*कि जरा बरं वाटतं.....*
जाताना बरोबर काही नेणार नाही!
हे जरी सत्य असल तरी...
खात्यावर बऱ्यापैकी शिल्लक असली की जरा बरं वाटतं!!
वाटेत कुणी दिन दुबळा असाह्य दिसला की... चार नाणी खिशात असली की ती त्याच्या हातावर टेकवताना जरा बर वाटत!
हॉटेलिंग ची हौस फिटली असली तरी....
मित्र भेटला तर त्याच्या बरोबर गप्पा मारायला हॉटेलात बसण्या इतपत चार पैसे केव्हाही जवळ असले की जरा बरं वाटतं!
कपडालत्ता दागदागिने नकोसे वाटू लागले तरी... मुलाबाळा साठी, नातवंडासाठी मनाजोगा खर्च करण्या इतकी ऐपत असली की जरा बरं वाटतं!
बरोबर काही न्यायचं नसल तरी .....
शेवट पर्यंत हातात चार पैसे खुळखुळत असले की,जरा बरं वाटतं!!
साठी पार केलीत?अजिबात वाटत नाही!अस कुणी म्हटल की जरा बरं वाटतं!
मित्रांसोबत रात्रभर पार्टी केली तरी...
घरी कुणीतरी आपली वाट पाहतंय हे जाणवलं की,जरा बरं वाटतं!
जाताना बरोबर काहीच जाणार नाही हे माहीत असल तरी...
आहे तोपर्यंत जे जे शक्य ते उपभोगुन घेतलं की,जरा बरं वाटतं!
पुढे दवा डॉक्टर काय वाढून ठेवलंय माहीत नाही तरी...
दोन चार एफडी एखादी पॉलिसी असली की, जरा बरं वाटत!
साठी नंतर ही आपण मुला बाळांना भार नाही. माझ मला पुरेस आहे.अस म्हणण्या इतपत पुंजी गाठीशी असली की,जरा बरं वाटतं!
मी मेल्यावर मला काय करायचंय अस म्हटल तरी...
जाताना दुसऱ्यासाठी काही शिल्लक ठेऊन गेलं की,जाताना जरा बर वाटत!
गरजे पुरता संचय कर हे तत्वज्ञान ऐकायला बर वाटल तरी...
भविष्यात कशा कशाची गरज पडेल हे सांगता येत नाही!
म्हणून.....
सगळं काही इथच रहाणार,
जाताना काही आपल्या बरोबर नेता येणार नाही.हे जरी खर असल तरी...
अंगात ऊब आहे तो पर्यंत खिशाला ही ऊब असली की,
जरा बरं वाटतं!जरा बरं वाटतं!
*कोणी लिहिलं माहीत नाही पण वाचून जरा बर वाटलं…*
👍🏻🙏🏻👍🏻
No comments:
Post a Comment