिक उपायुक्तांनी संकलित करून ती समाज कल्याण आयुक्तालयाकडे १५ दिवसात सादर करावी. काही जिल्ह्यात वारसांना नोकरी देण्यात आली आहे ती कोणत्या आधारावर दिली आहे त्याप्रमाणे इतर जिल्ह्यात याबाबत का कार्यवाही करण्यात आली नाही याबाबतचा अहवाल मागवावा. सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत बैठक घेण्यात यावी. इतर राज्यामध्ये या कायद्याची अंमलबजावणी कशी करण्यात आली किंवा नेमके काय दिशानिर्देश आहेत त्याची तुलनात्मक व अभ्यासपूर्ण माहिती घ्यावी व ती पुढील बैठकीत सादर करावी, तसेच पुढील बैठकीस संपूर्ण तपशीलवार माहिती, अहवाल अभिप्रायासह महिनाभरात घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Thursday, 24 July 2025

आपलं मंत्रालय' गृहपत्रिका अंकाचे

 आपलं मंत्रालयगृहपत्रिका अंकाचे

प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांच्या हस्ते प्रकाशन

 मुंबईदि. २१ : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या "आपलं मंत्रालय"  या  गृहपत्रिकेच्या जून २०२५ या अंकाचे प्रकाशन  प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांच्या हस्ते झाले.

यावेळी  सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव (मावज) अजय भोसलेमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे  संचालक (माहिती)(प्रशासन) हेमराज बागुलउपसंचालक(प्रशासन) गोविंद अहंकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

            'आपलं मंत्रालयगृहपत्रिकेच्या अंकामध्ये पर्यावरण धोरण२०२४ अंतर्गत शासनाची भूमिका, पर्यावरण रक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने शासनाच्या विविध योजनांची आणि उपक्रमांची माहिती, तसेचपर्यटनाशी निगडित आवश्यक पायाभूत सुविधापर्यावरणपूरक पर्यटन विकासव स्थानिक समुदायांच्या सहभागाची भूमिका यावर आधारित सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

मंत्रालयातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांनी स्वत: भेट दिलेल्या ठिकाणांची माहिती आणि त्यांच्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित प्रवासवृत्तांताचा समावेश या विशेषांकात करण्यात आलेला आहे.                                                                          

जिवतीच्या प्रतिमेचे पुजन आणि त्याचा अर्थ कोण हि जिवती? हिच्या पूजनाचा हेतू काय?


जिवतीच्या प्रतिमेचे पुजन आणि त्याचा अर्थ

कोण हि जिवती? हिच्या पूजनाचा हेतू काय?


 जिवतीच्या प्रतिमेचे पुजन आणि त्याचा अर्थ

कोण हि जिवती? हिच्या पूजनाचा हेतू काय?


आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा-जिवंतिका पूजन सुद्धा करतात. 


दिवा हे ज्ञानाचं, वृधिंगतेच प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप. तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळेच याला वंश वृद्धीचं प्रतीक मानतात. या प्रतीकाचं पूजन म्हणजेच दीपपूजन


दुसरी पूज्य देवता म्हणजे जिवती. 


जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेच पूजन मातृशक्ती कडून केल्या जातं व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या, वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचे?


जिवती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा- जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध - बृहस्पती (गुरु) यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पुजले जाते त्याची कारण मिमांसा...


प्रथम भगवान नरसिंहचं का?


भगवान विष्णूंचा चवथा अवतार असलेले नरसिंह, आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट  झाले. हि कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशिपू पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पुजले जातात. 


म्हणजेच...

 

नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी  


त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण-


यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्हीपण श्रावणातील  आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन  करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल कि या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळात असतांना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या- बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरटपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असतांना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पुजला जातो. 


म्हणजेच... 


कालियादमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळतांना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्हीदेव बालकांचे रक्षण करतात म्हणून जिवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान. 


नंतर येतात त्या जरा व जिवंतिका -


जरा व जिवंतिका या यक्ष गणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मगधनरेश बृह्दरथ याला दोन राण्या असतात. दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते. परंतु राजाला पुत्र/ पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतीत असतो. याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट  करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा- अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अभ्राकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोनीही शकलं सांधते. जरा ते सांधलेले अभ्रक संध्यासमयास बृह्दरथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रीत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मन देतो. त्याच प्रमाणे जारदेवतेचा वार्षिक महोत्सव सुरु करतो, अशी हि जरा देवी. जारेंचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवतात. 


प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध व बृहस्पती -


बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो. तर बृहस्पती (गुरु) वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, अध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते. 


बुधाचं वाहन हत्ती - हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने, व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरुन लक्षात येते. 


बृहस्पतीचं वाहन वाघ - हे अहंकाराचा प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या, गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. 


म्हणूनच बुध - बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्थान मिळालं. 


प्रथम रक्षक देवता.


नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता.


आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा जिवती प्रतिमेचा क्रम. 


एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन. जगातील सर्व प्राणिमात्रांच्या उज्वल भविष्याची, रक्षणाची प्रार्थना ...


म्हणजेच जिवती पुजन 


जरे जीवन्तिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी।

रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते।।


संग्रहित


।। इदं न मम ।।

🙏🏼 🌹 🙏🏼

Tuesday, 22 July 2025

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कांदिवली पूर्व विधानसभेत आयोजित रक्तदान संकल्प शिबिराचा शुभारंभ

 मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कांदिवली पूर्व विधानसभेत आयोजित रक्तदान संकल्प शिबिराचा शुभारंभ


आमदार भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

           यावेळी आमदार भातखळकर म्हणाले कीदेवेंद्रजींच्या सक्षम आणि खंबीर नेतृत्वात महाराष्ट्र गतीने प्रगती करत आहे. त्यांच्या हातून असेच लोककल्याणाचे कार्य घडत राहो आणि आई जगदंबेच्या कृपेने त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थन केली.

           सेवा आणि संघटन हे भारतीय जनता पक्षाचे वैशिष्ट्य आहे. सेवेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणेत्यांचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडवणे अशी विविध कामे आपण भाजपाच्या माध्यमातून करत असतो असे आमदार भातखळकर यांनी सांगितले.

           यावेळी आमदार भातखळकर यांच्या हस्ते रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदाते आणि आयोजकांचेही आमदार भातखळकर यांनी अभिनंदन केले.   

                              

Tuesday, 1 July 2025

बुड्ढीलेन सोशल ग्रुप ने घाटी अस्पताल के गरिब मरिजों के लिए जमा किया 777 रक्त

 बुड्ढीलेन सोशल ग्रुप ने घाटी अस्पताल के गरिब मरिजों के लिए जमा किया 777 रक्त


रक्तदान शिविर मंे दिखाई दी गंगा जमनी संस्कृति, पुरुषो सहित महिलाओं ने भी किया रक्तदान

 

शहर संवाददाता। छत्रपति संभाजीनगर

बुड्ढीलेन सोशल ग्रुप की ओर से पिछले साल की तरह इस साल भी घाटी अस्पताल मंे पिछले तीन महीने से रक्त की किल्लत के कारण गरिब मरिजों को दिक्कतो को परेशानी हो रही थी इस बात के मद्देनजर रविवार 29 जून को जामा मस्जिद के इनाम हॉल में रक्तदान शिविर आयोजित किया गया था । जिसमंे रात 10 बजे तक 777 रक्तदाताओं ने रक्तदान किया।

जानकारी अनुसार पिछले साल 605 युवाओं ने रक्तदान किया था। इस साल इसमें 172 की बढोतरी हुई। यानी 18 साल की आयु से 58 साल के वरिष्ठ नागरिक और 20 महिलाओं ने रक्तदान करने से इस बार 777 रक्तदान किया गया।

रक्तदान शिविर मंे गंगा जमनी संस्कृति दिखाई दी। हर जाती धर्म के नागरिक ने इसमें शामिल होकर केवल लोगों की जान बचाने के लिए रक्तदान करने की बात कही। सुबह 10 बजे से शुरु होने वाले शिविर के लिए डयुटी और दूसरे शहर जाने वालो ने जिम्मेदारो को सुबह 8.30 बजे ही फोन पर रक्तदान करने का अनुरोध किया। जिस पर तत्काल दो डाक्टरों को शिविर मंे पहुुंचाकर उनका रक्त लिया गया। शिविर के लिए घाटी अस्पताल के तीन टीम की व्यवस्था की गई थी। जिसमंे एक टीम ने दोपहर तक और दोपहर के बाद 2 टीम ने रक्त लिया। एक टीम में 10 से 12 सदस्य शामिल थे। शिविर में रक्तदान के लिए महिलाएं भी पहुंची । जिनके लि



ए पर्दे की व्यवस्था की गई थी।


कहां कहां से पहुंचे रक्तदाता

बुड्ढीलेन सोशल ग्रुप के रक्तदान शिविर में शहर के कोने कोने सहित दौलताबाद, खुलताबाद, गंगापूर और दिल्ली से आए हुए एक यात्री ने भी रक्तदान किया। शिविर मंे 18 से अधिक विभिन्न जाती के युवाओं ने भी केवल घाटी अस्पताल के गरिब मरिजों को रक्तदान करने के उद्देश से पहुंचे। युवाओं से शिविर मंे आने के बारे में पुछने पर बताया गया कि सोशल मीडिया पर पुलिस आयुक्त प्रवीण पवार सहित कई मान्यवरो की रक्तदान की अपील पर पहुंचे। रक्तदान शिविर को सफल बनाने के लिए सोशल ग्रुप के 150 से अधिक सदस्यो ने परिश्रम किया।

शिविर के दौरान घाटी अस्पताल के अधीष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे, उप अधीष्ठाता डॉ सोनवणे, आईआरसी के अध्यक्ष एड फैज सैयद के अलावा मान्यवरो ने पहुंचकर युवाओं का हौसला बढाया।

Wednesday, 11 June 2025

पर्यावरणाला हो आणि प्लास्टिकला नो म्हणा -

 पर्यावरणाला हो आणि प्लास्टिकला नो म्हणा - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

श्रीमती मुंडे म्हणाल्या कीपर्यावरणाचे संवर्धन हा एक महत्त्वाकांक्षी विषय असून आपण सर्वांनीच  पर्यावरणाच्या संवर्धनाची आवड जोपासणे आवश्यक आहे. शासकीय व खासगी कार्यालयात सर्व कामकाजात कागद मोठ्या प्रमाणात वापरला जातोम्हणून पर्यावरण संवर्धनासाठी आपण सर्वप्रथम  मंत्रालयातील कामकाज कागद विरहित करून आपले पहिले पाऊल उचलूया. पर्यावरणाबद्दलची ही जनजागृती आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवायची आहे. इतरांना जागृत करण्यासाठी सर्वप्रथम आपण जागरूक राहायला हवे. 

पेपर व प्लास्टिकचा वापर  टाळायला हवा. प्लास्टिकच्या पिशवी ऐवजी कापडी पिशवी वापरात आणावी. प्लास्टिकला नो व पर्यावरणाला हो म्हणून आज पासून पर्यावरण संवर्धनाची शपथ घेण्याचे आवाहन मंत्री श्रीमती मुंडे यांनी केले.

Thursday, 5 June 2025

सिंगल यूज प्लास्टिक वापरास नकार, हाच पर्यावरण संवर्धनाला होकार

 सिंगल यूज प्लास्टिक वापरास नकारहाच पर्यावरण संवर्धनाला होकार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वातावरण बदल प्रचार मोहिमेचा शुभारंभ

मुंबईदि. ४: वातावरण बदलामुळे होणारी हानी पर्यावरण संवर्धनातून निश्चितच टाळता येणार आहे. पर्यावरणाचा सर्वात मोठा शत्रू प्लास्टिक असून सिंगल यूज प्लास्टिक वापरास नकारहाच पर्यावरण संवर्धनाला होकार असल्याचे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. या वर्षी शासनाच्यावतीने १० कोटी वृक्षलागवड मोहिमेत सर्वांनी सहभाग घेत पर्यावरण संवर्धनात आपले योगदान द्यावेअसे आवाहनही त्यांनी केले.

भामला फाऊंडेशन आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बांद्रा येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वातावरण बदलावर जागतिक प्रचार मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अँम्फी थिएटर येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमास गोवा राज्याचे परिवहन मंत्री मौविन गोडिन्होमुंबई महापालिका सह आयुक्त दिनेश पल्लेवाडभामला फाउंडेशनचे आसिफ भामला अभिनेत्री रवीना टंडनगोदरेज कंपनीचे नादिर गोदरेजगीतकार स्वानंद किरकिरे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणालेकमीत कमी प्लास्टिक वापरून पर्यावरणाची होणारी हानी टाळावी. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहकार्याने विघटनकारी प्लास्टिक निर्माण करणे शक्य आहे. प्लास्टिकला पर्याय अशा विघटनकारी प्लास्टिक निर्मिती करावी. राज्यात राबविण्यात येणाऱ्या वृक्षलागवड मोहिमेत केवळ वृक्ष लागवड करण्यात येणार नसून वृक्ष जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. या मोहिमेत वृक्षांचे संवर्धनही करण्यात येईल.

देशातील सर्वात मोठे सांडपाणी प्रक्रियेचे जाळे मुंबईत तयार करण्यात येत असून भविष्यात मुंबईतील समुद्रात जाणारे संपूर्ण सांडपाणी प्रक्रिया केलेले असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०३० पर्यंत नेट झिरो चे उद्दिष्ट आहे. देशाच्या एकूण ऊर्जे गरजेपैकी ५० टक्के ऊर्जा पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांकडून मिळविण्याचा मानसही आहे. यामध्ये महाराष्ट्र पुढे असून राज्याने २०२६ पर्यंत कृषी क्षेत्राची १६ हजार मेगावॉट ऊर्जा गरज सौर ऊर्जेपासून भागविण्यासाठी काम सुरू केले आहे. राज्यातील महानगरांमधील संपूर्ण सार्वजनिक परिवहन सेवा ग्रीन ऊर्जेवर आणण्यात येत आहे. मुंबईत याची सुरुवातही करण्यात आली आहे. तसेच मुंबई शहरातील संपूर्ण  परिवहन सेवेचे तिकीट सिंगल तत्वावर आणण्यात येत आहेअसेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

कार्यक्रमादरम्यान पर्यावरण संवर्धन आणि सिंगल यूज प्लास्टिक वापर बंदी जनजागृतीबाबत अभिनेता अजय देवगण यांच्यावर चित्रित प्यासा या प्रचार मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला.

Sunday, 18 May 2025

वाघा बॉर्डरवर नवीन भारतीय ध्वज: 360 फूट उंच. त्याची किंमत 3.5 कोटी आहे. 55 टन स्टील

 🇮🇳🙏🌸

वाघा बॉर्डरवर नवीन भारतीय ध्वज: 360 फूट उंच. त्याची किंमत 3.5 कोटी आहे. 55 टन स्टील वापरले आहे. झेंडा-पोल बसविण्यासाठी क्रेनसाठी 60 लाख रुपये दिले. ध्वजाची रुंदी 120 फूट आणि उंची 80 फूट आहे.  ध्वज-पोल 360 फूट उंच आहे. 12 ध्वज सुटे ठेवण्यात आले आहेत. हा जागतिक विक्रम आहे.*

*हे आमच्या जमिनीवर 200 मीटर आत उभारलेले आहे. ध्वजारोहण प्रत्येक भारतीयासाठी कौतुकास्पद आहे. तुमच्या ग्रुपवर शेअर करा.*

 *अभिमान आहे भारतीय

 असल्याचा.*

*जय हिंद*


Wednesday, 7 May 2025

दशावतार नावाचे एक व्रत

 ❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

     *🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹*

                  *🔸दशावतार.🔸*


*------------------------------------------*

*🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.*

*------------------------------------------*


*दुष्टांचा नाश, सज्जनांचे रक्षण आणि धर्माची स्थापना यांसाठी परमेश्वर युगायुगांत निरनिराळे अवतार घेतो, असे भगवद्‌गीतेत म्हटले आहे. हे दहा अवतार विष्णूचे आहेत. शिव, गणपती, देवी इ. देवतांनीही अवतार घेतले असल्याच्या अनेक कथा पुराणांत आहेत. विष्णूच्या दहा अवतारांपैकी मत्स्य, कूर्म, वराह, वामन व परशुराम या अवतारांची कथाबीजे वैदिक वाङ्‌मयात मिळतात. पुराणांनी विष्णूचे प्रमुख दहा अवतार मानले असले, तरी भागवतपुराणात विष्णूचे चोवीस अवतारही सांगितले आहेत.*


*पुराणांत दशावतारांच्या जन्मतिथी सांगितल्या आहेत. त्या अशा (१) मत्स्य—चैत्र शुद्ध तृतीया, (२) कूर्म—वैशाख पौर्णिमा, (३) वराह—भाद्रपद शुद्ध तृतीया, (४) नरसिंह—वैशाख शुद्ध चतुर्दशी, (५) वामन—भाद्रपद शुद्ध द्वादशी, (६) परशुराम—वैशाख शुद्ध तृतीया, (७) राम—चैत्र शुद्ध नवमी, (८) कृष्ण—श्रावण वद्य अष्टमी, (९) बुद्ध—आश्विन शुद्ध दशमी, (१०) कल्की—श्रावण शुद्ध षष्ठी.*


*विष्णूने हे दहा अवतार कशासाठी घेतले यासंबंधी पुराणांत अनेक कथा आढळतात. मत्स्यावतार- शंखासुराला मारण्यासाठी आणि प्रलयकाळी मनूचे रक्षण करण्यासाठी, कूर्मावतार- देव व दैत्य मंथन करीत असता मंदार पर्वताला आधार देण्यासाठी, वराहावतार- हिरण्याक्ष राक्षसाचा वध करून पाण्यात बुडणाऱ्या पृथ्वीला वर काढण्यासाठी, नरसिंहावतार- हिरण्यकशिपूचा वध करून प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी, वामनावतार- तीन पावलात बळीचे सर्वस्व हरण करून बळिराजाला पाताळात लोटून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी, परशुरामावतार- सहस्रार्जुनाला मारण्यासाठी आणि दुष्ट क्षत्रियांचा नाश करण्यासाठी, रामावतार- रावणादि राक्षसांचा नाश करण्यासाठी, कृष्णावतार–कंसादी दुष्टांचा वध करण्यासाठी, बुद्धावतार- यज्ञहिंसेचा अतिरेक थांबवून अहिंसेचे तत्त्व प्रतिपादन करण्यासाठी व कल्कीचा अवतार- म्लेंच्छांदी दुष्टशक्तींचा नाश करून धर्मस्थापना करण्यासाठी. हा शेवटचा कलियुगाच्या शेवटी होणार आहे, असे कल्कीपुराणात म्हटले आहे.*


*दशावतारांची ही कल्पना उत्क्रांतिवादावर आधारित आहे, असे एक मत आहे, तर ॲनी बेझंट यांनी आपल्या अवताराज  (१९२५) या पुस्तकात अवतारानुसार वेगवेगळी युगे मानली आहेत. गीतगोविंदकार जयदेवाने श्रीकृष्ण हा श्रेष्ठ देव मानून त्याचे दहा अवतार सांगितले आहेत. कृष्णाऐवजी तो बलराम हा आठवा अवतार मानतो.*


*दशावतार नावाचे एक व्रतही सांगितले आहे. अवतार ज्या दिवशी झाला त्या दिवशी त्या अवताराची मूर्ती तयार करून तिची पूजा, तीस खाद्यपदार्थांचा नैवेद्य असा याचा विधी आहे. या पदार्थांपैकी दहा देवाला, दहा ब्राह्मणाला देऊन दहा स्वतःसाठी ठेवतात.....*

*स्त्रोत: मराठी विश्वकोश,जोशी, रंगनाथशास्त्री...*

❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

Wednesday, 16 April 2025

Pune Municipal Corporation* is ready to supply these plants to any societies who

 Punekars! 🙋🏻‍♀️


*Pune Municipal Corporation* is ready to supply these plants to any societies who want to plant them inside their compounds. . 

They will plant the saplings too , only maintainence will need to be done by the societies….


• Tabubiya yellow

• ⁠Tabubiya pink

• ⁠Palas pink, white, yellow 

• ⁠बहावा

• ⁠बकुळ 

• ⁠चाफा 

• ⁠करंज 

• ⁠कदंब 

• ⁠वड 

• पिंपळ 

• ⁠कडुनिंब 

• ⁠आंबा 

• ⁠चिंच 

• ⁠अर्जुन

• ⁠शिरीष 

• ⁠सदुंबर


Here is the format to share  while forwarding on your groups:


• Name of society / bunglow

• ⁠Type of saplings including number of each required.

• ⁠Contact person from society who will coordinate.


Interested?

Please message *Megha Lawand:*

+91 8149206443

Featured post

Lakshvedhi