Showing posts with label मुख्यपृष्ठ. Show all posts
Showing posts with label मुख्यपृष्ठ. Show all posts

Saturday, 16 August 2025

पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर

 पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर

महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. रस्तेविमानतळ सोबत वाढवण बंदरचे काम हाती घेतले आहे. हे बंदर जगातलं दहाव्या क्रमांकाच्या पहिल्या दहा बंदरामध्ये आहे.  यामुळे महाराष्ट्र आणि भारत एक नवीन मेरिटाइम पॉवर होणार आहे. त्याच वेळी पुणेमुंबईनागपूरगडचिरोलीअमरावतीछत्रपती संभाजीनगर या विमानतळांचेनवीन विमानतळ बांधणे किंवा आधुनिकीकरण हे कार्यसुद्धा सुरु आहे.

Monday, 28 July 2025

नागपूर महानगराच्या वाढत्या विस्ताराला आकार देण्यासाठी तीन टप्प्यात गतिशीलता आराखडा साकार करू

 नागपूर महानगराच्या वाढत्या विस्ताराला आकार देण्यासाठी तीन टप्प्यात

गतिशीलता आराखडा साकार करू

-       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

·         दळणवळण यंत्रणेला भक्कम करणाऱ्या आरखड्याबाबत लोकप्रतिनिधींसह जनेतेनेही आपली मते नोंदविण्याचे आवाहन

·         भक्कम व सुलभ वाहतूक व्यवस्था नागपूरकरांसाठी होणार उपलब्ध

·         सुमारे 25 हजार 567 कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा

        नागपूरदि. 27 : नागपूरच्या वाढत्या विस्तारात सार्वजनिक वाहतूकीच्या सुलभ वाहतूक व्यवस्थेसह सर्व भागांना जोडणाऱ्या उत्तम वाहतूकीच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सद्यस्थितीत नागपूर मध्ये रस्त्यांच्या सुविधा चांगल्या असल्यातरी त्या कमी पडत आहेत. वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पायी चालणाऱ्या लोकांसाठी सुरक्षित फुटपाथसह सर्व भागांना जोडणाऱ्या नवीन रस्त्यांची निर्मितीअपुऱ्या स्थितीतील चौकांचे विस्तारीकरणमहानगरात धावणाऱ्या बसेसचे थांबेसार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बसेसचे मार्गमेट्रो स्टेशन पासून त्याला बसेसची कनेक्टीव्हिटी आदी मुलभूत विकासासाठी सर्वसमावेशक गतीशीलता आराखडा तयार करण्यात आला आहे. सुमारे 25 हजार 567 कोटी रूपयांच्या प्रारूप आरखड्याला अधिक लोकाभिमुख करून सक्षम करण्यासाठी जनतेचीही मते याबाबत जाणून घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.   

            नागपूर महानगराच्या सर्वसमावेशक गतिशिलता आराखड्याबाबत आज मेट्रो भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरीपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेवित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वालखासदार श्यामकुमार बर्वेआमदार सर्वश्री कृष्णा खोपडेप्रवीण दटकेसमीर मेघेचरणसिंग ठाकूरसंजय मेश्रामविभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरीशहर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगलमहा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर,  नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीनाजिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनीमहामेट्रोचे संचालक अनिलकुमार कोकाटेराजीव त्यागी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील तसेच महामेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

Friday, 2 May 2025

महाराष्ट्र आणि गुजरात देशाच्या विकासात आणि जागतिक पटलावर चमकणारी राज्य : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

 महाराष्ट्र आणि गुजरात देशाच्या विकासात आणि जागतिक पटलावर

चमकणारी राज्य : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

 




नवी दिल्ली दि. 1 : भारताला समृद्ध करणारे भारताचे नाव जागतिक पटलावर येण्यात मोठी भुमिका निभावणारे महत्वाचे राज्य ठरणाऱ्या महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचा 1 मे हा राज्य दिवस या दोन्ही राज्यांना त्यांच्या स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देत हा प्रवास असाच सुरू राहील असे प्रतिपादन केंद्रिय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.

