Monday, 28 July 2025

नागपूर महानगराच्या वाढत्या विस्ताराला आकार देण्यासाठी तीन टप्प्यात गतिशीलता आराखडा साकार करू

 नागपूर महानगराच्या वाढत्या विस्ताराला आकार देण्यासाठी तीन टप्प्यात

गतिशीलता आराखडा साकार करू

-       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

·         दळणवळण यंत्रणेला भक्कम करणाऱ्या आरखड्याबाबत लोकप्रतिनिधींसह जनेतेनेही आपली मते नोंदविण्याचे आवाहन

·         भक्कम व सुलभ वाहतूक व्यवस्था नागपूरकरांसाठी होणार उपलब्ध

·         सुमारे 25 हजार 567 कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा

        नागपूरदि. 27 : नागपूरच्या वाढत्या विस्तारात सार्वजनिक वाहतूकीच्या सुलभ वाहतूक व्यवस्थेसह सर्व भागांना जोडणाऱ्या उत्तम वाहतूकीच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सद्यस्थितीत नागपूर मध्ये रस्त्यांच्या सुविधा चांगल्या असल्यातरी त्या कमी पडत आहेत. वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पायी चालणाऱ्या लोकांसाठी सुरक्षित फुटपाथसह सर्व भागांना जोडणाऱ्या नवीन रस्त्यांची निर्मितीअपुऱ्या स्थितीतील चौकांचे विस्तारीकरणमहानगरात धावणाऱ्या बसेसचे थांबेसार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बसेसचे मार्गमेट्रो स्टेशन पासून त्याला बसेसची कनेक्टीव्हिटी आदी मुलभूत विकासासाठी सर्वसमावेशक गतीशीलता आराखडा तयार करण्यात आला आहे. सुमारे 25 हजार 567 कोटी रूपयांच्या प्रारूप आरखड्याला अधिक लोकाभिमुख करून सक्षम करण्यासाठी जनतेचीही मते याबाबत जाणून घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.   

            नागपूर महानगराच्या सर्वसमावेशक गतिशिलता आराखड्याबाबत आज मेट्रो भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरीपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेवित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वालखासदार श्यामकुमार बर्वेआमदार सर्वश्री कृष्णा खोपडेप्रवीण दटकेसमीर मेघेचरणसिंग ठाकूरसंजय मेश्रामविभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरीशहर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगलमहा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर,  नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीनाजिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनीमहामेट्रोचे संचालक अनिलकुमार कोकाटेराजीव त्यागी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील तसेच महामेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi