मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक स्टार्टअप कार्यरत आहेत. अधिकाधिक स्टार्टअपला परिषदेत सहभागी करून घ्यावे. जेणेकरून परिषदेमध्ये या क्षेत्रात होणाऱ्या नवनवीन संशोधनावर आधारित चर्चांमधून कर्करोगासारख्या आजारांवर सहज, सोपी आणि परवडणारी उपचार पद्धती विकसित करण्यात स्टार्टअपला मदत होईल.वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक गुंतवणूकदार या परिषदेत सहभागी होतील याबाबत दक्षता घ्यावी, त्यांच्या माध्यमातून राज्यात होत असलेल्या 'बल्क ड्रग पार्क' मध्ये गुंतवणूक होईल, यासाठी प्रयत्न करावे. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित विभागांनी नोडल अधिकारी नियुक्त करावेत. सबंधित विभागांनी समन्वयाने काम करीत परिषदेच्या आयोजनातून राज्याला वैद्यकीय क्षेत्रात मोठा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
No comments:
Post a Comment