दिल्लीतील उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्या मार्गदर्शनात सायंकाळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि  केंद्रीय मंत्री गृह श्री शाह यांच्या प्रमुख महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचा राज्य दिवस डीडीए असिता ईस्ट पार्कविकास मार्ग येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी श्री शाह बोलत होते.

या कार्यक्रमास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्न वराळेकेंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीयदिल्लीचे तसेच गुजरातचे राज्यमंत्रीमहाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमलामहाराष्ट्र आणि गुजरात चे दिल्ली स्टिक विविध क्षेत्रातील निवासी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्रीमती आर. विमला यांनी उपराज्यपाल श्री सक्सेना,  केंद्रीय गृहमंत्री श्री शाहश्रीमती रेखा गुप्ता यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

ते म्हणालेगुजरात व महाराष्ट्र यांनी स्वतंत्र राज्य म्हणून परस्पर सन्मान राखत आणि आरोग्यदायी स्पर्धेच्या माध्यमातून देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. हे एक उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे.

पंतप्रधान मोदींनी "एक भारतश्रेष्ठ भारत" या संकल्पनेद्वारे भाषिक व सांस्कृतिक विविधतेतून एकतेचा संदेश दिला असून विविध भाषा व संस्कृती एकमेकांना बळ देतात.

महाराष्ट्रही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमीत्यांनी आणि बाजीराव पेशव्यांसारख्या सेनानींनी मुगल सत्तेला जबरदस्त प्रतिकार देत स्वराज्यस्वधर्म व स्वभाषेचे रक्षण केले. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" हे लोकमान्य टिळकांनी ठणकावून सांगितले.

सामाजिक सुधारणाचळवळ यामध्ये महात्मा फुलेबाबासाहेब आंबेडकर आणि वीर सावरकर यांचे योगदान संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायक ठरले.

गुजरातजेथे श्रीकृष्णांनी जीवन व्यतीत केलेतेथे स्वामी दयानंद सरस्वतीमहात्मा गांधी व सरदार पटेल यांसारख्या थोर नेत्यांचा जन्म झाला. त्यांनी स्वातंत्र्य चळवळ घडवून आणली.

स्वातंत्र्यानंतर देशाच्या एकात्मतेसाठी व प्रगतीसाठी गुजरात व महाराष्ट्र या राज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आज महाराष्ट्रात गरबा तर गुजरातमध्ये गणेशोत्सव उत्साहाने साजरा होतो. ही परस्पर संस्कृतीची देवाणघेवाण भारताची खरी ताकद आहे.

महाराष्ट्र हे देशाची आर्थिक राजधानी असून गुजरातची जीएसडीपी ३० लाख कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. गुजरातमध्ये देशातील सर्वात मोठा बंदररिफायनरीएशियातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा पार्कपहिली बुलेट ट्रेनगिफ्ट सिटी आणि आता धोलेरा स्मार्ट सिटी उभी राहत आहे.

वायब्रंट गुजरात आणि मॅग्निफिसंट महाराष्ट्र हे दोन्ही राज्य भारताच्या विकासाचे मजबूत स्तंभ आहेत. दोन्ही राज्यांनी २०४७ पर्यंतचा आपला विकास आराखडा निश्चित केला आहे.

या दोन राज्यांनी आपल्या वारशाचा सन्मान राखत आधुनिकतेला स्वीकारले असून देशाच्या एकात्मतेसाठी मोलाचे योगदान दिले आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी मांडलेली महान भारताची संकल्पना साकार करण्यासाठी ही राज्ये आरोग्यदायी विकास स्पर्धेच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करत आहेत.

२०४७ मध्ये जेव्हा भारत विकसित राष्ट्र बनेलतेव्हा गुजरात आणि महाराष्ट्र यांचा सर्वाधिक वाटा असेल.

महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कला सादरीकरणाने ‘महाराष्ट्र दिन’ राजधानीत उत्साहात

 महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कला सादरीकरणाने

महाराष्ट्र दिन’ राजधानीत उत्साहात

 

नवी दिल्ली1 मे :  महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या वर्धापनदिनानिमित्त राजधानी दिल्लीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गणेशवंदनाआषाढी वारीगोंधळधनगर नृत्यभारूडपोवाडाअभंगदिवलीकोळी नृत्यासह महाराष्ट्र गीत’ अशा विविध समृध्द कलाकृतींचे दमदार सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडले.

दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्ग स्थित नवीन महाराष्ट्र सदनाच्या बँक्वेट हॉलमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी श्री. संजीव कुमारश्री. राजेश अग्रवालश्रीमती सुमन चंद्रा यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावारस्मिता शेलारसारिका शेलारपरिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरामाहिती अधिकारी अंजु निमसरकरमहाराष्ट्र सदनचे व्यवस्थापक आणि अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दिल्लीतील महाराष्ट्र सदनानेही यानिमित्त राज्याच्या समृद्ध सांस्कृतिकऐतिहासिक वारश्याचे दर्शन घडविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने अमेय पाटील यांच्या भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट्स संस्थेच्या  कलाकारांनी 'गर्जा महाराष्ट्र माझाकार्यक्रम सादर केला.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिकऐतिहासिक वारश्याचे दर्शन

श्री गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर जिजाऊ वंदनाछत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक गीतमहाराणी ताराराणीपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वंदना गीतआषाढी वारीसादरीकरण झाले. आई अंबाबाईचे जागरणगोंधळ सादरीकरणाने संपूर्ण वातावरण भारावले. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या समृध्द लोक संस्कृतीचे  प्रति‍बिंब उभे केलेकार्यक्रमाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विविध देशांतील गुंतवणूकदारांशी संवाद सृजन क्षेत्रातील ऑरेंज इकॉनॉमीला गती देण्यासाठी

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विविध देशांतील गुंतवणूकदारांशी संवाद

सृजन क्षेत्रातील ऑरेंज इकॉनॉमीला गती देण्यासाठी

उद्योजकांनी भरीव योगदान द्यावे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आवाहन

·         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती

·         सृजन क्षेत्राच्या विकासासाठीच्या भारताच्या प्रयत्नांना उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

मुंबईदि. १ : मुंबईमध्ये सुरू असलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध देशांमधील प्रमुख उद्योजकांशी संवाद साधला.

 

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमधील लोटस बॉलरूममध्ये विविध देशातील प्रतिनिधींची गोलमेज बैठक झाली. यावेळी प्रधानमंत्री श्री मोदी यांनी उपस्थित उद्योजकांशी सविस्तर चर्चा केली.

 

या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमाहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णवकेंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगनकेंद्रीय सचिव संजय जाजू तसेच उद्योजक ॲडम ग्रॅनिटीॲडम मोसरीआदर पुनावालाअजय बिजलीअक्षत राठीअक्षय विधानीभूषण कुमारचांघाम किमचार्ली जेफरीडायन स्मिथ गंडरएकता कपूरप्रिन्स फैजल बिन बंदर बिन सुलतान अल सौदसुबासकरण अलीराजाहशूजी उत्सुमीशरद देवराजनशंतनू नारायणसंकेत शाहसंजीव गोयंकाराल्फ सिमोनराजन नवानीपिरोजशा गोदरेजनितीश मिटरसेनअलेक्झांडर झरोवक्रिस रिप्लेयदिनेश विजनलिझवेटा ब्रॉडस्कायाहर्ष जैनफरहान अख्तरहार्वेय मासोनहिरोकी टोटोकीजोंग बम पार्कलुईस बॉसवेलमहेश सामतमार्क रीडनमीत मल्होत्रानिल मोहन उपस्थित होते.

 

भारताच्या जीडीपीमध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असणार आहे. कंटेंटक्रिएटिविटी आणि कल्चर यावर आधारित ऑरेंज इकॉनॉमी पुढील १० वर्षांत दुप्पट होणार आहे. या इकॉनॉमीला आणखी गती देण्यासाठी उद्योजकांनी भरीव योगदान द्यावेअसे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

 

भारताने सृजन क्षेत्राच्या विकासासाठी उचलेले पाऊल अत्यंत सकारात्मक असून त्यास सर्व उद्योजक उत्स्फूर्तपणे साथ देतीलअसा विश्वास सर्व उपस्थित उद्योजकांनी व्यक्त केला.

0

महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची

 महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल ॲन्ड एन्टरटेन्मेंट समिट - २०२५ चे उद्घाटन

 

मुंबईदि. १ : महाराष्ट्राच्या विकासात विविध क्षेत्रे आपला सहभाग देत आहेत. येत्या काळात महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ अर्थात वेव्हज परिषदेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर मध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनरेल्वेमाहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णवपरराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारमाहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांच्यासह देशविदेशातील मान्यवर उपस्थित होते.

मुंबईतील चित्रपटनगरीत मीडिया अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट सिटीची उभारणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ५०० एकरमध्ये असलेल्या मुंबईतील चित्रपटनगरीत अ‍ॅनिमेशनगेमिंग आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी खास १२० एकरमध्ये मीडिया अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट सिटीची उभारणी होणार आहे. हे दोन्ही प्रकल्प आगामी काही महिन्यांत प्रत्यक्षात येणार आहेत.

या वेव्हज परिषदेद्वारे भारताने क्रिएटिव्ह क्षेत्रात आघाडीवर असल्याचे दाखविले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक महासत्ता म्हणून ओळख निर्माण केली असूनआता भारत क्रिएटिव्ह क्षेत्रातही नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहेअसे  प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. माहिती तंत्रज्ञानकौशल्य आणि क्षमता ही महाराष्ट्राची बलस्थाने आहेत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी भारताच्या नव्या क्रिएटिव्ह वेव्हज'चे स्वागत करण्याचे आवाहन केले.

मुंबईत साकारणार ‘आयआयसीटी’

 मुंबईत साकारणार आयआयसीटी

- माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

 

मुंबईदि. १ : भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन होणार असूनत्यासाठी केंद्र सरकारने ४०० कोटी रुपये मंजूर केले असल्याचे रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५  (व्हेव्ज) चे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी श्री. वैष्णव बोलत होते. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर मध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपरराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकरमाहिती  प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगनउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

माहिती व प्रसारण मंत्री श्री.वैष्णव म्हणाले, ‘आयआयसीटीच्या स्थापनेसाठी गुगलॲपलमायक्रोसॉफ्ट आणि ॲडोबी सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सहकार्य लाभणार आहे. वेव्हज या व्यासपीठाच्या माध्यमातून भारत सर्जनशील उद्योगजगताच्या जागतिक केंद्रस्थानाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

सर्जनशीलतेच्या जगात सध्या मोठे परिवर्तन घडत आहे. तंत्रज्ञानामुळे सर्जनशील उद्योग आता सर्वांसाठी खुले झाले आहेत. कंटेंट तयार करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहेतसेच कंटेंटचा उपभोग घेण्याचे माध्यमही बदलत आहे. या बदलत्या प्रक्रियेची समज आणि वाटचाल एकत्रितपणे करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण सर्जनशील जगाला वेव्हजच्या व्यासपीठावर एकत्र आणण्याचा निर्णय घेतला आहे.

जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट हे व्यासपीठ जगभरातील निर्मात्यांसाठी खुले आहे. हे व्यासपीठ नवीन तंत्रज्ञानाचे प्रदर्शनगुंतवणूकदारनिर्माते आणि खरेदीदार यांच्याशी जोडणारी संधी देईल. यामुळे नव्या आर्थिक संधींचा उगम होईल.

या परिषदेस जगभरातून धोरणकर्तेउद्योग नेते आणि ७५ देशांतील निर्माते सहभागी झाले असून पुढील चार दिवसांत १०० सत्रे विविध स्वरूपात पार पडणार आहेत. सर्जनशील समुदाय क्रिएट इन इंडिया स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले असून ३२ क्षेत्रांमध्ये ह्या स्पर्धा झाल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

0000

Thursday, 1 May 2025

महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हुतात्म्यांना अभिवादन,मुख्यमंत्री यांनी दिल्या सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

 महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हुतात्म्यांना अभिवादन

भारताच्या निरंतर विकासामध्ये महाराष्ट्राची सर्वात महत्त्वाची भूमिका

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री यांनी दिल्या सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या  शुभेच्छा

 

मुंबईदि. 1 : महाराष्ट्राकडे भारतातील सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून पाहिले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणारा महाराष्ट्र निरंतर भारताच्या विकासामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडतो आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲङ राहुल नार्वेकरमुख्य सचिव सुजाता सौनिकमुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणीपोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह राज्याच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारीकर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले कीमहाराष्ट्राला सातत्याने पुढे नेण्याचा  निर्धार आहे. राज्याला ट्रिलियन डॉलर ईकॉनॉमी करण्याचा संकल्प आहे. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहचवून सर्वांना सोबत घेऊन विकसित महाराष्ट्र घडवायचा आहेअसा  निर्धार आणि निश्चय  महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने करत असल्याची भावना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.


हेरिटेज दर्जा कायम ठेवून बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऑडिटोरियमचा पुनर्विकास करावा

 हेरिटेज दर्जा कायम ठेवून बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या

ऑडिटोरियमचा पुनर्विकास करावा

उपमुख्यमंत्री अजित पवार

बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक हजार क्षमतेचे

नवीन पदव्युत्तर विद्यार्थी वसतीगृह उभारण्यास तत्वतः मान्यता

 

         मुंबई दि. २८ : - पुण्यातील बी. जे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय हे स्वातंत्र्यापूर्वीपासूनचे राज्यातील नामवंत असे शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहे. त्यामुळे येथील ऑडिटोरियमचा पुनर्विकास करताना त्याचा हेरिटेज दर्जा कायम राखून तो महाविद्यालयाच्या लौकिकास साजेसा व्हावा. त्यासाठी तातडीने एकात्मिक विकास आराखडा सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले.

             पुणे येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऑडिटोरियमच्या पुनर्विकासाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

              यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीबी जे वैद्यकीय महाविद्यालयात अनेक विद्यार्थी वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेत आहेत. येथील महात्मा गांधी सभागृहामध्ये (ऑडिटोरियम) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रम तसेच राज्यस्तरीय कार्यक्रम घेण्यात येतात. परंतु सद्यस्थितीत या कार्यक्रमांसाठी महात्मा गांधी सभागृहाची आसन क्षमता अपुरी पडत आहे. या सभागृहात ५०० विद्यार्थ्यांची आसनक्षमता आहे. तथापि या ठिकाणी सुमारे १,५०० विद्यार्थी शिकत आहेत. त्यामुळे या सभागृहाचा पुनर्विकास करून पंधराशे आसन क्षमतेचे सुसज्ज सभागृह निर्माण करण्यात यावे.

            यावेळी हेरिटेज वास्तू विशारद आभा लांबा यांनी ऑडिटोरियमच्या पुनविकासाबाबत सादरीकरण केले.

एक हजार विद्यार्थी क्षमतेच्या नवीन पदव्युत्तर वसतीगृहाच्या निर्मितीस तत्वतः मान्यता

            वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातच एक हजार विद्यार्थी क्षमतेचे पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह बांधण्यासही या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी  शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय होणार आहे.

             या बैठकीस नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशीउपमुख्यमंत्र्यांचे सचिव राजेश देशमुखवैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमारवैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ.अजय चंदनवालेबी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवारपुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण उपस्थित होते तर पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

Tuesday, 29 April 2025

बैठकीत राज्यातील विकासप्रकल्पांचा आढावा पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या कामाचा वेग वाढवा

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पीएमयूच्या

बैठकीत राज्यातील विकासप्रकल्पांचा आढावा

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी

पायाभूत सुविधांच्या कामाचा वेग वाढवा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

 

