Showing posts with label मनोरंजन. Show all posts
Showing posts with label मनोरंजन. Show all posts

Tuesday, 6 May 2025

फुलले रे क्षण माझे फुलले रे

 किती छान लिहिले आहे,फुलांविषयी केवढी क्रियापदे की विशेषणे... कमाल आहे आणि प्रत्येक गोष्ट पटते!!👍👍

                                                                               फुले माळावी मोगर्‍याची

फुले वेचावी पारिजातकाची

फुले जपावी बकुळीची

फुले दरवळावी चाफ्याची

फुले खुलावी गुलाबाची

फुले वाहावी अनंताची

फुले बहरावी बहाव्याची

फुले घमघमावी रातराणीची

फुले फुलावी कमळाची

फुले रंगावी जास्वंदाची

फुले झुलावी मधुमालतीची

फुले भरावी केळ्याची

फुले मोहरावी आंब्याची

फुले ओघळावी बुट्ट्याची

फुले दिखावी बोगनवेलीची

फुले स्मरावी बाभळीची

फुले लाघवी अबोलीची

फुले निगर्वी गोकर्णीची

फुले उधळावी झेंडूची

फुले तोलावी केशराची

फुले उमलावी ब्रम्हकमळाची

फुले निरखावी कृष्णकमळाची !


🌷🌹🥀🌺🌸🌼🌻🌾🍂

Wednesday, 16 April 2025

वेव्हज् : मनोरंजनाची सर्वसमावेशक चळवळ ,लेखक : आमिर खान, अभिनेता आणि निर्माते (सौजन्य: पी आय बी, मुंबई)

 वेव्हज् : मनोरंजनाची सर्वसमावेशक चळवळ

 

मनोरंजन व्यवसायात योगदान देणाऱ्या विविध घटकांना एका मंचावर आणून त्यांना परस्पर सहकार्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या देवाण-घेवाणीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या वेव्हज शिखर परिषद आणि व्हेज बाजाराविषयी

 

भारत हा मनोरंजन आणि माध्यम उद्योग जगतातला एक आघाडीचा आणि तितकाच महत्त्वाचा देश. भारतात या उद्योग क्षेत्राची प्रगतीही तितक्याच झपाट्याने होत आहे आणि त्यासोबतच या परिसंस्थेच्या अवकाशात सातत्याने होत असलेल्या बदलांसह हे क्षेत्रही तितक्याच सातत्यपूर्णतेने बहरत चालले आहे. आज या क्षेत्राकडे नीट पाहिले तर विविध व्यासपीठांवरच्या आशय निर्मितीनेही मोठी उसळी घेतल्याचे दिसते. यामागचे कारण म्हणजे देशातील वाढत्या डिजिटल प्रसारण सेवाप्रादेशिक भाषांमधील आशय सामग्री निर्मिती आणि सातत्याने नव्याखिळवून ठेवणाऱ्यासर्वसमावेशकतेची जाणीव करून देणाऱ्या आशयाची वाढती मागणी करत असलेला देशातला तंत्रज्ञानस्नेही प्रेक्षक वर्ग. त्यामुळेच तर आता भारतासाठी हे क्षेत्र केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून मर्यादित राहिलेले नसूनहे भारतासाठी सांस्कृतिक अभिव्यक्तीआर्थिक विकास आणि जागतिक पटलावर आपला प्रभाव पाडण्याचे एक सामर्थ्यशाली माध्यम झाले आहे. लवकरच मुंबईत जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद (World Audio Visual & Entertainment Summit - WAVES) होणार आहे. येत्या १ ते ४ मे २०२५ दरम्यान महाराष्ट्रातमुंबई इथे ही शिखर परिषद होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे भारत सरकारनेच या परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद जागतिक पटलावर भारताच्या वाढत्या महत्त्वाचे प्रतिबिंब असलेला एक मंच ठरणार आहे आणि वेव्हज बाजार हा या शिखर परिषदेअंतर्गतचाच एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. खरे तर गेल्या अनेक दशकांपासून मी या क्षेत्रातच जगतोवावरतो आहे. या इतक्या प्रदीर्घ काळातील माझ्या स्वत:च्या अनुभवांवरून मी एक गोष्ट खात्रीने सांगू शकतो ती म्हणजे कथात्मक मांडणीत लोकांना एकत्र आणण्याचीत्यांना प्रेरित करण्याची आणि एकुणात परिवर्तन घडवून आणण्याची मोठी ताकद असते. याच पार्श्वभूमीवर वेव्हज आणि वेव्हज बाजाराच्या माध्यमातून भारताने जागतिक मनोरंजन क्षेत्रासाठी एका व्यापक सहकार्यपूर्ण भागीदारीचे आणि सर्वसमावेशक भविष्य घडवण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

खरे तर वेव्हज बाजार ही ऑनलाइन बाजारपेठेसाठी आखली गेलेली एक क्रांतिकारक संकल्पना आहे. ही ऑनलाइन बाजारपेठ म्हणजे जागतिक मनोरंजन परिसंस्थेअंतर्गतचे व्यावसायिक तज्ज्ञउद्योग - व्यवसायआणि कलाकारांना परस्परांसोबत जोडून देणारे माध्यम ठरणार आहे. या बाजारपेठेअंतर्गत या क्षेत्रातील परस्पर सहकार्य सुलभ करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले गेले आहे. याद्वारे या क्षेत्रातील व्यावसायिक तज्ज्ञांना नव्या संधी शोधण्याची आणि सहकार्यपूर्ण भागीदारी स्थापित करण्याची संधी मिळणार आहे. या बाजारपेठेला माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील एक अभिनव व्यवसाय केंद्र म्हणून स्थान मिळवून देण्याचाच सरकारचा प्रयत्न आहे. भारताचे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 27 जानेवारी २०२५ रोजी या अभिनव बाजारपेठेचे औपचारिक उद्घाटन केले होते. आर्थिक क्षेत्रात दावोस शिखर परिषदेचे स्थान आहेतेच मनोरंजन क्षेत्रात वेव्हज शिखर परिषदेला मिळवून देण्याचा दृष्टिकोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला होता. त्या दृष्टीने वेव्हज बाजार महत्त्वाचे साधन ठरणार आहे.

वेव्हज बाजाराच्या अधिकृत संकेतस्थळावर आतापर्यंतमाध्यम आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित विविध क्षेत्रांमधील सुमारे ५५०० खरेदीदार२००० पेक्षा जास्त विक्रेते आणि जवळपास १००० प्रकल्पांसाठी नोंदणी केली गेली आहे. भविष्यात या संकेतस्थळाला माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठीच्या आशय सामग्रीची एक सर्वसमावेशक बाजारपेठ आणि परस्पर संपर्काच्या केंद्राचे स्वरूप प्राप्त करून देणे हा सरकारचा मानस आहे. त्या दृष्टीनेच संकेतस्थळाला कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रोफाइलिंग म्हणजेच त्या त्या व्यक्तींची व्यावसायिक ओळख करून देण्याची तसेच मागणीनुसार जुळवणी करून देण्याच्या तंत्रज्ञानाचीही जोड दिली गेली आहे. या माध्यमातून ऑनलाइन संकल्पना मांडण्याचे सत्रऑनलाइन बीटूबी बैठका (विविध व्यावसायिक प्रतिनिधींच्या बैठका)वेबिनार या आणि अशाच प्रकारच्या इतर महत्त्वाच्या सत्रांचेही आयोजन केले जाणार आहे.

ही बाजारपेठ म्हणजे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या अवकाशातील चित्रपटदूरचित्रवाणीअॅनिमेशनगेमिंगजाहिरातवर्धित वास्तव (एक्स्टेंडेड रिअॅलिटी)संगीतध्वनी संयोजननभोवाणी या आणि अशा विविध क्षेत्रांमधील भागधारकांना एकत्र आणणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. हे व्यासपीठ विक्रेते आणि खरेदीदारांतील दुवा ठरेल आणि त्याद्वारे व्यावसायिकांना आपली कौशल्ये सुलभतेने सादर करण्याचीत्यांच्या संभाव्य ग्राहकांसोबत थेट संपर्क साधण्याची आणि उपयुक्त सहकार्यपूर्ण भागीदारीची संधी उपलब्ध करून देत राहील.

एखादा चित्रपट दिग्दर्शक आपल्या चित्रपटासाठी निर्मिती भागीदाराच्या शोधात असेलएखादा जाहिरातदार योग्य व्यासपीठाच्या शोधात असेलएखादा गेम डेव्हलपर गुंतवणूकदाराच्या शोधात असेल किंवा एखादा कलाकार आपल्या कलाकृतींना जागतिक स्तरावरील प्रेक्षकांसमोर सादर करू इच्छित असेलतर अशा सर्वांसाठी वेव्हज बाजारपेठेचा हा मंच म्हणजे परस्पर संपर्कसहकार्य आणि व्यवसायवृद्धीचे बहुआयामी व्यासपीठ उपलब्ध करून देणारी मोठी जागा किंवा बाजारपेठ असणार आहे.

एका अर्थाने वेव्हज बाजार ही एकप्रकारची समन्वित बीटूबी बैठकांची अभिनव बाजारपेठ आहेजिने जागतिक मनोरंज क्षेत्रातील परस्पर संपर्क व्यवस्थापरस्पर सहकार्यपूर्ण भागीदारी व्यवस्थाआणि विकासाचा संपूर्ण चेहरामोहरा अगदी क्रांतिकारकरीत्या बदलला आहे. या बाजारपेठेने चित्रपटदूरचित्रवाणीसंगीतगेमिंगअॅनिमेशनजाहिरात तसेच वर्धित वास्तव (एक्स)आभासी वास्तव (व्हीआर) यांसारख्या जिवंत अनुभूती देणाऱ्या तंत्रज्ञानाशी संबंधित तज्ज्ञ व्यावसायिकांना एकत्र आणणारा मंच उपलब्ध करून दिला आहे. आणि याद्वारे विविध सर्जनशील क्षेत्रांसाठीच्या आशय सामग्रीचे सूचीकरणत्याचा शोध आणि संबंधित व्यवहारांसाठीचाही एक व्यापक मंच उपलब्ध झाला आहे. चित्रपट वितरणासाठीचा मंचाच्या शोधात असलेले निर्मातेनव्या संकल्पना मांडू पाहणारे गेम डेव्हलपर किंवा लायसन्सिंग संधींच्या शोधात असलेले साऊंड डिझायनर अशा सगळ्यांसाठी वर्गवारीनुसार सूचीकरणसुरक्षितपणे सादरीकरणे पाहण्याची दालने आणि संपर्क व्यवस्था उपलब्ध करून देत ही संपूर्ण प्रक्रिया सुलभ करणारी बाजारपेठ म्हणून वेव्हज बाजार उदयाला येणार आहे.

या बाजारपेठेच्या माध्यमातून भौगोलिक मर्यादांच्या पलीकडे जात विक्रेते आणि खरेदीदारांना त्यांच्यासाठीचा योग्य भागीदार आणि संधी शोधण्याच्या दृष्टीने सक्षम करणाऱ्या सुविधांचा अंतर्भाव केला आहे. चित्रपट स्टुडिओअॅनिमेशन हाऊसपॉडकास्ट निर्मातेमार्केटिंग यंत्रणा यांसारख्या विक्रेत्यांना आपल्या सेवा आणि त्यांच्याकडची आशय सामग्री जागतिक गुंतवणूकदारवितरक आणि भागीदारांसमोर सादर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दुसरीकडे खरेदीदारांसाठीदेखील उच्च गुणवत्तेचेआधुनिक काळाशी सुसंगत प्रकल्प या बाजारपेठेमुळे उपलब्ध होऊ लागले आहेत. त्याच वेळी गुंतवणूकदारांसाठीदेखील सहनिर्मितीच्या करारांची आणि व्यापक व्यावसायिक संधींची दारे खुली झाली आहेत. इथे आवर्जून उल्लेख करायला हवी अशी गोष्ट म्हणजे या व्यासपीठाला या उद्योग क्षेत्राशी संबंधित विशिष्ट उपक्रमसादरीकरणे पाहण्याची दालनेगुंतवणूकदारांबरोबरच्या बैठका - चर्चा आणि कलाकृतींच्या थेट प्रक्षेपण सत्रांसारख्या लाइव्ह स्क्रीनिंगसारख्या उपक्रमांशी जोडले गेले आहेयामुळे या व्यासपीठाच्या माध्यमातून केवळ आभासी संवादाच्या पलीकडे जात खऱ्या अर्थाने उपयुक्त असलेले करार आणि व्यवहार प्रत्यक्षात साकारले जातील याचीच सुनिश्चिती झाली आहे.

सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे येत्या १ ते ४ मे २०२५ दरम्यान मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलात वेव्हज शिखर परिषद होणार असून त्यावेळी हा वेव्हज बाजारही साकारला जाणार आहे. यानिमित्ताने उपलब्ध करून दिलेल्या डिजिटल बाजारपेठेवर नोंदणी केलेल्या काही निवडक प्रतिनिधींना या बाजारपेठेत आपल्या संकल्पना मांडण्याचीया उद्योग क्षेत्रातील विविध घटकांसोबत संपर्क प्रस्थापित करण्याचीआघाडीच्या भागधारकांसोबत प्रत्यक्ष करार आणि व्यवहार पूर्णत्वाला नेण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. अभिनव दृष्टिकोनामुळे वेव्हज बाजार केवळ एक व्यासपीठ म्हणून मर्यादित राहिलेले नाहीतर ते अधिक स्मार्टपरस्परांशी अधिक जोडलेले आणि जागतिक पातळीवरील सर्वसमावेशक मनोरंजन क्षेत्राच्या दिशेने सुरू झालेली चळवळच ठरले आहे.

एक कलाकार म्हणूनआम्ही कायमच आव्हानात्मकप्रेरणादायी आणि चौकटीपलीकडे जाऊन विचार करायला लावणाऱ्या अवकाशाच्या शोधात असतो. वेव्हज हा अशाच प्रकारच्या अवकाशाच्या निर्मितीचा प्रयत्न आहे. दूरदृष्टीने सुरू केलेल्या या वाटचालीचा आपणही एक भाग असल्याचा मला खरोखरच अभिमान वाटतो. ही परिषद आपल्या परस्परांशी संपर्काच्याकलाकृतींच्या निर्मितीच्या आणि मांडणीच्या पद्धतींमध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणेल. हा बदल केवळ भारतापुरता मर्यादित नसेल तर त्याचा प्रभाव अवघ्या जगात दिसेल. ही परिषद म्हणजे भारतासाठीचा लगान’ क्षण आहे. जगभरातील माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी एकतेचाधैर्याचा आणि एका अशा दृष्टिकोनाचा क्षण आहेज्याचा प्रतिध्वनी आपल्या सीमांच्याही पलीकडे ऐकू येत राहील.

