Showing posts with label संपादकीय. Show all posts
Showing posts with label संपादकीय. Show all posts

Wednesday, 15 November 2023

पदवीधर मतदार नोंदणी

 पदवीदार मतदार संघासाठी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म भरण्याची मुदत (दुसरा टप्पा ) *22 nov to 30 nov* आहे.

    तरी अजून नोंदवायचे शिल्लक असल्यास नाव नोंदवून घ्यावे

Wednesday, 25 October 2023

चांगलं द्या, चांगलंच मिळेल*

 *चांगलं द्या, चांगलंच मिळेल*  


एकदा श्रीकृष्ण व अर्जुन  एका जंगलातून जात असताना अचानक अर्जुन श्रीकृष्णला बोलतो मला कर्णा पेक्षा मोठे दानशूर व्हायचे आहे, त्या साठी तू माझी मदत कर. कृष्ण त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो की तुला ते शक्य नाही. पण अर्जुन हट्टालाच पेटलेला असतो तो श्रीकृष्णाच्या मागे सतत एकाच धोशा लावतो की मला कर्णा पेक्षा मोठे दानशूर व्हायचे आहे.

 कृष्ण म्हणतो ठिक आहे मी तुला एक संधी देतो पण माझी पण एक अट आहे मी तुला जी संधी देईन तीच संधी कर्णाला सुद्धा देईन अणि ह्या परीक्षेत तू कर्णा पेक्षा मोठा दानशूर असल्याचे सिद्ध करून दाखवायचे. अर्जुन कृष्णाची ही अट मान्य करतो. 

    कृष्ण आपल्या शक्तीने जंगलातल्या दोन टेकडयांचे रूपांतर सोन्याच्या टेकडयांमध्ये करतो आणि अर्जुनाला म्हणतो ,आता हे सगळे सोने लोकांमध्ये वाटून टाक अट एकच एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस.

  लगेच अर्जून जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की...

  मी प्रत्येक गावकऱ्यांना सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे.

लोक अर्जूनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले.

  पुढे अर्जुन छाती काढून चालत होता. मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते. दोन दिवस, दोन रात्री काम चालू होते.

   अर्जून खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता.पण टेकडी थोडीदेखील संपली नव्हती.

   लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे.

 आता अर्जून अगदी दमून गेला होता.पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता. 

 शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बास....!आता यापुढे मी काम करू शकत नाही. 

  मग कृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की.......

 या दोन सोन्याच्या टेकडया आहेत त्या तू लोकांना दान करून टाकायच्या......

लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकऱ्यांना बोलवले आणि सांगितले की.....

  या दोन सोन्याच्या टेकडया तुमच्या आहेत. ज्याला जेवढे शक्य आहे त्याने तेवढे सोने निःसंकोच घेवून जावे. 

 एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला. लोक सोने वाहून नेऊ लागले.

  अर्जून चकित होऊन पाहात बसला. हा विचार आपल्या मनात का आला नाही.....या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला. कृष्ण मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला..... 

 अनावधानाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास.....!तू गर्वाने प्रत्येक गावक-याला सोने वाटू लागलास.जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तू दान करत होतास.....!  

   कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते.त्याने दान केले आणि तो निघूनही गेला.

  आपले कुणी कौतुक करतंय.....गुणगान गातंय......हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही.

व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे.

  देणगीच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे.....

शुभेच्छा द्याव्यात..... धन्यवाद द्यावेत अशी अपेक्षा ठेवणे.....

म्हणजे ते काही निरपेक्ष दान नसते.

कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता दान करावे.............                                                    *म्हणून निसर्गाचा एक नियम आहे जे तुम्ही देणार ते तुम्हाला नक्की परत भेटणार.कोणत्या रूपात परमेश्वर देईल ते सांगता येत नाही. त्यामुळे चांगल द्या पदरी चांगलंच मिळेल.*

"काय चुकलं" हे शोधायला हवं,

 पण आपण मात्र "कुणाचं चुकलं" हेच शोधत राहतो.....

*🌷 राम कृष्ण हरी 🌷*

बर्थडे पार्टी

 एका मित्राच्या बर्थडे पार्टी होती. एका छानशा बँक्वे हॉलमध्ये ही पार्टी ठेवली होती. मित्राचे बरेच ओळखीचे आणि परिचयाचे लोक तिथे आले होते. "हाय! हॅलो!!" वगैरे सगळं झालं. मलाही माझे कॉलेज मधले कॉमन मित्र भेटले. पार्टी रंगात येऊ लागली होती. मग जेवणाच्या आधी 'ड्रिंक्स & डान्स' चं आयोजन होतंच.


सगळ्यांचे हात ग्लासांनी भरले. डी.जे.चं सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. नाचायला पूर्ण तयार झालेली लोक, आता कुठलं गाणं हा डी.जे. लावेल आणि त्यावर कुठल्या स्टेप्सवर नाचायचं ह्यावर काही उत्साही मंडळी चर्चा करत होती... आणि गाणं सुरु झालं!


"गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया... मंगलमूर्ती..." सगळे आलेले लोक अवाक होऊन एकमेकांकडे बघू लागले. बर्थडे पार्टी, हातात दारूचे ग्लास आणि कसलं हे गाणं ? गजानना गणराया ?" लोकांची कुजबुज जाणवण्याएवढी वाढली. शेवटी त्या उत्साहावर पाणी पडलेल्या एकाने विचारलं, "ऐ, हे काय, पार्टीत काय हे गाणं लावता ? कोई पार्टीवाला गाना लगाओ यार!" तसा माझा मित्र, ज्याचा वाढदिवस होता, हातात माईक घेऊन स्टेजवर चढला.


"मित्रांनो, माझी बर्थडे पार्टी आहे. आता पार्टी म्हंटली कि त्यात कुठचंतरी पार्टी सॉन्ग वाजेल अशीच तुमची अपेक्षा होती ना ? अर्थात असणारच! पण जसं एखाद्या पार्टीत हे 'गजानना गणराया' गाणं शोभत नाही ना, तसंच एखाद्या गणपतीच्या मांडवात देखील एखादं पार्टी साँग शोभत नाही. पण त्यावेळेस आपण आपला विरोध दर्शवतो का? नाही! 'आपल्याला काय करायचंय?' म्हणून सोडून देतो. पण हे चुकीचं आहे. गणेशोत्सव हा 'उत्सव' आहे आणि गणपती हा आपण देव मानतो. त्याला 'Show -Piece' करून ठेवू नका. आत्ता ह्या पार्टीत जसा विरोध दाखवलात ना, तसाचं विरोध एखाद्या गणपतीच्या मांडवातसुद्धा दाखवा. D.J. फक्त पार्टीची शोभा वाढवतो, उत्सवाची नाही! हे लक्षात ठेवा. हातात दारूचे ग्लास, पार्टीत बरे वाटतात, गणपतीच्या मिरवणुकीत नाही. विरोध दर्शवा. आपण गप्प बसतो म्हणून हे खूळ बोकाळलंय. सगळीकडे दारू आणि डी.जे चालणार नाही हे कळूदे ना गणेशोत्सव मंडळांना. जिथे असला थिल्लरपणा चालत असेल अशा उत्सव मंडळांना वर्गणी, देणगी, जाहिरात देऊ नका. मग बघा परिवर्तन होतं कि नाही ते. आणि, सो सॉरी. मला ही गोष्ट खटकते. गणपती यायला आता फक्त 10-12 दिवस उरलेत आणि आज तुमच्यापर्यंत माझा विचार पोचावा अशी माझी इच्छा होती, म्हणून हे सगळं मीच घडवून आणलं. Now enjoy your Party, Friends!" म्हणत हा खाली उतरला.,टाळ्यांचा कडकडाट झाला!


मी मात्र नाचण्याऐवजी ड्रिंकचा आस्वाद घेणं prefer केलं. हा माझा मित्र माझ्या शेजारी येऊन उभा राहिला आणि खांद्यावर हात ठेवत म्हणाला, "लोकांना ना ज्या भाषेत समजतं, त्याच भाषेत समजवावं लागतं. कशी वाटली आयडिया ?" तसं मी हसत म्हटलं, "साल्या, डोक्याचा उपयोग अगदीच उशीवर ठेवण्याकरता करत नाहीस. ग्रेट! चियर्स!!"


कृपया हा मेसेज तुमच्या प्रत्येक ग्रुप वर शेयर करा जेणेकरून किमान ह्या गणपति उत्सवात देवाचे पावित्र्य जपले जाईल  शेवटी मला जे योग्य वाटले ते मी सांगितले शेवटी प्रत्येकाला निर्णय स्वातंत्र्य आहे गणपत्ती बाप्पा मोरया🙏

Saturday, 14 October 2023

मृत्यू का गरजेचा आहे...* *☸️अतिशय सुंदर आणि मृत्यूचे महत्व, गोष्टी रूपाने पटवून देण्याचा छान प्रयत्न...*

 *मृत्यू का गरजेचा आहे...*


     *☸️अतिशय सुंदर आणि मृत्यूचे महत्व, गोष्टी रूपाने पटवून देण्याचा छान प्रयत्न...*


*मृत्यू येऊच नये असे प्रत्येकाला वाटते. समुद्रमंथनाच्या वेळी अमृत कलश निघाला, तो प्राशन करण्यासाठी, अमर होण्यासाठी देव-दानवांमध्ये चढाओढ लागली होती, तिथे आपल्यासारख्या सर्वसामान्यांची काय कथा !!!मृत्यूचे भय वाटणे स्वाभाविक आहे. परंतु, मृत्यू टाळणे अशक्य आहे. "जन्म-मृत्यू" हा सृष्टीचा नियमच आहे. तो कोणालाही चुकलेला नाही. तो आवश्यकही आहे. अन्यथा माणसेच माणसाच्या जीवावर उठली असती.*

         *कशी? ते पहा...*

एका राजाने शहराबाहेर, एका वृक्षाखाली बसलेल्या साधूला विचारले, "साधूमहाराज, मला अमर करू शकेल, अशी दिव्य वनौषधी किंवा चांगले रसायन तुमच्याजवळ आहे का?" साधू म्हणाला, "हे राजा, हा समोरचा व त्यापलीकडील असे दोन पर्वत ओलांडून गेलास, की, तुला एक सरोवर लागेल. त्याचे पाणी तू पी, म्हणजे अमर होशील." ते दोन पर्वत ओलांडून राजा त्या सरोवरापाशी गेला.

 त्याचे पाणी पिण्यासाठी आपल्या हाताची ओंजळ करून सरोवरावर तो वाकला. तेवढ्यात त्याच्या कानावर कुणी तरी कण्हत असल्याचा आवाज आला. पाणी पिणे बाजूला ठेवून राजा आवाजाच्या दिशेने गेला. एक जर्जर माणूस एका झाडाखाली आडवा पडून कण्हत असलेला त्याच्या दृष्टीस पडला. राजाने त्याला कण्हण्याचे कारण विचारले. तो म्हणाला, "या सरोवराचे पाणी प्यायल्यामुळे मला अमरत्व आले. परंतु वयाची शंभरी ओलांडताच माझ्या मुलाने मला घराबाहेर हकलून दिले. गेली पन्नास वर्षे मी या ठिकाणी पूर्णतः दुर्लक्षित अवस्थेत तळमळत पडलो आहे. आता माझी मुलं तर मेलीच, पण नातवंडेही मरायला टेकली असतील. हे बघावे लागू नये, म्हणून गेली पाच वर्षे मी अन्नपाण्याचा त्याग केला आहे. तरीही मी मरत नाही." त्या वृद्धाची करुण कहाणी ऐकून राजा मनात म्हणाला, "छे! नुसत्या अमरत्वाला काही अर्थ नाही. म्हातारपणाशिवाय जर अमरत्व मिळालं, तरच त्यात मजा आहे. आपण त्याबद्दल साधूला माहिती विचारू. त्याने साधूकडे पर्याय मागितला. साधू म्हणाला, "ज्या सरोवराकडे तू जाऊन आलास ना, त्याच्यापुुढे असलेला डोंगर ओलांडून तू पलीकडे गेलास, तर पिवळ्या जर्द फळांनी भरलेला एक वृक्ष तुला लागेल. त्या वृक्षाचे एक फळ तोडून तू खा. म्हणजे तुला म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळेल." साधूच्या सांगण्या प्रमाणे राजा त्या वृक्षापाशी गेला. त्याने एक पिवळे धमक फळही काढले. आता तो ते फळ खायला सुरुवात करणार, तोच जवळपास भांडण सुरू झाल्याचा आवाज कानावर पडला. एवढ्या दूर येऊन कोण भांडत असेल, या विचाराने राजा त्या लोकांजवळ गेला. तिथे त्याला चार तरुण आढळले. त्यातल्या एकाला राजाने भांडणाचे कारण विचारले, त्यावर तो म्हणाला, "आता मी अडीचशे वर्षांचा आहे. तरी माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले तीनशे वर्षांचे माझे बाबा, पूर्वापार मालमत्ता माझ्या स्वाधीन करत नाहीत. मग त्यांच्याशी भांडू नको तर काय करू ?" राजाने युवकाइतक्याच तरुण दिसणाऱ्या दुसऱ्या युवकाला विचारले, तर तो म्हणाला, "अहो, माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले हे माझे साडे तीनशे वर्षांचे वडील आहेत. ते मला संपत्ती देत नाहीत, तर मी तरी मुलाला कुठून संपत्ती देऊ सांगा."

साडे तीनशे वर्षांच्या तरुणाकडे राजाने प्रश्नार्थक दृष्टीने पाहिले असता, तो म्हणला, "मी तरी संपत्ती कुठून देणार ? ही चूक माझ्या वडिलांची आहे. ते आता ४०० वर्षांचे आहेत."

यावर राजा म्हणाला, "पण एवढी संपत्ती असताना तुम्ही डोंगर दऱ्यांमध्ये का वास्तव्य करताय ? यावर पणाजोबा म्हणाले, "आमच्या घरात दिवस रात्र मालमत्तेवरून भांडणे होत असल्याने गावकऱ्यांनी आम्हाला गावाबाहेर हाकलून दिले आणि आम्हाला इथे राहावे लागत आहे."


तो प्रकार पाहून राजा म्हणाला, म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळाले, तर तेही नकोच. कारण ते जास्त भयंकर आहे. राजा साधूजवळ परत आला आणि म्हणाला, "तुम्ही मला मृत्यूचे महत्त्व पटवून दिलेत. मृत्यू आहे म्हणून जगात प्रेम आहे, अन्यथा माणसेच माणसांच्या जीवावर उठली असती."


 *साधू म्हणाला, "मृत्यू टाळण्यापेक्षा मिळालेला दिवस आणि मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगून घे. त्यातच खरा आनंद आहे आणि "मृत्यूनंतर उत्तम गतीही आहे."*

*स्वतः बदला, जग बदलेल.

१)स्नान करताना *नाम* घेतले तर ते *'तीर्थस्नान'* होईल.

२) भोजन करताना *नाम* घेतले तर तो *'प्रसाद'* होईल.

३) चालताना *नाम* घेतले,

 तर ती *'तीर्थयात्रा'* होईल.

४) स्वयंपाक करताना *नाम* घेतले तर तो *'महाप्रसाद'* होईल.

५) झोपताना *नाम* घेतले

 तर ती *'ध्याननिद्रा'* होईल.

६) काम करताना *नाम* घेतले तर ते कर्म *'भक्ती'* होईल.

७) घरात *नाम* घेतले,

 तर ते घर *मंदिर*' होईल.    

🙏🙏 *ll जय श्री राम ll*  🚩🚩

Thursday, 24 August 2023

बाहेर खाताना काळजी घ्या!😋*

 *😋बाहेर खाताना काळजी घ्या!😋*


*_(मी मात्र स्वतः छोट्या गर्दी असलेल्या दुकानात गरम पोळ्या आणि भाजी खातो. परंतु भारतातील परिस्थिती वाईट आहे,हे नक्की!)_*


कायप्पावर वाचलेल्या मूळ हिंदी पोस्टचा भागवत कृत स्वैर मराठी अनुवाद.*


■■ आम्ही कधीच उष्ट आणि शिळं अन्न खात नाही !!!

पुढल्या वेळेस हे लोकांना सांगण्या अगोदर जरा विचार करून बोला ■■


काही दिवसांपूर्वी आमचे एक परिचित आम्हाला एका अतिशय प्रसिद्ध अशा रेस्टॉरंट मध्ये जेवायला घेऊन गेले होते.


मी बहुधा नेहमीच बाहेर कुठे हॉटेलमध्ये जेवायला जाणं टाळते. परंतु सामाजिक दबावाखाली कधी कधी जावं लागतं.


आजकाल जेवणात पनीरचे पदार्थ खाणं हे श्रीमंतीचे लक्षण समजलं जातं. म्हणून त्यांनी सुरुवातीला पनीरच्या काही डिशेस मागवल्या.


प्लेट मध्ये ठेवलेले पनीरचे वेगवेगळ्या आकारांचे तुकडे बघून मला थोडसं विचित्रच वाटलं. असं वाटलं की त्या तुकड्यांना मुद्दाम कापून शिजवलेलं आहे.


मी वेटरला बोलावून त्या हाॅटेलच्या कुकला बोलावून आणण्यास सांगितलं. कुक आल्यावर त्याला मी विचारलं, "पनीरचे तुकडे वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या रंगाचे का बरं आहेत?" तेव्हा तो बोलला, "ही आमची स्पेशल डिश आहे."


त्यावर मी त्याला म्हटलं की मी आणखीन एक डिश माझ्याकरता पॅक करून घरी घेऊन जायचा विचार करतेय. पण मला ही तुमची स्पेशल डिश माझ्यासमोर बनवून दाखवा.


आख्ख रेस्टोरंट माझ्या वाढलेल्या आवाजानं जणू हादरून गेलं होतं...

