Friday, 7 November 2025

आरोग्याची जनजागृती कार्यक्रमात लसीकरणाचे वेळापत्रक, स्वच्छता, आयर्न-फॉलिक ॲसिडचे महत्व, ॲनिमिया प्रतिबंध इत्यादी

 या मेळाव्याच्या माध्यमातून बालकांशी संवाद साधण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. मुलांना विविध मुखवटे व टोपी घालून त्यांना आरशासमोर उभे केले जाते. जेणेकरून त्यांना स्वत:चा चेहरा पाहता येतो. अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून संवाद वाढवणेमेंदूचा विकाससामाजिक आणि भावनिक वाढ होण्यास मदत होते. याचबरोबर ब्रेन वायरिंग खेळाच्या माध्यमातून खेळ अनुभव आणि संवेदनाच्या आधारे मेंदूच्या न्यूरल कनेक्शनच्या निर्मिर्तीचे महत्त्व समजावतो. मुलाचा मेंदू पहिल्या १००० दिवसात सर्वाधिक वाढते म्हणून या काळात स्पर्शसंवाद आणि खेळ यावर भर दिला जातो. पालक मेळाव्यात मुलांसाठी बाहूली घर तयार केले जाते. यामध्ये कल्पनाशक्तीचा वापर करून खेळ खेळवले जातात. यामुळे त्यांच्या सामाजिकभावनिक आणि बौद्धिक विकासाला चालना मिळते. पौष्टिक पोषण अंतर्गत सहा महिन्यांपर्यंत आणि त्यानंतरचे अन्न कसे असावे हे दाखवले जाते. तसेच जंक फुडचे दुष्परिणाम आणि स्थानिक फळभाज्यांचा उपयोग सांगितला जातो.

याचबरोबर आरोग्याची जनजागृती कार्यक्रमात लसीकरणाचे वेळापत्रकस्वच्छताआयर्न-फॉलिक ॲसिडचे महत्वॲनिमिया प्रतिबंध इत्यादी माहिती वैद्यकीय अधिकारीआशा वर्कर यांच्यामार्फत करण्यात येते.

पालक हेच मुलांचे पहिले शिक्षक असताततीन वर्षांच्या वयातील विकास हा आयुष्यभरासाठीचा पाया घालतो. मुलांशी संवादप्रेम आणि संधी दिल्यास त्यांचा मेंदूलक्ष आणि स्मरणशक्ती जलद वाढते. प्रोत्साहन हेच सर्वांत मोठे शिक्षण आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi