Friday, 20 September 2024

🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻 *मधुर स्मृतींची*

 🌹⚜️🌹🎼🌅🎼🌹⚜️🌹


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻


                 *मधुर स्मृतींची*              

                                          

🌸🥀🔆🌺🎶🌺🔆🥀🌸

             

        *जीवनात अनेक नाती जोडली जातात. पण काळाच्या ओघात ही नाती विसरलीही जातात. मग त्या नात्यांसोबत व्यतीत केलेला आज निघून गेलेला काळ.. त्यात भेटलेली ती नाती.. त्या व्यक्ती खरंच भेटल्या होत्या  का ? तो भूतकाळ भास तर नव्हता ना असेही वाटते. हे आमचे जीवन म्हणजेच भास तर नाही ना असेही वाटते.*

        *आता बघा ना.. अजूनही ते दृश्य दिसतेय. ती तुडुंब भरुन वाहणारी यमुना.. त्या लगतचा कदंब वृक्ष.. तिथे मोरपिस लावलेला.. मुरलीने गारूड घालणारा गोकुळातील भेटलेला कान्हा.. सोबत असणारी ती राधा.. त्या कृष्णाच्या लीला. हे जे सारे  प्रत्यक्षात अनुभवले होते, ते खरे होते की.. की तो भासच होता ?*

        *कधीकधी आसपास पुण्यवान व्यक्ती असल्या तरीही त्यांना ओळखताच येत नाही. अगदी परमात्माही जवळपास असला तरीही आम्हांला पटतच नाही. विश्वास बसत नाही. पण तो कान्हा अविनाशी. आमच्या अज्ञानाचे रहस्य तोच जाणतो.*

        *एकाच जीवनात किती किती म्हणून भूमिका वठवल्यात त्या कृष्णाने ? बंधू.. पती.. पिता.. परममित्र राजा.. द्रष्टा उपदेशक.. सर्वांना आश्रय देणारा असा सहृदयी नेता. त्याच्या सगळ्या लीलासुद्धा आम्हाला शिकवण देणाऱ्या.. आमचे भलेच करणाऱ्या.. आनंद देणाऱ्या.*

       *कृष्णाने त्याच्या जीवनातून अशाश्वत जीवनात कसे जगावे याचा धडा शिकवलाय. प्रेमबंधनी   नात्यांमध्ये अडकला नाही. सुखदुःखापासून अलिप्तता राखून धर्म कर्तव्य चोख पार पाडली. जीवन रहस्य जाणणारा असा तो योगी*

        *त्यानेच या मानवी नात्यांमध्ये रंग भरून हे  जीवन सुंदर केलेय.. आयुष्याला अर्थ दिलाय. या जीवनात चैतन्य निर्माण करणाऱ्याला काय बरे म्हणावे.. तो काळाचा स्वामी होता की देव. त्याच्या वागण्याचे गुढ अशा निळ्या अस्तित्वाचे रहस्य जनसामान्यांना समजण्या पलिकडचेच. पण तरीही जेव्हा तो दिसत नाही तेव्हा वाटते की त्याचे ते वागणे.. प्रेम करणे.. ते लीला दाखवणे हा भास तर नव्हता ना ?*

        *जसा काळ पूढे पूढे सरकतो तसे जगलेले मानवी जीवन भासमयच वाटते. ही पण त्याचीच माया. पण एकमात्र खरे की कृष्णाच्या या मधूर स्मृतीतही चैतन्य भरलेय.*


🌹🌼🎼🌺🎶🌺🎼🌼🌹

  

  *अजून तरळते दृष्टीपुढती* 

  *ते मोराचे पीस निळे*

  *झिळमिळत्या रंगांचे गारुड* 

  *अजून मला पुरते नकळे !*


  *ती मुरली ती तुडुंब यमुना*

  *कदंब फुलले काठी*

  *खरेच का तो होता तिथला*

  *गोकुळचा रहिवासी ?*

  *खरीच होती राधा अन तो*

  *रास खरा होता का ?*

  *नवलपरीच्या लीला त्याच्या*

  *भासच तो होता का ?* 

  *त्या अविनाशी मूलपणाचे*

  *रहस्यही पुरते नकळे !*


  *तो तर होता गोपसखा*

  *की तरुण प्रियकर होता*

  *धीट किती तो लोकप्रिय किती*

  *नित्य अग्रणी होता*

  *मधुवचनी तो मुरलीमनोहर*

  *रूपवंत वेल्हाळ*

  *समयज्ञही तो चतुर जाणता*

  *शत्रूंजय कळीकाळ* 

  *त्या नित्य नूतन शत रूपांचे*

  *रहस्यही पुरते नकळे !*


  *तो बंधु तो पती पिता तो*

  *परम मित्र तो राजा*

  *तो द्रष्टा उपदेशक प्रेरक*

  *आश्रय तो सकलांचा* 

  *सर्वांसाठी सहृदय तरीही* 

  *तो तर त्या पलीकडचा*

  *अलिप्त सावध निर्मम साक्षी*

  *सगळ्या सुखदुःखांचा*

  *अपूर्व त्या जीवन योगाचे*

  *रहस्यही पुरते नकळे !*


  *सर्व मानवी नात्यांना*

  *अति सुंदर केले त्याने* 

  *आयुष्याला अर्थ दिला*

  *रसभरल्या चैतन्याने*

  *काय म्हणावे ? काय नेमके*

  *द्यावे त्याला नाव ?*

  *काळाचा होता का स्वामी,* 

  *तो होता का देव ?*

  *गूढ निळ्या त्या अस्तित्वाचे*

  *रहस्यही पुरते नकळे !*


🌹🎼🌹🔆🎶🔆🌹🎼🌹 

  

  *गीत : अरुणा ढेरे*  ✍

  *संगीत : मिलिंद जोशी*

  *स्वर : श्रेया घोषाल*

  

  🎼🎶🎼🎶🎼    🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-२०.०९.२०२४-*


🌻🥀🌸🎼🌺🎼🌸🥀🌻

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi