Friday, 23 January 2026

जनगणना 2027' अंतर्गत पहिल्या टप्प्यातील गृहगणना व घरयादी कामकाजाचे वेळापत्रक आणि प्रश्नावली जाहीर

 जनगणना 2027अंतर्गत पहिल्या टप्प्यातील गृहगणना व घरयादी कामकाजाचे

वेळापत्रक आणि प्रश्नावली जाहीर

        • शासकीय अधिसूचना जारी

 

नवी दिल्ली23 : देशातील 'जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून 1 एप्रिलपासून या मोहिमेला अधिकृतरित्या सुरुवात होणार आहे. या पहिल्या टप्प्यात 'घरयादीआणि 'गृहगणनाकेली जाणार असूनयासाठी सरकारने 33 प्रश्नांची यादी अधिसूचित केली आहे. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या दरम्यान आपल्या सोयीनुसार 30 दिवसांचा कालावधी निवडून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

 

या मोहिमेअंतर्गत नियुक्त केलेले प्रगणक घराघरात जाऊन घराची मालकीघराचा वापर आणि घराच्या बांधकामासाठी वापरलेले साहित्य (छप्परमजला इ.) याबद्दल माहिती घेतील. तसेच कुटुंबातील व्यक्तींची संख्याकुटुंब प्रमुखाचे नावलिंग आणि प्रमुखाची जात (अनुसूचित जातीअनुसूचित जमाती किंवा इतर) याविषयीचे प्रश्न विचारले जातील. घरामध्ये पिण्याच्या पाण्याचा स्रोत काय आहेस्वयंपाकासाठी एलपीजी किंवा पीएनजी जोडणी, विजेची व्यवस्थासांडपाणी निचराशौचालयाची उपलब्धता आहे कायाचीही नोंद केली जाणार आहे.

 

आधुनिक जीवनशैलीचा आढावा घेण्यासाठी यावेळी नागरिकांकडील इलेक्ट्रॉनिक साधनांचीही माहिती घेतली जाईल. यामध्ये रेडिओटेलिव्हिजनइंटरनेट सुविधालॅपटॉपसंगणकटेलिफोन आणि स्मार्टफोन यांचा समावेश आहे. त्यासोबतच कुटुंबाकडे कोणते वाहन आहे आणि आहारात कोणत्या मुख्य धान्याचा वापर होतोहे देखील प्रगणक विचारतील.

 

            जनगणनेच्या पुढील संवादासाठी नागरिकांचा मोबाईल क्रमांकही नोंदवला जाईल. विशेष म्हणजेप्रत्यक्ष प्रगणक घरी येण्यापूर्वी 15 दिवस नागरिकांना 'स्व-गणनाकरण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील ही गृहगणना सप्टेंबरपर्यंत पूर्ण झाल्यानंतरफेब्रुवारी 2027 मध्ये प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi