Saturday, 29 March 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

पंढरपूर, दि.29 :-   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे  दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.  

यावेळी त्यांच्या समवेत पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सर्वश्री समाधान आवताडे, अभिजीत पाटील, गोपीचंद पडळकर, सचिन कल्याणशेट्टी, बाबासाहेब देशमुख, माजी आमदार राम सातपुते, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,  मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री तसेच मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.

तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यामध्ये श्री विठ्ठल गर्भगृह, श्री रुक्मिणी गर्भगृह, श्री विठ्ठल चारखांबी व सोळखांबी, बाजीराव पडसाळी, महालक्ष्मी मंदिर आदी ठिकाणची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.

00000000

मुख्यमंत्री यांच्याकडून परिचारक कुटुंबियांची सांत्वन पर भेट

                  पंढरपूर दिनांक 29: - माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे वडील प्रभाकर परिचारक यांचे मागील दोन महिन्यापूर्वी वृद्धापकाळाने निधन झालेले होते. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशांत परिचारक यांच्या पंढरपूर येथील निवासस्थानी त्यांची व कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

               यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सर्वश्री समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, गोपीचंद पडळकर, रणजीतसिंह मोहिते पाटील, बाबासाहेब देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi