Showing posts with label साहित्य. Show all posts
Showing posts with label साहित्य. Show all posts

Thursday, 3 April 2025

भवताल मासिका’चा मार्च २०२५ चा अंक

 नमस्कार,


‘भवताल मासिका’चा मार्च २०२५ चा अंक प्रसिद्ध झाला असून, त्यात पुढील विषयांचा समावेश आहे.

* निसर्गाविरूद्ध नव्हे, निसर्गासह विकास हवा!
- प्राजक्ता महाजन

* सह्याद्रीत लपलेल्या वनस्पती अन् प्राण्यांच्या शोधाची गोष्ट
- डॉ. अमित सय्यद, डॉ. ओंकार यादव, डॉ. विनोद शिंपले

* पाळलेले चित्ते, साठारी आणि किंग कोब्रा!
- डॉ. संजीव बा. नलावडे

* भवताल बुलेटिन
- विद्यार्थ्यांसमोर उलगडले खनिजे अन् जीवाश्मांचे अनोखे विश्व!

* इको अपडेट्स
- शनीला मिळाले तब्बल २७४ चंद्र!
- सुपरबग या समस्येवर दोन दिवसात उपाय!
- तब्बल ५० लाख वर्षांपूर्वी होती उड्डाण करणारी खार!
...
सोबत अंकाची पीडीएफ प्रत, नावनोंदणी करण्यासाठीची लिंक शेअर करत आहोत. आपल्या संपर्कात मासिकासाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन करावे.

मासिकाच्या नावनोंदणीसाठी लिंक:
https://bhavatal.com/connectus/masik-nondani-information

(आपण 'भवताल मासिका'ची रु. ७९० इतकी वर्गणी भरावी, जेणेकरून आम्हाला त्याचा दर्जा टिकवण्यास मदत होईल.)

वर्गणी भरण्यासाठी बँक तपशील:
AC name : Bhavatal Foundation
AC no : 033805009849
IFSC Code : ICIC0000338

(वर्गणी भरण्यासाठी सोबत QR code शेअर करत आहोत.)

संपर्क:
8421603929
Bhavatalfoundation@gmail.com  

Wednesday, 26 March 2025

अहिल्यादेवींच्या कारकिर्दीतील बारव स्थापत्य कॉफीटेबल बुकचे प्रकाशन

 अहिल्यादेवींच्या कारकिर्दीतील बारव स्थापत्य कॉफीटेबल बुकचे प्रकाशन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त विशेष ग्रंथाचे आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या कारकीर्दीतील बारव स्थापत्य या कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

पाण्याचे महत्व जाणून राज्यातील जनतेसाठीच नव्हे तर विविध प्रांतातील लोकांसाठी जलस्त्रोताचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने अळिल्यादेवींनी बारवांची निर्मिती केली व आवश्यक त्या ठिकाणी त्यांचे जिर्णोद्धारही केले. या ग्रंथात अहिल्यादेवींच्या कारकिर्दीतील तसेच अन्य जीर्णोद्धारित काही निवडक बारवपायविहिरतलावपुष्करणी या जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्वाच्या असलेल्या स्थानांची. छायाचित्रांसह संक्षिप्तपणे माहिती देण्यात आली आहे.

जन्मशताब्दी निमित्त प्रकाशीत ग्रंथात जन्मस्थळ चौंडीराजधानी महेश्वरीउपराजधानी चांदवडइंदूर येथील राजवाडाकारकिर्दीतील प्रशासनलोककल्याणकारी धोरणन्यायदानआर्थिक नियोजनचलनराजचिन्ह अश्या महत्वपूर्ण पैलू संदर्भात परंतु महत्वपूर्ण माहिती या ग्रंथात देण्यात आली आहे.


Friday, 28 February 2025

साहित्य क्षेत्रात लवकरच युवक, महिला आणि बाल साहित्य संमेलनाचे आयोजन, व पुरस्कार,pl share

साहित्य क्षेत्रात लवकरच युवक, महिला आणि बाल साहित्य संमेलनाचे आयोजन


- मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत यांची घोषणा


मराठी भाषा व उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात सांगितले की, राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठी भाषा विभाग आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असून, परदेशातील मराठी बृहन्मंडळांची संख्या ५० पर्यंत वाढवण्याचा संकल्प आहे.


डॉ.सामंत म्हणाले की, सीमा भागातील मराठी संस्कृती आणि साहित्य संवर्धनासाठी सरकार विशेष निधी उपलब्ध करून देणार असून, साहित्याला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील. तसेच दिवंगत साहित्यिक रा.रं.बोराडे यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्याची जबाबदारी शासनाने स्वीकारली असल्याचे मराठी भाषा मंत्री यांनी स्पष्ट केले.


विंदा करंदीकर पुरस्कार यापुढे गेटवे ऑफ इंडियावर प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कुसुमाग्रज यांच्या जन्मगावाला ‘कवितांचे गाव’ म्हणून घोषित करण्यात आले असून, तेथे साहित्यिक उपक्रमांना चालना दिली जाईल, असेही मंत्री डॉ.सामंत यांनी यावेळी सांगितले.


या सोहळ्यात ‘पुस्तकांचे हॉटेल’ या अनोख्या उपक्रमाचा विशेष उल्लेख करण्यात आला, जिथे ग्राहकांनी जेवणासोबत वाचनाचा आनंद घ्यावा, अशी संकल्पना राबवली जाते, असेही डॉ.सामंत यांनी सांगितले. साहित्य क्षेत्रातील उपक्रमांसाठी सरकार कटिबद्ध असून, युवक, महिला आणि बाल साहित्य संमेलनांच्या आयोजनाची घोषणा करण्यात आली.


या मराठी भाषा गौरव दिनी ग्रामीण साहित्यासाठी २०२३ चे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात वाङमय पुरस्कार प्रकार – प्रौढ वाङमय अंतर्गत काव्य प्रकारात कवी केशवसूत पुरस्कार हा एकनाथ पाटील यांना ‘अरिष्टकाळाचे भयसूचन’ या पुस्तकासाठी प्रदान करण्यात आला आहे. प्रौढ वाडमय नाटक / एकांकिका याकरिता राम गणेश गडकरी पुरस्कार हा मकरंद साठे यांना, प्रौढ वाङमय कादंबरी याकरिता हरि नारायण आपटे पुरस्कार हा आनंद विंगकर यांना, प्रौढ वाडमय लघुकथा याकरिता दिवाकर कृष्ण पुरस्कार हा दिलीप नाईक-निंबाळकर यांना, प्रौढ वाङमय ललितगद्य याकरिता अनंत काणेकर पुरस्कार अंजली जोशी यांना, प्रौढ वाङमय-विनोद याकरिता श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार हा शेखर गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. प्रौढ वाङमय चरित्र याकरिता न.चिं.केळकर पुरस्कार हा विवेक गोविलकर, प्रौढ वाङमय आत्मचरित्र याकरिता लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार हा डॉ.वसंत भा.राठोड यांना, प्रौढ वाङमय समीक्षा/संशोधन/सौंदर्यशास्त्र/ललितकला/आस्वादपर लेखन याकरिता श्री.के.क्षीरसागर पुरस्कार हा समिर चव्हाण यांना प्रदान करण्यात आला.


त्याचप्रमाणे, प्रौढ वाङमय इतिहास याकरिता शाहू महाराज पुरस्कार हा प्रकाश पवार यांना, भाषाशास्त्र/व्याकरण याकरिता नरहर कुरूंदकर पुरस्कार हा उज्ज्वला जोगळेकर यांना, विज्ञान व तंत्रज्ञान याकरिता महात्मा जोतीराव फुले पुरस्कार हा सुबोध जावडेकर यांना, शेती व शेतीविषयक पुरक व्यवसाय लेखनाकरिता वसंतराव नाईक पुरस्कार हा डॉ.ललिता विजय बोरा यांना, उपेक्षितांचे साहित्य याकरिता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार हा सुनीता सावरकर यांना प्रदान करण्यात आला. तसेच तत्वज्ञान व मानसशास्त्र याकरिता ना.गो.नांदापूरकर पुरस्कार हा या.रा.जाधव यांना, शिक्षणशास्त्र करिता कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार हा हेमंत चोपडे यांना, पर्यावरण करिता डॉ.पंजाबराव देशमुख पुरस्कार हा माधव गाडगीळ यांना, संपादित/आधारित याकरिता रा.ना.चव्हाण पुरस्कार संपादक रविमुकुल यांना, अनुवादित करिता तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी पुरस्कार हा अनुवादक श्रीकांत अरूण पाठक यांना तर संकीर्ण याकरिता भाई माधवराव बागल पुरस्कार हा सुप्रिया राज यांना प्रदान करण्यात आला.


वाङमय पुरस्कार प्रकार – बाल वाङमय यात कविता याकरिता बालकवी पुरस्कार हा प्रशांत असनारे यांना तर, नाटक व एकांकिका याकरिता भा.रा.भागवत पुरस्कार संजय शिंदे यांना, कादंबरी प्रकारात साने गुरूजी पुरस्कार हा रेखा बैजल यांना, कथा प्रकारात राजा मंगळवेढेकर पुरस्कार हा शरद आपटे यांना, सर्वसामान्य ज्ञान याकरिता यदुनाथ थत्ते पुरस्कार हा डॉ.प्रमोद बेजकर यांना तर बालवाङमय संकीर्ण या प्रकारातील ना.धो.ताम्हणकर पुरस्कार हा डॉ.आनंद नाडकर्णी यांना प्रदान करणार आला.


वाङमय पुरस्कार प्रकार – प्रथम प्रकाशन अंतर्गत काव्य याकरिता बहिणाबाई चौधरी पुरस्कार हा तान्हाजी रामदास बोऱ्हाडे यांना, नाटक/एकांकिका याकरिता विजय तेंडुलकर पुरस्कार हा हरीष बोढारे यांना, कादंबरी या प्रकारातील श्री.ना.पेंडसे पुरस्कार हा प्रदीप कोकरे यांना, लघुकथेसाठीचा ग.ल.ठोकळ पुरस्कार हा डॉ.संजीव कुलकर्णी यांना, ललितगद्य याकरिता ताराबाई शिंदे पुरस्कार हा गणेश मनोहर कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला.


वाङमय पुरस्कार प्रकार – सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार प्रकारात सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार हा अनुवादक योगिनी मांडवगणे यांना आल्बेर काम्यू ला मिथ द सिसीफ या पुस्तकासाठी प्रदान करण्यात आला.


000कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार हा हेमंत चोपडे यांना, पर्यावरण करिता डॉ.पंजाबराव देशमुख पुरस्कार हा माधव गाडगीळ यांना, संपादित/आधारित याकरिता रा.ना.चव्हाण पुरस्कार संपादक रविमुकुल यांना, अनुवादित करिता तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी पुरस्कार हा अनुवादक श्रीकांत अरूण पाठक यांना तर संकीर्ण याकरिता भाई माधवराव बागल पुरस्कार हा सुप्रिया राज यांना प्रदान करण्यात आला.

वाङमय पुरस्कार प्रकार  बाल वाङमय यात कविता याकरिता बालकवी पुरस्कार हा प्रशांत असनारे यांना तरनाटक व एकांकिका याकरिता भा.रा.भागवत पुरस्कार संजय शिंदे यांनाकादंबरी प्रकारात साने गुरूजी पुरस्कार हा रेखा बैजल यांनाकथा प्रकारात राजा मंगळवेढेकर पुरस्कार हा शरद आपटे यांनासर्वसामान्य ज्ञान याकरिता यदुनाथ थत्ते पुरस्कार हा डॉ.प्रमोद बेजकर यांना तर बालवाङमय संकीर्ण या प्रकारातील ना.धो.ताम्हणकर पुरस्कार हा डॉ.आनंद नाडकर्णी यांना प्रदान करणार आला.

वाङमय पुरस्कार प्रकार  प्रथम प्रकाशन अंतर्गत काव्य याकरिता बहिणाबाई चौधरी पुरस्कार हा तान्हाजी रामदास बोऱ्हाडे यांनानाटक/एकांकिका याकरिता विजय तेंडुलकर पुरस्कार हा हरीष बोढारे यांनाकादंबरी या प्रकारातील श्री.ना.पेंडसे पुरस्कार हा प्रदीप कोकरे यांनालघुकथेसाठीचा ग.ल.ठोकळ पुरस्कार हा डॉ.संजीव कुलकर्णी यांनाललितगद्य याकरिता ताराबाई शिंदे पुरस्कार हा गणेश मनोहर कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला.

वाङमय पुरस्कार प्रकार – सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार प्रकारात सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार हा अनुवादक योगिनी मांडवगणे यांना आल्बेर काम्यू ला मिथ द सिसीफ या पुस्तकासाठी प्रदान करण्यात आला.

Wednesday, 19 February 2025

कोकणातील साहित्यिक वाटचालs

 कोकणातील साहित्यिक वाटचाल

            २१ ते २३ फेब्रुवारी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकणातील साहित्यिक वाटचाल यावर विशेष लेख..

            महाराष्ट्राच्या इतर विभागाप्रमाणेच एक विभाग म्हणजे कोकण. या कोकणात वेधक निसर्गसौंदर्यभव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण लाभलेला समुद्रकिनाराविविध झाडे - झुडुपेडोंगर - दऱ्या अशा अनेक नयनरम्य नैसर्गिक साधनसंपत्ती आढळतात. त्यामुळे इतर विभागाप्रमाणेच कोकणचे वेगळे महत्व आहे. त्यासोबतच कोकण हा महाराष्ट्रातील समृद्ध सांस्कृतिकऐतिहासिक आणि निसर्गसंपन्नता लाभलेला प्रदेश आहे. त्याचे कारण म्हणजे याच कोकणात अनेक चळवळींचा प्रारंभ झाला आहे. त्यामुळे त्या त्या चळवळींचा मोठा प्रभाव हा कोकणासह महाराष्ट्रात झाला. त्यामुळे कोकणातल्या सर्वच क्षेत्राची वाटचाल अत्यंत लक्षणीय आहे. एवढंच नाही नव्हे तरइतर चळवळीप्रमाणेच इथल्या साहित्यिक चळवळीचा इतिहास मोठा आहे आणि त्याला विविध साहित्यप्रकारांची आणि प्रसिद्ध साहित्यिकांची पार्श्वभूमी आहे. म्हणूनच कोकणातील साहित्यिक चळवळ ही कालही प्रभावी होतीआजही लक्षणीय आहे आणि भविष्यातदेखील तिचे योगदान मोठे असणार आहे.

कोकणातील साहित्यिक चळवळ ही पारंपरिक आणि आधुनिक विचारांचे मिश्रण

            कोकणात नमनजाखडीलोककथाओव्या आणि भारुडे मोठ्या प्रमाणावर प्रचलित होती आणि कालानुरूप आजही त्यांचे अस्तित्व भक्कम आहे. दशावतारी नाट्यप्रकारही इथल्या लोकसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. या साहित्याच्या माध्यमातून कोकणातील अनेक प्रथा - परंपरा - सण - उत्सव यांचे महत्व अधोरेखित झाले. आजही ग्रामीण भागात वरील प्रकारातुन साहित्य निर्मिती आणि सामाजिक परिवर्तन होण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे दिसून येते. मुख्यतः लोककथाओवीभारुडेकविताकथाकादंबरी आणि नाटकांमधून व्यक्त झाली आहे. म्हणूनच कोकण हा केवळ निसर्गरम्य प्रदेश नसूनतो मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेत महत्त्वाचे योगदान देणारा भाग आहे. कोकणातील साहित्यिक वाटचाल लोकपरंपरेपासून आधुनिक साहित्यापर्यंत विविध टप्प्यांतून गेली आहे. म्हणूनच कोकणातील साहित्यिक चळवळ ही पारंपरिक आणि आधुनिक विचारांचे मिश्रण आहे. लोकसाहित्यकविताकथा आणि नाट्य या सर्व माध्यमांतून कोकणाने मराठी साहित्य समृद्ध केले आहे.

            कोकणातून अनेक नामवंत साहित्यिक उदयास आलेज्यांनी मराठी साहित्याला मोठे योगदान दिले. कृ. आ. केळुस्कर यांनी गौतम बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहिले चरित्र आपल्या स्वखर्चातून लिहिले आणि त्यातून साहित्य चळवळ प्रवाहित केली. कवी केशवसुत यांना मराठी आधुनिक मराठी कवितेचे मानले जाते. त्यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकांच्या मनातील अंधश्रद्धाअज्ञान आणि अनिष्ट प्रथा यावर कवी केशवसुत यांनी प्रहार करताना मानवतेचा आणि सामाजिक जाणिवा वृंद्धीगत करणारा आशय मांडला. त्यापुढील धनंजय कीर यांच्यासारख्या चरित्र लेखकांनी भारतातील अनेक नामवंत आणि महनीय व्यक्तिमत्वाची चरित्रे निर्माण केली. साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. स. खांडेकरभारतरत्न डॉ. पा. वा. काणेकोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिककथाकार जी. ए. कुलकर्णीमहेश एलकुंचवार यांसारखे कादंबरीकारलेखक आणि नाटककारही कोकणातील आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने साहित्य चळवळ समृद्ध झाली. जयवंत दळवी आणि इतरांनी नाट्यलेखन आणि विविध क्षेत्रात लेखन करताना त्या - त्या लेखनाचा आशय समाजमनाला भावणारा ठेवला. त्यामुळे संवेदनशील असणारे कोकणी समाजमन या लेखनाकडे आकर्षित झाले. परिणामी कोकणात साहित्यिक चळवळ ही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली.

कोकणात अनेक साहित्य संमेलन यशस्वी

            अशा असंख्य लेखकांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील उपेक्षितवंचित आणि सर्वसमावेशक कोकणी मनाला भुरळ घातली. प्रत्येकाच्या लेखणीच्या आशयसंपन्न लेखनामुळे लहान ते ज्येष्ठ यांच्यापर्यंत साहित्याची आवड निर्माण झाली. त्याचा परिणाम म्हणजे कोकणात अनेक साहित्य संमेलन यशस्वी झाले. रत्नागिरी येथे १९९० मध्ये झालेले साहित्य संमेलनानंतर तत्कालीन संमेलनाध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. आणि तेव्हापासून ते आजपर्यंत कोकणातील वाडी - वस्त्यांमधील संवेदना जपणाऱ्या मनांनी लिहायला सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणजे अनेक कवीलेखककथाकारकादंबरीकारललित लेखन करणारे साहित्यिक तयार झाले. त्यातून त्यांच्याच पुढाकाराने कोकणात विविध साहित्य संमेलने भरवली जात आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने कोकणात झाली. त्यासोबतच कोकण मराठी साहित्य परिषदेचे १७ पेक्षा जास्त केंद्रीय संमेलनेसाहित्य विश्वात पहिल्यांदाच सहा राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनराज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनबाल साहित्य संमेलन यासह स्थानिक स्तरावर अनेक संमेलने झाली. त्यात राजापूर येथे ग्रामीण साहित्य संमेलनाचेनाट्य संमेलनाचे दरवर्षी मोठ्या उत्साहात आयोजन केले जाते. त्यात कोकणी भाषा आणि साहित्य चळवळ यावर मोठ्या प्रमाणात चर्चा घडवून आणली जाते. महिला साहित्य संमेलन असो वा युवा साहित्य संमेलनातून महिला आणि युवा वर्गाच्या समोर असणाऱ्या प्रश्नांना आवाज असतो. त्यामुळे या साहित्य संमेलनात उपस्थितीदेखील मोठी असते.

             काळाच्या ओघात कोकणातील असंख्य नवलेखक आपल्या सृजनशील लेखणीच्या द्वारे आता कादंबरीकवितालघुकथाचित्रवाहिन्यावरील मालिकांचे लेखनसंहिता लेखन आणि चित्रपट कथा या माध्यमांतून योगदान देत आहेत. कोकणावर आधारित पर्यटनविज्ञानसांस्कृतिक आणि ऐतिहासिक कथा लोकप्रिय होत आहेत. जुन्या आणि नवीन लेखकांनी कोकणच्या संस्कृतीला केंद्रस्थानी ठेवून लेखन केले आहे.

काही दिवसांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. मागील किती तरी वर्षांपासून सुरू असलेली साहित्यिक आणि मराठी भाषिकांची मागणी विद्यमान सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे पूर्ण झाली. त्यामुळे आता सर्वच मराठी भाषिकांनी मराठी भाषेचे अभिजातपण जपण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या प्रयत्नांना हातभार लावण्यात कोकणचे मोठे योगदान असेल. यावर्षी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

            थोडक्यात अनेक थोर लेखकांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. त्या भूमीत ज्या अपेक्षेने मराठी भाषामराठी साहित्य आणि साहित्य चळवळ उभारली त्याच जोमाने ती पुढे - पुढे जात आहे. अनेक संस्था यासाठी पुढाकार घेऊन भडकत्या प्रसारमाध्यमांच्या काळात तरुण मनाला लिहिते करत आहेत. त्यामुळे कोकणातील साहित्यिक वाटचाल ही आव्हानात्मक जरी असली तरी समाधानकारक आहे.

000

 

श्री. माधव विश्वनाथ अंकलगे

                                                     वाटद खंडाळाता. जि. रत्नागिरी

                                                                 संपर्क - ९०२१७८५८७४ / ९७६४८८६३३०.

 


Monday, 17 February 2025

अहिराणी काल, आज आणि उद्या- अहिराणी ही ऐके

 अहिराणी कालआज आणि उद्या- अहिराणी ही ऐके काळी खानदेश परिसरातील मुख्य बोली होती. ती व्यवहाराची भाषा होती. अहिरराजे यांची ती प्रमुख बोली. धुळेनंदूरबारजळगांवनासिकचा कळवणसटाणामालेगांव अन औरंगाबाद चा कन्नड व सोयगांव या तालुक्यांचा भाग या परिसरात ती आजही बोलली जाते. या परिसराची लोकसख्या ही दिड कोटीच्या आसपास आहेच. या शिवाय उर्वरित महाराष्ट्रात आणि गुजरात व मध्यप्रदेशात नोकरी वा व्यापारा निमित्ताने गेलेले सारे खानदेशवासी हे आपल्या घरात अहिराणीच बोलतात. जगाच्या पाठिवर अनेक देशातही खानदेशातील माणूस स्थाईक झालेला आहे. तेथेही तो आपल्या कुटूंबात अहिराणी जपून आहे. पूर्वी अहिराणी बोलणे गावंढळग्राम्यतेचे लक्षण मानले जाई. अलिकडे भाषिक अन प्रादेशिक अस्मिता जोपासली जाऊ लागली आहे. या शिवाय जागतिक स्तरावर विविध विद्यापिठातून बोली भाषेच्या अभ्यासाचे महत्व पटू लागल्याने त्या जतन करण्याकडेत्यांचे संवर्धन करण्याकडे जगाचा कल वाढू लागला आहे. आजवर प्रमाण भाषांनी बोलींनाबोलीतील शब्दांना दूर ठेवले होते. आता अलिकडे अभ्यासकांना याच बोलीतून प्रमाण भाषा जन्माला येते व बोलींच्या आधारानेच ती वाढतेटिकते हे कळू लागले आहे. त्यामुळे आपली बोली जतन करण्याचा तीचे संवर्धन करण्याचा प्रयत्न सामान्य स्तरावरही होऊ लागला आहे.

अलिकडे अहिराणीतून दिनदर्शिकालग्नपत्रिकामाहिती पत्रके छापली जात आहेत. जे जे प्राण्मा मराठीतून असते ते ते आता अहिराणी बोलीतून प्रकाशित होत आहे. सकस वांङमयाचे अहिराणीतून भाषांतरेही होवू लागली आहेत. अहिराणी बोलीचा शब्दकोशभाषावैज्ञानिक अभ्याससुलभव्याकरणसचित्र कोशम्हणी कोशवाकप्रचार कोशओवी कोश अहिराणी बोलीतील लोकसाहित्य आदी ग्रंथ डॉ. रमेश सूर्यवंशी यांची प्रकाशित आहेतच. कालऔघात बोली नष्ट होत आहेत असे म्हटले जात असेल तरी जगभर या बोली वाचविण्यासाठीचे प्रयत्न सुरुच आहेत. या बोली वाचवून ठेवण्यात शेतकरी व शेतमजूर यांच मोठा वाटा आहे. हा वर्ग आपली बोली आजी सांभाळून आहे. जगभर बोली वाचविण्याची चळवळ सुरुच आहे. त्या मुळे बोलीच भवितव्य हे उज्वचल असेच आहे.


अहिराणी किंवा खानदेशी बोलीचा भूगोल

 अहिराणी किंवा खानदेशी बोलीचा भूगोल


अहिराणी किंवा खानदेशी बोलीचा उपरोक्त भाषा भूगोल (आधीचा खानदेश जिल्हा, त्यानंतर नासिकचे कळवण, सटाणा, मालेगांव तालुके व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचा सोयगांव व कन्नड हे तालुक्यातील डोगराखालील खानदेश लगतची गावे) आजवर संशोधकांनी स्विकारला आहे. आता नुकत्याच माझ्या क्षेत्रिय पाहणीतून असे लक्षात आले की ही खानदेशात बोलली जाणारी बोली जशीच्या तशी विदर्भातील अमरावती जिल्हयाच्या धारणी, चिखलदरा, अचलपूर आणि चांदूर बाजार या चार तालुक्यातील सुमारे साठ ते सत्तर गांवातून केवळ गवळी जातीच्या लोकांकडून बोलली जाते. मात्र या लोकांना अहिर वा अहिराणी वा खानदेशी या संकल्पना अद्यापही ज्ञात नाहीत. ते आपल्या या बोलीला गवळी बोली म्हणून संबोधतात. त्यामुळे आता खानदेशी बोलीच्या सामाजिक प्रभेदात गवळी बोली तर प्रादेशिक प्रभेदात वऱ्हाडची अहिराणी म्हणून समावेश करुन सध्याचा भाषा भूगोलाचा विस्तार करावा लागत आहे.


(असं असली तरी सोरटी सोमनाथावरील गझनीच्या स्वारी नंतर पलायन केलेल्या मंदिराच्या पुजाऱ्यांनी देवगीरीला आश्रय घेतला व तेथून त्यानां तामीळनाडूतील मंदिराचे पौराहित्यासाठी नेले गेले पुढे ते मासांहारीही बनले व सुताला रंग देण्याच्या व्यवसायातही उतरलेत. (हा इतिहास के.सी कृष्णमुर्ती यांनी 'द मायग्रन्ट सिल्क व्हेव्हर्स ऑफ तामिलनाडू' या ग्रंथात केला आहे. प्रकाशन फेब्रु. २०१४) त्यांची बोली तेथे सौराष्ट्री म्हणून प्रचलित असून तिच्यात आणि अहिराणीतही बरेच साम्य आढळते. या शिवाय नेपाळच्या नेपाळी बोलीत आणि अहिराणी बोलीतही बरेच साम्य आहे. अधिकचा अभ्यास करुन त्यावर प्रकाश टाकणे आवश्यक आहे)


अमरावती जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा, अचलपूर आणि चांदूर बाजार या चार तालुक्यातील मेळघाट अभयारण्याचा मध्य प्रदेशाच्या, अशिरगड किल्ल्यापर्यतचा भागातील वस्तीला असलेले गवळी या जातीच्या लोकांची बोली ही गवळी बोली आहे. ह्या गवळी बोली बोलणारांची संख्या ही जवळजवळ पन्नास हजाराहून अधिकची आहे. देवगांव, कुकरु, खामगांव सारखी काही गावे ही संपूर्ण गवळी या जातीच्या लोकसंख्येची गावे आहेत. चिखलदरा, सांगोळा, कोहा ढाकण, मोथा, लवादा, देवगांव, धामनगांव गढी, हरीसाल, अंबापाटी, टेंभरु सोजाई, जामली, वस्तापूर, कुलंगणा खुर्द, उपासखेडा, नवाखडा अशाही काही गावांची नावे ही गवळ्यांची वस्ती असलेली गावे सांगता येतील. अभ्यासाअंती असे लक्षत येते की, या सगळ्या गवळ्यांची ही गवळी बोली आणि खानदेशात प्रचलित असलेली अहिराणी बोली ह्या दोन बोली भिन्न वा स्वतंत्र वेगवेगळ्या बोली नसून त्या एकच बोली आहेत. मात्र खानदेशात ती अहिराणी बोली म्हणून ओळखली जाते तर विदर्भातील अमरावती जिल्ह्यात मेळघाटात ती गवळी बोली म्हणून ओळखली जाते आहे. विशेष बाब ही की आजपर्यंत अहिराणीच्या अभ्यासकांना ज्या प्रमाणे गवळी बोली हे अहिराणीचे वेगळ्या भूप्रदेशात आढळणारे रुप आहे ही बाब ज्ञात नाही. तशीच गवळी बोलीच्या अभ्यासकांनाही गवळी बोली ही अहिराणी बोलीचेच रुप आहे हे ज्ञात नाही. मात्र शब्दावली, वाक्याची रुपे, विभक्ती प्रत्यय, ही भाषा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासाची सगळी वैशिष्टे ही दोनही बोलीत सारखी आणि एकच आहेत. धारणी, चिखलदरा या भागात या गवळ्यांना अहिराणी हा शब्द ज्ञात नाही. ते आपल्या बोलीला गवळी बोली असेच म्हणतात. हे सारे गवळी लोक कोरकू, कुणबी, गोंड वा कोलामांसोबत राहात असले तरी गवळी बोली ही केवळ गवळी लोकांचीच बोली असून तेच बोलतात. गवळी बोली वर आजवर भाषावैज्ञानिक अभ्यास कुणी मांडल्याचे ज्ञात नाही. भाषा सर्वेक्षणातही मेळघाटातील या गवळ्ळ्यांच्या बोलीला ग्रिअर्सन पासून आताच्या भारतीय भाषा सर्वेक्षणापर्यंत कुणीही दखल घेतलेली नाही. म्हणजे या मेळघाटात बोलीच्या सर्वेक्षणाचेही कूपोषण झालेले आढळते.


या गवळ्यांच्या या भागातील आगमना बाबतच्या काही कथाही मिळतात. कौंडीण्यपूरहूर रुक्मीनी आणण्यासाठी श्रीकृष्णाने आपल्या गवळ्यांच्या लवाजम्यासह विदर्भात कूच केली. त्यांच्या सरंक्षणाच्या दृष्टीने बलदेवानेही गवळ्ळ्यासह त्यांच्या गुराढोरांसह कूच केली. परतीच्या मार्गावर चांदूर बाजार, अचलपूर सारख्या काळ्या जमिनीवर आपल्या गुरांचे पाय फसतात व गुरांना त्रास होतो हे जाणून त्यांनी तो काळ्या जमिनीचा भाग सोडून टणक जमिनीकडे वाटचाल केली. ते मेळघाट आले. रुक्मीनीला घेवून श्रीकृष्ण व गवळी रातोरात परतलेत. मात्र काही गवळींना आपल्या गुराढोरांसह, लवाजम्यासह परतणे शक्य झाले नाही. शिवाय आपल्या गुरांसाठी चारा असलेले घनदाट जंगल त्यांना आवडले. हे गवळी परत मथुरेला न जात तेथेच राहिलेत. वन्यजिवांकडून आपल्या गुरांचे सरंक्षण करण्याच्या दृष्टिने त्यांनी मातीच्या भिंतीची तटबंदी बांधून गाविलगड किल्ला बांधला. गाविलगड हा गवळ्यांचा किल्ला. पुढेही चिखलदराहून इंग्रजांनी या गवळ्यांना हुसकावून जंगलात पिटाळले. अशिरगड, नरनाळा आणि गाविलगड ही किल्ले गवळी आपले किल्ले समजतात. अशिरगडची आशा देवी ही त्यांचे कुलदैवत मानतात. ते कृष्णाला आपले पूर्वज मानतात. केवळ बोलीच नव्हे तर त्यांच्या रुढी परंपरा, विवाह विधी, सणउत्सव, हे खानदेशातील अहिराणी भार्षिक लोकांप्रमाणेच आहेत. या विदर्भातील गवळ्यामध्ये खेडके, हेकडे, शेडके, शनवारे, सावडे, गायन, तोटे अशी आडनावे आढळतात. मात्र असली आडनावे खानदेशातील अहिराणी भाषकांत आढळत नाहीत. खानेदशातील अहिराणी भाषिक हे विविध जातीचे असून कुणबी, मराठा, सोनार, शिंपी अशा विविध जातीत विभागले गेले आहेत. या गवळ्यांनी आपल्या दुग्धव्यवसायाशी संबंधित जी धार्मिक विधी आजही जपून ठेवलेली आहेत ती खानेदशात नावालाच आढळतात. विदर्भातील हे गवळी गुलाबाई, गौराई, भालदेव, विवाहाची गाणी, जात्यावरची गाणी हे सगळ आजही जपून आहेत. मात्र खानदेशात महत्वाचा समजला जाणरा कानबाईचा उत्सव या विदर्भातील गवळी जमातीत आढळत नाही. खानदेशातील या अहिराणी भाषकां प्रमाणे त्यांचा संपर्क बाहेरच्या जगाशी कमी आलेला असल्याने खानदेशीच्या मानाने त्यांच्यात सांस्कृतिक वा भाषिक बदल कमीच आढळतो. आजही हे गवळी मुलाच्या जन्मा नंतर कास्य या धातूची थाळी वाजवितात तर मुलीच्या जन्मा नंतर सूप वाजवितात. या गवळ्याचे महत्वाचे सण वा उत्सव म्हणजे गोकुळाष्टमी आणि दिपावलीची गायगोंदन. आपल्या दुग्ध व्यवसायाशी व कृष्णाशी संबंधित हे विधी ते आजही पाळतांना दिसतात. आपल्या जनावरांची हेटी करुन राहणे हे या गवळ्यात आजही आढळते. मात्र खानदेशात हे प्रमाण कमी झाले आहे. खानदेशा प्रमाणे आखाजीला पित्तर जेवू घालणे, विवाह प्रसंगी पूर्वजाना निवतं देणे हे विदर्भातील गवळ्यात आढळते. खानदेशाच्या भाषिक आणि सांस्कृतिक जिवनाशी साध्यर्म्य राखणारे हे गवळी स्वतःला गवळी, गोपालक, श्रीकृष्णाचे वंशज म्हणत असले तरी ते खानदेशातील अहिराहून वेगळे नाहीत हे अहिराविषयी जाणून घेतल्यावर लक्षात येते. विदर्भतील या गवळी जातीवर इतिहासकारांनी विषेश प्रकाश टाकलेला आढळत नाही.


खानदेशातील ब-याच परंपरा या मोडीत निघाल्या मात्र दुग्धव्यवसाया संबंधीत ब-याच परंपरा आजही बोली सोबत या गवळी समाजाने जपून ठेवलेल्या आढळतात. तेही स्वतःला गोपालक समजतात. दोहोचे नाते श्रीकृष्णाशी अन अशिरगड, गावीलगड यांचेशी आहे. अर्थात यादव, अहिर, गवळी हे एकाच कुलातील.

माय माउली साहित्यप्रवाहांनी समृद्ध

 साहित्यप्रवाहांनी समृद्ध

मराठी साहित्याला दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, स्रीवादी साहित्य, जनवादी साहित्य, आदिवासी साहित्य, विज्ञान साहित्य, प्रादेशिक साहित्य, बालसाहित्यमुस्लीम साहित्य, ख्रिस्ती साहित्य, बालसाहित्य अशा साहित्यप्रवाहांनी अतिशय समृद्ध केलेले दिसते. मराठीच्या विविध बोलींतून ही साहित्यनिर्मिती केलेली दिसते.

    १९९० च्या नंतर जागतिकीकरणाचा परिणाम मराठी साहित्यावरही झालेला दिसतो भोगवादचंगळवादउपभोगवादविलासवादग्राहकवादबाजारवादवस्तुवादलैंगिकतावाद या प्रकारच्या बाबींची वेगाने प्रतिष्ठापना करीत जागतिकीकरण वाढत चालले आहे. रंगनाथ पठारेमकरंद साठेश्रीधर नांदेडकरजयंत पवारविश्राम गुप्तेसदानंद देशमुखराजन गवसआसाराम लोमटे आदी साहित्यिकांच्या लेखनात ही संवेदना प्रकटलेली दिसते.

    संगणकादी नवे तंत्रज्ञान आल्यावरही मराठीचा वापर प्रचंड वाढला आहे. मराठी ब्लॉग्स,संकेतस्थळे वाढली आहेत. मराठीतील कोशवाङ्मय जगात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. प्रसारमाध्यमांनी मराठी भाषा साचेबद्ध न ठेवता तिच्यात कालानुरूप बदल केले आहेत. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच विद्यापीठांनी मराठी भाषाभ्यासाला व्यावहारिक जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे अनेक क्षेत्रांत नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.भारतातील सर्वच विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकविली जाईल. बोलीभ्यास संशोधनअनुवाद प्रक्रिया यांना गती मिळेल. ग्रंथालये सशक्त होतील. पुरातन साहित्याचे डिजिटायझेशन होईल. त्यामुळे डिजिटल माध्यमांतून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.

            अनेक जाती-धर्मांचे लोक मराठी भाषा बोलतात. अनेक पंथधर्मप्रांतसंस्कृती यांना मराठीने आपल्या पोटात सामावून घेतले आहे.खांद्यावर माय मराठीची पताका घेतलेल्या साडे बारा कोटींची ही भाषांमाजी भाषा साजिरी आहे.

-----

विविध भागातील बोलभाषा आणि वैशिष्ट्ये pl share

 ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

विविध भागातील बोलभाषा आणि वैशिष्ट्ये

 

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळे दिल्लीत होणारे  साहित्य संमेलन पहिलेच 'अभिजात मराठी साहित्य संमेलनअसेल.दिल्लीत होणाऱ्या या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे  उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.जेष्ठ नेते शरद पवार या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी असणार आहेत.

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा… ही केवळ कविकल्पना नाही तर आपल्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय आहेयाचा प्रत्यय आपणास या ऐतिहासिक संमेलनातून येणार आहे. भाषासंस्कृतीराष्ट्रभावनामानवता आणि एकात्मता यांचा आगळा मिलाफ यानिमित्ताने महाराष्ट्र वा देशातीलच नव्हेअवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत अनुभवणार आहेत

यापूर्वी १९५४ मध्ये  दिल्लीला ३७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळसंमेलनाध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी तर उद्घाटक तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला या संमेलनानंतर बळ मिळाले आणि १ मे १९६० मध्ये  महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर दिल्लीला एकदाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले नव्हते.

दिल्ली येथे नियोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य व लोक संस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. २१२२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ ला दिल्लीत हे संमेलन होणार आहे. तब्बल ७० वर्षांनंतर राजधानी दिल्लीत मराठी भाषेचा आवाज घुमणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमध्ये अनेक बोलीभाषा प्रचलित आहेत. या बोलीभाषा त्या- त्या प्रदेशाच्या सांस्कृतिकभौगोलिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीवरून विकसित झाल्या आहेत. काही प्रमुख बोलीभाषा आणि त्यांचे वैशिष्ट्य....

कोकणी भाषा

 कोकण किनारपट्टीवरील जिल्हे म्हणजे रत्नागिरीसिंधुदुर्ग आणि गोव्यातील कोकणी भाषा प्रचलित आहे. कोकणी भाषा ही भारतातील सर्वांत जुन्या भाषांपैकी एक आहे.  कोकणीमध्ये अनेक बोलीभाषा आहेतजसे की गोव्याकडील कोकणीमंगलोरी कोकणीकेरळ कोकणीमालवणी इत्यादी. कोकणी भाषेत देवनागरीरोमनकन्नडमल्याळम आणि अरबी या विविध लिपींचा वापर केला जातो. कोकणी ही इंडो-आर्यन भाषाकुळातील असूनसंस्कृतशी तिचे जवळचे नाते आहे. कोकणी शब्दसंग्रहात संस्कृत शब्द मोठ्या प्रमाणावर आहेत. कोकण किनारपट्टीवर असल्यामुळे कोकणी भाषेत मराठीपोर्तुगीजतुळूकन्नड आणि मल्याळम भाषांचे प्रभाव दिसून येतात. कोकणी भाषक हिंदूख्रिस्ती आणि मुस्लीम समाजाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते. कोकणी भाषेत कविताकथालोकसंगीत आणि लोककथांची समृद्ध परंपरा आहे. कोकणी भाषा ही तिच्या वैशिष्ट्यांमुळे आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे एक अनमोल ठेवा आहे!

देशी बोली

पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीसाताराकोल्हापूर भागात बोलली जाणारी भाषा आहे. या भागातील बोलीत एक प्रकारचा रांगडेपणा व सडेतोडपणा आहेजो त्या भागातील लोकांच्या स्वभावाला साजेसा वाटतो. या बोलीत मराठा साम्राज्याचावतनदार व शेतकरी संस्कृतीचा ठसा उमटलेला आहे. शब्दांमध्ये ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब दिसते.

प्रसिद्ध म्हणी आणि शिव्या:

या भागातील बोली म्हणींसाठीउपरोधिक वाक्यांसाठी आणि कधीकधी सुसंस्कृत वाटणार नाही अशा शिव्यांसाठीही प्रसिद्ध आहेज्या तिथल्या संवादाचा एक भाग आहेत.

'नाय' (नाही), 'काय बी' (काहीही), 'भारी' (छान), 'हुश्शार' (शहाणा), 'गड्या' (मित्रा) असे शब्दप्रयोग मोठ्या प्रमाणावर आढळतात.लय भारी’, ‘काय म्हणतोस’, ‘चल गड्या’ यासारखे वाक्प्रचार प्रचलित आहेत. लोकसंवादात आढळणारी बोली साधीसरळ आणि स्पष्ट असतेकोणताही आडपडदा किंवा बडेजाव नसतो. 'जमिन', 'रान', 'बैलगाडी', 'तुरी', 'चाऱ्याचं गंजीअशा अनेक शब्दांतून कृषी जीवनाचे दर्शन घडते. या बोलीत बोलताना एक प्रकारची लय असते. वाक्यांचा शेवट कधीकधी चढत्या सूरात केला जातोज्यामुळे संभाषण अधिक ठसकेबाज वाटते. लावणीतमाशापोवाडे या लोककला प्रकारांचा प्रभाव या बोलीवर आहे. त्यामुळे तिच्या उच्चारात आणि शब्दरचनेत एक विशिष्ट गंमत आहे. सांगलीसाताराकोल्हापूरच्या बोलीत ऐकताना एक वेगळाच जोशउत्साह आणि आपलेपणा जाणवतोजो त्या भागातील मातीशीइतिहासाशी आणि लोकांशी जोडलेला आहे.

वऱ्हाडी

 विदर्भातील अमरावतीअकोलाबुलढाणायवतमाळ भागातील बोली भाषा आहे. वऱ्हाडी बोलीत एक वेगळा रांगडेपणा आहे. बोलण्यात ठासून आत्मविश्वास व ठसकेबाजी जाणवते. ‘लाचा उच्चार बा’: वऱ्हाडी भाषेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ला’ चा उच्चार बा’ असा होतो. उदाहरणार्थ 

मला  मबा

तुला  तुंबा

चला  चंबा

 वऱ्हाडी माणूस स्वतःला आपण’ म्हणतो. उदा. "आपण काल गेला होतो." (मी काल गेलो होतो.)

 भाषेत शहरी बडेजाव किंवा जडपणा नाही. तिच्यात गावरान सोज्वळपणा आणि सहजता आहे. बोलण्यात लयबद्धता असते आणि वाक्याच्या शेवटी एक विशिष्ट चढता सूर येतोजो वऱ्हाडी भाषेला अधिक प्रभावी बनवतो.


सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात गद्यलेखनाला बहर

 सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात गद्यलेखनाला बहर

शाहिरी वाङ्मयात होनाजी बाळासगनभाऊप्रभाकरपरशरामरामजोशीअनंतफंदी यांच्या लावण्या आणि पोवाड्यांनी अस्सल मराठमोळ्या जीवनाचे दर्शन घडविले. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठीत गद्यलेखनाला बहर आला. बखर वाङ्मय हे महाराष्ट्र सारस्वताचे एक विलोभनीय लेणे आहे. बखर वाङ्मयातून धर्मनिष्ठाराष्ट्रनिष्ठाउच्च जीवनमूल्ये यांची प्रचितीस्वामीनिष्ठा अशा प्रेरणांनी लेखन केले. मल्हार रामराव चिटणीस यांनी छत्रपती शिवाजीसंभाजी महाराजथोरले राजारामथोरले शाहू महाराजछत्रपती धाकटे रामराजेधाकटे शाहू यावर बखरलेखन केले. रामचंद्रपंत अमात्य यांनी रचलेले आज्ञापत्र’ आणि शिवाजी महाराजांनी आवर्जून तयार करवून घेतलेला राज्यव्यवहार कोश’ मराठी साहित्यात महत्वाचे ठरतात.

   ख्रिस्तीधर्मीय साहित्यिकांनी मराठी वाङ्मयनिर्मिती केलेली दिसते. फादर स्टीफन्स यांनी 'ख्रिस्तपुराणलिहिले. त्याचबरोबर फादर क्रुवापेद्रोजजोसेफमिगेलरिबैरू यांनीही मराठीत साहित्यनिर्मिती केली. मराठी जैन साहित्याचा विचार करता पुष्पदंत- 'णायकुमारचरिउ', ब्रह्मगुणदास-'श्रेणिकचरित्र', गुणकीर्ती-'धर्मामृत', जिनदास- 'हरिवंशपुराणहे ग्रंथ लिहिले.

    १८७४ ते १९२० या कालखंडात विष्णुशास्त्री चिपळूणकर,टिळक,आगरकरलोकहितवादी,महात्मा फुले,न्यायमूर्ती रानडे हे सामाजिक,राजकीय,धार्मिक आणि  आर्थिक विचार प्रसृत करीत होते,त्याच काळात केशवसुतांनी आपल्या काव्यरचनेला प्रारंभ केला.नव्या कवितेचे सर्व विशेष त्यांच्या काव्यात आलेले दिसतात. ना.वा.टिळकगोविंदाग्रजरेंदाळकरबालकवीचंद्रशेखरभा.रा.तांबेवि.दा. सावरकरसाने गुरुजीमाधव ज्युलियनबा.भ.बोरकरबा.सी.मर्ढेकरपु.शि.रेगेविंदा करंदीकरमंगेश पाडगावकरवसंत बापटग.दि.माडगूळकरना.धों.महानोरबहिणाबाई चौधरीइंदिरा संतकुसुमाग्रजवसंत बापटशांता शेळकेप्र.के.अत्रेमुक्तिबोधखानोलकरदिलीप चित्रे, नारायण सुर्वेना.सी.फडके, वि.स.खांडेकर, भालचंद्र नेमाडेविजय तेंडुलकर या साहित्यिकांनी मराठी सारस्वतात मोलाचे योगदान दिले.

