पी के अत्रेंनी एकवेळ यशवंतराव यांना
निपुत्रिक म्हटले. ही टीका अंत्यत वाईट तर होतीच.पण १९६० साली महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाल्यावर केली होती. तरीही यशवंतराव यांनी एक चकार शब्द काढला नाही. त्यांनी एक फोन केला आणि अत्रेंना खुलासा करून म्हणाले, 'माझी पत्नी वेणू १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात असताना तिच्यावर इंग्रजांनी लाठी हल्ला केला, व त्यात तिचा गर्भपात झाला आणि गर्भाशय कायमचे निकामी झाले' यशवंतराव हे सांगताना ना अत्र्यांवर रागावले ना त्यांच्याबद्दल एकही अपशब्द काढला. मात्र त्यानंतर अत्रे थेट यशवंतरावांच्या घरी आले. अंत्यत भावनिक होत त्यांनी त्यांची व वेणूताई यांची माफी मागितली, पश्चाताप केला होता. वेणुताई अत्रेंना म्हणाल्या भाऊ त्यानिमित्ताने तरी घरी आला.असे उदगार काढले होते. तेव्हा अत्रेंना अश्रू अनावर झाले होते. आणि यशवंतरावांनी हसतमुखाने अत्रेंना माफ केले. ही महाराष्ट्रातील नेत्यांची त्या वेळेची (आजची नव्हे) संस्कृती होती. ती माणसे कुठल्या मातीने बनलेली असावीत ? हा यशवंतराव साहेबांचा महाराष्ट्र... आजची संस्कृती म्हणजे तुला चप्पलने मारतो, कानशिलात मारतो, कोथळा काढतो वगैरे वगैरे . आज यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी त्या निमित्ताने विशेष लेख🙏🙏🙏
#YashwantraoChavhan
#MaharashtraCM
#politicalikon

No comments:
Post a Comment