⚜🌹⚜🔆🌅🔆⚜🌹⚜
🌻 *li.आनंदी°पहाट.il* 🌻
*माणिक दिनाची*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️
*आज पद्मश्री माणिक वर्मा*
*जन्मदिन*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️
🌹⚜️🌸🌺🎶🌺🌸⚜️🌹
*मुलीचे वय वर्ष १३. पण संगीताचा जाहीर कार्यक्रम घेतला तो सुद्धा चोखंदळ पुणेकरांसमोर. तेवढा स्वक्षमतेचा आत्मविश्वास होता. या पहिल्याच कार्यक्रमात दाद मिळवली. गदिमा.. सुधीर फडके इ. मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले. या बालिका म्हणजे माणिक दादरकर अर्थात माणिक वर्मा. किराणा घराण्याच्या गायिका. हिराबाई बडोदेकरांच्या शिष्या. ज्यांना पु. ल. देशपांडेंनी संगीतातील 'माणिक' म्हणून गौरवले. आज त्यांचा जन्मदिवस. (१९२६-१९९६). जन्म पुण्याचा.*
*संगीताचे बाळकडू हे त्यांना आईकडून प्राप्त झाले. पूढे त्यांनी अनेक गुरुंकडे शिक्षण घेतले. किराणा घराण्याचे गाणे शिकल्या. त्यांच्यावर हिराबाईं बडोदेकर यांचा मोठा प्रभाव होता. माणिकताईंनी स्वतः गाण्यासाठी कष्ट घेत स्वतःचे स्थान निर्माण केले. तर्कशास्त्र विषयात पदवी पण घेतली.*
*रंजकता आणि रसिक हृदयाचा ठाव घेणारा विलक्षण गोडवा हे त्यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य. त्यांना मोठमोठे संगीत दिग्दर्शक लाभले. अगदी गदिमा.. सूधीर फडकेंच्या गीत रामायणातही त्यांची सात गाणी आहेत. शास्त्रीय.. उपशास्त्रीय.. भक्तीगीत.. नाट्यगीत ते अगदी चित्रपट गीत असा त्यांचा सर्वत्र संचार होता.*
*त्यांचे नाव निघताच तत्काळ आठवण होते ती "कबिराचे विणतो शेले.." गाण्याची. "निघाले आज तिकडच्या घरी..", "अंगणी गुलमोहर फुलला..", "हसले मनी चांदणे..", "आज अयोध्या सजली.." अशा अनेक लोकप्रिय गाण्यांची. त्यांनी गायलेल्या एकमेव लावणीतील त्यांची "जाळीमधली पिकली करवंद.." पण तेवढीच अवीट गोडीची. एकुण काय सगळ्याच प्रकारात त्यांची हुकूमत होती.*
*कोणतीही कला शिकावी तर ती मन लावून शिकावी, कष्टाने आत्मसात करावी हे माणिकताईंचे मत. त्यांच्या गायकीला असलेला सात्विकतेचा स्पर्श व्यक्तीमत्वाला आणि सुरालाही होता. त्याकाळात मुलीला दाखवायच्या कार्यक्रमात जर मुलीने माणिकताईंचे गाणे गायले तर ती सुशील समजली जायची एवढा त्यांच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव समाजावर होता.*
*गाण्याच्या मैफिलीत रमूनही तेवढीच धडपड त्या संसारातही करायच्या. सणावाराला पंचवीस तीस पाहुण्यांचा स्वयंपाक तेवढयाच उत्साहानं करायच्या. मोठमोठी गायक मंडळी हक्काने त्यांच्या घरी जेवायला यायची. त्यांचे उत्साहाने स्वागत करायच्या. आपल्या मुलींवर संस्कार करताना गाणे लादले नाही. त्यांना त्यांचे क्षेत्र निवडू दिले. त्याला आशीर्वाद दिले.*
*त्यांचा वारसा चालवत कन्या राणी वर्मा.. भारती आचरेकर.. वंदना गुप्ते.. अरुणा जयप्रकाश यांनीही आपआपली क्षेत्र गाजवलीत. पद्मश्री माणिकताईच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारालाही त्यांच्याच श्रेष्ठतेचा मान आहे.*
*माणिकताई वर्मा यांच्या विविधांगी गायकीची साक्ष देणारे हे वेगळ्याच ढंगाचे लोकप्रिय गीत. जेष्ठ श्रेष्ठ गायिका पद्मश्री माणिकताईंना जन्मदिनी विनम्र अभिवादन.*
🌹⚜️🌸🌾🎶🌾🌸⚜️🌹
*कुई कुई कुई कुई चाक बोलतंय*
*मोट चालली मळ्यामंदी*
*झुळ झुळ झुळ झुळ पाणी पळतंय*
*नागावाणी पाटामंदी*
*भिर भिर भिर भिर फिरतंय वारं*
*सळ सळ करतंय शिवार सारं*
*चम चम चम चम मोती चमकती*
*घाटावरनं कणसामंदी*
*भर भर येती रानपाखरं*
*लुटतील दौलत चिमणा चोर*
*गर गर गोफण फिरवीत राहीन*
*माळावर मी थाटामंदी*
*आहा हाहा हाहा हाहा कुकुकूकू*
*आपण दोघं घुमवत राहू*
*करू काढणी धाट मोडणी*
*मोती साठवू खळ्यामंदी*
*लई सुखाची तुझीच राई*
*घरी लक्ष्मी येईल बाई*
*धनत्तराची बाळं आपण*
*खेळू नांदू सुखामंदी*
🌹⚜️🌸🌾🌺🌾🌸⚜️🌹
*गीत : ग. दि. माडगूळकर* ✍
*संगीत : सुधीर फडके*
*स्वर : माणिक वर्मा*
*चित्रपट : पुढचं पाऊल (१९५०)*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*१६.०५.२०२४*
🌻🌸🥀🔆♦️🔆🥀🌸🌻
No comments:
Post a Comment