Friday, 9 January 2026

राज्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्या सोबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्लीत बैठक

 राज्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्या सोबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्लीत बैठक

 

जनऔषधीक्षयरोग निर्मूलनाला व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामाला गती देणार

 

मुंबईदि. 4 - राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा व राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्ली येथे महत्त्वपूर्ण आढावा संपन्न झाली.

 या बैठकीत राज्यातील राष्ट्रीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणेसार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणेआणि रुग्णकेंद्रित सेवा देणे बाबत चर्चा करण्यात आली.

बैठकी दरम्यान नागरिकांना दर्जेदार व परवडणाऱ्या दरात औषधे सहज उपलब्ध व्हावीतयासाठी प्रत्येक जिल्हा रुग्णालयात जनऔषधी केंद्र आणि अमृत फार्मसींचे जाळे राज्यात अधिक विस्तारण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी दिल्या. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रुग्णांवरील औषध खर्चाचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi