‘कॅन्सरमुक्त महाराष्ट्रा’चा राज्य शासनाचा निर्धार
-आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई दि. 26 :- सार्वजनिक आरोग्य विभाग व टाटा कॅन्सर हॉस्पिटल यांच्य संयुक्त प्रयत्नांतून ‘कॅन्सर मुक्त महाराष्ट्रा’चा संकल्प सिद्धिस नेऊया असे आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी त्यांनी विविध विभागाची पाहणी केली. आधुनिक कॅन्सर उपचार पद्धतीची माहिती घेतली. टाटा मेमोरियल सेंटरचे ऑल इंडिया डायरेक्टर डॉ. सुदीप गुप्ता, टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबईचे डायरेक्टर डॉ. सी. एस.प्रमेश, डेप्युटी डायरेक्टर श्रीखंडे, डेप्युटी डायरेक्टर सिद्धनाथ लष्कर, रुग्णालय सुपरिटेन्डन्ट डॉ. विनीत सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, अलीकडच्या काळात कॅन्सर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनेही राज्यभर कॅन्सर तपासणी व उपचार मोहीम राबवली जात आहे. टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून कॅन्सर निर्मूलनासाठीचे चांगले काम सुरु आहे.
No comments:
Post a Comment