Showing posts with label Dhor. Show all posts
Showing posts with label Dhor. Show all posts

Sunday, 7 June 2026

नीट परीक्षा पारदर्शक, सुरळीत व तणावरहित वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात

 नीट परीक्षा पारदर्शक, सुरळीत व तणावरहित वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, दि. 5 : 'राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा' (नीट) देणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी  पारदर्शक आणि तणावरहित वातावरण असावे.  सर्व  यंत्रणांनी सतर्क राहून परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना करून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये,  यासाठी अधिक दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  वर्षा निवासस्थानी नीट परीक्षेच्या पूर्व तयारीसंदर्भात आयोजित बैठक झाली. गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, राज्य गुप्तचर विभागाचे आयुक्त शिरीष जैन, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, सहसचिव संतोष खोरगडे, राज्य सूचना विज्ञान अधिकारी सपना कपूर, तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सर्व परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवून त्याचे नियंत्रण करावे, तसेच सायबर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.  परीक्षा केंद्रांवर उमेदवारांची तपासणी व ओळख पडताळणी प्रक्रिया काटेकोरपणे राबवावी. परीक्षेसंदर्भातील अचूक माहिती विद्यार्थी, पालक आणि नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समाज माध्यमांचा प्रभावी वापर करून व्यापक जनजागृती करण्यात यावी, तसेच परीक्षा प्रक्रियेबाबत अफवा किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित झाल्यास त्याचा तातडीने खुलासा करून विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मानत कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी.

पुणे आणि लातूर येथील परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात यावे, परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, याची दक्षता घेण्याबरोबरच सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, पावसाच्या दृष्टीने पूर्वतयारी आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक मूलभूत सुविधांची प्रभावी अंमलबजावणी करून परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, शिक्षण विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

राष्ट्रीय परीक्षण एजेंसी (एनटीए) महासंचालक अभिषेक सिंह यांनी सादरीकरणाद्वारे नीट महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रांची संख्या, उपलब्ध सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती यावेळी दिली.

००००

Saturday, 21 June 2025

राज्यातील किनारपट्टीच्या विकासासाठी एक सकारात्म पाऊल

 महाराष्ट्रातील बंदर विभागाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे

- केंद्रीय बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल

राज्यातील किनारपट्टीच्या विकासासाठी एक सकारात्म पाऊल

- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. २० : महाराष्ट्रातील बंदर विभागाचे प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी केंद्रीय आणि राज्य शासनाचे विभाग यांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना केंद्रीय बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिल्या. किनारपट्टीच्या विकासासाठी केंद्रीय आणि राज्य विभागाची एकत्रित बैठक हे एक सकारात्मक पाऊल असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले.

              राज्यातील बंदर विकास आणि महत्त्वाच्या प्रकल्पांविषयी केंद्रीय मंत्री श्री. सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली आणि मंत्री श्री. राणे यांच्या उपस्थितीत केंद्रीय आणि राज्य शासनाचे विभाग यांची एकत्र बैठक झाली. यावेळी केंद्रीय मंत्री श्री. सोनोवाल आणि राज्याचे मंत्री श्री. राणे बोलत होते.

               बैठकीस बंदरे व परिवहन सचिव संजय सेठीमहाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीपजेएनपीटीचे अध्यक्ष उन्मेष वाघएमबीपीटीचे उपाध्यक्ष आदेश तितारमारेडिजिसीएचे महासंचालक श्याम जगन्नाथ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

          केंद्रीय मंत्री श्री. सोनोवाल म्हणाले कीसागरी व्यापार आणि उद्योग क्षेत्रात भरपूर संधी आहेत. महाराष्ट्रातील बंदरे क्षेत्रातील प्रकल्प महत्वाचे असून त्यासाठी लागणाऱ्या परवानगी लवकर देण्यात याव्यात. रेल्वे आणि रस्ते मार्गाने बंदराची जोडणी करणारे प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत. सागरमाला अंतर्गत महाराष्ट्रात मंजूर करण्यात आलेले प्रकल्प २०२६ सालापर्यंत पूर्ण करावेत.

              मंत्री श्री.राणे म्हणाले कीकेंद्रीय विभागांची परवानगी वेळेत मिळण्यासाठी दोन्ही विभागांनी समन्वयाने काम करावे. तसेच ही परवानगी मिळणे सुलभ व्हावे यासाठी प्रयत्न व्हावे. त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन खर्चात बचत होईल. आजची बैठक ही सकारात्मक झाली असून यामुळे राज्यातील बंदर विभागाची कामे गतीने मार्गी लागतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

             या बैठकीमध्ये वैभववाडी कोल्हापूर रेल्वे प्रकल्पआनंदवाडी बंदररो रो सेवावॉटर टॅक्सीअंतर्गत जलमार्ग,  जेटीचे प्रश्न याबाबत चर्चा झाली.

००००

Featured post

Lakshvedhi