Showing posts with label उधोग. Show all posts
Showing posts with label उधोग. Show all posts

Tuesday, 5 March 2024

लक्ष्‍मी मित्‍तल ग्रुपसह 19 सामंजस्‍य करारांवर स्‍वाक्षरी ‘ॲडव्हान्टेज चंद्रपूर 2024 -इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’ चे उद्घाटन

 लक्ष्‍मी मित्‍तल ग्रुपसह 19 सामंजस्‍य करारांवर स्‍वाक्षरी

ॲडव्हान्टेज चंद्रपूर 2024 -इंडस्ट्रियल एक्स्पो अँड

बिझनेस कॉन्क्लेव्ह’ चे उद्घाटन


            मुंबईदि. 4 : देशाच्‍या विकासात आता चंद्रपूर महत्‍वाची भूमिका निभावणार असून ॲडव्हान्टेज चंद्रपूरच्‍या माध्‍यमातून लक्ष्‍मी मित्‍तल ग्रुपसह 19 कंपन्यांशी सामंजस्‍य करार केले गेले आहेत. चंद्रपूर प्रशासन या सर्व कंपन्‍यांच्‍या पाठीशी पूर्ण उभे राहून केवळ चंद्रपूरच नाही तर देशाच्‍या विकासातही हातभार लावेल,  असे प्रतिपादन  वनेसांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.  देश के निर्माण में चंद्रपूर मैदान में’ असे सांगून देशविकासाच्या कार्यात चंद्रपूर महत्वाची भूमिका बजावेलअसे त्यांनी यावेळी सांगितले.

            महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळजिल्हा प्रशासनएमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचंद्रपूर व असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय 'ॲडव्हांटेज चंद्रपूर 2024 - इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्हचे सोमवारी वन अकादमी येथे उद्घाटन झाले.

            त्यावेळी मंत्री श्री मुनगंटीवार बोलत होते. कौशल्‍य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्‍यासह आमदार किशोर जोरगेवारचंद्रपूरचे जिल्‍हाधिकारी विनय गौडासीईओ विवेक जॉन्‍सनमनपा आयुक्‍त विपीन पालिवाल न्‍यू ईरा व्‍यवस्‍थापकीय संचालक बाळासाहेब दराडेलॉईडचे मधूर गुप्‍ताकुमार वारराकेश प्रसादराजेश झंझाडजी. डी. कामडेआलोक मेहताके. जी. खुबाटामधुसूदन रुंगटा  उपस्‍थ‍ित होते.

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेचंद्रपूर हे आतापर्यंत कोळसासिमेंट यासाठी ओळखले जात होते. येथे स्‍थापन झालेले उदयोग भविष्‍यात अधिक प्रगती करतील. त्याचा लाभ स्थानिक परिसराला होईल. करार झालेल्‍या कंपन्‍यांच्‍या विविध परवानगींसाठी वन विंडो सिस्‍टीम’ तयार करण्‍यासोबतच एअरपोर्टरेल्‍वेरस्‍ते आदी पायाभूत सुविधाकौशल्‍य विकासाचे विविध अभ्‍यासक्रमसंशोधन कार्यक्रमांवर भर दिला जाणार असल्‍याचे ते यावेळी म्‍हणाले.

            मंत्री श्री. लोढा यांनी श्री. मुनगंटीवार यांच्‍या कार्याचे कौतुक केले. आ. किशोर जोरगेवार यांनी यावेळी शुभेच्‍छा दिल्‍या.

            मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्‍सन यांनी अॅडव्‍हांटेज विदर्भ व चंद्रपूर जिल्‍ह्याच्‍या विकासासाठी जिल्‍हा प्रशासनाने विविध कंपन्‍यांशी केलेल्‍या सामंजस्‍य करारासंदर्भात माहिती दिली. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी चंद्रपूर जिल्‍ह्याच्‍या सामाजिकऔद्योगिक व आर्थिक विकासाबद्दल विस्‍तृत सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ॲडव्हान्टेज चंद्रपूर 2024 बद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शुभेच्छा संदेश दाखवण्यात आले. ॲडव्हान्टेज चंद्रपूर 2024 संदर्भात एक चित्रफीत दाखवण्यात आली.

            ॲडव्हान्टेज चंद्रपूर 2024 साठी राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि केंद्र शासनाच्या एमएसएमई मंत्रालयाचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर व श्‍यामल देशमुख यांनी केले.

50 वर्षांचे व्हिजन तयार करा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

            चंद्रपूर जिल्‍ह्याच्‍या क्षमता आणि कमतरता या बाबींचा विचार करून या जिल्‍ह्याच्‍या  विकासासाठीजिल्‍ह्याला समृद्ध व संपन्‍न करण्‍यासाठी पुढील 50 वर्षांचे व्हिजन तयार करावेअशा सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ संदेशातून केल्‍या. चंद्रपूरमध्‍ये अॅडव्‍हेंचर स्‍पोर्ट्सवॉटर स्‍पोर्टसपर्यटनपर्यटकांसाठी इलेक्‍ट्रीक गाड्यारिसॉर्टसबांबू लागवडमत्‍स्‍यव्‍यवसाय यावर काम करण्‍याची गरज असल्‍याचे ते म्हणाले.

चंद्रपूरमध्‍ये स्‍टील प्‍लांट उभारणार - अलोककुमार मेहता

            लक्ष्‍मी मित्‍तल ग्रुपचे संचालक (मायनिंग अँड स्‍ट्रॅटेजिक प्रोजेक्‍ट) अलोक कुमार मेहता यांनी महाराष्‍ट्रात येऊन सामंजस्‍य करारांवर स्‍वाक्षरी करण्‍याची संधी मिळाल्‍याबद्दल धन्‍यवाद व्‍यक्‍त केले. चंद्रपूरमध्‍ये 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून स्‍टील प्‍लांट स्‍थापन करण्‍यात येणार असून त्‍या माध्‍यमातून 60 हजार प्रत्‍यक्ष- अप्रत्‍यक्ष रोजगार निर्मिती केली जाईलअसे ते म्‍हणाले. मधुसुदन रुंघटा यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले.

19 सामंजस्‍य करार75 हजार 721 कोटींची गुंतवणूक

            अॅडव्‍हांटेज चंद्रपूरच्‍या उद्घाटन सत्रात लक्ष्‍मी मित्‍तल ग्रुपसह एकुण 19 सामंजस्‍य करार करण्‍यात आले. यामध्ये सुमारे 75 हजार 721 कोटी रुपयांचे करार करण्‍यात आले ज्‍या द्वारे या भागात 50 हजारहून अधिक रोजगार निर्माण होणार आहेत. जिल्‍हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने या करारावर स्‍वाक्षरी केली. या विविध करारांवर आर्सेलर मित्‍तल निप्‍पॉन स्‍टील इंडिया लिमिटेडचे अलोककुमार मेहतान्‍यू ईराचे व्‍यवस्‍थापकीय संचालक बाळासाहेब दराडेलॉईड मेटल्‍सचे मधूर गुप्‍ताचंद्रपूर सोलारचे राजेश ओसवालअंबुजा सिमेंट के. सुब्‍बलक्ष्‍मणनअरविंदो रिअॅलिटी इन्‍फ्रोस्‍ट्रक्‍चर प्रा. लि. संजय मिश्राराजुरी स्‍ट्रील्‍सचे विपीन जैन व विवेक गुप्‍तासनफ्लॅग अँड स्‍टील कंपनी लिमिटेडचे एस. महादेवन अय्यरअल्‍फालॉजिक टेक्‍सेस लिमिटेडचे अंशु गोयलवेस्‍टर्न कोलफिल्‍ड लिमिटेड हर्षल दातारअल्‍ट्राटेक एसीसीचे अतुल कंसनडेस्टीनो मिनरल्‍सचे मोरेश्‍वर झोडेएसआयएडी युएसएचे उमेश दिघे व अनंत एव्हियेशनचे संचालक यांनी स्‍वाक्षरी केल्‍या.

            मान्‍यवरांच्‍या हस्‍ते यावेळी भव्‍य प्रदर्शनाचे उद्घाटन करण्‍यात आले. या प्रदर्शनामध्‍ये कोळसा खाणी, खनिज, लोह – पोलाद, बांबू, मत्स्यव्यवसाय, पर्यटन सोबतच पुरवठा, डेअर, ग्रीन एनर्जी, रिअल इस्टेट, वाहन उद्योग, औषधनिर्माण अशा विविध क्षेत्राशी संबंधित सुमारे 150 स्‍टॉल्‍स आहेत. मान्‍यवरांनी यावेळी या प्रदर्शनाची पाहणी करून कौतुक केले.

0000

Featured post

Lakshvedhi