 

लेखक : आमिर खान, अभिनेता आणि निर्माते

(सौजन्य: पी आय बीमुंबई)

००००

Wednesday, 26 March 2025

*अर्जंट पाहिजेत....*

 *अर्जंट पाहिजेत....*


*🤲इच्छुक व्यक्तींनी संपर्क साधावा🤲*


*एक शिंपी पाहिजे,*

*जो एकमेकांची तुटलेली नाती शिवु शकेल*


*एक इलेक्ट्रिशियन पाहिजे,*

👉🏻 *जो एकमेकांशी न*

     *बोलणाऱ्या दोन व्यक्तीमध्ये पुन्हा*

     *एकदा कनेक्शन जोडून देईल,✌🏻*


*एक ऑप्टिशियन पाहिजे,*

👉🏻 *जो लोकांची दृष्टी आणि*

     *दृष्टीकोन नीट करून देईल,👍🏻*


*एक कलाकार पाहिजे,*

👉🏻 *जो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित*

     *हास्याच्या रेषा रेखाटू शकेल,😊*


*एक बांधकाम कामगार पाहिजे,*

👉🏻 *जो दोन शेजाऱ्यांमध्ये*

     *उत्तम सेतू उभारू शकेल,*


*एक माळी काका पाहजे,*

👉🏻 *जो चांगल्या विचारांच*

      *रोपण करू शकेल,☝🏻*


*एक प्लंम्बर पाहिजे,*

👉🏻 *जो तुंबलेल्या मनांना*

     *मोकळं करू शकेल,🤗*


*एक शास्त्रज्ञ पाहिजे,*

👉🏻 *जो एकमेकांबद्दलची*

     *ओढ शोधू शकेल,😌*


*आणि सर्वात महत्वाचे म्हणजे,*


*एक शिक्षक पाहिजे,*

👉🏻 *जो एकमेकांशी संवाद कसा*

     *साधायचा ते शिकवू शकेल,*☝🏻


*आज तुम्हा-आम्हा, सर्वांना*

*याचीच नितांत गरज आहे..!!*

" या जन्मावर, या जगण्यावर, शतदा ( शंभर  वेळा ) प्रेम करावे." 


*संपर्क :- माणसाने माणसाशी करावा .*


    🚩तुमचा दिवस आनंदात जाओ 🚩

Friday, 14 March 2025

शिमगोत्सव कोकण


 गावातले,ta दापोली, जिल्हा -  रत्नागिरी 

Wednesday, 5 March 2025

एका व्यक्तीने मध्ये न थांबता 101 ची नावे रिंगिंग टोनमध्ये पाठ केली. धृतराष्ट्र आणि गांधारी यांनाही कदाचित 101 नावे आठवली


 *एका कन्नड शोमध्ये, होस्टने प्रेक्षकांना विचारले, "101 कौरवांची नावे कोणाला माहित आहेत?" एका व्यक्तीने मध्ये न थांबता 101 ची नावे रिंगिंग टोनमध्ये पाठ केली. धृतराष्ट्र आणि गांधारी यांनाही कदाचित 101 नावे आठवली नसतील!*🤗 *(गजब : ये किसी भारतीय का टॅलेंट ही हो सकता है)* 👏👏

Sunday, 27 October 2024

हसून हसून पोट दुखेल बाबाआजोबा आता तुमचा जमाना गेला...आता आमच्या नवीनम्हणी ऐका...आधुनिक युगाच्या अफलातून आधुनिक म्हणी-🍥

 हसून हसून पोट दुखेल  बाबाआजोबा आता तुमचा जमाना गेला...आता आमच्या नवीनम्हणी ऐका...आधुनिक युगाच्या अफलातून आधुनिक म्हणी-🍥

१) राहायला नाही घर म्हणे लग्न कर !🍥२) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये !🍥३) खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन !🍥४) मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क !🍥५) चुकली मुलं सायबरकॅफ़ेत !🍥६) चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये !🍥७ ) ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार !🍥८) नाजुक मानेला मोबाईलचा आधार !🍥९) मनोरंजन नको रिंगटोन आवर !🍥१०) स्क्रिनपेक्षा एस एम एस मोठा !🍥११) जागा लहान फ़र्निचर महान !🍥१२) उचलला मोबाईल लावला कानाला !🍥१३) रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार !🍥१४) काटकसर करुन जमवलं, इंकम टॅक्समध्ये गमावलं 🍥१५) साधुसंत येती घरा, दारंखिडक्या बंद करा !🍥१६) ज्याची खावी पोळी, त्यालाच घालावी गोळी🍥१७) एकमेका पुरवू कॉपी, अवघे होऊ उत्तीर्ण !🍥१८) लांबून देखणी, जवळ आल्यावर चकणी !🍥१९) चोर्या करुन थकला आणि शेवटी आमदार झाला🍥२०) आपले पक्षांतर, दुसर्याचा फुटीरपणा !🍥२१) प्रयत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे !🍥२२) अन्यायाचा फास बरा, पण चौकशीचा त्रास आवरा !🍥२३) जया अंगी खोटेपण, तया मिळे मोठेपण !🍥२५) सरकार जेवू घालीना, पदवी भिक मागू देईना 🍥२६) वशिल्याच्या नोकरीला शिक्षण कशाला२७) वयही गेले, पैसेही गेले, हाती राहीले दाखले !🍥२८) घोड्याच्या शर्यतीत वशिल्याचे गाढव पुढे !🍥२९) साहेबापुढे वाचली गीता, कालचा मेमो बराहोता !🍥३०) गाढवापुढे वाचली गीता वाचणारा गाढव होता !🍥३१) स्मगलींगचे खाणार, त्याला दाऊद देणार !🍥३३)न्हाव्यावर रुसला अन जंगल वाढवून बसला!🍥३४) पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा !🍥३५) पुढार्याचं मुळ व हॉटेलची चूल पाहु नये !🍥३६) नाव सुलोचनाबाई, चष्म्याशिवाय दिसत नाही !🍥३७) नाव गंगूबाई, आंघोळीला पाणी नाही!🍥३८) घरात नाही दाणा आणी म्हणे बर्शन आणा !🍥३९) घरावर नाही कौल पण अॅंटीनाचा डौल !🍥४०) घाईत घाई त्यात चष्मा नाही !🍥४१) रिकामा माळी ढेकळ फोडी !🍥४२) घरोघरी मॉडर्न पोरी !🍥४३) ओठापेक्षा लिपस्टीक जड !🍥४४) नाकापेक्षा चष्मा जड !🍥४५) अपुर्या कपडयाला फॅशनचा आधार !🍥४६) बायकोची धाव माहेरापर्यंत !🍥४७) गोष्ट एक चित्रपट अनेक !🍥४८) काम कमी फाईली फार!🍥४९) लाच घे पण जाच आवर !🍥५०) मंत्र्याच पोर गावाला घोर !🍥५१) मरावे परी मूर्तिरुपे उरावे !🍥५२) नटीच्या लग्नाला सतरा नवरे !🍥५३) मिळवत्या मुलीला मागणी फार !🍥५४) रिकामी मुलगी शृंगार करी!🍥५५) प्रेमात पडला हुंडयास मुकला !🍥५६) दुरुन पाहुणे साजरे !🍥५७) ऑफीसात प्यून शहाणा !🍥५) सत्ता नको पण खैरनार आवर !🍥५९) एक ना धड भाराभर पक्ष !🍥६०) हरावे परी डिपॉझिटरुपी उरावे !🍥६१) थेंबे थेंबे लोकसंख्या वाढे !🍥६२) तोंडाला पदर गावाला गजर !🍥६३) कष्टानं कमावलं बाटलीनं गमावलं !🍥६४) रात्र थोडी डास फार !🍥६५) शिर सलामत तो रोज हजामत ६६) नेता छोठा कटआऊट मोठा !🍥६७) चिल्लरपुरता सत्यनारायण!🍥६८) दैव देते आयकर नेत !🍥६९) डीग्री लहान वशिला महान!


करा शेअर...😀😀😀

Thursday, 22 August 2024

चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने शिवाजी साटम सन्मानित राज्य सांस्कृतिक पुरस्कार रोहिणी हट्टंगडी यांना, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२४ अनुराधा पौडवाल यांना प्रदान राज्याच्या १३ कोटी जनतेच्या वतीने देण्यात येणारे

 चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने शिवाजी साटम सन्मानित

राज्य सांस्कृतिक पुरस्कार रोहिणी हट्टंगडी यांनागानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२४ अनुराधा पौडवाल यांना प्रदान

राज्याच्या १३ कोटी जनतेच्या वतीने देण्यात येणारे

 राज्य मराठी चित्रपट पुरस्कार अनमोल.

-  सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

५८ व ५९ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा

          मुंबई दि. २१ : मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि मानाचे समजले जाणारे राज्य शासनाचे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार हे राज्यातील १३ कोटी जनतेचे प्रतिनिधी म्हणून राज्य शासनामार्फत दिले जातात. हे पुरस्कार अनमोल असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 

            वरळी येथील एन एस सी आय डोम येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण  करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेमहाराष्ट्र चित्रपटरंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटीलसांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते.

            यावेळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२४ प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांना ,  प्रख्यात अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी यांना चित्रपटांसाठी राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२४ आणि कंठसंगीतासाठी प्रख्यात गायक सुदेश भोसले यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

            यावेळी चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२३ शिवाजी साटम,  चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार २०२३, दिग्पाल लांजेकर यांना प्रदान करण्यात आला. 

            स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२३ आशा पारेख यांना तर स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०२३ एन चंद्रा यांना प्रदान करण्यात आले.

 

तसेच यावेळी पुढील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले

  58 वे राज्य चित्रपट पुरस्कार खालीलप्रमाणे -

 

सर्वोत्कृष्ट कथा :-  शंतनू रोडे ( गोष्ट एका पैठणीची ),

पटकथा :- मकरंद मानेविठ्ठल काळे  (बापल्योक ),

उत्कृष्ट संवाद :-  शंतनू रोडे ( गोष्ट एका पैठणीची )

उत्कृष्ट गीते :- गुरु ठाकूर, (बापल्योक)

उत्कृष्ट संगीत: -  राहुल देशपांडे ( मी वसंतराव )

उत्कृष्ट पार्श्वसंगीत:-  विजय गवंडे ( बापल्योक ),

उत्कृष्ट पार्श्वगायक:-  राहुल देशपांडे ( मी वसंतराव )

उत्कृष्ट पार्श्वगायिका:-  प्राची रेगे ( गोदाकाठ )  

उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक :-  सुजितकुमार (चोरीचा मामला )

उत्कृष्ट अभिनेता:-  राहुल देशपांडे ( मी वसंतराव )

 

उत्कृष्ट अभिनेत्री :-  मृण्मयी गोडबोले ( गोदाकाठ )

उत्कृष्ट विनोदी अभिनेता :- जितेंद्र जोशी ( चोरीचा मामला )

सहाय्यक अभिनेता :-  विठ्ठल काळे ( बापल्योक ),

सहाय्यक अभिनेत्री:- प्रेमा साखरदांडे ( फनरल)

प्रथम पदार्पण अभिनेता:- ऋतुराज वानखेडे ( जयंती)

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :-  पल्लवी पालकर ( फास )

 

 ५९ वे राज्य चित्रपट पुरस्कार  खालीलप्रमाणे -

 

सर्वोत्कृष्ट कथा :- मंगेश जोशीअर्चना बोराडे ( कारखानिंसांची वारी),

उत्कृष्ट पटकथा :- रसिका आगासे ( तिचं शहर होणं ),

उत्कृष्ट संवाद :-   नितीन नंदन ( बाल भारती )

उत्कृष्ट गीते:- जितेंद्र जोशी ( गोदावरी )

उत्कृष्ट संगीत: - अमित राज ( झिम्मा)

उत्कृष्ट पार्श्वसंगीत :-  सारंग कुलकर्णी ( कारखानीसांची वारी)

उत्कृष्ट पार्श्वगायक :- राहुल देशपांडे ( गोदावरी ),

उत्कृष्ट पार्श्वगायिका :- आनंदी जोशी ( रंगिले फंटर),

उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक :- फुलवा खामकर ( लक डाऊन be positive )

उत्कृष्ट अभिनेता :-जितेंद्र जोशी ( गोदावरी,) 

उत्कृष्ट अभिनेत्री :- सोनाली कुलकर्णी ( तिचं शहर होणं ),

उत्कृष्ट विनोदी अभिनेता :- भालचंद्र कदम ( पांडू )

सहाय्यक अभिनेता :-  अमेय वाघ ( फ्रेम )

सहाय्यक अभिनेत्री :- हेमांगी कवी ( तिचं शहर होणं ),

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता :-  योगेश खिल्लारे ( इंटर नॅशनल फालमफोक )'

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :-श्रुती उबाले (भ्रमणध्वनी),

उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री :- निर्मिती सावंत ( झिम्मा )

००००


 

Wednesday, 21 August 2024

Thanks a lot

 कॅमेरूनच्या जंगलात एका चिंपांझीने एका फ्रेंच फोटोग्राफरला तुझ्या हातांची ओंजळ करून मला पाणी प्यायला मदत कर अशी इशाऱ्याने विनंती केली. त्यांनतर पाणी पिऊन झाल्यावर त्या फोटोग्राफरचे हात धुऊन देत आभार / कृतार्थता व्यक्त केले, आभारी असणे, कृतार्थ असणे, उपकारांची जाण ठेवणे हे निसर्गतः आहे, आपण विसरत चाललोय का ? आपलं वर्तन अधिकाधिक अनैसर्गिक होत चाललंय का ?


Monday, 29 July 2024

Sunday, 21 July 2024

हसा लेको


 

*लाडक्या 3 योजना* ओळखा पाहू

 *लाडक्या 3 योजना*


1. लाडकी बहीण योजना

2. लाडका भाऊ योजना

च्या प्रचंड यशा नंतर 


*लव करच*


*💃 लाडकी मैत्रीण योजना*💃🏻


लाडकी मैत्रीण असणाऱ्या व्यक्तिला मिळणारे लाभ.


१) ॲाफिस वेळेतुन एक तास सुट किंवा आठवड्यात एक दिवस लाडकी मैत्रीण रजा मिळणार.


२) मैत्रिणीला फिरविण्यासाठी बाइक अथवा कार च्या पेट्रोल रकमेत ३०% सुट किंवा टॅक्सी allowance देण्यात येणार.


३) पत्नी पासुन संरक्षण मिळणार.


*नियम व आवश्यक कागदपत्रे*


१) कमीत कमी एक मैत्रीण असावी. 

२) १ महिन्याचा व्हॅाटस ॲप किंवा फेसबुक बरच संभाषण अनिवार्य. 

३) मैत्रीण तुमचेबरोबर आनंदि आहे याचा पुरावा म्हणुन एक सेल्फि फोटो.

४) पुरुष हा वयाने चाळीशीचे पुढिल असावा.


 *या योजनेमुळे होणारे फायदे*


१)पुरुषांची कार्यक्षमता वाढेल.  

२) इकडे तिकडे फिरण्याचे प्रमाण कमी होईल.

३) पुरुष तणाव मुक्त जीवन जगतील. 💃😆

Saturday, 13 July 2024

आला वारा संग पावसाच्या धारा, चला खेळ खेळू


 

DJ वाला बाबू

 आज-काल कोणी जन्माला आला तर डीजे, कोणी मेला तर डीजे, लग्नाला डीजे, श्राद्धाला डीजे ,पूजेला डीजे,  जिंकले तर डीजे, हारले तर डीजे,... डीजे ऐकून ऐकून गल्लीतल्या कुत्र्यांचे काय हाल झाले आहेत बघा😄


😅

Featured post

Lakshvedhi