Showing posts with label Kruhi. Show all posts
Showing posts with label Kruhi. Show all posts

Friday, 5 July 2024

ऊस रसापासून इथेनॉल निर्मितीस परवानगी मिळण्यासाठी महिना भरात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांना भेटणार

 ऊस रसापासून इथेनॉल निर्मितीस परवानगी मिळण्यासाठी

महिना भरात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांना भेटणार

उपमुख्यमंत्री अजित पवार

           

            मुंबईदि. 4 :- ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऊस रसापासून इथेनॉल निर्मितीस परवानगी देण्याचे धोरण केंद्र सरकारने कायम ठेवावे. इथेनॉलचा दर 31 रुपयांवरुन 42 रुपयांपर्यंत वाढविण्यात यावाया मागण्यांसाठी याच महिन्यात केंद्रीय सहकार मंत्र्यांची भेट घेण्यात येईल. केंद्र सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल याची खात्री आहेअसा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत व्यक्त केला.

            सदस्य जयंत पाटील आणि राजेश टोपे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर उत्तर देतांना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन देण्याचे केंद्राचे धोरण होते. त्यासाठीच्या प्रकल्प निर्मितीस सहा टक्के व्याजदराने कर्जही उपलब्ध करण्यात आले. परंतु नंतरच्या काळात साखरेचे दर नियंत्रित ठेवणे आणि साखरेचा तुटवडा टाळण्यासाठी केंद्राने इथेनॉल निर्मितीबाबतच्या धोरणात बदल केला. परंतु आता राज्यात आणि देशात विक्रमी साखरेचे उत्पादन झाले असल्याने ऊस रसापासून इथेनॉल निर्मितीस बंदी घालण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. यासंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी अनौपचारिक चर्चा झाली असून त्यांनीही सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर महिनाभरात केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. गेल्या काही वर्षात एफआरपीमध्ये वाढ झाली. त्याच प्रमाणात एमएसपीही वाढण्याची गरज आहे. ऊस उत्पादक शेतकरी आणि ग्राहक या दोघांच्या हिताचा विचार करुन यासंदर्भात निर्णय होईलअसा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी व्यक्त केला.

Featured post

Lakshvedhi