Thursday, 27 November 2025

अध्यक्ष म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा जगातील सर्वात मोठ्या निवडणुकांचे आयोजन करण्यातील

 अध्यक्ष म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा जगातील सर्वात मोठ्या निवडणुकांचे आयोजन करण्यातील भारताचा अनुभव हा संस्थेच्या जागतिक कार्ययोजनेत वापरण्याचा मानस आहे. निवडणूक व्यवस्थापन संस्था यांच्यात ज्ञान-विनिमयव्यावसायिक नेटवर्किंग आणि पुराव्यावर आधारित जागतिक निवडणूक सुधारणा यांना या सहकार्यातून गती मिळणार आहे.

जवळपास एक अब्ज मतदार असलेल्या भारताची पारदर्शक आणि सुबद्ध निवडणूक प्रक्रिया ही जगासाठी आदर्श मानली जाते. आगामी वर्षभर भारत आपल्या उत्तम पद्धती आणि अनुभव आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देणार आहे.

भारतीय निवडणूक आयोगाच्या प्रशिक्षण संस्था (इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमॉक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (आयआयडीईएम) ) आणि आयडीईए यांच्यात संयुक्त कार्यक्रमकार्यशाळा आणि संशोधन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दिशाभूल करणारी माहितीनिवडणूक हिंसाचार आणि मतदारांचा विश्वास कमी होणेया जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ही भागीदारी अधिक प्रभावी ठरणार आहे.

स्थापनेपासून आयआयडीईएम ने भारतासह जगभरातील निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. संस्थेने आतापर्यंत 28 देशांबरोबर सामंजस्य करार केले असून 142 देशांतील 3169 निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली इसीआय आणि (आयडीईए) एकत्रितपणे भारताच्या तांत्रिक व प्रशासकीय नवकल्पना आणि सर्वोत्तम पद्धतींचे जागतिक स्तरावर दस्तऐवजीकरण व प्रसार करण्याचे काम पुढे नेणार आहेतअसे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धापत्रकाद्वारे कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi