मंत्रालयात राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ
मुंबई, दि. २३ : देशभर राष्ट्रीय मतदार दिन २५ जानेवारी रोजी साजरा केला जातो. यावर्षी राष्ट्रीय मतदार दिन रविवार, २५ जानेवारी २०२६ रोजी आहे. २३ जानेवारी रोजी मंत्रालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता यांनी उपस्थितांना मतदार दिनाची शपथ दिली.
२५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. भारत निवडणूक आयोगामार्फत देशामध्ये निष्पक्ष व पारदर्शकरित्या निवडणूकांचे संचालन करण्यात येते. २०११ पासून भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जात आहे.
मंत्रालयात आयोजित मुख्य सचिव कार्यालयाचे सह सचिव मकरंद देशमुख, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment