किती छान लिहिले आहे,फुलांविषयी केवढी क्रियापदे की विशेषणे... कमाल आहे आणि प्रत्येक गोष्ट पटते!!👍👍
फुले माळावी मोगर्याची
फुले वेचावी पारिजातकाची
फुले जपावी बकुळीची
फुले दरवळावी चाफ्याची
फुले खुलावी गुलाबाची
फुले वाहावी अनंताची
फुले बहरावी बहाव्याची
फुले घमघमावी रातराणीची
फुले फुलावी कमळाची
फुले रंगावी जास्वंदाची
फुले झुलावी मधुमालतीची
फुले भरावी केळ्याची
फुले मोहरावी आंब्याची
फुले ओघळावी बुट्ट्याची
फुले दिखावी बोगनवेलीची
फुले स्मरावी बाभळीची
फुले लाघवी अबोलीची
फुले निगर्वी गोकर्णीची
फुले उधळावी झेंडूची
फुले तोलावी केशराची
फुले उमलावी ब्रम्हकमळाची
फुले निरखावी कृष्णकमळाची !
🌷🌹🥀🌺🌸🌼🌻🌾🍂
No comments:
Post a Comment