हॉटेलमधील अनेक लोक आपलं जेवण थांबवून माझ्याकडे बघू लागले...


हाॅटेलचा स्टाफ वेगवेगळ्या सबबी सांगू लागला. शेवटी पोलीसच्या भीतीने वेटरनं कबूल केलं की जेवणारे लोक अनेकदा प्लेटांमध्ये अन्न, भाज्या कोशिंबीरी आणि पोळ्या वगैरे टाकून निघून जातात. हॉटेलमधल्या स्वयंपाक घरातून हे सारं फेकून दिल्या जात नाही. पनीर व भाज्यांमधील मोठे तुकडे एकत्र करून व पुन्हा त्यांची भाजी बनवून ग्राहकांना डिश दिली जाते.

 

बशांमध्ये शिल्लक राहिलेली कोशिंबीर नवीन ऑर्डर साठी वापरली जाते. बश्यांमध्ये टाकून दिलेले सुक्या चिकन व मांसांचे तुकडे पुन्हा कापून ते करीमध्ये नव्यानं टाकले व शिजवले जातात. शिळ्या आणि सडक्या भाज्या सुद्धा करीच्या रूपाने पुन्हा वाढल्या जातात...


*हे मोठमोठ्या हॉटेलमधलं वास्तव आहे. यापुढे जेव्हा केव्हा हॉटेलमध्ये खायला अथवा जेवण करायला जाल तेव्हा उरलेलं अन्न एका प्लास्टिकच्या थैलीमध्ये टाकून सोबत घेऊन जा आणि बाहेर जाऊन एखाद्या जनावराला तरी खाऊ घाला किंवा मग ती पिशवी कचऱ्याच्या डब्यामध्ये तुम्हीच स्वतः फेकून मगच पुढे जा*


अन्यथा कदाचित तुमचं उष्ट अन्न दुसरा कुणी खाईल किंवा तुमच्या प्लेट मधील अन्न कदाचित दुसऱ्या कुणी प्लेटमध्ये टाकून दिलेलं उष्ट अन्न असू शकेल.


दूसरा किस्सा भगवान कृष्णाची जन्मभूमि वृंदावन येथील आहे. वृंदावनवा पोहोचल्यावर, मी मंत्रमुग्ध होऊन तिथल्या पवित्र भूमीकडे पाहात होते. दिल्लीहून लांबचा प्रवास करून आल्यावर आम्हा सर्वांनाच कमालीची भूक लागली होती. म्हणून एका स्वच्छ दिसणाऱ्या उपहारगृहामध्ये आम्ही प्रवेशलो. उगीच ऑर्डरला वेळ लागू नये म्हणून आम्ही डिश ऐवजी जेवणाच्या थाळ्या मागवल्या.


एका स्वच्छशा ट्रे मधून वरण, भाजी,भात, रायतं व सोबतच एक टोपलीतून चपात्या आणल्या गेल्या.


सुरुवातीचे काही घास घेताना लक्षात आलं नाही, पण मग नंतर मला काहीतरी चुकतंय असं वाटू लागलं. मग लक्षात आलं की पोळी थोडी आंबूस लागते आहे, मग भाजीकडे माझं लक्ष गेलं तेव्हा लक्षात आलं की भाजीतील प्रत्येक तुकड्याचा रंग वेगळा आहे. मग भाताची चव घेऊन बघितली. तिथेही काहीतरी गडबड वाटली. सगळं जेवण तसेच टाकून आम्ही उठलो आणि मग काउंटर वर मी जेवणाचं बिल किती झालं म्हणून विचारलं तर हाती साडेसहाशे रुपयांचे बिल ठेवल्या गेलं.


मी म्हटलं, "भाऊ! पैसे तर मी देईन, पण एकदा मला तुमचा भटारखाना दाखवा." तो एकदम गडबडून गेला आणि मला विचारू लागला, "कां? काय झालं?"


मी म्हटलं, "जो पैसे देतो त्याला जेवण साफ बनतंय की नाही हे पाहण्याचाही हक्क आहे."


तो काही बोलण्या आधीच मी हॉटेलच्या भटारखान्यात शिरले.


आत शिरल्यावर स्वयंपाक घरात कसलाही पदार्थ शिजत नाहीये हे पाहून माझ्या आश्चर्याला काही पारावार उरला नाही. एका टोपलीत कांही पोळ्या ठेवल्या होत्या. फ्रिज उघडून बघितला तर आंत उघड्या भांड्यांत वेगवेगळ्या प्रकारच्या शिजलेल्या भाज्या ठेवलेल्या दिसत होत्या. कांही भाज्यांना तर चक्क बुरशी लागली होती.


फ्रिजमधून सडका वास बाहेर पडत होता. आचाऱ्याला दरडावून विचारल्यावर ह्या साऱ्या भाज्या एक आठवड्याइतक्या शिळ्या असल्याचं त्यानं कबूल केलं. वाढताना याच शिळ्या भाज्यात तेल टाकून व कढईत गरम करून आपण त्यात कोथिंबीर व टमाटू टाकून डिशमध्ये ग्राहकांना सर्व्ह करीत असतो हेही त्यानं मान्य केलं.


कणिक आपण केवळ एक दिवसाआडच मळतो.


किती किती तास वीज जाते तेव्हा खाद्यपदार्थ खराब होऊ लागतात. ते लपविण्यासाठी त्यांत तिखट आणि भरपूर मसाले टाकून डिशेस सर्व्ह केल्या जातात. तिंबलेली शिळी कणिक खराब झाली असेल तर तीच नान साठी सर्रास वापरली जाते.


मी रेस्टॉरंटच्या मालकास बोलले "तुम्हीही कधीतरी यात्रा करीत असालच, ईश्वर करो, जेव्हा पुढील यात्रेच्या वेळेस तुम्ही भुकेनं अगदी व्याकुळ झाला असाल तेव्हा तुम्हाला बिलकूल असंच जेवण मिळावं जसं तुम्ही तुमच्या ग्राहकांना खाऊ घालता." माझं हे बोलणं ऐकून त्याचा चेहरा काळा ठिक्कर पडला....


आज आपल्याला संकटं, धोके व फसवणूकीपासून केवळ आपली जागरूकताच वाचवू शकते. कारण आता देवालाही दुष्टांनी घेरलेलं आहे.


भारतातून योग्य आणि अयोग्य यांतील फरक संपत चालला आहे....


प्रत्येक दुकानात वा प्रतिष्ठानात एका कोनाड्यात देवाचं मोठं वा लहान मंदिर पहायला मिळेल, व्यापारी सकाळी येताच देवाच्या मूर्ती समोर धूप, दीप लावतो, गल्ल्याला नमस्कार करतो आणि मग दुकानातील सामानासोबतच स्वतःचा आत्मा विकण्याचा धंदा सुरू होऊन जातो!!!


देवाजवळ मागणं मागताना दुकानदार हा विचार करीत नाहीत की ते स्वतः जगाला काय देतायत!!


जागरूक व्हा!!

दुसरा कुठलाच उपाय नाही.


*कमीत कमी पाच समूहांना नक्की अग्रेषित करा.*


*कांही लोक नाही पाठवणार.*


*पण मला विश्वास आहे की तुम्ही तरी नक्कीच पुढे पाठवाल.*


🙏🙏

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनाराज्यातील कारागिरांना लाभदायकसुतार, लोहार, कुंभार, चर्मकार, शिल्पकार, पाथरवट, नाभिक, धोबी, खेळणी बनवणारे, झाडू तयार करणारे, सोनार, मिस्त्री आदी उद्योगांच्या कारागिरांचा समावेश आहे.

 प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनाराज्यातील कारागिरांना लाभदायक

सुतार, लोहार, कुंभार, चर्मकार, शिल्पकार, पाथरवट, नाभिक, धोबी, खेळणी बनवणारे, झाडू तयार करणारे, सोनार, मिस्त्री आदी उद्योगांच्या कारागिरांचा समावेश आहे.

- आर. विमला


            मुंबई, दि. 23 : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कारागिरांच्या हिताची असून राज्यातील खादी ग्रामोद्योग मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या सात लाख ग्रामीण कारागिरांना याचा थेट लाभ होणार असल्याचे मत खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला यांनी व्यक्त केले.


            खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्यालयात आज दृकश्राव्य माध्यमाद्वारे राज्यातील 311 कारागीर बलुतेदार संस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला बोलत होत्या.


            नव्याने सुरु होत असलेल्या 'प्रधानमंत्री विश्वकर्मा' योजनेची सविस्तर माहिती देताना श्रीमती विमला म्हणाल्या की, "खादी व ग्रामोद्योग मंडळाकडे राज्यात जवळपास सात लाख कारागीर नोंदणीकृत आहेत. यात सुतार, लोहार, कुंभार, चर्मकार, शिल्पकार, पाथरवट, नाभिक, धोबी, खेळणी बनवणारे, झाडू तयार करणारे, सोनार, मिस्त्री आदी उद्योगांच्या कारागिरांचा समावेश आहे.


            केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात कर्ज, कौशल्य वाढीसाठी प्रशिक्षण, आणि विद्यावेतन देखील मिळणार आहे याचा लाभ कारागिरांनी घ्यावा. या योजनेत मंडळाच्या कारागिरांनी जास्तीत जास्त सहभागी होणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात जास्तीत जास्त कारागिरांना सहभागी करून घेण्यासाठी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.


            या योजनेची सविस्तर माहिती केंद्र सरकारकडून मिळणार आहे. ही योजना ऑनलाईन उपलब्ध होणार असून आवश्यक ते कागदपत्रे आधारकार्ड, रेशनिंग कार्ड कारागिरांनी तयार ठेवावीत. कारागिरांना कारागीर म्हणून नवे ओळखपत्र या योजनेत दिले जाणार असून त्यामुळे 'कारागीर' म्हणून शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच या योजनेत प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे. जेणेकरून हस्तकला आणि कारागिरांना महत्व प्राप्त होईल. या योजनेबाबत अधिक माहिती मंडळाच्या जिल्हा ग्रामोद्योग कार्यालयात मिळेल.


            या सभेस राज्यातील बलुतेदार कारागीर संस्थांचे अध्यक्ष, सचिव, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी आदी उपस्थित होते. मंडळाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी आभार मानले.


००००

Monday, 24 July 2023

सन फ्लॉवर थिअरी

 🌞 *सन फ्लॉवर थिअरी..*🌻


 *जसा जसा सूर्य पुढे पुढे सरकतो तसे हे सूर्य फुलं आपले तोंड त्या दिशेला करीत असतात. म्हणजेच सुर्य प्रकाश समोरून ग्रहण करीत असतात. हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. पण याबाबतीतील एक रहस्य कदाचित आपणास माहिती नसावे. ढगाळ आणि पावसाळी वातावरणात जेव्हा सूर्य संपूर्ण झाकला जातो त्यावेळी काय घडते? तुम्हाला वाटेल की ती फुलं मिटत असतील किंवा जमिनीकडे तोंड करीत असतील, नाही कां?*


*नाही... तर काय घडते त्यावेळी?ही फुले खाली किंवा वरती नाहीवळत तर ती वळतात समोरासमोर एकमेकांना आपली साठवलेली ऊर्जा देण्यासाठी, इतरांनाही जगविण्यासाठी !!*


*निसर्गाचं परिपूर्ण तेच वरदान खरंच आश्चर्यकारक आहे!! माणसाने ही निसर्गाची प्रतिक्रिया आपल्या जीवनात आणणे आवश्यक आहे. समाजात अनेक लोक काळजीने, चिंतेने, परिस्थितीने ग्रासलेले असतात. तेव्हा ही सूर्यफूल थिअरी उपयोगात आणली पाहिजे. जसे एकमेकांना मदत करणे आणि ऊर्जा प्रदान करणे, मनोबल वाढविणे !*


*तर सर्वांना सदिच्छा देऊ या की आपणही सूर्य फुलासारखे वागूया, संकटाच्या, निराशेच्या ढगाळ वातावरणात एकमेकांना साथ देऊ या, आपल्या चांगुलपणाची साक्ष देऊ या !*🤝