              १८७४  ते १९२०  या कालखंडात मराठी रंगभूमीच्या क्षेत्रात अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद देवल, श्रीपाद कोल्हटकर, कृष्णाजी खाडीलकरराम गडकरी आदी नाटककारांनी संगीत नाटके लिहिलीरंगभूमीवर आणली. हा कालखंड मराठी रंगभूमीच्यादृष्टीने सुवर्णयुग मानला  जातो.

तुका झालासे कळस'

 तुका झालासे कळस'

एकनाथ हे सांस्कृतिक पुनरुत्थानाचे सर्वश्रेष्ठ प्रतिनिधी होत. ची वाङ्मयसेवा बहुविध आहे. त्यांचे 'एकनाथी भागवतआणि 'भावार्थ रामायणहे महत्त्वपूर्ण ग्रंथ. देशकालपरिस्थितीनुसार अगदी योग्य वेळी,एका विशिष्ट हेतूने ही रामकथा त्या वेळच्या लोकांपुढे त्यांनी ठेवली. हा हेतू राष्ट्रीय स्वरूपाचा आहे. ज्ञानेशादिकांनी सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणून ठेवलेले तत्त्वज्ञान अभ्यासूनपचवून, जीवनाच्या झगड्यात प्रत्यक्ष अनुभवूनलोकांना उपदेश करण्याची पात्रता संत तुकारामांनी सिद्ध केली. यामुळेच 'तुका झालासे कळसहे त्यांच्या संबंधीचे उद्गार सार्थ ठरले आहेत. एकनाथ-तुकारामांच्या काळात आणि त्यानंतरही मुसलमान संतांनी जी मराठीची सेवा केली ती उपेक्षणीय नाही. शहा मुंतोजी ब्रह्मणी यांचा 'सिद्धसंकेतप्रबंधहा  दोन हजार ओव्यांचा  सर्वात मोठा ग्रंथ. यानंतर अंबर हुसेनशेख सुलतानशेख महंमदशहामुनी इत्यादी संतांनी यात महत्त्वाचे योगदान दिले.

               कलात्मकदृष्टीने कथा निवेदन करणे हा  विशेष मुक्तेश्वर यांच्या काव्यात दिसतो. त्यांची एकूण कविता १७००० इतकी भरेल.शिवकालीन प्रवृत्तीची आणि आकांक्षांशी पूर्णतः समरस झालेले संत कवी रामदास त्यांचा 'दासबोध',' मनाचे श्लोक','रामायणही रचना. वामन पंडित-'यथार्थदीपिका', मोरोपंत-'केकावली', रघुनाथ पंडित-'दमयंती स्वयंवर', सामराज-'रुक्मिणी स्वयंवर', कृष्णदयार्णव-'हरिवरदा', श्रीधर- 'हरिविजय', 'पांडवप्रताप','वेदांतसूर्यया पंत साहित्यातील महत्वाच्या रचना.

लीळाचरित्र’ : पहिला चरित्रग्रंथ

 लीळाचरित्र : पहिला चरित्रग्रंथ

तेरावे शतक हे मराठी वाङ्मयनिर्मितीचा प्रारंभिक काळ. परिपक्वताप्रौढतापारमार्थिकता या गुणांनी युक्त. मराठीतील पहिला चरित्रग्रंथ म्हणून लीळाचरित्राला अनन्यसाधारण महत्व आहे. महानुभाव संप्रदायातील साहित्यिकांनी निर्माण केलेल्या साहित्याची विपुलता आणि वैविध्यता ही वैशिष्ट्ये आहेत. त्यांनी आख्यानक काव्येभाष्ये-महाभाष्येसूत्रबद्ध व्याकरणभावगीतात्मक स्वयंवरकथागीताटीकास्थळवर्णनेआरत्यापदेभारुडेस्तोत्रेप्रवासवर्णनचरित्रटीकाविदग्ध कथाकाव्येटीपा अशा विविध साहित्यप्रकांरातून लेखन केलेले दिसते.

मराठीत आज अस्तित्वात असलेल्या अनेक वाङ्मयप्रकारांचा उगम महानुभाव साहित्यात शोधता येतो. संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि मराठी भाषेत गीतार्थाचे सुंदर व प्रत्ययकारी निरुपण  केले. सर्व समाजाला प्रेमाचासमतेचा आणि भक्तिभावाचा उपदेश गीताटिकेच्या द्वारा करण्याचा उपक्रम ज्ञानेश्वरांनी केला.मराठी जन आणि मराठी मन घडवणारा पहिला क्रांतिकारी नेता ज्ञानदेव होय. मौलिक स्वरूपाचे तत्त्वज्ञान आणि अव्वल दर्जाचे काव्य या दोहोंचा मनोहर संगम तत्कालीन दुसऱ्या कोणत्याही भाषेत आढळणार नाही. महाराष्ट्रात दत्तभक्तीचा प्रसार मुख्यतः इस.१५५८ मध्ये लिहिलेल्या सरस्वती गंगाधर यांच्या गुरुचरित्राने केला. दासोपंतांचा 'गीतार्णवयासारखा सव्वा लाख ओवीसंख्या असलेला प्रचंड ग्रंथ मराठीत दुसरा 

मराठीला आकार देणारे महानुभाव साहित्य

 मराठीला आकार देणारे महानुभाव साहित्य

 

आज आपण बोलत असलेली मराठी ही अनेक स्थित्यांतरे आणि उत्क्रांतीनंतर तयार झालेली समृद्ध भाषा आहे. अशा या समृद्ध साहित्य परंपरा लाभलेल्या मराठी भाषेस केंद्र शासनाने ऑगस्ट 2024 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. आसा दर्जा प्राप्त झाल्यानंतर प्रथमच नवी दिल्ली येथे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यानिमित्ताने मराठी साहित्याचा पाया असणाऱ्या महानुभाव पंथाच्या साहित्याचा घेतलेला हा धांडोळा. आजच्या आपल्या मराठीच्या विकासामध्ये किंबहुना  आज वापरात असलेल्या मराठीला आकार देण्याचे महत्वाचे काम केले ते महानुभाव पंथानेया पंथाच्या साहित्यातील लीळाचरित्र हा चक्रधर स्वामींच्या लीळांवर आधारित ग्रंथ मराठीतील आद्य ग्रंथ म्हणावा लागेल. मराठीच्या विकासात महानुभव पंथाच्या योगदानावर टाकलेला हा प्रकाश.*

महाराष्ट्र आणि मराठी विषयी -  मराठी भाषेची उत्पत्ती प्राकृतात असल्याचे सर्वश्रृत आहे. प्राकृत भाषेत लिहला गेलेला गाथा सप्तशती’ हा आद्य: ग्रंथ आणि यातील भाषा ही अस्सल महाराष्ट्राचीगोदावरी खोऱ्यातील आहे.  महाराष्ट्र प्रदेशावर साडेचारशे वर्ष राज्य करणाऱ्या सातवाहन कुलातील राजा हाल यांने हा ग्रंथ लिहला. मराठीतील पहिला शिलालेख हा कर्नाटकातील श्रवणबेळगोळा येथील श्री चावुण्ड राये करवियले श्री गंगराये सुत्ताले करवियले हा आहे. तर रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळील आक्षी येथे सापडलेला  शिलालेख मराठीतील पहिला शिलालेख असल्याचे डॉ शं.गो.तुळपुळे म्हणतात. त्याही आधी 'धर्मोपदेशमाला' (इ.स. 859) या ग्रंथात मराठी भाषेचा उल्लेख आहे. सललयि-पय-संचारा पयडियमाणा सुवण्णरयणेल्ला ! मरहठ्य भासा कामिणी य अडवीय रेहंती !! असे मराठीचे वर्णन येते. सहाव्या शतकातील वराह मिहीरच्या बृहत्दसंहितेत महाराष्ट्र  देशाचा उल्लेख पहावयास मिळतो. तर महाराष्ट्राचा स्पष्ट उल्लेख महानुभव लेखक डिंबकृष्णमुनी यांनी केल आहे. विंध्याद्रीपासौनि दक्षिणदिशेसी।कृष्णनदीपासौनि उत्तरेसी।। झाडीमंडळापासौनि पश्चिमेसि । महाराष्ट्र बोलिजे ।।’ असा महाराष्ट्र प्रदेश असल्याचे ते सांगतात. याशिवाय मराठीच्या वापराची उदाहरणे आपल्याला दिवे आगरपंढरपूर येथील ताम्रपटातून पहावयास मिळतात.

                यादव काळात मराठीला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला. या राजभाषेचा विकास करण्याचे कार्य महानुभाव पंथातील अनेकांनी केले. श्री गोविंदप्रभूभटोबासकेसोबाडिंबकुष्णमुनी यांनी मराठीला आकार दिला. पंथियांच्या अनेक साहित्यातून मराठी समृद्ध होत गेली. त्यामध्ये म्हाईंभटांचे लीळाचरित्रगोविंदप्रभूचरित्र किंवा ऋद्धिपूरचरित्रकेशिराजबास यांचे दृष्टांतपाठसिद्धांतसूत्रपाठबाईदेवबास यांचे पूजावासरनरेंद्रस्वामी यांचे रुक्मिणीस्वयंवरभास्करभट्ट यांचे शिशुपाळवधउद्धवगीतादामोरदपंडित यांचे वच्छाहरणरवळोबास यांचे सह्याद्री महात्म्यनारो बहाळिये यांचे ऋद्धिपूरवर्णनविश्वनाथ पंडित यांचे ज्ञानप्रबोधयासह स्थानपोथीवृद्धाचारमार्गरुढीचरित्र अबाबमहदबेचे धवळे अशा ग्रंथांचा समावेश आहे.

                सांकेतीक लिपीचा वापर - महानुभाव साहित्याचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सांकेतीक लिपीचा वापर. या वापरामुळेच अनेक वर्ष हे साहित्य सामान्यांपासून लांब राहिले. पणयाचमुळे हे सर्व साहित्य आहे त्या स्थितीत आज आपल्याला उपलब्ध झाले. यादव काळात 12 व्या शतकात महानुभाव पंथ उदयास आला. पंथियांना मार्गदर्शन करण्यासाठी साहित्याची निर्मिती केली. या साहित्यातूनच अधुनिक मराठीला आकार मिळत गेला. यानंतरच्या काळात वारकरी सांप्रदायांने मराठी अधिक समृद्ध केली.

                महानुभाव सांप्रदायाने महाराष्ट्राला दिलेल्या अनेक देणग्यांपैकी एक म्हणजे समृद्ध साहित्य. पंथियांच्या या साहित्यामध्ये सर्वप्रथम उल्लेख करावा लागेल असा ग्रंथ म्हणले स्थानपोथी. चक्रधरस्वामींनी महाराष्ट्रात ज्या ठिकाणी भ्रमण केले त्याची भौगोलिक माहिती देणारा ग्रंथ म्हणजे स्थानपोथी. चक्रधरस्वामींनी भेटी दिलेल्या ठिकाणी पंथियांनी ओटे बांधले आहेत. त्यामुळे आजही आपणास स्थानपोथीतील गावांचीनगरांची माहिती मिळते. यातील अनेक गावेनगरे आजही अस्तित्वात आहेत. त्यामुळे यादवकालीन महाराष्ट्र समजून घेताना स्थानपोथीचे महत्व अनन्यसाधारण आहे. एकूणच या ग्रंथाच्या माध्यमातून आपणास यादवकाळातील महाराष्ट्राचा भूगोल,  संस्कृतीजीवनपद्धतीग्रामरचनाखाद्य संस्कृतीव्यवहारप्रशासनघर बांधणीव्यापार व व्यवसाय याविषयी सविस्तर माहिती मिळते. त्याकाळच्या महाराष्ट्राचे समग्र दर्शन घडवणारा उत्कृष्ट असा दुसरा ग्रंथ नाही.

लीळाचरित्र मराठीतील पहिला गद्य चरित्रग्रंथ - महानुभाव पंथांचे संस्थापक चक्रधरस्वामी त्यांच्याविषयीच्या आख्यायिकांच्या संग्रहाला लीळाचरित्र असे नाव आहे. महींद्रबास ऊर्फ म्हाईंभट यांनी नागदेवाचार्यांच्या मदतीने चक्रधरांच्या लीळा संकलित केल्या. याचा रचनाकाल सन 1178 च्या आसपासचा आहे. तत्कालीन राजकीयसामाजिक व धार्मिक जीवनाचे मार्मिक चित्रण लीळाचरित्रातून आले आहे.  लीळाचरित्राची भाषा म्हणजे यादवकालीन मराठी गद्याच्या समृद्धतेचा उत्तम नमुनाच होय. छोटी छोटी अर्थपूर्ण वाक्येअलंकृत साधेपणा हे तिचे विशेष होत. त्यावेळचे खाद्यपदार्थवस्त्रचालीरितीकरमणुकीचे प्रकारकायदेसामाजिक सुरक्षासणउत्सव इत्यादी सामाजिक जीवनाच्या दृष्टीने उपयुक्त असे अनेक उल्लेख या चरित्रग्रंथातून आले असल्यामुळे तत्कालीन समाजजीवनाच्या व धार्मिक जीवनाच्या दृष्टीने हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. चक्रधरांच्या काळातील वाक्प्रचारम्हणी यांचा उपयोग करून भाषेला सजविण्याचा प्रयत्न म्हाईंभटांनी केला आहे. साधीसरळसोपी पण आलंकारिक भाषा हे या चरित्रग्रंथाचे वैशिष्ट्य.

ऋद्धिपूरलीळा उर्फ गोविंदप्रभूचरित्र – ऋद्धिपूरचे चक्रधरांचे गुरू गोविंदप्रभू उर्फ गुंडमराउळ यांनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या आठवणी म्हाइंभटाने गोळा केल्या व त्यातून ऋद्धिपूरलीळा उर्फ गोविंदप्रभूचरित्र हा ग्रंथ सिद्ध केला. याचा रचना काळ इ.स. 1288 आहे. प्राचीन वऱ्हाडी भाषेच्या अभ्यासासाठी हा एक उपयुक्त साधन ग्रंथ आहे. गडू = तांब्याहारा = टोपलीहेल = पाणी भरण्याचे मडकेपोपट / पावटे = उकडलेल्या तुरीच्या शेंगागीदरीउकड = नीट न बसलेलाकोनटा = कोपरा असे शब्द या ग्रंथात भेटतात.

मराठीतील पहिला कथासंग्रह दृष्टांतपाठ - दृष्टांत म्हणजे छोटीशी बोधकथा होय. प्रत्येक दृष्टांत स्वतंत्ररोचक आहे. विचारप्रतिपादनतत्त्वज्ञानमांडणीभाषाशैली आणि समाजजीवनाचे निरीक्षण या सर्वच गोष्टींनी हा ग्रंथ अपूर्व आहे.  चक्रधरांचे तत्त्वज्ञान विद्वानांना रुचेल अशा मराठीतून मांडणे व अध्यात्मासारखे शास्त्र पेलण्यास समर्थ अशी शब्दसंपत्ती मराठीत रूढ करणे हे केशिराजाचे मोठे कार्य. दृष्टांतपाठ हा फक्त तत्त्वज्ञानाचा ग्रंथ नाही तर मराठीतील लोककथांचे पहिले संकलन आहे. खरे तर म्हातारियाना तो सोप्या भाषेतील अज्ञानमुंचन करणारा ज्ञानग्रंथ आहे.

रुक्मिणीस्वयंवर – नरेंद्रस्वामींनी लिहलेला हा ग्रंथ म्हणजे मराठीतील पहिले शृंगारिक आख्यानकाव्य. काव्यदृष्ट्या व कालदृष्ट्या साती ग्रंथांमधील पहिल्या क्रमांकाचा ग्रंथ. हे भक्तीतून उमललेले विदग्ध काव्य आहे. ज्या यादवकाळात रुक्मिणीस्वयंवर लिहिले गेले त्या काळात मराठी वाङ्मयाच्या भावसृष्टीवर श्रीकृष्णाच्या भक्तीचे अधिराज्य होते. या काव्याची रचना संस्कृतमधील महाकाव्यांच्या धर्तीवर आहे. वर्णनाची विपुलता व कथानकाची मंदगती यांचा प्रत्यय येतो. रुक्मिणीस्वयंवराच्या कथेवर अनेकांनी रचना केली पण नरेंद्राची सर कुणालाच आली नाही. खरीखुरी कलावंताची दृष्टी असणारा नरेंद्र हा मराठीतील पहिला कवी आहे.

शिशुपालवध - महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. याचा कर्ता भास्करभट्ट बोरीकर आहे. रुक्मिणी-श्रीकृष्ण यांच्या चित्रणासोबतच शिशुपाळवधाचे चित्रण या ग्रंथात आहे. विरक्ती व भक्तीपेक्षा शृंगाराचे चित्रण या ग्रंथात अधिक आढळते. या ग्रंथाविषयी बाईदेवबास म्हणतात भटो ग्रंथु निका जाला : परि निवृताजोगा नव्हेचि (ग्रंथ तर उत्तम झाला आहे पण निवृत्तीमार्गासाठी उपयुक्त नाही!) बाइदेवबासांचे हे उद्गार मराठी समीक्षेचे पहिले वाक्य ठरते.

उद्धवगीता - महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. याचा कर्ता भास्करभट्ट बोरीकर. भागवताच्या एकादशस्कंधावरील मराठीतील ही पहिली टीका ठरते.

वच्छाहरण - महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. कर्ता दामोदर पंडित. दामोदरपंडिताचा कवित्वाचा विलास वृंदावनवर्णनयमुनावर्णनश्रीकृष्णमूर्तीवर्णन यांमधून प्रकर्षाने जाणवतो. श्रीकृष्णवर्णन आणि पंथाच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार हे दुहेरी कार्य दामोदरांनी साधले आहे.

सैह्याद्री-माहात्म्य किंवा सैह्याद्रवर्णन - सैह्याद्री-माहात्म्य किंवा सैह्याद्रवर्णन हा महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. याचा कर्ता रवळोबास आहे. मूळ ग्रंथ शके 1254 ते 1275 यादरम्यान केव्हातरी लिहिला गेला असावा. सैह्याद्रवर्णन काव्यातील सह्याद्री म्हणजे माहूरचा डोंगर. पश्चिम घाटावरील सह्याद्री डोंगराशी या काव्यातील सह्याद्रीचा काही संबंध नाही. सैह्यादी-माहात्म्य हे काव्यकवीचे वर्णनचातुर्यत्याची प्रतिभासृष्टी आणि काव्यातला रसाविष्कार या दृष्टीने वाचले तररवळोबास हे एक एक प्रतिभावंत कवी होते असे प्रत्ययास येते.

ज्ञानप्रबोध - महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. याचा कर्ता विश्वनाथ. काव्य व तत्त्वज्ञान यांचा संगमवैराग्याची व भक्तीची शिकवण या ग्रंथात आहे.

                अशा वैविध्यपूर्ण ग्रंथाच्या लिखाणातून पंथियांनी मराठीचे साहित्यविश्व प्राचीनकाळी समृद्ध केले आहे. त्यांच्या या साहित्याचा वारसा पुढील काळात संत ज्ञानेश्वरांनी पुढे नेला. संत ज्ञानेश्वर माऊलींचा भावार्थदीपिकाअमृतानुभवचांगदेवपासष्टी अशा ग्रंथांनी मराठी भाषेतील साहित्याला वेगळ्या उंचीवर नेले. तर त्यानंतर संत नामदेवसंत तुकाराम महाराज यांनी केलेल्या रचनांनी भक्तीची परंपरा जनसामान्यांपर्यंत पाझरवण्याचे काम केले.

                अशा या समृद्ध मराठीभाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. ही प्रत्येक मराठी माणसासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे.

हेमंतकुमार चव्हाण,

विभागीय संपर्क अधिकारी

0000


महाराष्ट्राबाहेर पुन्हा एकदा अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा डंका

 महाराष्ट्राबाहेर पुन्हा एकदा अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा डंका!


यावर्षी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी नवी दिल्ली येथे होत आहे. या आधी तब्बल बावीस वेळा महाराष्ट्राबाहेर साहित्य संमेलने झाली आहेत. यंदाही हे संमेलन अनेक कारणांसाठी विशेष ठरणार आहे.


केंद्र सरकारकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले साहित्य संमेलन आहे. यामुळे हे संमेलन ऐतिहासिक असेल. हा सोहळा मराठी भाषिक, साहित्यप्रेमींसाठी एक अभिमानास्पद क्षण ठरणार आहे. यामुळे संपूर्ण भारतभर आणि परदेशात विखुरलेल्या मराठी जनामनास एकत्र येण्याची संधी मिळणार आहे. या संमेलनामुळे मराठीचा लौकिक अधिक वृद्धिंगत होईल. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारे उद्घाटन हा मराठी भाषिकांसाठी अभिमानाचा क्षण असेल.


अशी आहे मराठी साहित्य संमेलनाची गौरवशाली परंपरा


मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ १८७८ मध्ये पुण्यात रोवली गेली. त्यानंतर महाराष्ट्राबाहेर मराठी साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी अनेक संमेलने महाराष्ट्राबाहेर पार पडली आहेत. विशेष म्हणजे १८७८ मध्ये सुरू झालेली साहित्य संमेलनाची परंपरा आजही सुरू आहे. पहिले संमेलन १८७८ मध्ये पुणे येथे पार पडले.


✒️ यानंतर १९०९ मध्ये म्हणजेच तब्बल २१ वर्षांनी सातवे संमेलन बडोदा (गुजरात) येथे पार पडले.


✒️ १९१७ मध्ये म्हणजेच तब्बल आठ वर्षांनी दहावे संमेलन मध्यप्रदेश मधील इंदूर येथे पार पडले.


✒️ १९२१ मध्ये तब्बल चार वर्षांनी अकरावे संमेलन बडोदा (गुजरात ) येथे पार पडले.


✒️ १९२८ मध्ये तब्बल सात वर्षांनी चौदावे संमेलन मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर येथे पार पडले.


✒️ १९२९ मध्ये पंधरावे संमेलन कर्नाटकमधील बेळगाव येथे पार पडले.


✒️ १९३० मध्ये सोळावे संमेलन गोव्यातील मडगाव येथे पार पडले.


✒️ १९३१ मध्ये सतरावे संमेलन तेलंगणातील हैद्राबाद येथे पार पडले.


✒️ १९३४ मध्ये तब्बल चार वर्षांनी विसावे संमेलन बडोदा (गुजरात) येथे पार पडले.


✒️ १९३५ मध्ये एकविसावे संमेलन मध्यप्रदेशमधील इंदूर येथे पार पडले.


✒️ १९४६ मध्ये तब्बल अकरा वर्षांनी ३० वे संमेलन कर्नाटकमधील बेळगाव येथे पार पडले.


✒️ १९४७ मध्ये ३१ वे संमेलन तेलंगणातील हैद्राबाद येथे पार पडले.


✒️ १९५१ मध्ये तब्बल चार वर्षांनी ३४ वे संमेलन कर्नाटक मधील कारवार येथे पार पडले.


✒️ १९५३ मध्ये ३६ वे संमेलन गुजरातमधील अहमदाबाद येथे पार पडले.


✒️ १९५४ मध्ये ३७ वे संमेलन दिल्ली येथे पार पडले.


✒️ १९६१ मध्ये ४३ वे संमेलन तब्बल सात वर्षांनी मध्यप्रदेशमधील ग्वालेहर येथे पार पडले.


✒️ १९६४ मध्ये ४५ वे संमेलन गोव्यातील मडगाव येथे पार पडले.


✒️ १९६७ मध्ये ४७ वे संमेलन मध्यप्रदेशमधील भोपाळ येथे पार पडले.


✒️ १९८१ मध्ये तब्बल १४ वर्षांनी ५६ वे संमेलन छत्तीसगडमधील रायपूर येथे पार पडले.


✒️ २००० मध्ये ७३ वे संमेलन तब्बल १९ वर्षांनी कर्नाटक मधील बेळगाव येथे पार पडले.


✒️ २००१ मध्ये ७४ वे संमेलन मध्यप्रदेशमधील इंदोर येथे पार पडले.


✒️ २०१५ मध्ये तब्बल १४ वर्षांनी ८८ वे संमेलन पंजाबमधील घुमान येथे पार पडले. त्यानंतर २०१८


✒️ २०१८ मध्ये ९१ वे संमेलन गुजरात मधील बडोदा येथे पार पडले.


यानंतर यंदा तब्बल ७ वर्षांनी पुन्हा २०२५ मध्ये ९८ वे संमेलन महाराष्ट्राबाहेर दिल्ली येथे पार पडणार आहे.


मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्याचा जागर


मराठी ही केवळ एक भाषा नसून शब्द, साहित्य, संगीत, कला आणि संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. संत साहित्यापासून ते आधुनिक काव्यापर्यंत, लोककथांपासून आधुनिक कादंबऱ्यांपर्यंत, नाटकांपासून चित्रपटांपर्यंत मराठी साहित्याचा वारसा अत्यंत समृद्ध आहे.


या संमेलनात मराठी साहित्यविश्वातील मान्यवर लेखक, कवी, समीक्षक आणि रसिक वाचक एकत्र येणार आहेत. विविध चर्चासत्रे, परिसंवाद, ग्रंथप्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांमधून मराठी भाषेचे भवितव्य उजळवण्याचा संकल्प केला जाणार आहे.


या भव्य सोहळ्याचा भाग बना!


दिल्लीतील हे साहित्य संमेलन मराठी संस्कृतीचा उत्सव आहे. साहित्यप्रेमी, लेखक, कवी, विद्यार्थी आणि मराठी भाषा जपणाऱ्या सर्वांनी या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याची ही सुवर्णसंधी आहे. आपली मराठी संस्कृती जपण्यासाठी, तिचा जागर करण्यासाठी आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी आपण सर्वांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे. चला, तर मग मराठी साहित्याचा हा ऐतिहासिक उत्सव दिल्लीच्या ऐतिहासिक भूमीवर भव्य स्वरूपात साजरा करूया!




 

️ १९६७ मध्ये ४७ वे संमेलन मध्यप्रदेशमधील भोपाळ येथे पार पडले.

️ १९८१ मध्ये तब्बल १४ वर्षांनी ५६ वे संमेलन छत्तीसगडमधील रायपूर येथे पार पडले.

️ २००० मध्ये ७३ वे संमेलन तब्बल १९ वर्षांनी कर्नाटक मधील बेळगाव येथे पार पडले.

️ २००१ मध्ये ७४ वे संमेलन मध्यप्रदेशमधील इंदोर येथे पार पडले.

️ २०१५ मध्ये तब्बल १४ वर्षांनी ८८ वे संमेलन पंजाबमधील घुमान येथे पार पडले. त्यानंतर २०१८

️ २०१८ मध्ये ९१ वे संमेलन गुजरात मधील बडोदा येथे पार पडले.

यानंतर यंदा तब्बल ७ वर्षांनी पुन्हा २०२५ मध्ये ९८ वे संमेलन महाराष्ट्राबाहेर दिल्ली येथे पार पडणार आहे.

मराठी भाषासंस्कृती आणि साहित्याचा जागर

मराठी ही केवळ एक भाषा नसून शब्दसाहित्यसंगीतकला आणि संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. संत साहित्यापासून ते आधुनिक काव्यापर्यंतलोककथांपासून आधुनिक कादंबऱ्यांपर्यंतनाटकांपासून चित्रपटांपर्यंत मराठी साहित्याचा वारसा अत्यंत समृद्ध आहे.

या संमेलनात मराठी साहित्यविश्वातील मान्यवर लेखककवीसमीक्षक आणि रसिक वाचक एकत्र येणार आहेत. विविध चर्चासत्रेपरिसंवादग्रंथप्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांमधून मराठी भाषेचे भवितव्य उजळवण्याचा संकल्प केला जाणार आहे.

या भव्य सोहळ्याचा भाग बना!

दिल्लीतील हे साहित्य संमेलन मराठी संस्कृतीचा उत्सव आहे. साहित्यप्रेमीलेखककवीविद्यार्थी आणि मराठी भाषा जपणाऱ्या सर्वांनी या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याची ही सुवर्णसंधी आहे. आपली मराठी संस्कृती जपण्यासाठीतिचा जागर करण्यासाठी आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी आपण सर्वांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे. चलातर मग मराठी साहित्याचा हा ऐतिहासिक उत्सव दिल्लीच्या ऐतिहासिक भूमीवर भव्य स्वरूपात साजरा करूया!

- वर्षा फडके- आंधळेवरिष्ठ सहायक संचालक 

Featured post

Lakshvedhi