मुंबईदि. 28 :- पुणे शहरासह उपनगरात वाहतुक कोंडीची समस्या गंभीर असून ती सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात द्यावे. पुणे शहर आणि उपनगरांची वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पुणे रिंग रोडसह मेट्रोउड्डाणपूलरिंग रोड तसेच सुरु असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग वाढविण्यात यावा. यासाठी या प्रकल्पांशी संबंधित सर्व विभागाने योग्य समन्वय आणि ताळमेळ राखत पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातउपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाची (प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनीटच्या) बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरासार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरपरिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठीकृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीवैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमारपुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीसार्वजनिक बांधकाम विभाग पुणे विभागाचे मुख्य अभियंते अतुल चव्हाण उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीवर पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवारपुणे महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, ‘महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकरसातारा जिल्हाधिकारी संतोष पाटीलपिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंगमहानगर आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसेयांच्यासह पुणे मेट्रोपीएमआरडीएसंबंधित जिल्ह्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीचे संचालन उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव विकास ढाकणे यांनी केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीराज्यात सुरु असणाऱ्या विकासकामांची गती राखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. विलंबामुळे प्रकल्पांच्या किंमतीत वाढ होऊन राज्याचे दीर्घकालीन नुकसान होतेते टाळण्यासाठी नियोजित वेळेत विकास प्रकल्प मार्गी लावण्यावर भर द्यावा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी लोणावळा येथील नियोजित स्काय वॉकटायगर पॉईंटपुणे नाशिक ग्रीन फिल्ड सेमी हायस्पीड रेल्वे, ‘सारथीसंस्थेच्या नाशिककोल्हापूरनागपूरखारघरसंभाजीनगरअमरावतीच्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकामसातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयसातारा सैनिक स्कूलरेवस ते रेड्डी सागरी महामार्गवडाळा येथील जीएसटी भवनरेडिओ क्लब मुंबईरत्नागिरीचे मिरकरवाडा बंदरवढू व तळापूर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारकपुणे येथील वीर वस्ताद लहूजी साळवे स्मारककृषीभवनकामगार कल्याण भवनसहकार भवनपुरंदर विमानतळ आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला. 

0000

 

Monday, 28 April 2025

प्रायोगिक तत्त्वावर ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’

 प्रायोगिक तत्त्वावर महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल

             २ ते ४ मे २०२५  दरम्यान पार पडणाऱ्या महाबळेश्वर महोत्सवात  महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित होणार आहे. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून २५ जवानांची नियुक्ती करण्यात येईल. या जवानांना पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि महोत्सवाच्या नियोजनानुसार आवश्यक प्रशिक्षण देण्यात येईल. हे दल  २५ एप्रिल  ते ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत कार्यरत राहील. या दलासाठी आवश्यक वाहन व्यवस्था आणि अन्य सुविधा पुरविल्या जातील. जवानांकडून योग्य कर्तव्ये पार पाडण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून केली जाईल. या उपक्रमासाठी होणारा खर्च महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ आणि सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याशी समन्वय साधून अदा केला जाईल.

            महाबळेश्वर महोत्सवातील प्रायोगिक तत्त्वावरील यशस्वी अंमलबजावणीनंतरसंपूर्ण महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ स्थापन केले जातील. या उपक्रमांतर्गत पर्यटन क्षेत्रात रु. १ लाख कोटींची खासगी गुंतवणूक आणि १८ लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

****

केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन यांच्या उपस्थितीत सागरी किनारपट्टीच्या मत्स्योत्पादक राज्यांची बैठक संपन्न

 केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन यांच्या उपस्थितीत

सागरी किनारपट्टीच्या मत्स्योत्पादक राज्यांची बैठक संपन्न

 

मुंबईदि. 28 : देशातील सागरी मासेमारीच्या संधीआव्हाने आणि समस्या या विषयावर सागरी किनारपट्टीची 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांची एकत्रिक बैठक हॉटेल ताज पॅलेस येथे झाली. या बैठकीचे उद्घाटन केंद्रीय मत्स्यव्यवसायपशुसंवर्धन व ग्रामविकास मंत्री राजीव रंजन सिंग उर्फ ललन सिंह यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले. यावेळी राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे उपस्थित होते.

            या बैठकीस केंद्रीय मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री एस.पी.सिंग बाघेलकेद्रीय पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय मंत्री जॉर्ज कुरियनकर्नाटकचे मत्स्यव्यवसाय मंत्री मनकाला वैद्यआंध्रप्रदेशचे मत्स्यव्यवसाय मंत्री किनजारापू अत्चान नायडूगोव्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री निलकांत हालरनकरगुजरातचे मत्स्यव्यवसाय मंत्री पुरषोत्तमभाई पटेलकेंद्रीय मत्स्यव्यवसाय सचिव अभिजित लिख्वीसह सचिव नितू प्रसाद आदींसह 9 राज्य व 4 केंद्रशासित प्रदेशातील मत्स्यव्यवसाय सचिवआयुक्तसंचालक व अधिकारी उपस्थित होते.

            केंद्रीय मत्स्यव्यवसाय सचिव श्री लिख्वी यांनी बैठकीचे महत्व विषद करताना सांगितले कीदेश आज जगात मत्स्योत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्यव्यवसायाचा मोठा सहभाग आहे. तसेच निर्यातीमध्येही मत्स्यव्यवसाय आघाडीवर आहे. देशातील मत्स्योत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर आणण्याचे ध्येय असून त्यासाठी आजचही ही बैठक महत्वाची आहे. यावेळी सह सचिव श्रीमती प्रसाद यांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून देशाच्या मत्स्यव्यवसायाची माहिती सादर केली.

            या उद्घाटनप्रसंगी मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध योजनांचादेशातील विविध राज्यातील मत्स्योत्पादक लाभार्थ्यांनालाभ देण्यात आला. त्यामध्ये टर्टल एक्स्लुडरचे वाटप 5 लाभार्थ्यांना करण्यात आले. वर्सोवाअंधेरी येथील देवेंद्र गजानन काळेपनवेल कोळीवाडा येथील किरन पांडुरंग भोईर यांना लाभ देण्यात आला. मासेमारी विमा योजनेचा लाभ 8 लाभार्थ्यांना देण्यात आला. क्लायमेट रेजिलेंट कोस्टल फिशिंग व्हिलेजचे प्रमाणपत्र अर्नाळाता. वसईजि. पालघर या गावास देण्यात आले. तर रणजीत काळेवर्सोवामुंबईसंतोष खंदारेमेढामालवणकांचन चोपडेकरमालवण यांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात आले. याशिवाय मच्छिमार सहकारी संस्था व मच्छिमार उत्पादक संस्थांचे प्रमाणपत्र वाटपही यावेळी करण्यात आले. तसेच मलाड येथील राफ्टेक सोल्युशनव प्रा.लि. यांना उत्कृष्ट स्टार्टअप प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. एफआयडीएफ अंतर्गत प्रकल्प असलेल्या जिलानी मरिन प्रोडक्टरत्नागिरीया फिश प्रक्रिया उद्योगासखोल समुद्रातील मासेमारीसाठीच्या नौका तयार करण्यासाठी कुलाबामुंबई येथील राजू चौहान यांना आणि श्रीम्प हॅचरीज उभारण्यासाठी रायगड जिल्ह्यातील मंडन ॲक्वा फिशरीज सहकारी संस्थेस प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

            यावेळी केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध उपक्रमांची सुरुवातही करण्यात आली. त्यामध्ये सागरी मत्स्यगणनाटर्टल एक्स्लुडर योजनासागरी मत्स्यगणनेसाठी मत्स्यव्यवसाय विभागांना टॅबलेटचे वाटप यांचा समावेश आहे.

Wednesday, 26 March 2025

महाराष्ट्र विधानमंडळाला संविधानिक गौरवशाली परंपरा संविधानाने सामान्य माणसाला दिली संधीची समानता

 महाराष्ट्र विधानमंडळाला संविधानिक गौरवशाली परंपरा

संविधानाने सामान्य माणसाला दिली संधीची समानता

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. २६ : मातीशी नाळ जोडलेल्या सामान्य कार्यकर्त्याची महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड होणे हे भारतीय संविधानाने दिलेल्या संधीच्या समानतेचे उत्तम उदाहरण आहे. राज्याच्या विधानमंडळाला मोठी गौरवशाली परंपरा आहे. या परंपरेला पुढे नेण्याची जबाबदारी सर्वांची आहे. अण्णा बनसोडे उपाध्यक्ष झालेही घटना केवळ त्यांचा गौरव नसून राज्यातील १३ कोटी जनतेचा अभिमान आहे. संविधानाने दिलेल्या समानतेच्या हक्कामुळेच आज सामान्य माणूसही उच्च पदावर पोहोचू शकतो असे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनपर प्रस्ताव मांडलात्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा बनसोडे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करताना त्यांचा राजकीय प्रवास आणि अनुभव यांची प्रशंसा केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेमहाराष्ट्र विधानमंडळ देशातील सर्वाधिक काळ चालणाऱ्या सभागृहांपैकी एक आहे. या सभागृहाच्या परंपरेला पुढे नेण्यासाठी अध्यक्षउपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी समन्वयाने काम करून या सभागृहाचा अधिक लौकिक वाढवूया. उपाध्यक्ष पद हे महाराष्ट्र विधानसभेतील सन्मानाचे पद आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी या पदाचा गौरव वाढविला आहे.अण्णा बनसोडे यांची या पदासाठी निवड त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आहे. पिंपरीचे आमदार म्हणून ते तिसऱ्यांदा निवडून आले असूनत्याआधी महानगरपालिकेत नगरसेवक पदाची हॅटट्रिक त्यांनी केली आहे. तसेचस्थायी समितीच्या अध्यक्षपदीही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

अण्णा बनसोडे यांचा राजकीय प्रवास नगरसेवकस्थायी समिती अध्यक्षआमदार आणि आता उपाध्यक्ष असा चढता राहिला आहे. त्यांच्या निवडीने विधानसभेला सक्षम उपाध्यक्ष मिळाला असून त्यांनी या जबाबदारीतून संविधानिक परंपरेचा सन्मान वाढवावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

अध्यक्ष पदावर विधीतज्ज्ञ अँड राहुल  नार्वेकर  आणि त्यांच्यासोबत सामाजिक व राजकीय प्रश्नांची जाण असलेला सदस्य हे उपाध्यक्ष म्हणून काम करणार आहेत. आपल्या या  अनुभवातून  विधानमंडळाचा बहुमान उंचावेल. अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोघांच्या समन्वयातून या सभागृहाला निश्चितपणे न्याय मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

Friday, 10 January 2025

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन गत

 राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 साठी

प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

 

            मुंबई, दि.10 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिताउत्कृष्ट लेखनउत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथाउत्कृष्ट छायाचित्रकारसमाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी2024 ते 31 डिसेंबर2024 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी2025 अशी आहे.

            राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनीमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयतळमजलाहुतात्मा राजगुरु चौकमादाम कामा मार्गमंत्रालयमुंबई - 32येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचं नमुने dgipr.maharashtra.gov.in  व  www.maharshtra.gov.in तसेच https://mahasamvad.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

पुरस्कारांची माहिती

अ.क्र

पुरस्काराचे नाव

पारितोषिक

1.

अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय)

1,00,000/- (रुपये एक लाख रोख) (मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक)

2.

बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)

5हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

3.

अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)

 

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

4.

बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

5.

मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

6.

यशवंतराव चव्हाण पुरस्कार

शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क(राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

7.

पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार(राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

8.

तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

9.

केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क(राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

10.

समाज माध्यम पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

11.

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

12.

पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)


 

13.

दादासाहेब पोतनीस पुरस्कार, (नाशिक विभाग)

 

5हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र,

या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)

14.

अनंतराव भालेराव पुरस्कार, (औरंगाबाद आणि लातूर विभाग)

5हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

15.

आचार्य अत्रे पुरस्कार, (मुंबई विभाग)

5हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

16.

नानासाहेब परूळेकर पुरस्कार, (पुणे विभाग)

5हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

17.

शि.म.परांजपे पुरस्कार, (कोकण विभाग)

5हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

18.

ग.गो.जाधव पुरस्कार, (कोल्हापूर विभाग)

5हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

19.

लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, (अमरावती विभाग)

5हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

20.

ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, (नागपूर विभाग)

5हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

0000000


 

 


विभागीय पुरस्कार

13.

दादासाहेब पोतनीस पुरस्कार, (नाशिक विभाग)

 

Featured post

Lakshvedhi