🌞🌻🌼🌞🌻🌼🌻🌞

Friday, 30 June 2023

श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर - उडुपी येथील उत्थान द्वादशी काकड आरती

 *🌹🙏👆श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर - उडुपी येथील उत्थान द्वादशी काकड आरती - विश्वरूप दर्शन सोहोळा आणि दीपोत्सव - एक अप्रतिम संग्रही ठेवावा असा व्हिडिओ आणि त्यासाठी वापरलेलं "उठ पंढरीच्या राया... फार वेळ झाला... थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला...." एक अप्रतिम समयोचित भक्तीगीत प्रत्यक्ष अनुभवा... ..!!! 👌👌👌🙏🌹*


Saturday, 17 June 2023

भारतीय जनता पार्टी, कांदिवली पूर्व विधानसभेच्या वतीने 'मोदी @ ९' च्या पार्शवभूमीवर

 भारतीय जनता पार्टी, कांदिवली पूर्व विधानसभेच्या वतीने 'मोदी @ ९' च्या पार्शवभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १८ जून रोजी हे कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमासाठी भाजपचे राष्ट्रीय महासचिव सी. टी. रवी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी दिली. भाजपचे राष्ट्रीय महासचिव तसेच महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी या कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणार आहेत.


दुपारी १२.३० वाजता मालाड पूर्व मधील पारेख हॉल येथे 'टिफिन बैठक' होणार आहे. २.३० वाजता विशेष व्यक्ती संपर्क, ३.३० वाजता महिला बचत गट आणि लाभार्थी संमेलन महिला आधार भवन, हनुमान नगर येथे होणार आहे. सायंकाळी ५ वाजता लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे प्रभावशाली व्यक्ती संमेलन होणार आहे. सायंकाळी ६ वाजता कॅन्सर रुग्ण सेवा केंद्र, लोखंडवाला कॉम्प्लेक्स आणि आकुर्ली रोड येथील रोटी बँक येथे विकासतीर्थ संपर्क अभियान होणार आहे. ६.६० वाजता पायोनियर स्कूल येथे बुद्धीजिवी संमेलन होणार आहे.


या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तयारी पूर्ण झाली असून कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी, कांदिवली पूर्व विधानसभेच्या वतीने करण्यात आले आहे.


 

Sunday, 28 May 2023

Suorabhat

: 🪷🪷🌹🩷🌹🪷🪷

*ज्याला वास्तव स्वीकारणे चांगले जमते, तोच मनुष्य आपल्या आयुष्यात, सदैव यशस्वी होतो. लाचारी स्विकारून, अनेकांच्या सहवासात राहण्यापेक्षा, स्वाभिमानाने स्विकारलेला एकटेपणा, कधीही चागंला.*

🪷🪷🌹🩷🌹🪷🪷

🪔🪔 **🪔🌸❄️⚜️सुप्रभात ⚜️❄️🌸🔅*

*आयुष्याची गणितं खरंतर बोटांवर सोडवण्याइतकी सोपी आहेत.*

*पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवते.*

🏵️⚜️🏵️⚜️🏵️⚜️🏵️⚜️🏵️⚜️

Monday, 27 June 2022

पाणी रे पाणी

 पाण्याबद्दल एक माहितीचा लेख वाचनात आला. तो पाठवतो आहे.

*डोंगर आणि झाडाशिवाय जमीनीत पुरेसे पाणी साठवणे अशक्य आहे*

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️@✍️✍️✍️✍️✍️✍️✍️


1) डोंगर हे जमिनीतील पाणीसाठ्याचे बाह्य कवच असते. उन्हाळ्यात डोंगराचे बाह्य आवरण तापते.माञ भूपृष्ठापर्यंत उष्णता पोहचू न शकल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही.या उलट डोंगर फोडला तर उष्णता थेट पोहचते व डोंगराच्या पोटातील ओलावा संपुष्टात येतो. 

2) पाणी जमिनीत दोन प्रकारे साठले जाते. *एक मृत साठ्याचे पाणी*

*दुसरे जिवंत साठ्याचे पाणी* 

       मृत साठ्याचे पाणी हे दहा फुटावर पाझरते तर जिवंत साठ्याचे पाणी दहा ते १०० व त्यापेक्षा अधिक पाळीवर आढळते.

       जेेंव्हा पाऊस पडतो तेंव्हा नदी नाल्याचे पाणी मृत साठ्याच्या स्वरूपात जमिनीत साठले जाते.जे कि एकदा उपसले कि संपून जाते. आणि जोपर्यंत ओढे वगळ वहात असतात तोपर्यंतच विहीर व बोअरला पाणी असते. 

       तर जिवंत साठ्याचे पाणी आज तरी भूगर्भातून संपलेले आहे. कारण जिवंत पाणी खोलवर जाण्यासाठी नैसर्गिक यंञणा हवी असते. 

3) एक पाण्याचा थेंब खडकातून पाझरून भूगर्भात जाण्याठी एक वर्षाचा कालावधी लागतो.म्हणजेच दहा फुटावर जाण्याठी दहा वर्ष लागतात. 

4) एक झाड एका दिवसाला ५० फुटावर दहा लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते. कारण झाडं हे जमिनीच्या वर जेवढ्या उंचीपर्यंत असेल तेवढीच खोलवर त्याची मुळे असतात.म्हणून झाडं हे निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन आहे, 

5) एक लिंबाचे झाडं दहा हजार लिटर पाणी एकुण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते.याचा अर्थ आपल्या परिसरात किमान ३० झाडं लिंब,चिंच,जांबळ,अंबा, मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असतील.म्हणून मृत साठ्याचे पाणी पाझरत रहात असावे. 

6) एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाडं एका हंगामासाठी एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते.आणि ते ही पन्नास फुटाच्या ही खाली. वडाची व पिंपळाचे मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात. 

      एक कोटी लिटर म्हणजे एका विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी. याचा गणितीय हिशोब सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो. 

      *म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा. 

         आपण एक बोअरवेलसाठी एक लाख खर्च करतो. एका विहीरीसाठी पाच लाख खर्च करतो.पण पाण्याचा कुठलीच शाश्वती नाही'. 

           कारण आपली नियत ही धुर्त असते, डोंगर संपुष्टात आणण्याची,डोंगारावरील झाडं तोडण्याची, बांध संपवून बोडके करण्याची म्हणून पाणी तरी कुठून येणार? 

6) पाण्याचे दुर्भिक्ष हे मानव निर्मित आहे. देवाला दोष देण्यात अर्थ नाही.खरे दोषी आपण व आपला स्वार्थ आहे. 

           हवा ही ऊर्जा आहे.

           पाणी हे अमृत आहे

          तर माती ही जननी आहे.

        तर झाडं हे जीवनदायी आहेत. 

झाड नसेल तर हवा रोगट होते. पाणी विषासमान होते आणि माती वांझ होवून शापीत होते.

        

7) झाडांचं मूल्य समजून घ्या... आणि दहा रूपयाचं फक्त एक झाडं शेत असेल तर शेतात नाहीत तर माळरानावर,डोंगरावर कुठे ही जगविण्याची जबाबदारी घ्या.... 

       या शिवाय दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नाही. तुम्ही गावाचे, शहराचे, देशाचे, समाजाचे आणि स्वहिताचे जर काही देणं लागत असाल तर एवढचं साध काम करा. 

          झाडं मानसाचं मन, मस्तिष्क व जीवन हिरवंगार करत असतात. 

8) एक सदैव लक्षात असु द्या. झाडांची पाणी पाठवण्याची व वाहण्याची क्षमता त्यांच्या 

वयावर व प्रकारावर अवलंबून असते. शक्यतो देशी झाडे लावा.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏@🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Friday, 26 November 2021

 महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अध्यक्षपदी


विधानपरिषद सदस्य डॉ. वजाहत मिर्झा अथर मिर्झा यांची निवड


अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केले नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन


 


            मुंबई, दि. 26 : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अध्यक्षपदी विधानपरिषद सदस्य डॉ. वजाहत मिर्झा अथर मिर्झा यांची बिनविरोध निवड झाली. त्यांना अध्यक्षपदी निवडून आल्याबाबतचे प्रमाणपत्र अल्पसंख्याक विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी यांनी आज मंत्रालय येथे प्रदान केले.


            अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री नवाब मलिक यांनी डॉ. वजाहत मिर्झा अथर मिर्झा यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले. मंडळावर सद्यस्थितीत 10 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर मंडळासाठी पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. आता अध्यक्षपदाचीही निवड झाल्याने वक्फ मंडळ आता संपूर्ण क्षमतेने कामकाज करु शकेल. नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा अथर मिर्झा यांना तसेच मंडळाच्या पुढील वाटाचालीसाठी शुभेच्छा देतो, अशी प्रतिक्रिया मंत्री श्री. मलिक यांनी व्यक्त केली.


            वक्फ अधिनियम 1995 या केंद्र शासनाच्या कायद्यानुसार महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मंडळावर सद्यस्थितीत 10 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिनियमातील तरतुदींप्रमाणे मंडळाच्या अध्यक्ष निवडीसाठी आज 26 नोव्हेंबर, 2021 रोजी बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ (निवडणूक घेणे) नियम 2000 मधील तरतूदीनुसार अपर मुख्य सचिव तथा सक्षम अधिकारी जयश्री मुखर्जी यांच्यामार्फत त्यांच्या दालनात निवडणूक घेण्यात आली. नियोजित वेळेत डॉ. वजाहत मिर्झा अथर मिर्झा या एकाच सदस्याकडून नामनिर्देशन प्राप्त झाल्याने व हे नामनिर्देशनपत्र वैध ठरल्याने डॉ. वजाहत मिर्झा अथर मिर्झा हे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले असल्याची घोषणा करण्यात आली.

Wednesday, 3 November 2021

 बांधकाम प्रकल्पांमुळे बाधित मच्छिमारांना

नुकसानभरपाईबाबतच्या धोरणासाठी अभिप्राय पाठविण्याचे आवाहन

 

          मुंबईदि. 2 : राज्यातील सागरी क्षेत्रात होत असणाऱ्या बांधकाम प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या मच्छिमारांना नुकसान भरपाईबाबत राज्यस्तरीय धोरण तयार  करण्यात येणार आहे. या धोरणासाठी राज्यातील सर्व मच्छिमारमत्स्यव्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञया क्षेत्रात कार्यरत संघटना आणि मच्छिमार संस्थांनी त्यांचे लेखी अभिप्राय पाठविण्याचे आवाहन पशुसंवर्धनदुग्धविकासमत्स्यव्यवसाय विभागाच्या प्रधान सचिवांनी केले आहे.

          उच्च न्यायालयाने रिट याचिका २०१६/२०२१ संदर्भात दि. १२ ऑगस्ट २०२१ रोजीच्या आदेशान्वये राज्यातील सागरी क्षेत्रात होत असणाऱ्या बांधकाम प्रकल्पामुळे बाधित  मच्छिमारांना नुकसान भरपाईबाबत राज्यस्तरीय धोरण तयार  करण्यासाठी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये मत्स्यव्यवसाय आयुक्तराज्यातील महाराष्ट्र मच्छिमार संघमहाराष्ट्र मच्छिमार कृती समितीअखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती व पारंपरिक मच्छिमार बचाव कृती समिती यांचेशी चर्चा करण्यात आली. प्रकल्पामुळे बाधित झालेल्या पारंपरिक मच्छिमारांना व इतर मत्स्यव्यवसायिकांना न्याय देण्यासह नुकसान भरपाईविषयी चर्चा करण्यात आली. जे मच्छिमार शासनाच्या अभिलेखामध्ये नसतील त्यांच्या शासनामार्फत नोंदी घेण्याविषयी देखील चर्चा झाली. सर्व मच्छिमारांचे अधिकार अबाधित रहावे व मासेमारी क्षेत्र कमी होऊ देऊ नयेअशा सूचना देऊन लेखी स्वरुपात त्यांचे म्हणणे विभागास कळविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

          राज्यस्तरीय धोरणासाठी राज्यातील सर्व मच्छिमारमत्स्यव्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञया क्षेत्रात कार्यरत संघटना आणि मच्छिमार संस्थांनी त्यांचे लेखी अभिप्राय  commfishmaha@gmail.com  या ई-मेलवर पाठविण्याचे आवाहन पशुसंवर्धनदुग्धविकासमत्स्यव्यवसाय विभागाच्या प्रधान सचिवांनी केले आहे. प्राप्त अभिप्रायांची दखल राज्यस्तरीय धोरणामध्ये घेण्यात येणार असून यासंबंधीची सर्व माहिती fisheries.maharashtra.gov.in   या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

0000


Monday, 4 October 2021

 *आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती  निवडणुकांसाठी शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस युती*  

अलिबाग-मुरुडसाठी महेंद्र दळवी यांची घोषणा; शेकापचा पराभव करण्यासाठी एकीचे बळ

अलिबाग, ता. 3: आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी विधानसभेच्या अलिबाग-मुरुड मतदार संघासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. महेंद्र दळवी यांनी नवे समिकरण जुळवून आणले आहे. शेतकरी कामगार पक्षाला या मतदार संघातून हद्दपार करण्यासाठी बलाढ्य शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढविणार असल्याची घोषणा महेंद्र दळवी यांनी रविवार (ता.3) रोजी राजमळा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली. 

या नव्या समिकरणाची जुळवणी मागिल काही दिवसांपासून सुरु होती. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच ही त्रिपक्षीय आघाडी झाली असल्याची माहिती आ. महेंद्र दळवी यांनी आजच्या कार्यकर्ता मेळाव्यात दिली. या एकीच्या बळाने आपण शेकापला या मतदार संघातून हद्दपार करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. नव्या आघाडीमुळे शेकाप एकाकी पडला आहे. त्यांच्या नेत्यांना पराभव समोर दिसू लागल्यान शेकापचे नेते अर्थहिन आरोप करु लागले आहेत. त्यांच्या आरोपांना आणि धमक्यांना घाबरण्याची वेळ संपली असून शेकापचे अनेक वर्षांचे वर्चस्व संपवण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहनही आ. महेंद्र दळवी यांनी कार्यकर्त्यांना केले. राजमळा येथील मेळाव्यास जिल्हापरिषदेचे विरोधी पक्ष नेता सुरेंद्र म्हात्रे, शिवसेनेचे अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी, मुरुड तालुका प्रमुख श्रीकांत डोंगरीकर महिला जिल्हा संघटीका दिपेश्री पोटंफोडे जिल्हा खजिनदार सुरेश म्हात्रे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष निगडे ॲड.सुशील पाटील यांच्यासह अलिबाग मुरुड तालुक्यातील शिवसेना उप तालुका प्रमुख विभाग प्रमुख महिला आघाडी च्या पदाधिकारी संपर्क प्रमुख शिवसेना शाखा प्रमुख उप शाखा प्रमुख आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

 विद्यार्थी व शिक्षकांचा उत्साह पाहून वेगळाच आनंद झाला

- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

 

·       "वेलकम बॅक टू स्कुल..." सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी 'शिक्षणोत्सवानिमित्तजिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे केले पुष्प देऊन स्वागत...

 

·       शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरणमास्क सॅनिटायझर आदी सुरक्षा उपाययोजनांबाबत  सूचना

 

 

          परळी (दि. 04) -: कोविड कालावधीच्या मोठ्या ब्रेकनंतर प्रथमच परळी तालुक्यातील टोकवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत उपस्थित झालेल्या विद्यार्थ्यांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गुलाब पुष्प देत त्यांचे शाळेत स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या वर्गात जाऊन त्यांच्याशी संवाद साधत पालकमंत्री श्री.मुंडे यांनी 'वेलकम बॅक टू स्कुल...म्हणताच विद्यार्थ्यांनी एका सुरात 'थँकू यु सर...म्हणत दिलेल्या प्रतिसादाने शाळेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.

            कोविडच्या काळात जवळपास दीड वर्ष शाळा बंद राहिल्यानंतरआता दुसरी लाट ओसरली आहे. राज्य सरकारने शाळांची घंटा वाजवण्याचा निर्णय घेतला असून राज्यात शाळा सुरू झाल्या असून राज्यभरात शिक्षणोत्सव साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा परिषद शाळा, टोकवाडी येथे जाऊन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व शिक्षणोत्सव पुढे अखंडित सुरू राहावा, अशा शुभेच्छा दिल्या.

            पुन्हा नव्याने शाळा सुरू झाल्या आहेतत्या आता कायम सुरू राहाव्यात यासाठी मास्कसॅनिटायझरअन्य स्वछता याबाबत दक्षता घेण्यात यावी. यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण केले जावे, शाळेचा परिसर स्वच्छ ठेवावा याबाबत संबंधितांना सक्त सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत.

            यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेच्या आवारात वृक्षारोपण देखील करण्यात आले.

            मधल्या काळात शाळा बंद राहिल्या पण शाळा पुन्हा सुरू होताना विद्यार्थी व शिक्षकांच्या मनातील उत्साह एक वेगळाच आनंद देतो आहेतसेच मधल्या काळात झालेले शैक्षणिक नुकसानही भरून निघेल असा विश्वास वाटत असल्याची प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

            यावेळी पंचायत समितीचे सभापती बालाजी (पिंटू) मुंडेमार्केट कमिटीचे संचालक सूर्यभान नाना मुंडेडॉ.राजाराम मुंडेटोकवाडीच्या सरपंच गोदावरीताई मुंडेग्रा.प. सदस्य तुकाराम काळेनामदेव मुंडेसुरेश रोडेशालेय समितीचे अध्यक्ष मदन काळेगणेश मुंडेमाधव मुंडे, यांसह शाळेचे मुख्याध्यापक श्याम आघाव तसेच शिक्षकशिक्षिका उपस्थित होते.

0000


Featured post

Lakshvedhi